|
दुसर्या दिवशी पूजाला ऑफ़िसला जायला उशीरच झाला. वाशी स्टेशनवर उतरल्यावर तिने इकडे तिकडे पाहिलं.. पण शॅली इथे कशाला असेल? ऑफ़िसमधे गेल्यावर मात्र ती काल रात्रीची आठवण पार विसरली. अख्ख्या ऑफ़िसमधे अजीब खुशीचं वातावरण होतं. "काय झालं?" आल्या आल्या हातात मिठाई ठेवनार्या बॉयला तिने विचारलं. "नवीन कॉंट्रॅक्ट मिलाल" तो इतकंच म्हणाला. "काय?" तिने शर्मासराना विचारलं. "अरे हमारे एजन्सीको बीपीओ का कॉंट्रॅक्ट मिला है. वो भी यू एस का." "कब?" "डील तो बहुत पहले फ़ायनक हो चुकी थी. पर बोर्ड नही मान रहाथा. कल बॉसने सबको मनाया," "मतलब अपना एजन्सी बंद.?" पूजाने विचारलं. "अरे नही.. नही. हमारा काम तो चालू रहेगा. सिर्फ़ कुछ लोग कम होंगे" तितक्यात बॉय आला. "बॉस बहित खुश है आज. सुबहसे हन्सके बात कर रहा है और मेरेको तो थॅंक यु भी बोला.. लेकिन सुनाहै जिसका परफ़ॉर्मन्स नही उसको निकाल देंगे. ल" "मर गयी. मेरी सिर्फ़ पांच पॉलिसीज हो गयी. एक और.. चाहिये थी" "क्या बत कर रही हो? तुम्हारी तो सिक्स पॉलीसीज है." शर्मा सर तिचा रेकॉर्ड वाचत म्हणाले. "और माय गॉड. ये कैसे किया तुमने." कुठलं नाव वाचून शर्मा सर इतके उडाले आणि तिची पाचच्या सहा पॉलीसीज कशा झाल्या हे समजायच्या आत कुणीतरी तिला बोलावलं/ "पूजा.. पूजा... बॉसने बुलाया है," पहिल्यादा पूजा बॉसच्या केबिनकडे गेली. जाम घाबरली होती ती. नक्की कशाला बोलावलं असेल आणि तिचा जॉब जाणार का याची तिला धास्ती होती. का कुणास ठाऊक.. केबिनच्या दारात जातानाच तिची भिती निघून गेली. केबिनच दरवाजा किंचित उघडा होता. कालचीच जीन्स. कालचाच कुर्ता. तेच विस्कटलेले केस आणि खिडकीत पाठमोरी उभी राहून व्हायोलीनवर धुन वाजत होती. कुठली ते पूजालाही माहीत नव्हती. "शलाका.." केबिनमधे पाय ठेवत पूजा म्हणाली. "चोवीस तासाच्या आत.. " पाठी वळत शॅली हसत म्हणाली. (समाप्त)
|
Manjud
| |
| Thursday, December 06, 2007 - 12:09 pm: |
|
|
नंदिनी, नाही आवडली फारशी. तीट वगैरे नाही हं, खरीखुरी प्रतिक्रिया आहे ही.....
|
Meggi
| |
| Thursday, December 06, 2007 - 1:02 pm: |
|
|
नाही कळली ग कथा, शलीला suiside का करायची होती, त्याचा कथेशी संबंध नीट कळला नाही.
|
Tiu
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:57 pm: |
|
|
"पूजा, मला कुठलाही प्रॉब्लेम नाहिये, पर्सनल तर बिल्कुल नाही. पण मी माझ्या डॅडना दिलेल्या वचनाला जागत नाही आहे. मी आयुष्यात नापास होयेत, आणि... जाऊ दे.." >>> पर्सनल प्रॉब्लेम नाही! प्रोफेशनल पण वाटत नाही. कारण एजन्सी चांगली चालु आहे, मार्केट मधे नाव आहे, बिपीओचं कॉंट्रक्ट पण मिळालय...मग ती आयुष्याला इतकी का कंटाळलीये? कसलं वचन? कुछ समझ्या नही!
|
Mi_anu
| |
| Friday, December 07, 2007 - 3:49 am: |
|
|
कथेला दिलेली कलाटणी आवडली. मला पण इतरांसारखंच वाटत होतं की शॅली कॉलगर्ल असणार. कथा शेवट वाचल्यावर परत एकदा वाचली. आपलं किंवा वडिलांचं सुरुवातीचं स्वप्न कोपर्यात ठेवून नव्या धंद्यात तो जास्त चांगला चालतो म्हणून उतरावं लागणं यातलं फ्रस्ट्रेशनपण जाणवलं. आर्थर हलीच्या 'हॉटेल' मधे अशीच काहीशी परिस्थिती हॉटेलच्या वृद्ध मालकाची होते पण हॉटेल्च्या चटपटीत स्त्री मनेजरने एका वृद्धाची आपुलकीने घेतलेली काळजी त्या मालकाला वाचवते. तो वृद्ध एकदम श्रीमंत माणूस निघतो आणि हॉटेल एका माणूसकीशून्य माणसाला विकावं न लागवां म्हणून मदत करतो. पण कलाटणी द्यायची आहे या हिशोबाने काही गोष्टी मात्र मुद्दाम संदिग्ध केल्याच्या जाणवल्या. उदा. शलाकाच जर बॉस आहे तर "बॉस बहित खुश है आज. सुबहसे हन्सके बात कर रहा है और मेरेको तो थॅंक यु भी बोला.. लेकिन सुनाहै जिसका परफ़ॉर्मन्स नही उसको निकाल देंगे. ल" यात पुल्लिंग का आहे? आणि हे वाक्य शर्मांबद्दल होते असे मानले तर 'पहिल्यांदा पूजा बॉसच्या केबिनकडे गेली' या वाक्यात मुख्य बॉसला का रेफर केले आहे? जरी बॉस हा शब्द बॉस आणि बॉसचा बॉस या दोघांबद्दल वापरत असले तरी या केसमध्ये संदिग्धता टाळायला शर्मांना पी एल वगैरे आणि शलाकाला बॉस म्हणून वेगवेगळे उल्लेख करता आले असते. (या सर्व वाक्यांना 'असे मला वाटते हं' चे शेपूट जोडून वाचावे.शहाणपणा शिकवण्याचा हेतू नाही.) पण कथेतली कलाटणी आवडली. मला क्यांडी मधला अर्धचंद्र का टंकता येत नाहिये? के ए डॉट सी टंकून प्रिव्ह्यू मधे तो दिसतो पण पोस्ट केल्यावर गायब होतो आहे.
|
Adm
| |
| Friday, December 07, 2007 - 5:49 am: |
|
|
नाही कळली.. नंदिनी जरा समजावणार का?
|
Swa_26
| |
| Friday, December 07, 2007 - 6:49 am: |
|
|
ए नंदिनी, मला पण नाही गं झेपली कथा!!
|
Manjud
| |
| Friday, December 07, 2007 - 7:29 am: |
|
|
अनु, कॅंडी असे लिहून बघ kE.nDI = कॅंडी
|
नंदु,शेवटचं धक्कातंत्र चांगलं वापरलयस.. पण मांडणी थोडी गोंधळात टाकल्यासारखी केली आहेस असं वाटतय त्यामुळे लोकांच्या पल्ले पडत नाहीये लगेच
|
कथा 'नो स्मोकिंग' स्टाईलची आहे काय??
|
Rashmee
| |
| Friday, December 07, 2007 - 4:19 pm: |
|
|
अगदिच कै च्या कै आहे....काहिच कळली नाही...
|
आयला. का समजली नाही म्हणून मी परत एकदा वाचून काढली. एक अख्खी पोस्टच लिहिलेली नाहीये. मॉड्स आता काही करता येईल का? कारण आता बीबीला टाळं लागेल महिना संपला ना....
|
Anaghavn
| |
| Monday, December 10, 2007 - 4:39 am: |
|
|
नन्दु,मी माझी प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला कथा तर समजली होती,पण असं वाटलं की कदाचित माझी समज कमी पडत असेल.. (हे मी मनापासून लिहित आहे.) पण आता मात्र मी मनपासून तुझ्या राहीलेल्या post ही वाट पहात आहे. अनघा
|
|
|