|
Pama
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:56 pm: |
|
|
चाव्यांच्या जुडग्यातली बरोबर चावी शोधत, एका हातात पोष्टातून आलेला कागदांचा गठ्ठा सांभाळत आणि ऑफिसची bag धरत मी दरवाज्याशी उभा होतो. तेव्हढ्यात कुणीतरी दार उघडून बाहेर आल. मी पटकन आत शिरलो. कुणीतरी भारतीय मुलगा दिसला. या इमारतीच्या तळ मजल्यावर कुणीतरी भारतीय राहतो हे पोष्टाच्या पेटीवरील नावावरून माहीत होत. पण बघितल कधीच नव्हत. तसही ५ व्या मजल्यावर जाता येताना फारस कुणी खालच्या मजल्यांवरच दिसतच नाही. क्षणात मला जाणवल कि आपण हसलो देखील नाही त्याच्याकडे बघून. मी पटकन मागे वळून बघितल पण तेवढ्यात तो दिसेनासाही झाला होता. अमेरिकेत एक भारतीय दुसर्याकडे बघून साध हसतही नाही हे मत पुन्हा एकदा पक्क करत मी लिफ्ट कडे वळलो. पुढे बरेच दिवस तो कधी दिसला नाही. एके दिवशी दारावर थाप आली तस मी आतूनच विचारल, " Who is it?" पुन्हा दरावर नुसतीच थाप, उत्तर नाही. मी चडफडत जाऊन साखळी घालूनच दार जरास उघडून बघितल. समोराच्याला मी क्षणभर ओळखल नाही, पण तोच होता आस उगाच वाटल. तस त्याला कधीच नीट बघितल नव्हत त्यामुळे सांगता येण कठिण होत. " मी तळ मजल्यावर राहतो. भेटायच होत जरा, येऊ का?" त्यानी इंग्रजीत प्रश्न टाकला. नाही म्हणण्याचा उर्मट पणा बरा नव्हे केवळ म्हणून, ये म्हणालो. सावळा रंग, मध्यम बांधा, जरासे कुरळे पण नीट बसवलेले केस. स्वच्छ आणि नीट नेटके कपडे. मी पुढे काही बोलायच्या आत तो आत शिरला होता. मला जरा रागच आला. "बस", म्हणून दाराजवळच्या खुर्चीकडे मी खूण केली. त्याच नाव सांगण्यापासून त्याने सुरवात केली. माझ नाव त्याला आधीच माहीत होत. बहुदा पोष्टाच्या पेटीवर बघितल असेल असे मनात म्हणून त्याच नक्की काय काम असेल याचा विचार करायला लागलो. "मी इथे २ वर्ष राहतोय. पण तुम्हाला माहीत असेलच, माझा अगदी काही त्रास नाही कुणाला. शांततेत मी आणि माझी बायको आम्ही दोघे राहतो. कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही." मला कसलाच बोध होईना. याला नक्की काय हवय? इतकी प्रस्तावना तो का करतोय याची आता उत्सुकता लागली. तेव्हढ्यात बयको बाहेर आली. जुजब ओळख करून देताच ती कॉफी करायला आत गेली. पाचच मिनिटात त्याच्यासमोर कॉफीचा गरम गरम कप ठेऊन ती जायला वळली तसा त्यानी तिच्याशी बोलायला सुरवात केली. " तुम्ही माझ्या बायकोला भेटल्या होतात नं? कशी वाटली ती?" मी अधिकच बुचकळ्यात पडलो. ही आणि कधी भेटली त्याच्या बायकोला? " तस मी एक दोनदाच बघितलय तिला. laundry नेता आणतना. बाकी तशी मी काही तिला फारशी ओळखत नाही." इतकच म्हणून ती आत निघून गेली. त्या नंतर तो बराच वेळ स्वता: बद्दल आणि बायको बद्दल बोलत होता. त्यांच लग्न, अमेरिकेत येण बायकोची नोकरीची शोधाशोध सर्व काही त्यानी सविस्तर सांगितल. माझा धीर सुटत चालला होता. हे सगळ काय चाललय आणि तो हे सगळ मला