|
Manogat
| |
| Thursday, November 15, 2007 - 11:45 am: |
|
|
शापित रात्रिचे सुमारे ७:०० वाजले असतिल समोरच्या पडवीत अप्पा बसले होते.. नेहमी प्रमाणे हातात अडकित्ता घेउन सुपारि कापित होते. अप्पा म्हण्जे एक करारि व्यक्तिमत्व, घरात सगळेच घाबरायचे त्यांना. पण अप्पा फार दयाळु होते सगळ्यांना मदत करायचे.माई तर नेहमिच सांगायचि ते दिसतात तसे नहित नारळा सारखेच आहेत. नारायण काका पुढच्या दारातुन धावत आले "अप्पा.. अप्पा घात झाला". नारायण काका हेच एक व्यक्तिमत्व होत जे अप्पांना काहि पण बोलु शकत होते, अप्पांचा पण खुप जिव होता त्यांच्यावर. नारायण काकां चा आवाज ऐकुन अप्पा घाबरले हातातला अडकित्ता ठेवुन ते लगेच उठुन दाराकडे गेले. वाड्यातल पुढच दार अणि पडवित बरच अंतर होत. अप्पा पुढे धावले तोच नारायण काका त्यांच्या जवळ आलेत आणि बेशुद्ध होउन खालि कोसळले. अप्पा घाबरले त्यांने म्हादुला आवज दिला.. अप्पांचा तो घाबरलेला आवाज ऐकुन सगळे पडवि कडे धावले. म्हादु, माई,नेत्रा,रघु अप्पा पुन्हा ओरडु लागले. म्हादु बाहेरन आला आणि ते द्रुष्य पाहुन थकित झाला. सगळ्यांनि मिळुन नारायण काकांना तक्तपोसावर झोपवल. अप्पांच्या सांगण्या वरुन म्हादु गावातल्या एकमेव डोक्टरांना बोलवायला गेला. अप्पांच काम म्हण्टल की सगळ गाव तय्यार असायच. म्हादुला बघुन डोक्टरांनी त्याला विचारल अरे म्हादु काय झाल आता येवढ्या रात्रि कसा काय,म्हादु धापा टाकतच आला होता. थोडा अवकाश घेउन डोक्टरांना म्हणाला "अप्पांनि वाड्यावर बोलिवल तुम्हाला" डोक्टर म्हणाले काय रे अप्पांचि तब्यत वगैरे ठिक आहे न. म्हादु म्हणाला ते सगळ रस्त्यात सांगतो चला आत. अप्पांचा निरोप आहे म्हणुन डोक्टर भरल्य ताटावरुन उठले आणि सरळ वाड्या कडे चालते झाले. म्हादुने सारि हक़िकत त्यांना रसत्यात सांगितली. डोक्टरांनी येउन नारायण काकांना चेक केल. नारायण काकांचा रक्तदाब वाढला अणि त्यांआ mild hert attack आला हे डोक्टरांच्या लक्षात आले. त्यानी अप्पांना तालुक्याच्या दवाखाण्यात नारायण काकांना घेउन जायला सांगितल. डोक्टरांनी अप्पांन्ना विचारल काय झाल तेव्ह अप्पांनि नारायण काकांच्या हातातल पत्र दाखवल. अप्पांनि सांगितल तो धावत आला तेव्ह त्याच्य हातत हेच होत अणि मग कोसळलाच. आज पहिल्यांदा अप्पांचा आवाज भारि झाला होता, पण सर्वात मोठे याचि जाणिव होति म्हणुन त्यांनि आपल्या भावनांना रोखल अणि डोळयातल्या अश्रुंना तेथेच थांबवल. रघु आणि डोक्टरांनी ते पत्र बघितल दिनुच्या मित्राच पत्र होत, दिनु नारायण काकांचा मुलगा, नेत्रा चा होणारा नवरा. तो ज्या गाडिने येत होता ति नदित पडली अणि दिनुचा काहिच पत्ता न्हवता. हे वाचताच सगळ्यांना धक्काच बसला. पण अप्पांनि कोणाला पण सांगण्यास मनाई केली. रघु ने एक कटाक्ष नेत्रा कडे ताकला "उंच पुरि, गोंडस्शि त्याचि बहिण बोहल्यावर कधिच उभि होउ शाकणार नाहि का" य विचाराने त्याला एकदम दाटुन आले. पुन्हा त्याच्या मनात "श्राप श्राप आहे या वाड्याला" हे वाक्य ऐकु येउ लगले. अप्पांच्य लक्षात येताच त्यांनी रघु ला नारायण काकांच्या घरी पाठवुन राधा वहिनि आणि मुग्धा ला घरि घेउन ये असे सांगितले, आणि बजावल मी येइस्तोवर कोणालाहि याचि वाच्यता नाहि करायचि. अप्पा, डोक्टर, म्हादु, शिवराम (म्हादुचा मुलगा) आणि गावातले दोन लोक घेउन तलुक्याला निघाले.
