Aditih
| |
| Sunday, June 10, 2007 - 7:15 am: |
| 
|
मस्त !!!!! सही जमलीय.
|
Ajjuka
| |
| Sunday, June 10, 2007 - 7:49 am: |
| 
|
चिन्नू, जयावि, तुषार आणि आदिथ, तुम्हा सगळ्यांचे आभार!
|
Bee
| |
| Sunday, June 10, 2007 - 9:51 am: |
| 
|
वा! शेवट खूपच छान रंगला होता अज्जुका. खर सांगू मला मिसेस बर्वेच्या एका लघूकथेची आठवण झाली. तिचा शेवट असाच काहीतरी होता. आणि हा परिच्छेद खूप छान उतरला आहे.. काय सांगू? सगळे तर सुख दुखलं म्हणतायत. हाही तेच म्हणणार. का सांगू? नातं उरलं नव्हतं फक्त कुरघोडी करणंच उरलं होतं ज्याचा वीट आला म्हणून सोडलं हे सांगू? नरेनची भिती वाटायला लागली. आज काय समोर येणार? आज तो कश्यापद्धतीने जिंकू पहाणार? सतत धास्ती. साध्या सोप्या गोष्टी वाकड्यात नेऊन दुसर्याला आणि स्वतःला torture करून घ्याच्या सवयी लागल्या होत्या. आपलं एका घाणेरड्या प्राण्यात रूपांतर होतंय हे सहन होईनासं झालं आणि एक दिवस नरेन घरी नसताना गुपचुप घर सोडलं. त्याच्या समोरून निघणं शक्य नसतं झालं मला. त्याचा ego दुखावून मी निघून जातेय हे त्याने सहन केलं नसतं. काहीतरी झालं असतं. काहीतरी खूप घाण. कधीही भरून न येण्यासारखं काहीतरी तुटलं मोडलं असतं. ते मी टाळलं. स्वतःच्याच घरातून चोरासारखी पळून आले.
|
Ajjuka
| |
| Sunday, June 10, 2007 - 10:21 am: |
| 
|
मिसेस बर्वे कोण? कोणती लघुकथा?
|
अज्जुका, खूप effective झाली कथा!अनावश्यक नाट्यमय डीटेल्स्च्या मोहात न पडता..
|
Tulip
| |
| Sunday, June 10, 2007 - 2:11 pm: |
| 
|
मस्तं. अगदी थोडक्यात किती मोठा आणि खोल कॅन्वास उभा केलास तिच्या त्या संपलेल्या नात्याचा. आणि शेवट 'तिचा' प्रवास पुढे नेणारा केलास हे फ़ारच छान. प्रिया तेंडुलकरच्या कथांमधे असंच मेलेल्या नात्यांच पोस्टमार्टेम जिवंतपणे केलेलं असायचं. keep writing more often अज्जुका
|
सहीच .... अजिबात flashy न करता effective . मुंबईत भेटलो तेव्हाची anxiety अनाठायी होती तर ... you reached there , easily and gracefully.
|
Zelam
| |
| Sunday, June 10, 2007 - 9:20 pm: |
| 
|
अज्जुका आवडली गोष्ट. सरळ आणि समर्पक.
|
Mankya
| |
| Monday, June 11, 2007 - 1:40 am: |
| 
|
अज्जुका .. मस्त रेखाटलयस भावचित्र ! प्रसंग छान खुलवलेस ! कथा खूपच आवडली ! माणिक !
|
Bee
| |
| Monday, June 11, 2007 - 1:53 am: |
| 
|
अज्जुका, काल मालगुडीची ट्यून शोधून काढली यूट्यूबवरून तुझी कथा वाचून झाल्यावर. तुला Mrsbarve जिला बरेच जण प्रिति म्हणत असतं माहिती असेल कदाचित. मायबोलिवरची ती एक खूप जुनी कथाकार आहे. हल्ली ती मुळीच दर्शन देत नाही. पण अधुनमधुन चक्कर टाकत इथे. ही बघ तिची profile /cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=view_profile&profile=mrsbarve-users त्या कथेचे नाव आता आठवत नाही.
|
Upas
| |
| Monday, June 11, 2007 - 3:40 am: |
| 
|
बहोत खूब अज्जूका.. प्रभावी पणे आणि सुसंगत मांडलेयस तिच्या मनातले विचार.. flow आवडला.. आणि हो let's move on म्हणत कावेरीला प्रवाही ठेवलसं हे छानच जमलं.. लिहीत रहा!