का सांगतोय ते काही कळेना. शेवटी न राहवून मी विचारल, "ते सगळ ठीक आहे, पण हे तू मला का सांगतो आहेस?" " मला जरा तुमची मदत हवी होती. काय झालय कि माझी बायको मागच्या आठवड्यात घर सोडून निघून गेलीय. तिने पोलीस पाठवले होते आणी माझ्या वर छळाची केस केलीय. आता तुमच्या सारखे लोकच मला यातून सोडवू शकतात. मी काही तिला हातसुद्धा लावला नव्हता कधी. मी तिला मारतो अशी तक्रार केली आहे आणि चेहेर्यावर झालेल्या जखमाही दाखवल्या आहेत. मला अगदीच काय कराव सुचत नाहीया." मी सुन्न होऊन एकत होतो. एखाद्या चित्रपटाची कथातर एकत नाही ना आपण? काय बोलाव सुचेना. काय मदत करणार मी याला? " हे पहा, माझ्या काही पोलीस मधे वगैरे ओळखी नाहीत मी काय मदत करणार यात?" " काही नाही, तुम्ही पोलीसात इतकच सांगायच कि तुम्ही कधी आमच्या घरून भांडणाचे ओरडा-आरडीचे आवाज ऐकले नाहीता. कधी आमच्या बद्दल तुमची तक्रार नाही. बरोबरच म्हणतोय न मी?" "नाही, ते खर आहे, पण आपण या आधी कधी भेटलोही नाही, मग मी हे अस.." " मी दुसर काही करू शकत नाही हो! आजूबाजूच्या लोकांनी साक्ष दिली कि यांच्यात अस काही नव्हत, तर ती चुकीच सांगतेय, मनाच सांगतेय अस सिद्ध होईल आणि केस आपोआप बारगळेल. खालच्या मजल्यावरचे आणखी काही लोक अगदी तयार आहेत ही साक्ष द्यायला. तुम्ही भारतीय म्हणून नक्की मदत कराल माझ्या कठिण प्रसंगी, माझी खात्री आहे." " मी तुम्हाला मदत करेन, पण साक्ष बिक्ष काही देता येणार नाही. माझे काही वकील आहेत ओळखीचे, त्यांची भेट घालून देईन. ते योग्य ते मार्गदर्शन करतील तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका." " अहो नका कशी म्हणता, मला धरून सरळ जेल मधे घालतील ना!" " इतक सोप नसत हो ते, उगाच आपले कुणालाही उचलून जेलमधे घालत नाहीत. तुम्ही थांबा मी आत्ताच फोन लावतो माझ्या ओळखीच्या वकिलांना." अपूर्ण:
|
Amruta
| |
| Wednesday, November 28, 2007 - 7:21 pm: |
|
|
hmmm intresting खरच साधा आहे का तो?? लवकर सांग
|
Pama
| |
| Wednesday, November 28, 2007 - 7:48 pm: |
|
|
मी ताबडतोब माझ्या ओळखीच्या एका वकीलांना फोन केला. नेमके ते त्याचीच भाष बोलणारे निघाले. उद्या coffee house मधे भेट म्हणाले. त्याच्या जरा जिवात जीव आल्या सारख वाटल. दुसर्या दिवशी त्याच्या बरोबर वकीलांना भेटायला जाण्याच कबूल करून त्याला निरोप दिला. " काही तरी उगाच लावून घेऊ नका मागे. ओळख नाही पाळख नाही, उगाच दुसर्यांच्या भानगडीत पडू नका." दार लावताच बायकोचा सल्ला कानावर पडला. " अग अस कस म्हणतेस? मी काय पोलीसात जात नाही त्याची साक्ष द्यायला, पण ओळखी आहेत आपल्या त्याचा झाला बिचार्याला उपयोग तर काय बिघडल?" " बघा बाबा, आपल्या गळ्यात नसती भानगड नको!" किती सहज म्हणून गेली.. आपल्या गळ्यात भानगड नको. माझ्या मनात उलट सुलट विचारांच रणच माजल. बराच वेळ रात्री विचार करत होतो. अस कस कुणी करू