|
अहो ताई किंवा काकू(कोण असाल ते) , एकदम छान लिहिलय तुमच्या ललितापेक्षा तुमचा ID भारी आहे- सुपरमॉम!!!चांगल आहे!!
|
Jhuluuk
| |
| Monday, November 19, 2007 - 9:15 am: |
|
|
सुमॉ, एकदम मस्त!! सुमॉ style!!
|
Princess
| |
| Monday, November 19, 2007 - 10:48 am: |
|
|
सुमॉ, खुप लोकांच्या व्यथेला वाचा दिलीस. अगदी मनातलं लिहिलय. आमच्या घरी वेगळीच कहाणी आहे. मुलगा एक वर्षाचा झाला आणि आम्ही बंगलोरला शिफ्ट झालोत. घरी मराठी आणि शाळेत टीचर्स कडुन इंग्लिश तर आयाकडुन कन्नड अशा भाषा त्याला ऐकायला मिळायच्या. त्यामुळे तो मराठी, ईंग्लिश आणि कन्नड अशा तिन्ही भाषा तोडक्या मोडक्या (किंवा तोडुन मोडुन) बोलायचा. जो शब्द आठवेल तो लावुन वाक्य पुर्ण करायचा. आय वॉंट नीरु किंवा मग बेकु बनाना असे काहीही. आता तर चायनीज लोकांमध्ये आहे. बोलला तरी मला काहीच समजणार नाही ओल राहिलच ग... पण हे फक्त आपले समाधान. तू म्हणतेस तसे त्याना पु.ल. शांता शेळके काहीच कळणार नाही (बहिणाबाई तर दुरच) खुप वाईट वाटते ते याच गोष्टीचं
|
Farend
| |
| Tuesday, November 20, 2007 - 1:18 am: |
|
|
सुपरमॉम छान लिहिले आहे. 'ओल' अशीच राहो किंवा वाढो ही शुभेच्छा! माझी मुलगी मधे काही दिवस स्वत:हून फक्त इंग्रजीतून आणि त्या आधी फक्त मराठीतून बोलायची. मधे मग भारतात जाऊन आल्यामुळे की काय पण आता कधी मराठीत तर कधी इंग्रजीत बोलते. हे किती दिवस चालेल काय माहीत?
|
Daad
| |
| Tuesday, November 20, 2007 - 2:57 am: |
|
|
राहावलं नाही म्हणून परत एक! घरात आम्ही कितीही मराठीत टाहो फोडला तरी मुलाचे विचार इंग्रजीत आहेत. त्यामुळे मधली अनेक वर्षं मराठी प्रश्नाला इंग्रजी उत्तर मिळायचं. माझीही खंत हीच होती की त्याला पुलं, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, काही काही कळणार नाहीये.... अगदी ह्या दोन महिन्यातली गोष्टं- आपणहून मराठी लिहायला-वाचायला शिकतोय त्याच्या आज्जीकडे. हे एक महत्वाचं. आई-वडीलांव्यतिरिक्त कुणी दुसरं हवं असलं शिकवायला. सुदैवाने सासूबाई आहेत सद्ध्या. मी दिवाळी अंक वाचताना मान वाकडी करून त्याचं अंकावरचं 'मेनका' हे नाव वाचणं.... त्याच्या पहिल्या शब्दाइतकं गोड! सुमॉ ओल राहिलीच... पण त्यातच मराठीचे अंकूरही रुजलेत... आता जमेल तसं खत-पाणी घालायचं. "आई, मायबोलीवर मस्तं कथा वाचलीये... तुला लिन्क पाठवतोय" हे त्याच्याकडून कळणं हे माझं स्वप्नं आहे....
|
Shonoo
| |
| Tuesday, November 20, 2007 - 12:43 pm: |
|
|
सुमॉ सगळ्या अनिवासी लोकांची व्यथा मांडलीस. माझी मुलं जे काही तेलगू बोलतात किंवा मराठी बोलतात ते दोन्ही कडच्या नातेवाइकांना समजत नाही. ' अदी गो पक्षी गॉन' ( तो बघ पक्षी उडून गेला) इथून सुरुवात. पण तरिही आजी आजोबांशी प्रयत्नपूर्वक तेलगू किंवा मराठी बोलतात. मग कधी कधी काय केलंस आज म्हटलं तर 'मी स्विमिन्गला गेलं' असतं नाहीतर ' प्लेयिंगु, जम्पिंगु' असतं. पण लेकीने चार वर्षाची असतानाच mom, when I grow up can I have all your books that don't have any pictures in them? म्हणून झालंय. त्यामुळे निदान पुस्तकांच्या आशेपायी भाषा शिकेल असं वाटतंय. अगदी जिव्हाळ्याचा विषय, छान मांडला आहे.
|
सु मा सुंदर ओल राहतेच उदाहरण किती समर्पक आणि छाने...!!!
|
Supermom
| |
| Tuesday, November 20, 2007 - 1:10 pm: |
|
|
सगळ्यांचे मनापासून आभार. या सगळ्यात एक गोष्ट मात्र समाधान देणारी आहे, की लहान मुलं कुठलीही भाषा फ़ार लवकर शिकत असतात. माझ्या मावसबहिणीची मुलं सतत मध्य प्रदेशात राहिली. त्यामुळे हिंदी हीच त्यांची विचार करायची, बोलायची भाषा बनली होती लहानपणी. पण थोडी मोठी झाल्यावर मराठीही ती उत्तम बोलायला लागली. तसं आपल्या मुलांच्या बाबतीत व्हावं हीच सदिच्छा.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:11 pm: |
|
|
अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय सुमॉ. भाषेतुन विचार करणे जमले कि ती भाषा येतेच. शिवाय अशी संवेदनशील आई असेल, तर मुलाना भाषेची नसली तरी संस्कृतीची आवड निर्माण होणारच.
|
Rashmee
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:59 pm: |
|
|
अगदी माझ्या मनातलं लिहिलय सुमॉ.
|
>>"आई, मायबोलीवर मस्तं कथा वाचलीये... खरतर, "आई, मायबोलीवर तुझी मस्त कथा वाचली, फारच छान लिहीतेस तू" अस तुला कळेल बघ नक्की पूनम, मनु, आकाशकंदील घेतले
|
Bhagya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 10:16 pm: |
|
|
/////'झालं... घरात एक तू कायम तोंड लटकावून बसणार... मीही तेच करू? म्हणजे संपलंच.' ///// हे अगदी बरोबर.... माझा दुजोरा. ////हे म्हणजे एखाद्या साध्यासुध्या आईला पार विसरून,एखाद्या टिपटॉप, मॉडर्न मावशीच्या मागे धावत जाण्यासारखं झालं.//// तीव्र निषेध. मावशी मॉडर्न असली तरी तिच्या मागे धावू दे की.
|
Anaghavn
| |
| Thursday, November 22, 2007 - 5:39 am: |
|
|
"मनापासुन,सारं कौशल्य लाऊन रेखाटायची असते रांगोळी.मग ती नीट येईल की नाही,सुरेख दिसेल की नाही ही चिंता न करता.---मुळ कलाक्रुति टिकूनच राहणार असते--एकमेकांत मिसळलेल्या रंगाची खुलावट आणखिनच वाढवत." नकळत पाणीच आलं ग डोळ्यात....... बस इतकंच. अनघा.
|
|
|