Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Jayavi
Tuesday, June 05, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी....मस्त पकड घेतेय गोष्ट..... लिही लवकर :-)

Nilima_v
Tuesday, June 05, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rehan ticha muslim mansashi lagn kelelya aaipaasuncha sawatrbhau tur nahi?

Manjud
Wednesday, June 06, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

be patient.... do not conclude before completion...

Sakhi_d
Wednesday, June 06, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त चालु आहे... लवकर लिही :-)

Swa_26
Wednesday, June 06, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, नंदिनी, कसले धक्के देतेयस गं तु!!! प्रत्येक एपिसोडनंतर पुढला कधि येतोय याचीच वाट बघतो आम्ही :-)

Nandini2911
Wednesday, June 06, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीला माहीत होतं की तिची आई तिथेच आहे. पण ती कधीच तिला भेटायला यायची नाही. एकाच गावात असूनही तिने तिच्या आईला कधीच पाहिलं नव्हतं.

सरस्वती चार वर्षाची होती जेव्हा तिच्या आईने तिच्या बाबाशी काडीमोड घेतला होता. घरची गरिबी हे खरं कारण होतं. लक्ष्मी दिसायला सुंदर होती आणि आपल्या सौंदर्‍याचा उपयोग करणं तिला पूरेपूर जमत होतं. एका य्:कश्चित माण्साबरोबर संसार करण्यापेक्षा तिला ऐशो आराम हवा होता. उस्मान दुबईला नोकरीला होता. भरपूर पैसा होता. त्याला ही ब्राह्मणाची बायको आवडली. आणि लक्ष्मीला उस्मानचा पैसा आवडला. एके दिवशी घर नवरा लेक सगळं सोडून ती पलीकडच्या मोहल्ल्यात गेली. लक्ष्मीची रझिया झाली. उस्मानने तिच्याशी रीतसर निकाह केला होता.

त्यादिवशी सरस्वतीचे बाबा पहिल्यादा दारूच्या गुत्त्यात गेले होते. या सगळ्या घटनेत सरस्वतीची काहीच चूक नव्हती. पण दरवेळेला दोषाचं खापर मात्र तिच्यावर फ़ुटायचं. काकूची ती लाडकी कधीच नव्हती. बाबानी तर तिला झिडकारूनच टाकलं. खूपदा तिला वाटायचं की इथून निघून जावं, कुठं तरी दूर जिथे आपल्याला कुणीसुद्धा ओळखणार नाही. आपल्या आईने दुसरं लग्न केलं हे कुणाला माहीत नसेल आणि आपला बाप दारूडा आहे हे ती कुणालाही सांगणार नव्हती. दिवसभर सरस्वती अशा ठिकाणची स्वप्नं रंगवत बसायची. इथे कोण ना कोण आपल्याला घेऊन जाईल याची तिला पूर्ण खात्रा होती.

हळू हळू दिवस सरत गेले. बाबाचं पिऊन पडणं रोजचं झालं होतं. आता आता तर कोण त्याना उचलून पण घेऊन यायचं नाही. शाळेमधे ऐकू येणार्या टोमण्याची पण तिला सवय झाली. काकूसारखंच ती इथे पण दुर्लक्ष करायला शिकली होती.

एका बाबतीत मात्र सरस्वती भाग्यवान होती. अभ्यासात तिची चांगली प्रगती होती. पहिला नंबर तिने कधी सोडला नाही. पण घरी तिच्या या यशाचं कौतुक करणारं कुणीच नव्हतं.

सरस्वतीची सातवीची परिक्षा संपली होती. आठवीची कुणाकडुन तरी मागून आणलेली पुस्तकं ती वाचत बसले होती. शाळा सुरू व्हायला अजून महिनातरी होता.