शकत. ज्याच्या बरोबर साता जन्माच्या शपथा घेतल्या, त्याच्यावर असले आळ? तेही थेट पोलीसात तिचा work visa मागच्याच महिन्यात आला होता म्हणाला. त्याचा सारा खर्च यानेच केला. इतकी आतल्या गाठीची असतात लोक. त्याच काम झाल्यावर असा मर्ग शोधला त्याच्या पासून सुटण्याचा? मला कहीच सुचेना. कुरबुरी कुणाच्या संसारात नसतात? म्हणून हे अस कराव? तेही या परक्या देशात परक्या लोकांच्यात? आता म्हणे मैत्रिणीकडे राहतेय तिच्या. देवा, मदत कर रे त्याची... दुसर्या दिवशी ठरल्या प्रमाणे coffee House मधे वकीलांना भेटलो. त्यांच्या भाषेत दोघे बरच काही बोलत होते. मतितार्थ इतकाच कि अस लगेच त्याला उचलून जेल मधे टाकणार नाहीत. चौकशी होईल, कोर्टात तारीख निघेल आणि कोर्टाला पटल तरच केस पुढे जाईल. त्यामुळे त्याला फारस काळजी करण्याच कारण नव्हत. फक्त त्याच्या बाजूने जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे. वकील गेल्यावर त्याला म्हटल," नाहीतरी तुझ्या बाजूनी साक्ष द्यायला तयार आहेत ना काही लोक, मग तू कशाला काळजी करतोस?" " आज गेलो होतो पहिल्या मजल्यावरच्या त्या बाईंकडे, तेव्हा पोलीसात येणार नाही म्हणाल्या. " मग तुझ्या घरच्यांपैकी कुणाला का बोलवत नाहीस? ते देतील साक्ष." " आई असते माझी घरी फक्त, तिला लगेच येण कदाचित जमणार नाही. पण मी प्रयत्न करीन." का कुणास ठाऊक, पण आज त्याच्याशी बोलून मला जरा विचित्र वाटल. खर म्हणजे काय माहीत होत मला त्याच्या बद्दल? तो तर माझ्यासाठी अजूनही त्रयस्थच होता. दोनचारदा भेटून एखादा माणूस कळू शकतो? त्या नंतर मी त्याला अनेकदा भेटलो. 'तुमच्या' वरून आम्ही कधीच 'तुझ्या' वर आलो होतो. कधी माझ्या घरी बसून तो त्याच्याबद्दल बोलायचा तर कधी coffee shop मधे बसून बयकोनी कस कस छळल त्याला ते सांगायचा. तासनतास तिच कुणाकुणा मित्र मैत्रिणींशी बोलण, आधी आधी प्रेमानी वागणारी, नंतर जराजराश्या कारणावरून चिडचिड करायची. सारखी तिच्या घरी याची तक्रार करायची. नंतर नंतर भांडण उकरून काढायची, आदळ आपट करायची, ओरडा आरडी करायची... हे ऐकल मात्र आणि माझ्या मनात शंकेची पाल मोठ्याने चुकचुकली. पण मी बोललो काही नाही. काय बोलणार? त्याच्या घरासमोर राहणार एक जोडप ओळखीच होत. मुलगा जितका शांत, तितकीच त्याची बायको बडबडी. येता जाता, " काय कस का?" वरून आम्ही आता ५-१० मिनिट जिन्याशी थांबून अवांतर गप्पा मारू लागलो होतो. एक दिवस वर जाताना मागून हाक आली. अवांतर गप्पा झाल्यावर ती हळूच म्हणाली, "तू ओळखतोस या समोरच्याला? फारच rude आहे तो. कधी हसत नाही बोलत नाही आणि नेहमी धाडकन तोंडावर दार लावतो. " मग अगदी खाजगित सांगितल्या सारख करून म्हणाली," मारायचा बायकोला वाट्ट रोज, नेहमी भांडणांचा आवाज. एक दिवस बोलवल मी पोलीसांना, चांगल चोपल होत बहुतेक बायकोला, चांगलीच काळीनिळी पडली होती. बिच्चारी! पोलीसांनी धमकावल त्याला आणि बायकोला दिल मैत्रिणीकडे पाठवून. " माझ्या पायाखालून जमीनच सरकली. म्हणजे.. हिला माहीत आहे सगळ, हिनी एकलेत भांडणाचे आवाज? पोलीस पण हिनीच बोलावले? मग मला जे त्यानी सांगितल ते काय होत? अपूर्ण:
|
Pama
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:05 pm: |
|
|
मी घरी येऊन मटकन खुर्चीत बसलो. कुणाच खर आणि कुणाच खोट. कोण बरोबर आणि कोण चूक. मला काही समजेनास झाल. मला कस काही ऐकू आल नाही पोलीस आलेले? पण ती सांगतेय तर बरोबर असणार. ती कशाला मला काही बाही सांगत बसेल? आणि तिनी बघितल म्हणजे आणखीनही लोकांनी बघितल असणारच नां? मग हे सगळ तो स्वता:ला वाचवण्यासाठी करतोय? खरच मारत असेल तो बायकोला? नक्की कुणी कुणाचा छळ सहन केला? तो माझ्या समोर तरी होता. त्याच्या बायकोला मी बघितल देखील नव्हत. किती सोईस्कर रित्या मी चूक तिच्यावर ढकलून मोकळा झालो होतो. मला माझीच लाज वाटली. मी इतके दिवस एका अपराध्याला मदत करत होतो? अपराधी? हे पण मीच ठरवून मोकळा झालो. पण मग तिची चूक नसेल तर याची असणारच! बरेच दिवस काहीच घडल नाही. तो मला दिसलाच नाही. एक दिवस परत अचानक घरी आला. कोर्टाची नोटीस आली म्हणाला. पहिली तारीख पण पडली. पण बायको आलीच नाही. म्हणाला," बघ मी म्हणत नव्हतो.. सगळ मनाच सांगतेय ती. आता येतच नाही." माझ मन पुन्हा हिंदोळत होत. शेवटी मी विचारच त्याला, " मी तर ऐकल की त्या दिवशी तू मारलस तिला आणि शेजारच्या घरातून कुणीतरी आवाज ऐकून पोलीस बोलावले?" " खोट आहे सगळ! हो, भांडण झाल आमच. किती सहन करणार मी? माझी मर्यादा सुटली आणि फाडफाड बोललो मी तिला. ती हातात काहीतरी घेऊन धावली माझ्यावर, मी तिला ढकलली, तेव्हा दारावर आपटली ती. पोलीसांना तेच व्रण दाखवले तिनी. मी काहीही सांगितल तर कोण विश्वास ठेवणार माझ्यावर?" खरच ठेऊ विश्वास त्याच्यावर? का नको ठेऊ? मी तर केवळ एक त्रयस्थ होतो. ज्याच त्याच्याशी न काही घेण न देण. कुठल्या आधारावर मी निष्कर्ष काढू? काढू तरी का? मी कुणी वकील नव्हतो कि जज नव्हतो. मला कुणाला शिक्षा सुनावायची नव्हती. मी काढ लेल्या निष्कर्षावरून कुणाचे काय बिघडणर होते? एक घर तुटल्याची हळहळ होती. मदत करावी म्हटल तर कुणाला करावी? चूक तिची नसेल तर त्याचीच असणार, हे तरी बरोबर असेल कशावरून? दोघेही चूक असतील आणि दोघेही बरोबर. पण हे ठरवणारा मी कोण? उगाच यात पडू नको, अस व्यवहारी मनानी कितीही बजावल, तरी ते कधी कधी जमत नाही. अशा वेळी त्रयस्थ असण्यातच फायदा असतो. त्या दिवसा नंतर तो पुन्हा बरेच दिवस दिसला नाही. एक दिवस मीच त्याच दार वाजवल. बर्याच वेळाने त्याने दार उघडल, साखळी लावून. केसच काय झाल इतकच विचारायच होत मला. चालू आहे, अजून काही झाल नाही इतकच जुजबी उत्तर मिळाल. त्याच्या समोरच्या घरातली ती पुन्हा भेटली होती. "परवा रात्री दोन कुठल्याशा मुली घेऊन आला होता. आम्ही घरात जात होतो तर एकीने माझ्या नवर्याला चक्क डोळा