अज्जुका, चांगलं चाललय!एकदम जळजळीत वास्तव पातळीवर! काय आहे, इथे सगळं गोड गोड लिखाण असतं ना नेहमी, हा एवढा कडवट्पणा वाचायला जड जात आहे बघ 
|
Apurv
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:38 pm: |
| 
|
दाद ची कथा वाचल्यावर अजून काही मनाला भिडेल असे वाचायला मिळेल ह्याची शंका होती...पण आत तसे वाटत नाही... आशा करतो की शेवट अर्थपुर्ण होईल.
|
Ajjuka
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:02 pm: |
| 
|
सगळे... धन्यवाद!! मैत्रेयी... अपूर्व.. प्रयत्न करते. आता संपतच आलीये गोष्ट.
|
Monakshi
| |
| Friday, June 01, 2007 - 8:40 am: |
| 
|
चालूदे, लयी बेष्ट पुढचा भाग कधी टाकणार??
|
Sati
| |
| Friday, June 01, 2007 - 9:35 am: |
| 
|
अज्जुका, सहीच लिहीलंयस. एकदम प्रोफ़ेशनल रायटरचं लिखाण वाटतंय. बसचं रुपक आवडलं. साती
|
Giriraj
| |
| Friday, June 01, 2007 - 9:44 am: |
| 
|
पूर्ण झाल्याशिवाय आपण वाचत नाय... .. पूर्ण कर कथा...
|
Dhumketu
| |
| Friday, June 01, 2007 - 2:21 pm: |
| 
|
बरोबर बोललास गिरी... ..... ताटावर बसल्यावर पोट भरल्यावरच उठावे... उगीचच अर्धपोटी कशाला?
|
Jayavi
| |
| Saturday, June 02, 2007 - 6:41 am: |
| 
|
अज्जुका, फ़ार सुरेख सुरु आहे कथानक. अगदी आतपर्यंत पोचतंय सगळं. पण आता थांबू नकोस बाई....! वाट पहायचा कंटाळा येतो. बसचं असंही रुप......... something very different and interesting!!
|
Sakhi_d
| |
| Thursday, June 07, 2007 - 9:05 am: |
| 
|
अज्जुका कुठे हरवलीस? लिही ग पटकन...
|
Ajjuka
| |
| Thursday, June 07, 2007 - 8:11 pm: |
| 
|
आम्ही बोलायला लागून तासभर होऊन गेला होता. ऊन उतरायला लागलं होतं. एक almost घटस्फोटीत बाई आणि एक डॉक्टरेटचा विद्यार्थी यातलं हे संभाषण अजूनच absurd वाटायला लागलं होतं. "हसतेयस काय कावेरी?" "येतंय हसू.." "कशावर!" "सध्या तरी कशावरही!.." 'मूर्ख आहेस' असं म्हणता म्हणता त्याने ते आतल्याआत परतवल. माझं खोटं हसणं त्याला कळलं म्हणून की मी faculty म्हणजे त्याला senior होते म्हणून कुणास ठाऊक! "असं अजूनही बर्याच ठिकाणी जातेस का तू visiting faculty म्हणून?" "हं.. अजून एक्-दोन संस्था आहेत!." "म्हणजे शिकवण्यात बिझी!" "खूप नाही!" "मग उरलेला वेळ?" त्याला विचारायचं होतं उरलेल्या वेळाचं आता.. यापुढे काय करणार! आणि माझ्याकडे उत्तर नव्हतंच. आयुष्य नरेनला बांधून घेतलं होतं. सगळं त्याच्या सावलीत, तो सांगेल तसं, तेवढंच होतं. जगणं पण करीअर पण.. आत्ताआत्तापर्यंत तर केवळ मी घटस्फोट का घेऊ नये याची कारणे सांगण्याची स्पर्धा चालू होती आई आणि नरेनची. सह्या करूनही नरेन हट्ट सोडायला तयार नव्हता. शेवटी महिनाभरापूर्वी मानलं त्याने. आणि सध्या ६ महिन्यांसाठी आईबाबांच्यापासून दादाने सुटका केली. आता विचार करायला हवा पुढे काय चा.. पण कसं? कुठून सुरूवात करायची? सगळे contacts नरेनला ओळखणारे आहेत.. का दुसरंच काही करायचं? "तुला स्वैपाक येतो? पापड, लोणची बनवता येतात?" "ह??" "अगं उत्तम व्यवसाय आहे तो!" मी अजूनही समजून घ्यायच्या प्रयत्नात होते तो काय म्हणतोय ते! "हे बघ जिथे जिथे शिकवायला जाशील ना तिथे तिथे आधी samples घेऊन जात जा. प्रत्येक assignment किंवा परीक्षेच्याबरोबर एकेक पाकीट compulsory . त्याचे १० मार्कं extra!! केवढा खप होईल. केवढा धंदा वाढेल!" आता त्याला चेहरा सरळ ठेवणं मुश्कील झालं आणि आपल्याच विनोदावर तो हसत सुटला...... मग मीही!! क्रमशः...