दुपारच्या उन्हाचे चटके बसत होते. म्हणून सरस्वती पडवीच्या सावलीत बसलि होती. निसर्गाची किमया आपला रंग दाखवत होती. सरस्वती थेट तिच्या आईसारखी दिसत होती. गव्हाळ वाटणारा तिचा रंग आता गोरेपणाकडे झुकू लागला होता. नुकतीच बाजूला बसयला लागलेली सरस्वती तेजाळ दिसत होती. बघताक्षणी तिचं सौंदर्य डोळ्यात भरत होतं... आणि कुणीतरी लाँडग्याच्या नजरेने तिच्यावर लक्ष ठेवून होतं. मौका मिळताक्षणी तिच्यावर झडप घालण्यासाठी.


Nilima_v
Wednesday, June 06, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very good Nandini,
Mi aadhi shewat guess kela because I did not want story to end that way.
sorry if I caused trouble

Rayhaan
Wednesday, June 06, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Not a problem.. Dont apologoise.
By the way..your conclusion is wrong.
Read all the chapters. Nandini has made her secret open. By Mistake of course. :-)
Story is going good. I like the way she is unfolding it. I know entire story line, but narration is good.

I would love to read the entry of Rehan.

Bye Take Care


Manjud
Friday, June 08, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे ही काल्पनिक कथा नाही आहे...... कारण बरेच references same to same match होत आहेत....

Nilima_v
Friday, June 08, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

But looks like Rayhaan hospital madhun baher yeun messages pun post karu lagla aahe:-)

Nandini2911
Friday, June 08, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीचं आजूबाजूला काय चालू लक्षही नव्हतं. त्वढ्यात अंगणात गडबड झाली. गावतली बरीचशी माणसे गोळा झाली होती. तिचा बाबा पांढर्‍या कपड्यात गुंडाळून आणला होता.


हा दिवस येईल याची तिला पूर्ण कल्पना होती. पण तरीही हे दृश्य तिला हलवून गेलं. आपलं म्हणणारं एक तरी माणूस या जगात होतं. आज तोपण गेला.. कसा का असेना "बाप" नावाचं एक छत होतं. आज तेही हरवलं.

अख्खं गाव आलं होतं. सरस्वतीच्या काकाने ऐपतीप्रमाणे सगळे धार्मिक विधी केले. सरस्वतीच्या डोळ्यातून एकही अश्रू टपकला नाही. "रडायचं नाही" हे तिनं स्वत्:शीच ठरवलं होतं.


"काय मुलगी आहे.. बाप गेला तर डोळ्यतुन पाणी नाही. आईवर गेली आहे." येणारे जाणारे म्हणत होते.

"आता पुढे काय?" एका दुपारी जयाकाकूनी काकाना विचारलं.
"काय पुढे? ते ओझं तर आपल्यालाच वहावं लागणार आहे. अठराची होईपर्य्नत सांभाळू.. पुढे उजवुन देऊ"

"तवर ठीक राहील ना? उद्या आईशीसारखे गुण उधळायला गेली तर काय घ्या.. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घालवून टाका घरातून.."
काकूने नवर्‍याला ठणकावुन सांगितलं.

माजघरातून सरस्वती हे सगळं ऐकत होती. डोळ्यातुन नकळत पाणी आलं. तिला इथून कुठेतरी लांब जायचं होतं. या सगळ्यापासून.. आज तिला आई हवी होती.. कुशीत शिरून रडण्यासाठी, बाबा हवे होते. डोक्यावरून हात फ़िरवण्यासाठी. पण आज ते दोघं तर नव्हते म्हणून हे ऐकून घ्यायची वेळ तिच्यावर आली होती.

बाबाचे दिवस म्हटले तर घतले आणि म्हटले तर नाही. काकाने सगळं केलं पण काकूची धुसफ़ुस चालूच होती. बाबाचा चौदाव्याला जेवायला मोजुन पाच ब्राह्मण बोलावले होते. त्याच दिवशी संध्याकाळून उस्मान आणि लक्ष्मी आले.

