खरंच... मी हरवतेय.. कुठून माहीत नाही. कशी माहीत नाही. कधी तेही माहीत नाही. पण मी हरवतेय. स्वत्:पासुन स्वत्:ला, भलं मोठं सामान घेऊन चालले होते. त्याने विचारलं मदत करू? रूमच्या त्या टोकाला उभं राहून म्हटलं नको, माझं ओझं आहे. मलाच उचलायला हवं.. त्याक्षणी जाणवलं.. त्याच्यापासुन मी हरवतेय.. त्याच्याही नकळत.. मनात वाटलं तो म्हणेल.. "वेडे, तू का माझ्यापेक्षा वेगळी आहेस का गं. " पण तो खिडकीच्या बाहेर बघत उभा राहिला. एक नातं हरवत गेलय.. दोघाच्याही नकळत. एकटं एकटं वाटतं सतत.. माणसाच्या घोळक्यामधे पण.. खचाखच भरलेल्या लोकलमधे श्वास घ्यायला फ़ुरसत नसते, माझ्या डोळ्यासमोर एक चिता धगधगत पेटलेली असते. आणि त्या चितेवर मीच असते. स्वत्:ला आग लावत. थंड डोक्याने स्वत्:ला किंचाळताना बघत... कुठलं तरी स्टेशन आलय बहुधा.. लोक चढतात उतरतात. ओरडतात. हाक मारतात. मी मात्र जळत राहते. स्वत्:ला पेटवत राहते. आईचा फोन आलाय. हे एक बरं असतं.. मनातली ठसठसती जखम फ़क्त तिला जाणवते. दिसत नाही. मला सांगता येत नाही. पण वेदनेला तिचा पत्ता समजतो. डोळ्यातलं पाणी दिसत नाही. काळजामधलं भळभळतं रक्त दिसतं.... तसं बघायला गेलं तर बदललं काहीच नाही. सगळं जसंच्या तसं आहे. मग मलाच का वेगळं वाटतय? वेगळं दिसतय? वेगळं जाणवतय? खूप उत्साही होते मी इतकं आठवतय मलापण. पण म्हणजे नक्की काय करायचे ते मात्र आठवत नाही. किती वर्षापूर्वी तेही आठवत नाही. काळ कसा सरलाय तेच आठवत नाहिये तर पुढचं काय बोलणार? पण इतकी तर माझी स्मरणशक्ती वाईट नव्हती. पण आता आठवण्यासारखंच काही शिल्लक नाहिये. त्यादिवशी ऑफ़िसमधे बॉयला चहा आणायला सांगताना पहिल्यादा अडखळले. आधी कधीच अडखळले नाही. त्यानंतर कायमचं झालं.. एक जाणीव जीव कापून गेली. आपल्याला बोलायला सुद्धा जमत नहिये. मी बेसिक कम्युनिकेशन विसरत चाललिये. कधीतरी घुंघरू बांधलेले असले नसले तरी माझे पाय मात्र थांबायचे नहीत. सतत भिंगरी चालूच असायची. आता शरीराला गंज चढलाय.. परवा सहज घुंगरू हातात घेतले. माझ्यापेक्षा जड झाले होते. तसेच हातात घेऊन कितीतरी वेळ बघत राहिले. त्याने विचारलंच "काय झालं" त्याच्या डोळ्यात कधीतरी काळजी होती. मला ती वासना भासली. घुंगरू त्यानंतर कधीच छनकले नाहीत. मनाच्या कुठल्या कोपर्यात टाकलेतेही माहीत नाही. आता ते हातात घेऊन काय उपयोग? "माहीत नाही.. प्रत्येक प्रश्नाचं हेच उत्तर का असतं?" त्याने एकदा मिठीत घेत विचारलं होतं.. मी लाजले होते. त्याला तो नकार वाटला. त्यानंतर त्याने मला कधी प्रश्नच विचारले नाहीत. आता उत्तरं माहीत असून काय उपयोग? मी वहावत चाललेय. स्वत्:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाहतेय. कुठे ते कुणालाच ठाऊक नाही. आतातर बुडण्याची पण आशा नाही आणि तरण्याचीपण. कधीतरी माझं प्रेत पाण्यावर तरंगेल असं वाटत होतं. तीपण आशा मावळलीये. आत असंच वाहायचं. सापडला किनारा तरी मीच हात सोडायचा. नशीब नशीब म्हणतात ते दुसरं काय असतं.... इतक्या रात्री ते घुबड आणि मी दोघंच जागतोय. त्याला जागायला कारण आहे. मला जगायलाच कारण नाही. आताफ़क्त वाट बघतेय ते एकदाच डोळे मिटण्याची. पण ते तसे मिटणार नाहीत. अजून खूप ओल आहे त्याच्यामधे. अजून खूप पाणी आहे. मला तहानलेलं ठेवून वाहण्यसाठी. माझी दु:खं बघून तिकडे नजर फ़िरण्यासाठी. मी हरवत चाललेय. पण असं स्वत्:ला हरवाअय्चं पण नाही आहे. कुठून तरी काहीही करून स्वत्:ला शोधायला तर हवंच.. त्यासठी स्वत्:चा पत्ता शोधायला हवा.. पण पत्ता शोधत शोधतच मी स्वत्:ला हरवत चाललेय. स्वत्:मधेच...