|
Manogat
| |
| Thursday, November 15, 2007 - 1:52 pm: |
|
|
रस्त्यातुन जतांना अप्पा विचर करीत होते. नारयण काकांनी पडवित विचार करत बसलेल्या अप्पांच्या पठिवर हात ठेवला अणि म्हणाले तु काळजी कशाला करतोस मी आहे ना अशी सांतवना दिली. पण अप्पा खुप चिंतेत होते ते म्हणाले "अरे नारायणा कसा रे नको करु चिंता. लोक थु थु करतील पोरिच वय झालय आता अजुन किती दिवस अजुन वाट पाहायची. या श्रापचा परिणाम त्या पोरीवर का, सोन्य सारखी पोर मझी इतकी सुग्रण आहे पण बघ ना कुठे जुळुन येत नाही. एक तर पोर भेटत नहीत अणि असेले भेटतात की ज्यांना माझि नेत्रा नको हा हा पैस हवाय " अप्पांना अस व्याकुळ झालेल पाहुन नारायण काका म्हणाले मझी तुझी बरोबरि नाहि पण जर तुल पटत असेल तर माझ्या दिनु साठि मी तुझ्या नेत्रा चा हात मागतो. नारायण काकांच हे बोलण ऐकुन अप्पांना आपल रडु आवरल नाहि. नारायण काकांनी अप्पांच्या पाठिवरुन हात फ़िरवला आणि म्हणाले अरे बरेच दिवसांन पासन इच्छा होति माझी पण तुझ्या पुढे बोलण्याचे धर्यच झाले नाहि बघ. त्यावर अप्पा म्हणाले अरे तुझ्या घरी मझी पोर गेली तर एक आंगण सोडुन दुसर्यत गेली याचा सुख आहे माल. मला माहित आहे तुझ्या घरी तिला काहीच त्रास होणार नाहि. अणि वहिनी सुद्दा तीला आपल्या पोरी सारखी माया करतील.
|
Manogat
| |
| Thursday, November 15, 2007 - 2:10 pm: |
|
|
नारायण काकांना माहित होत की राधा काकुंना त्यांचा हा विचार पटणारा न्हवता, पण काकी त्यांच्या म्हण्याच्या बाहेर नाही हे त्यांना ठाउक होत. काकींना नारायण काका बोलले तेव्ह त्या चांगल्याच भांडल्या "मझा एकुलता एक मुलगा तुमच्या काय दोळ्यात खुपत आहे का तुम्ही स्वताहाच त्याला म्रुत्युमुखि घलता आहात हे कळतय का तुम्हाला की मैत्रिच्या नादात हे ही विसरलात. अहो त्या अपांच्या काकी चा श्राप विसरलात का त्या घरचि एकही पोरगी उजवु देणार नाहि म्हण्टल होत त्यांनि". आहो बेबी आक्का, म्रुदुला वंस आहेत ना पांढर कपाळ घेउन बसलेल्या जन्म भर तीथे. तुमच्या मैत्री पयी मी मझ्या पोराचा जीव धोक्यात नाही घालणार. आणि राधा काकी हुमसुन हुमसुन रडु लागल्या. नारयण काकांनी बराच समजविण्याच प्रयत्न केला पण बाईचा हट्ट सोडणार तरी कसा. या सगळ्या मुळे काकी दोन दिवस जेवल्या नाहि. दोन दिवसांनि दिनु घरी आला मुग्धा नी दादाला सारी हक़िकत सांगितली. दिनुला मनोमन नेत्रा पहिले पासनच आवडत होती अणि आता नरायण काकांनि ख़ुद्दच जुळवुन आणला आहे म्हणतांना त्याचा आनंद गगनात समावत न्हवता. आता आईला कस मनवायच हे त्याला पक्क ठाउक होत. स्वता:हची शपथ घालुन त्यानी राधा काकुला लग्ना साठि राजी केल. मग काय विचारता पुढचे कार्यक्रम इतके भराभरा झाले अनी दोघांचा साखरपुडा झाला. दिवाळित लग्नाची तारीक निघाली. सगळ व्यवस्थित चालल होत मध्येच दिनु च posting तालुक्याच्या office मधे झाल आणि त्याला तलुक्यातल्या office ला सोमवारी join व्हाव म्हणुन वरुन आदेश आल. एव्हना राधा काकी पण पोराच्या खुशित खुश होत्या. सगळ्या आनंदात राधा काकी सगल विसरल्या होत्या.