मारला, आता बोल!" मी काय बोलणार होतो? शेवटी इतकच कळल कि त्याला घर सोडून जाण्या साठी घरमालकानी नोटीस दिलीय. तो कधी घर सोडून गेला ते ही कळल नाही. या घटनेला आज बराच काळ लोटलाय. त्याच पुढे काय झाल ते कधीच कळल नाही. त्यामुळे काही काही अडल नाही. कारण मी एक त्रयस्थ होतो. पण मी न पाहिलेल्या तिनी आणि पाहिलेल्या त्यानी माझ्या मनात खोल कुठेतरी, पानगळीतल एक इवलस पान गरगरत याव, तसा शिरकाव केला. त्यावर काळाच्या ओघात अनेक उन्हाळे पावसाळे बरसतील आणि ते अनुभवांच्या पुटांखाली ते दडपून जाईल. आणि मी पुन्हा एकदा नव्याने या माझ्या अनुभवाकडे बघीन--- त्रयस्थ होऊन! समाप्त.
|
Gsumit
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:03 pm: |
|
|
चांगली कथा... छोटी पण आशयपुर्ण... नायकाच्या मनाचे खेळ मस्तच जमलेयत... माझेपण बर्याच वेळेस अशे उलटे पालटे विचार चाललेले असतात... अन नंतर त्याचच हसु येत... गोष्ट आवडेश...
|
Amruta
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:19 pm: |
|
|
छान आहे गोष्ट...शेवटच्या ओळी मस्तच... आजच पुर्ण वाचायला मिळाली म्हणुन अजुन जास्त आवडली.
|
Daad
| |
| Thursday, November 29, 2007 - 12:05 am: |
|
|
पमा, त्रयस्थ आवडली. आपल्या नायकाचे विचार... आधी हात राखुन चौकशी मग थोडं involve होणं, आणि परत बाजूला सरणं.... छोटी पण विचार करायला लावणारी कथा. आपल्या रोजच्या आयुष्यात असे कुणाबद्दलतरी jusgemental निर्णय घेतो आपण. ते चुकतात तेव्हा बजावतो की, "त्रयस्थ" होतो तेच बरय.... "त्रयस्थच" रहायचं यापुढे बरं का.... पण पुन्हा कुठ्ल्यातरी दुसर्या गुंत्यात ओढले जातो... आधी त्रयस्थ म्हणूनच. मस्त गोष्टं... अगदी आवडली.
|
Manuswini
| |
| Thursday, November 29, 2007 - 1:31 am: |
|
|
असेच एक सेम उदाहरण होते जेव्हा मी NJ ला रहायचे. मी first floor (म्हणजे आपले ground floor ), अशीच एक चुगलखोर बाई जी फक्त घरी बसून कोण आले,गेले, कोण गाडी कुठे park करते, कोण कीती वाजता ऑफ़ीसला जाते वगैरे वगैरे चा हिसाब ठेवणारी दुसर्या मजल्याला रहायची.(अश्य बायकांना बाजूच्या apt मधल्यानी आता नवीन Honda civic घेतली पासून सर्व खबरा असतात. नवरे ऑफ़ीसमधेय असतात ना तर ह्यांना काम काय. कधी मी दिसले तर अगदी जबरदस्तीने थांबून सगळ्या माझ्या चौकश्या करत बाजूच्या apt मध्ये आता नवीन कोण रहायला आले,गेले,कुणाचे आई वडील आलेत, कुणाचा GC झालेय ही info . I don’t understand what they do with such info? How does it matter to them?? असो. तिच्या वर एक भारतीय बाई रहायची. माझे आपले रोज सकाळी सातला जा, घरी सात - आठला परत ह्याच्यात कुणाशी बोलायला वेळ नसे आणि इच्छा सुद्धा नसे. साधारण तिसर्या मजल्यावरील बाईला सुद्धा ह्याच वेळेला घरी येताना पाहीले होते नी दुसरे म्हणजे ती माझ्याच बाजूला गाडी park करायची.(ही माझी गाडी park करायची fav जागा होती. चुगलखोर बाई असेच मला सांगायची वरची बद्दल की तीचा नुकताच divorce झालाय. त्यांची खुप भांडणे व्हायची,हीला एकायला यायची, तीचा ex-husband त्यांच्या मुलीला भेटायला येतो आता. अजून custody case चालु आहे वगैरे माहीती, अगदी मी विचारली नसताना. पण मी म्हणायची हीला काय काम. कोण विश्वास ठेवणार हीच्यावर. ज़री मी कधी विषेश तिसर्यामजल्यावरील ह्या बाईशी बोलले नाही तरी चेहयावरून शांत वगैरे वाटायची. एक दिवस घरून काम करत होते. बाहेर बर्फ़ पडत होता म्हटले गाडी दुसरीकडे park करुया म्हणून बाहेर आले तर बाहेरच्या दरवाज्यात ( NJ ला दोन entrance दरवाजे असतात)ही तिसर्या मजल्यावरील बाई खाली पडलेली,ओठ फुटलेले वगैरे, जवळपास बेशुद्ध होती. आधी selfish विचार केला की तसेच मागे घरात जावे. पण तीची अवस्था पाहून मग 911 dial केले. पोलीस आले चौकश्या झाल्या, मी कोण माझी काय ओळख, मी कुठल्या विसावर आहे. मी नेमकी तिथे काय करत होते. I was so sick n equally terrified ह्या प्रश्णांनी कारण I was the first witness . पोलीसाने report बनवून माझे फोटो, signature ठसे घेवून नोंद. वैतागले होते. तो पर्यन्त ही hospital मध्ये होती. नंतर कारण इतकेच कळले की weekend ला child access द्यायचा का नाही ह्यावरून तीचे ने नवर्याचे भांडण झाले होते. खरे काय,खोटे काय. माझी मात्र हालत मधल्या मध्ये. कानाला खडा लावलाय, मदत गेली खड्यात!
|
Psg
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:22 am: |
|
|
मदत गेली खड्यात! ... पण मनू, अशीच अजून एखादी जुजबी ओळख असलेली बाई तुला पुन्हा याच सिच्युएशनमधे दिसली, तर तू तिला मदत करशीलच ना? तसंच पुढे जाववेल का तुला? नाही जमत गं.. दाद म्हणली तसं.. कित्येक वेळा आपण स्वत:ला बजावतो की नसत्या फंदात पडायचं नाही, तरीही वेळ आली की आपसूक involve होतोच! सगळेच असे त्रयस्थ नाही राहू शकत. छान लिहिलं आहेस पमा. मनाचे हिंदोळे नेमके टीपलेस.
|
Manuswini
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:46 am: |
|
|
पूनम, अग अगदी तेच ग.. नाही जमत ग. आपली वृती एवढी थंड नाही ना होवु शकत. पण एकुण एकडचे legal complications बघताना खुप धोका आहे मदत करणे specially अश्या situations मध्ये हा माझ्या ह्या अनुभवातून सांगते........... मला बरेच दिवस कोर्टाच्या फेर्या घालायला लागल्या,कामाची सुट्टी घ्यावी लागली आणि नाही म्हणणे हा आणखी एक गुन्हा आहे इथे. मी तर तिच्या ना नवर्याला कधी आधी पाहीलेले ना मुलीला होते त्या आधी ना कधी ह्या बाईशी बोलले aprt from cold Hi at times . anyways ......... जसे दाद म्हणते तसे आपण आपोआप गुंतत जातो
|
>> दोघेही चूक असतील आणि दोघेही बरोबर. सही आहे गोष्ट पमा. माणसांमधले नातेसंबंध आणि त्यावर इतरांच्या डोक्यात चाललेले विचार अगाध असतात आणि खूपच कॉंप्लेक्स. छानच मांडलंयस ते सगळं.