|
Meenu
| |
| Monday, June 11, 2007 - 4:25 am: |
| 
|
आज्जुका मस्त जमली कथा .. आवडली .. कुठेही फार भडकपणा न येता आली म्हणुन जास्तच आवडली
|
Zakasrao
| |
| Monday, June 11, 2007 - 4:34 am: |
| 
|
अज्जुका खुप छान लिहिली आहेस. तिच्या मनातील द्वंद्व, तिची घुसमट,तिच्या भावना आणि तिला वाटणारी भिती हे सहज रीत्या मांडलस. अशी अकारण भिती कधी कधी आपणही अनुभवलेलि असतेच ना आपली चुक नसताना. त्यावेळी छातीवर काहितरी ओझ आहे असच वाटत राहत. ते तुझ्या शब्दातुन पक्क उतरलय. आणि ते ओझ का आहे आणि कशासाठी आहे हे समजुन उमजुन सांगितल्यावर ते सहजपणे बाजुला टाकणे हा शेवट आवडला. ते नात्यातल कलेवर,बससाठी वापरलेली उपमा सर्व आवडल. तु नेहमी लिहि जा यार. मस्त लिहितेस.
|
अज्जुका, कथा सही जमलीय. एकूण स्थळ, संवाद, रूपकं, स्वगतं, insights आणि breakthroughs वास्तव आणि प्रभावी झालेत अगदी. एकूणच कथेचा बाज performing वाटतोय. याची एक छान एकांकिका होईल.
|
Psg
| |
| Monday, June 11, 2007 - 6:03 am: |
| 
|
बसचं रूपक मस्त आहे. वेगळं आहे. सलग वाचली की जास्त भिडते कथा..
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 6:49 am: |
| 
|
अरे बापरे!! केवढ्या प्रतिक्रिया!!! सगळ्यांचे आभार!! सुरूवात केली तेव्हा मला पण वाटलं नव्हतं इतपत बरी होईल असं.
|
Dineshvs
| |
| Monday, June 11, 2007 - 7:48 am: |
| 
|
अज्जुका, छान कथा. आता तक्रार हिच की इतके दिवस मायबोलीसाठी लेखनसंन्यास का घेतला होता ?
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 8:41 am: |
| 
|
वैभवा, हो रे! पण वाटलं नव्हतं जमेल असं. सन्मे, शेवटी काही झालं तरी नाटकवाली ना मी मुळात.. दिनेश, संन्यास असा नाही हो. पण जोवर मनातून लिहावंसं वाटत नाही तोवर मी लिहित नाही. सध्या लिहिण्याचा किडा चढलाय तर लिहितेय बस्स इतकंच. ट्यु, प्रियाशी तुलना केल्यावर आता मी गेले हरभर्याच्या शेंड्याला.. आता काही खरं नाही.. हो आणि शेवटाला positive note कडे मी जाणारच. असलेल्या negative मधेही positive शोधणं, life शोधणं याची सवय झालीये मला त्यामुळे... असो! पण आता लिहिणार.. अजून लिहिणार नक्की! श्वास ची लेखमालाही थोड्या वेगाने लिहिणार.
|
Viveki
| |
| Monday, June 11, 2007 - 8:43 am: |
| 
|
व पु काळेंचा खूप प्रभाव जाणवतो गोष्टीवर. म्हणजे त्यांच्यासारखच कुठली कोण दोन माणस अचानक भेटुन तत्वज्ञानच ऐकवायला लागतात एकमेकांना आणि अगदी intimate गोष्टी लगेच दुसर्याला सांगतात हे अतर्क्य वाटते. मला आणि माझ्या कुठल्याही मित्राला आयुष्यभर बसने प्रवास करूनही कॉलेज,ऑफिस,कॉलनी यातलया एकाद्या महिलेने तिच्या लग्न वा घटस्फोटाबद्दल कधीच सांगितले नाही. तेंव्हा आमचा अनुभव असा नाही. रुपक ठीक आहे पण एक्दम ढोबळ आणि बटबटीतपणे मांडले आहे, रुपक subtle असावे. मास्तुरेंचे काहीच म्हणणे नाही का नेमके याच गोष्टिवर ?
|
Zakasrao
| |
| Monday, June 11, 2007 - 9:07 am: |
| 
|
विवेकि वपुंचा प्रभाव गुड जोक. त्या अज्जुकेने ओर्कुट वर I hate VAPU नावाची community सुरु केली आहे. ग़ुड हं गुड जोक. वपु मलाही आवडतात तरीही हे सांगितल. कारण इथे परत रण नको पेटायला.
|