|
Manogat
| |
| Thursday, November 15, 2007 - 2:29 pm: |
|
|
खड्यातुन गाडि गेली आणि त्या दचक्यानी अप्पांचा दोळा उघडला. वातावरणातल्या गारव्यामुळे सगळेच पेंगले होते. अप्पानी नारायण काकां कडे बघितल ते डोक्टरांनी दिलेल्या injection मुळे झोपलेले होते. अप्पानी पुन्हा दोळे मिटले... आणि त्यांना झोप लागली. मधु (अप्पांची चुलत बहिण) खुप चपळ होती अणि एकुलती एक असल्यामुले काकिंची पण लाडकि होती. अप्पांच्या काकी सरखीच होति मधु "सगळे आई चे वळण आहे" असे तिला म्हणायचे. कामचोर, फ़टकळ पण दिसायला खुप छान. याचाच तील खुप गर्व होता. तिच्याच वयाची म्रुदुला(अप्पांचि धाकटि बहिण) दिसायला छान होती पण मधु पेक्षा थोडी कमीच पण तिच्या अंगी मात्र सगळे गुण होते फ़ार गोड गायची ती. आणि म्हणुनच मधुला तिचा राग यायचा. दोघी ही बरोबरच शाळेत जायच्या पण आपल्या गुणांमुळे म्रुदुलाला सगळ्यांची आवडती अणि नावा प्रमाणे म्रुदु पण होती. दोघी समवयस्क होत्या त्यामुळे दोघिंचहि लग्न सोबत करायच अस सगळ्यांनी ठरवल होत. दोघिंना साठि स्थळ चांगलिच येत होती मधु दिसायला चांगली असल्या मुळे तिला सगळे मोठ्य मोठ्या घरचे स्थल यायचे. असच एकदा जहागिरदारांचे स्थळ आल मधुसाठि. मुलगा दिसायला खुप सुंदर होता आणि घरी मालमत्त पण खुप होती. मधु तर हरवुन गेलि. अगदि राणि सारख आपल जिवन व्यतित होइल असे स्वप्न ही रंगवु लागलि होती.
|
Manogat
| |
| Friday, November 16, 2007 - 1:12 pm: |
|
|
पहुणे येणार त्यादिवशी मधुची सकाळ पासन तय्यारी सुरु होति,तिला म्रुदुलाचि कधिच अडचन वाटत न्हवती कारण तीला माहित होत की मला पाहिल्यावर कोणिच नाहि म्हणणार नाहि. त्यादिवशी म्रुदुला आंघोळ करुन बागेत मधुच्या गजर्यासाठि फ़ुले तोडित होती. गायची तीचि सवयच होति फ़ुले तोडता तोडता ति गुन गुनत होती "पाहिले न मी तुला तु मला ना पाहिले". तेवध्यातच पाहुणे आले, तिचा तो गोड आवाज जहगीरदारांच्या मुलाच्या कानात पडला त्याने वळुन म्रुदुलाला पाहिले अणि त्याला ती पाहताक्षणीच खुप आवडली. पण इथे मधु त्याचे स्वप्न रंगवु लागलि होती. कर्यक्रम सुरु झाला. त्यांनी मधुला पाहिले पण म्रुदुला त्याचे मन कधीच जिंकुन गेली होति. त्याची नजर सारखी म्रुदुलाला शोधत होती. दुसर्या दिवशि जाहागिरदारांचा निरोप घेउन एक माणुस आला आबा,काकि अप्पा उभेच होते तिथे त्यनी कळवल कि त्यांना म्रुदुला पसंत आहे. मधु दरामागन हे ऐकत होती, मधुच अनि काकिचा तळफ़ळाट झाला. मला नाकारुन त्यांनी मरुदुलाचा हात मागितला हे तिला सहन नाहि झाल. ती धवत खोलि कडे गेली अनि स्वता:हला आपल्या खोलित बंद केले. म्रुदुलाला तिच्य बरोबरच होती तिने तिला बरीच विनवणी केली पण ती दरवाजा उघडायला तय्यारच न्हवती. सकाळची रात्र झाली घरातल वातावरण गंभीर झाल होत. जेवणासाठी हाक मारायला काकी आलि अनि पाहाते तो मधुने स्वताला पेटवुन घेतले होते काकि जोरत किंचाळली, सगळे आवाज ऐकुन त्या दिशेनी धावले अप्पांनि दार तोडल काकी कोणाच हि न ऐकता आत शिरलि मधु पुर्ण जळाली होति. अप्पा पाणि आणायला धावले पण काकि पण त्या आगित जळत गेली अनि आपांच्या आई ला म्हणालि "माझी पोरगि मेली न आता या घरची एकहि पोरगि उजवु देणार नाही हा मझा श्राप आहे श्राप आहे" आणि काकि ने प्राण सोडले.. "श्राप आहे" ह्या वक्यांचा नाद होताच अप्पा दचकुन उठले.
|
Aktta
| |
| Friday, November 16, 2007 - 8:00 pm: |
|
|
मनोगत चांगली कथा आहे.... एकटा....
|
Anaghavn
| |
| Monday, November 19, 2007 - 7:30 am: |
|
|
ऊत्सुक्ता वाढतीये.लवकर टाका पुढाचा भाग. अनघा
|
Manogat
| |
| Monday, November 19, 2007 - 8:53 am: |
|
|
अप्पांचा चेहरा घामाने ओला झाला होते, म्हादु त्यांच्या जवळच बसला होता. अप्पां कडे बघुन तो म्हणाला "तुम्ही भिउ नका मालक काही नाहि व्होनार त्याना". म्हादुचे हे शब्द ऐकुन अप्पा भानावर आले त्यांनी नारायण काकांकडे बघीतल, ते अजुनहि औषधा मुळे गुंगितच होते. अप्पांनी घाम पुसला. त्यांची गाडी तालुक्यात तोवर शिरली होति. गाडी दवाखाण्याच्या जवळ पोहचताच अप्पा आणि डोक्टर आत गेले. नारायण काकां वर उपचार सुरु झाले. गावातल्या डोक्टरांची शंका सत्यात बदलली जेव्हा तालुक्याच्या दवाखाण्यातल्या डोक्टरांनी अप्पांना सांगितल त्यांना heart attack आला आहे अणि त्यांना कोणतीहि अशि गोष्ट सांगु नका ज्यांनि त्यांना त्रास होइल. "देवाचि क्रुपा असेल तर त्यांना लवकरच शुद्ध येइल" अस म्हणुन डोक्टरांनी अप्पांच्या खांद्यावर अशवासनाच हात ठेवला अणि निघुन गेले. आता मात्र अप्पांना भिति वाटली नारायण ला जाग अली अणि त्याने दिनु बद्दल काहि विचर पुस केली तर मि त्याला काय सांगु. म्हादु ला अप्पांचे हाव भाव समझले तो अप्पांन जवळ गेला अनि त्यांना म्हणाला "मालक मि सवता जातो तिथे अणि त्याला शोधुन आणतो तुम्हि नका काळजि करु. खंडोबा च्या क्रुपेने सार काहि ठिक होइल"."येतना छोट्या मालकाला घेउनच येइल नाही तर तोंड नाहि दाखवणार". अप्पा त्याचे हे शब्द ऐकुन भाव विभोर झाले,त्यांनि त्यच्या खांद्या वर हात ठेवला आणि डोळ्यातले पाणि पुसले. म्हादु शिवराम ला घेउन घटनास्थळि निघाला. अप्पंनी हात जोडले अणि पुटपुटले "मोरेश्वरा मि जर काहि पुण्य केले असेल तर सगळे दिनुच्या वाट्यात टाक, त्याला काहि होउ नको देउस".
|
Manogat
| |
| Monday, November 19, 2007 - 9:13 am: |
|
|
सकाळची ११:०० वाजले तरी नारायण काकांना जाग न्हवति,अप्पा जवळच असलेल्या गणपतिच्या मंदिरात आवर्तन करित होते, १००१ आवर्तन असा त्यानि संकल्प सोडला होता. तिकडे घरी माई चा अखंड जप सुरुच होता, रघु ने तिला कल्पना दिली होती. रधा काकींचा तर रडनच थांबत न्हवत. सगळ्यानि खुप समजावल पण त्याही घरी जाउन गणपतिला पाण्यत ठेवुन बसल्या होत्या.काकी रघु दिसताच सांगत होत्या अरे दिनु ला तार पाठव. म्हणुन रघु काकिंच्या पुढे पण जात न्हवता त्यांच्या प्रश्नाच काय उत्तर द्याव हे त्याला कळत न्हवत. दुपारच्या २:०० वाजता शिवराम परत तालुक्यातल्या दवाखाण्यात आला. अणि धावत अप्पां कडे गेला "मालक छोटेमालक आलेत तुम्हि चला अगोदर". तित्क्यात डोक्टर आले "अप्पासहेब नारायणरावांना जाग आलि दिनु त्यांच्याच जवळ आहे". अप्पा उत्तर देत नाहि आहेत हे पाहाताच डोक्टर अप्पांकडे धावले. म्हादु अनि शिवराम पण त्यांच्या कडे धावले. आप्पा सभामंडपाच्या भिंतिला टेकुन बसले होते त्यांचे डोळे मोरेश्वराच्या मुर्तिला न्याहाळत होते. डोक्टरांनी अप्पांचा हात पकडला अणि अप्पा कोसळले म्हादु मालक म्हणुन किंचाळलाच.. पण अप्पा तर कधिचेच त्यांना सोडुन त्या श्रापाला स्वताहावर ओढवुन, त्या वाड्याला मुक्त करुन अनंतात विलिन झाले होते. समाप्त.
|
Aashu29
| |
| Monday, November 19, 2007 - 5:00 pm: |
|
|
माझी पोरगि मेली न आता या घरची एकहि पोरगि उजवु देणार नाही हा मझा श्राप आहे श्राप आहे" आणि काकि ने प्राण सोडले.. या शापाला स्वत वर कसे काय ओढऊन घेतले त्यांनी?confusing
|
Gsumit
| |
| Tuesday, November 20, 2007 - 12:41 am: |
|
|
पछाडलेला नाही पाहीला का, त्यात पण तो रावसाहेब तसाच मरतो की, सुड दुर्गे सुड करित...
|
Princess
| |
| Tuesday, November 20, 2007 - 4:50 am: |
|
|
सुरुवात खुप छान. पण शेवट घाईघाईत केल्यासारखा वाटतो. पण कथा बीज उत्तम.
|
Meggi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:40 am: |
|
|
मनोगत, छान आहे कथा... सलग लिहिली हे सगळ्यात उत्तम.. पुढच्या वेळी मोठे मोठे भाग टाक, म्हणजे अजून छान वाटेल..
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:22 pm: |
|
|
छान आहे कथा, अजुन प्रसंग खुलवले असते तर जास्त भावली असाती.
|
Manogat
| |
| Monday, November 26, 2007 - 6:15 am: |
|
|
धन्यवाद मित्रांनो...तुमच्या प्रतिक्रियां बद्दल
|
Are hi tar eka marathi cinemachi story vatate aahe mala tyache nav aathavat nahi pan Aasha Kale,Ajinky Dev yancha ha cinema aahe yat ashich story aahe.pan shevat vegala aahe.
|
|
|