|
Arc
| |
| Thursday, November 29, 2007 - 9:29 am: |
|
|
खरेच छान! खुप छान प्रसन्ग खुलविन्याच्या नावाखाली ( sorry to say ) खुप शब्दबंबाळ कथान्च्या पार्श्वभुमीवर तर खुपच छान.
|
Pama
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:13 pm: |
|
|
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या कथेच बीज पण सत्यकथेवर आधारित आहे. मनू, अगदी खर पण psg म्हणते तस, व्यवहारात कितीही ठरवल तरी आपण 'त्रयस्थ' म्हणू जगू शकत नाही.. जो असा जगू शकेल तो मी तर म्हणेन संतपदाला पोहचला. आपण सामान्य माणसं.. आपण काय करतोय हे जरी आपल्याला नीट कळल तरी खूप झाल. आपली सद्सदविवेकबुद्धी जागी ठेवून ' माणूस' म्हणून जरी आपण जगू शकलो तरी खूप मिळवल.
|
Chaffa
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:36 pm: |
|
|
कथा एकदम आवडली बाकी तांत्रीक बाबी मला फ़ारश्या कळत नाहीत पण शेवटपर्यंत वाचत रहावी अशीच आहे. फ़ार छान
|
छान आहे कथा,इथे खरच मदत करायला पण भिती वाटते.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 29, 2007 - 4:08 pm: |
|
|
पमा कथा आवडली. मदत करायला आपण सगळेच बिचकतो. अलीकडे सुप्रीम कोर्टाने एक निवेदन केले कि अपघातात मदत करताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी मदतकर्त्यावर नसून उपचार करणार्या डॉक्टरवर आहे. कथेतील एक छोटीशी तपशीलातली चूक. पोलिसांपुढे नोंदवली जाते ती जबानी वा स्टेटमेंट. साक्ष फक्त कोर्टातच होते, आणि आधी दिलेल्या जबानीनुसारच साक्ष द्यावी असे कुठलेही बंधन नाही. साक्ष शपथेवर घेतली जाते, जबानीसाठी अशी शपथ घेतली जात नाही.
|
पमा, मस्त.
|
Pama
| |
| Thursday, November 29, 2007 - 4:42 pm: |
|
|
दिनेशदा, तुमच बरोबर आहे. thanks मला जबानीच म्हणायच होत. स्वातू.. नुसतच सगळ्यांना मस्त, सुंदर लिहून काय..तू टाक आता कविता एक तरी.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:58 pm: |
|
|
अनुभव नेमक्या शब्दात पकडल्याने चांगला परिणाम साधला गेलाय..
|
जेंव्हा कोणी खुपच प्रॉब्लेममधे असेल आणि आपण त्याची मदत करु शकत असु तर कोणीही सज्जन त्याची मदत करतोच. मग पुर्वानुभव कसाही असो. आम्ही(मी आणि माझे मित्र) मदत केलेल्या अनेकांनी नंतर आमच्याच नावाने खडे फ़ोडले पण अजुनही कोणी प्रॉब्लेममधे असला तर आम्ही त्याची मदत करतोच. आधी ठरवले होते की काय उपयोग मदत करुन लोक लगेच विसरतात. पण जमत नाही तस करण. मी तर 'कर्मण्येवाधिकारस्से' या पध्दतीनेच मदत करतो.
|
Anaghavn
| |
| Saturday, December 01, 2007 - 9:02 am: |
|
|
मनु,तू म्हनतेस खरं की "या पुढे मदत गेली खड्ड्यात",पण मला खात्री वाटते की तुझं मन तुला असंच नाही जाऊ देणार पुढे.काहीतरी करण्याचा प्रयत्न तु करशीलंच. फक्त आपण काहीही करताना जमेल तेव्हढी काळजी घ्यायची. बाकी पमा, गोष्टं छान होती. अनघा
|
Shyamli
| |
| Monday, December 03, 2007 - 7:14 pm: |
|
|
पमा, सहि आहे कथा आवडल.
|
|
|