सरस्वती अंगण झाडत होती. तिची आई आली हे सांगायची गरजच नव्हती. तिला पाहताच सरस्वतीने ओळखलं.

विश्वाकाका आणि जयाकाकू मात्र पुरते गांगरले. निळा सलवार कमिझ घातलेली लक्ष्मी मात्र शांतपणे पडवीत आली. एकदाच तिने पाठी वळून सरस्वतीकडे पाहिलं. आणि ती हलकेच हसली. सरस्वती थिजल्यासारखी तिथेच उभी होती.






Rayhaan
Saturday, June 09, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just see how it goes.. It is purely fictional. I can guarantee you that. :-)
Keep it up Nandu. Just write more than 10 lines.

Nandini2911
Saturday, June 09, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पहिल्यादा ती तिच्या आईला पहात होती. उस्मान मात्र चांगला पन्नाशीचा म्हातारा होता. गोरापान आणि उंच. एकदम साहेब कॅटेगरीतला वाटत होता.

जयाकाकू मात्र आता सावरली होती.
"इथे कशाला आलीस?" तिने तिखटपणे विचारले.
"तुला माहीत आहे." लक्ष्मीने शांतपणे उत्तर दिलं.
"हे बघ, वासुदेव गेला. त्या आधी तू या घरातून गेलीस. तुला इथे काहीही मिळणार नाही. या घराशी तुझा संबंध नाही." विश्वाकाका म्हणाला.
"मला माहीत आहे की त्यानी माझ्यासाठी काही सोडलं नाही. माझा या घराशी पण काही संबंध नाही. पण मला माझी मुलगी हवी.." लक्ष्मी म्हणाली.

सरस्वतीचा तिच्याच कानावर विश्वास बसत नव्हता. तिची आई तिला न्यायला आली होती! विश्वाकाकाचा मात्र संताप अनावर झाला.
"काय? तुझी मुलगी? कुठे आहे ती? सोडून जाताना आठवली नाही का ती?" काका जोरात ओरडले.
"हे बघा भावोजी, तुम्ही विनाकारण आवाज चढवू नका. तेव्हापण तुम्ही आणि तुमच्या भावाने मला तिला नेऊ दिलं नव्हतं. माझी मुलगी मला कधीच जड झाली नव्हती. पण त्यांनी मला सांगितलं की ते तिला सांभाळतील म्हणुन मी गेले होते. त्या माणसाने माझ्या जाण्याच दोष त्या लेकराच्या माथी मारला. खुदा गवाह आहे, मी घर सोडून गेले त्याला सरस्वतीची काही चूक नाही. पण तरीही ने केलेल्या गुन्ह्याची सजा तिने का भोगावी? मी आज तिला घेऊन जाणार.." ती शांतपणे म्हणाली.
"कशाला? तुमच्यात नेऊन बाटवायला. तू एक धर्म बुडवलास. बाजारबसवी झालीस म्हणून लेकीलाही विकणार.." जयाकाकू म्हणाल्या.
"वहिनी तोंड सांभाळून बोला. तुमच्या घरात मला काय भोगायला लागलं याची पूर्ण कल्पना आहे तुम्हाला. मी माझ्या आयुष्याचा मार्ग स्वत्: निवडला. माझी लेकसुद्धा तेच करेल. तिच्या बाजूने तुम्ही बोलायची गरज नाही. आज मी इथे आले कारण तिच्या बापानंतर तुम्ही तिला विकून टाकाल कुठेतरी." लक्ष्मी अजूनही शांतपणे बोलत होती.

सरस्वती हे सगळं ऐकत होती. तिचं तिला खरं वाटत नव्हतं. तिची आई तिला नेणार होती. पण कुठूनत्री आतून सरस्वतीला हे सगळं खटकत होतं. जे काही चाललय ते बरोबर नाही असं कुणीतरी तिला सांगत होतं.

"मी सरस्वतीला तुझ्याबरोबर पाठ्वणार नाही. जे काही व्हायचं ते होऊन जाऊ दे." विश्वाकाका निर्धाराने म्हणाले.