|
Aktta
| |
| Thursday, November 22, 2007 - 1:26 pm: |
|
|
काय लीहील आहे मला काय कळ्ल नाही पन काहि काहि ओळी चांगल्या आहेत.. एकटा....
|
Preetib
| |
| Friday, November 23, 2007 - 3:58 am: |
|
|
Nandu samjala tula kay lihayacha aahe te .. atishay uttam lihites tu..ani ekdam pramanik lihites g..ashich lihit raha
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 5:41 am: |
|
|
हे असं निराशावादी लिहिण्याचा तुझा स्वभाव नाहीये....
|
Ana_meera
| |
| Friday, November 23, 2007 - 10:30 am: |
|
|
चांगल लिहिलेस.. पण निराशावादी पहिल्यांदा वाचल नंदूकडून..
|
Sush
| |
| Friday, November 23, 2007 - 12:21 pm: |
|
|
सुंदर लिहिलय. खरतर कितिही म्हणलं कि आयुष्य नेहेमी आनन्दाने जगावे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहि दिवस येतात की गर्दितहि माणुस एकटा पडतो. ती एक वाइट फेज असते. ती गेली की नंतर वाटतं उगिच आपण निराश झालो. नन्दिनी तुझ्या ललित वरुन त्या निराशेतिल दिवसांचि आठवण झालि. आणि पुन्हा अनुभवले ते दिवस. बाकिच्याना वाटतं काय कमी आहे हिला निराश व्हायला. पण म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं. असो, अप्रतिम लिहिलयस
|
Rajya
| |
| Saturday, November 24, 2007 - 8:59 am: |
|
|
छान लिहीलंय सुशला मोदक.
|
Badamraja
| |
| Saturday, November 24, 2007 - 9:58 am: |
|
|
कलमवालीबाई छान लिहील आहेस पण लवकरच स्वत्: ला सापडल्याच ललीत वाचायला मिळेल याची अपेक्षा करतो.
|
Neelu_n
| |
| Monday, November 26, 2007 - 5:04 am: |
|
|
नंदु निराशावादी आहे खरं पण असं असंबंद्ध.. हरवल्यासारखं.. प्रत्येकालाच वाटत असतं खुप वेळा.. मलातरी.. फक्त ते असं शब्दात उतरवायला जमत नाही. तु त्या भावनांचे शब्द झालीयस.. मनाच्या अश्या अवस्थेत तु खरच असशील तर तु त्यात जास्तवेळ नाही रहाणार याची खात्री आहे. कारण तुझा आशावाद त्याहुन जबरदस्त आहे.
|
Daad
| |
| Monday, November 26, 2007 - 5:09 am: |
|
|
दुसर्या कसल्या तरी घनदाटात आपण हरवणं एक गोष्टं. तिथे तरी आपल्यापास "आपण' असतो. पण आपल्यापासूनच आपण हरवणं हा जीवघेणा प्रकार आहे, शब्दश: जीवघेणा. नंदिनी, हे खूप आतलं आहे. या व्यतिरिक्त मल शब्द सुचत नाहीत.
|
नंदिनी, भिडलं एकदम. दादला अनुमोदन.
|
Jayavi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 8:05 am: |
|
|
नंदिनी, अप्रतिम लिहिलं आहेस.... अगदी आरपार जाणारं ! दाद चं म्हणण अगदी खरंय !!
|
Anaghavn
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:37 am: |
|
|
बाकीच्यांना वाटतं, काय कमी अहे हिला निराश व्हायला.//// सुश, अगदी खरंय. आपल्या मनातली ही आंदोलनं आपल्यालाच कळतात. आणि इतरांकडून अपेक्षा करण्यातही अर्थ नसतो. समोरची व्यक्ति त्या leval ची असेल,मनोव्यापारा बद्दल विश्वास असेल, तर समजून घेऊ शकते. पण ही एक phase असते. आणि ती जातेही. त्यातुन झाली तर आपली प्रगतीही होऊ शकते. अनघा
|
Ashwini
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:53 pm: |
|
|
>>त्याला जागायला कारण आहे. मला जगायलाच कारण नाही. वा! छान लिहीलय.
|
Marathifan
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:22 pm: |
|
|
नन्दिनी छान मला सगळं कळत गेलं वाचतना पण काय कळलं ते मात्र शब्दात सांगता येणार नाही
|
निराशवादी? सगळ्यांनीच कधी न कधी अनुभवलेली मनाची अवस्था. सुंदर शब्द तर आहेतच पण खुप प्रामाणिक आहेत.
|
Chinnu
| |
| Friday, November 30, 2007 - 3:33 pm: |
|
|
नंदू, तुझ्या टॅलेंटला सलाम! अस्वस्थता, मनाची घालमेल अगदी मोजक्या वर्णनात मांडलयं. छान जमलयं. एकदा वाचलं तेव्हा फार सबटल वाटलं. पण नंतर योग्य वाटलं.
|
Itsme
| |
| Sunday, December 02, 2007 - 1:58 pm: |
|
|
नंदिनी, छान लिहीले आहेस ...
|