|
Zakasrao
| |
| Friday, June 08, 2007 - 4:07 am: |
| 
|
अज्जुका मला खरतर पुर्ण झाल्यावरच लिहायच होत पण रहावल नाहि. खुप वेगळी चाललेय कथा आणि इंटरेस्टिंग वाटतेय. ते मधे मधे आकडे काय येतात ते जरा बघ ना.
|
Ajjuka
| |
| Friday, June 08, 2007 - 4:18 am: |
| 
|
झकास.. धन्स.. आकड्याचं solve केलंय...
|
Mrudu
| |
| Friday, June 08, 2007 - 12:54 pm: |
| 
|
अज्जुका, तुम्हाला पुढे लिहायला लवकर सवड मिळो! उत्तम झाली आहे कथा आत्तापर्यंत.
|
Ajjuka
| |
| Saturday, June 09, 2007 - 6:30 am: |
| 
|
"मग मी युनिव्हर्सिटीच्या या विभागातून त्या विभागात जाईन आणि आपला माल खपवीन. शिकवण्यापेक्षा यात नक्कीच बरा पैसा मिळेल!" मी अजूनही त्याच विनोदांच्यात घुटमळत होते. "आणि नरेनचा संपर्कही नाही. होना?" थबकण्याशिवाय पर्यायच नव्हता. नरेनचा संपर्क नसणं हे गमतीत का होईना पण किती बरं वाटलं होतं! काहीही बोलता आल नाही.. मी उगीचच चुळबुळत राह्यले. नरेनचा संपर्क, संदर्भ नसेल अस काय काय मला येऊ शकतं हे चाचपडत बसले. नव्हतंच असं काही. इतकं सगळं एकत्र होतं. याच क्षेत्रात राहून त्याचा संदर्भही येणार नाही असं कसं शक्य होतं? अगदी त्याच्याबरोबर काम नाही केलं तरी!! आणि कशावरून नरेन समोर येणार नाही कधीच? तेव्हा काय होईल? कसा वागेल तो? कशी वागेन मी? संपूर्ण professionally वागता येईल? "कधीपासून शिकवतेयस?" "बरीच वर्ष झाली." "एवढ्या लहान वयात faculty ?" "लहान?" "बर्याच वर्षांपूर्वी!" "हो. अरे माझ्या विषयात फारसे लोक नाहीयेत. I mean शिकवू शकणारे. आणि मला एक fellowship होती. त्यामुळे खूप संशोधन आणि अभ्यास करायला मिळाला होता लहान वयातच. ते झालं आणि इथे शिकवायला लागले." " Oh good! आणि मग पापड, लोणची कधी शिकलीस या सगळ्यातून?" "हं?" "अगं व्यवसाय करायचाय न तुला.... परीत्यक्ता बायकांसारखा!" "किरण!" रागही आला होता त्याने परीत्यक्ता म्हणल्याचा आणि त्या पांचट विनोदांची गंमतही वाटली. "मी सोडलं नरेनला. त्याने नाही टाकलं मला." "का? म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नकोस मी असंच विचारलं" काय सांगू? सगळे तर सुख दुखलं म्हणतायत. हाही तेच म्हणणार. का सांगू? नातं उरलं नव्हतं फक्त कुरघोडी करणंच उरलं होतं ज्याचा वीट आला म्हणून सोडलं हे सांगू? नरेनची भिती वाटायला लागली. आज काय समोर येणार? आज तो कश्यापद्धतीने जिंकू पहाणार? सतत धास्ती. साध्या सोप्या गोष्टी वाकड्यात नेऊन दुसर्याला आणि स्वतःला torture करून घ्याच्या सवयी लागल्या होत्या. आपलं एका घाणेरड्या प्राण्यात रूपांतर होतंय हे सहन होईनासं झालं आणि एक दिवस नरेन घरी नसताना गुपचुप घर सोडलं. त्याच्या समोरून निघणं शक्य नसतं झालं मला. त्याचा ego दुखावून मी निघून जातेय हे त्याने सहन केलं नसतं. काहीतरी झालं असतं. काहीतरी खूप घाण. कधीही भरून न येण्यासारखं काहीतरी तुटलं मोडलं असतं. ते मी टाळलं. स्वतःच्याच घरातून चोरासारखी पळून आले. "मगाशी नरेनचा फोन आल्यावर घाबरलीस म्हणून विचारलं. I am sorry मी हे विचारणं योग्य नाही.." "सांगण्यासारखं कहीच नाहीये रे. नातं सडलं, मेलं मग नात्याचं कलेवर घेऊन तसंच रहायचा धीर झाला नाही.... इतकंच सांगू शकते मी." क्रमशः.....
|
Sakhi_d
| |
| Saturday, June 09, 2007 - 7:17 am: |
| 
|
>>नातं सडलं, मेलं मग नात्याचं कलेवर घेऊन तसंच रहायचा धीर झाला नाही… इतकंच सांगू शकते मी.>> खरय अज्जुका... एकदा का नातं सडायला लागल ना की ते पुन्हा पुर्ववत होतच नाही. आणि ते तसच घेवुन चालायला खुप कठिन जाते. आणि जेव्हा हे सोडुनही टाकता येत नाही हे कळल्यावर तर खुपच त्रास होतो.... चला खुपच विषयांतर झालय. छान लिहिते आहेस. तिचे काय होते हे वाचायची खुप घाई झाली आहे. लवकर लिही...
|
Ajjuka
| |
| Saturday, June 09, 2007 - 8:06 am: |
| 
|
आजच्या दिवसात पूर्ण करणार नक्की... promise!!
|
Ajjuka
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:30 pm: |
| 
|
"मग guilt कसला आहे?" " guilt ?" "हो! त्याशिवाय का दचकलीस नरेनच्या फोनला." उत्तर नव्हतंच आणि ते शोधायचं टाळलंच होतं मी आजवर. असंच काय काय टाळण्यासाठी मी पळ काढला होता का? नरेनला सोडणं हे पळ काढणं होतं का? "अजूनही हरशील असं वाटतं तुला?" ‘हो कदाचित्’ असं पटकन मनात उमटून गेलं आणि मी विचारात पडले. हरणं जिंकणं हे शब्द नरेनच्या संदर्भात का येत होते अजूनही? पण आता ते absurd वाटायला लागले. "तू नरेनशिवाय जगू शकतेस ना?" "हो. म्हणजे काय! वर्षभर काय जगले नाही?" पटकन उत्तर दिलं मी. एक वेळ होती की नरेनशिवाय जगण्याची कल्पनाही उडवून लावली असती मी पण आता त्याच्याबरोबर जगणं सहन होत नव्हतं मला. "मग तू का हरशील?" तोंडावर फाडकन पाण्याचा हबकारा बसावा तसं वाटलं मला. आता ती वरचढ असण्याची धडपड संपली होती. म्हणजे कदाचित पळही असेल तो पण मी सुटले होते. मी मुक्त झाले होते. आता मी नरेनकडून हरूच शकत नव्हते. त्याच्या संपर्काला, संदर्भाला घाबरावं असं मी काहीच केलं नव्हतं. त्याला घाबरायची गरजच नव्हती मला. सगळंच अचानक लख्खपणे जाणवलं मला. माझं मुक्त होणं आतल्यात अनुभवत होते काही क्षण आणि बहुतेक किरणही. कारण भानावर आले तेव्हा त्याच्याही डोळ्यात हसू होतंच. "बस आली बघ! याच्यानंतरची आता एकदम तासाभराने येईल. घरी कशी जाणारेस?" "ह्याच बसने जाईन!" सहजच उत्तर बाहेर पडलं तोंडातून. आणि मीच खूश झाले. आता येणारी बस ही बस होती. मला एका जागेवरून दुसर्या ठिकाणी घेऊन जाणारी. काय ग्रेसफुल दिसत होती ती येताना. " Bravo कावेरी!" मी हसले. बस आली, मी बसमधे बसले. बस सुरू झाली. मी मागे वळून स्टॉपकडे पाह्यलं. बसस्टॉपने माझ्याकडे बघून हळूच डोळे मिचकावले बहुतेक. अचानक मातीपावसाचा खमंग वास आला. पावसाचा पहिला थेंब चेहर्यावर घेताना नव्याने शिकल्यासारखा मी खूप मोठ्ठा श्वास भरून घेतला अगदी मोकळेपणाने!! समाप्त….
|
Chinnu
| |
| Sunday, June 10, 2007 - 12:16 am: |
| 
|
नी, पावसाच्या पहिल्या थेंबाच्या आवेगात आलेल्या कथेला सलाम!
|
Jayavi
| |
| Sunday, June 10, 2007 - 3:20 am: |
| 
|
वा........ सुरेख...!! कावेरीची घुसमट चांगलीच जाणवत होती....आणि तिच्या पहिल्या मोकळ्या श्वासाबरोबर अगदी सुटल्यासारखं वाटलं किरणचं character पण खूपच आवडलं
|
वाचली आणि आवडली, याहून अधिक आज लिहिणार नाही, पुन्हा वाचे आणि पुन्हा लिहेन.
|