लक्ष्मीने वळून सरस्वतीकडे पाहिलं. "सरस्वती.. " पहिल्यान्दाच तिने आईच्या तोंडून तिचं नाव ऐकलं. का कुणास ठाऊक तिच्या अंगावर रोमांच आले.
"तू येणार माझ्याबरोबर?" तिच्या आईचा आवाज मधासारखा गोड होता.
सगळ्याच्या नजरा तिच्यावर रोखल्या होत्या. तिने हलकेच मान हलवली.. नाही...

"अगं, मी तुला खूप खुश ठेवीन. तुझ्या काकाकाकूपेक्षाही. तुला खूप शिकवीन. तुला मोठ्या शाळेत घालेन..." लक्ष्मी तिच्याकडे आली.

"पण मी नाही येणार.. " सरस्वती म्हणाली.
"अगं पण.. " ती काही बोलायच्या आत विश्वाकाका पुढे आले.
"ऐकलस ना? काही संस्कार दिलेत आम्ही तिला. तुझ्यासारखी लाज विकणारी नाही. समजलं? आता चालती हो तुझ्या या दुसर्‍या नवर्‍याला घेऊन." काकानी उस्मान्कडे पाहिलं. तो शांत उभा होता. न बोलण्याची शपथ घेतल्यासारखा.

"बेटा, असं करू नकोस. तुझ्या बाबानी मला तुला कधी भेटू दिलं नाही. आता तू तरी असं वागू नकोस. " लक्ष्मी च्या डोळ्यात पाणी तरारलं.

"काका, सांगा या बाईला. मी तिच्याबरोबर जाणार नाही. आणि माझी काळजी कराअय्ची तिला काहीही गरज नाही. मी माझं मी बघून घेईन." सरस्वती अत्यंत थंडपणे म्हणाली.

"सरस्वती..." लक्ष्मी आता मात्र रडायला लागली. उस्मान लक्ष्मीच्याजवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "चलो." इतकंच बोलला.

"लेकीन मै.. सरस्वती... बेटा.. मी आई आहे तुझी. "

त्याच गोष्टीचा तर सरस्वतीला राग होता...

उस्मान लक्ष्मीला घेऊन गेला. सरस्वती त्याना जाताना बघत होती. काका काकू खुप खुश होते. त्याना वाटत होतं की सरस्वती त्यानी दिलेल्या भाकरीला जागली. पण तिच्या मनात काय आहे हे कुणालाच समजलं नाही. कसलातरी एक तिरस्कार तिच्या मनामधे जन्म घेत होता. तो तिरस्कार, जो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. आज नाही पण उद्या.


Shyamli
Saturday, June 09, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं :-)
येउ द्या काहीतरी नवीन वाचायला मिळतय :-)

Chetnaa
Sunday, June 10, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही जमतेय कथा,नंदिनी,
पुढ्चा भाग लवकर येऊ दे...


Ladaki
Monday, June 11, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी खुपच छान आहे कथा पण तीन महिने लावणार तू संपवायला??
लवकर लवकर लिही ना बये
किती वाट बघायला लावशील???


Manutai
Monday, June 11, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, खूप पकड घेत आहे कथा! डेली एपीसोड ऐवजी शक्य तितक्या लवकर लिहिना क्रुपया...ख़रेच उत्कंठवधक आहे लिख़ाण. हुश्श.. संपली प्रतीक्रिया.........

Visunaik
Monday, June 11, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कथानक! उत्कंठावर्धक लेखन! पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

Manjud
Tuesday, June 12, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ नंदु मावशी,

तुला कोणी typist हवा आहे का? लवकर लवकर लिही ना ग बये...


Manjud
Tuesday, June 12, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे I am sorry.... कथेच्या सुरुवातीचा paragraph मी विसरलेच.... सावकाश लिही ग बाई...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators