|
Shrini
| |
| Friday, May 11, 2007 - 10:35 am: |
|
|
ही एक रुपक कथा आहे हे आधीच सांगितलेले बरे! ती बॅंक इतर बॅंकांपेक्षा जरा वेगळी होती. म्हणजे असे बघा, आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण बॅंकेत कसे पैसे ठेवता येतात, काढता येतात, कर्ज घेता येते, लॉकर्स घेता येतात, ई. ई. या बॅंकेची पद्धत वेगळीच होती. इथले खातेदार, बॅंकेत जमा करायचे ते तांबे, पितळ, जस्त, कथीला सारखे धातू; क्वचित सोने देखील! आणि मग बॅंकेचे कर्मचारी त्या धातूंवर रासायनिक प्रक्रीया करून त्यांचे सोन्यात रुपांतर करायचे. जर सोनेच जमा केले गेले असेल, तर त्याचे शुद्धीकरण करायचे. या कामाकरता बॅंकेच्याच तळघराचा एक भाग वापरला जायचा, आणि मग त्या सोन्याच्या लगडी बनवून त्या तळघराच्या दुसर्या भागात साठवल्या जायच्या. आता, जमा होणार्या सगळ्याच धातूंचे रुपांतर सोन्यात होत असे, असे नाही. बॅंच्या कर्मचार्यांचे पगार असायचे, तर कधी ग्राहकांना ते जमा करत असलेल्या धातूंच्या बदल्यात इतर धातू हवे असायचे. या करता बॅंकेकडे असलेले जस्त, पितळ, तांबे वापरले जाई. पण उरलेले धातू मात्र नियमित आणि नेटकेपणाने सोन्यात बदलून साठवले जात, कारण बॅंकेची श्रीमंती तिच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून होती ना! एकेकाळी ही बॅंक खूप श्रीमंत होती. तिच्या कडे ग्राहकांची अगदी रीघ लागलेली असे. कर्मचारी त्यांच्याकडून धातू जमा करता करता, आणि त्यांचे सोन्यात रुपांतर करताना थकून जात. सोन्याच्या लगडी ठेवायला जागा जवळ जवळ पुरेनाशी होई. शिवाय ग्राहक तरी किती समजूतदार. जमा करतील भरपूर, आणि परत मागतील अगदी थोडेसे. मग ही बॅंक का बरे श्रीमंत होणार नाही ? पण गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र बदलत चालले होते. बॅंकेकडे आता पूर्वी सारखी आवक येत नव्हती. ग्राहक भांडखोर झाले होते. जमा करायचे एवढेसे, आणि परत मागायचे भरपूर. बॅंकेचा निव्वळ नफा कमी होऊ लागला. शिल्लक घटू लागली. येण्यापेक्षा देण्याचे प्रमाण वाढू लागले, आणि शेवटी बॅंकेला आपला शिलकी सोन्याचा साठा वापरात आणावा लागला... आता ही बॅंक अगदी गरीब झाली आहे. ग्राहक येतात, धातू जमा करतात, पण जमेचे प्रमाण घटले आहे. परतफेडीत आणि कर्मचार्यांच्या पगारात जवळ जवळ सगळीच आवक संपून जाते. सोने तयार करायला फारसे काही उरतच नाही. शिलकी साठ्यातल्या सोन्याच्या लगडी आता हाताच्या बोटावर मोजता येतील. बॅकेचे कर्मचारी आता वेळ मिळेल तेव्हा जुने दिवस आठवताता आणि खेदाचे सुस्कारे सोडतात... ---------------------------------------------------------------------------------- "काय रे, आजकाल तू बराच बारीक झाला आहेस", माझा मित्र मला म्हणाला. "हो ना, सध्या जरा व्यायाम आणि डाएटींग सुरु केले आहे", मी उत्तरलो. ----------------------------------------------------------------------------------
|
पहिल्यान्दा वाचली तेव्हा समजलीच नाही. दुसर्यादा, तिसर्यादा वाचल्यावर अर्थ लक्षात आला. मस्त रूपक वापरलय.
|
Zakasrao
| |
| Saturday, May 12, 2007 - 5:28 am: |
|
|
थोडं कळल्यासारख वाटतय पण बघु अजुन कोणाच्या काय प्रतिक्रिया येतात ते मग अजुन कळेल. btw आमच्या बॅन्केत आता असले ग्राहक सोडण्याची वेळ आली आहे.
|
Saee
| |
| Saturday, May 12, 2007 - 8:32 am: |
|
|
मला ३ - ४दा वाचल्यावर दोन तर्क करावेसे वाटले - पुर्वीच्या आणि आजच्या पिढीतल्या लोकांच्या शारिरीक क्षमता आणि पुर्वीचे आणि आजचे पालक. अन्यथा नाही समजले काहीच.
|
Maasture
| |
| Saturday, May 12, 2007 - 10:47 am: |
|
|
सोने = चरबी वगैरे कल्पना ठीक आहे, पण अगदीच बळजबरीने आता रुपक कथा लिहितो हं अशी लिहिलेली वाटते. इथे रुपक आहे पण कथा अजिबात नाही. नुसताच काहीना पहिल्या वाचनात न कळणार लिहिल म्हणजे गोष्ट चांगली असे नाही होत. तुमचे आतापर्यंतचे सगळेच प्रयत्न असे ओढुन ताणून वाटले. आणि प्रत्येक प्रयत्नागणिक काहीपण सुधारणाही नाही. स्वत : चच लेखन पुन्हा वाचा काय चुकतय ते बघा ते सुधारन्याचा प्रयत्न करुन पुढे लिहा. पुढीळ लेखनासाठी शुभेच्छा.
|
Disha013
| |
| Monday, May 14, 2007 - 8:39 pm: |
|
|
मला वरचा भाग वाचल्यावर वाटतय की शाळा,पालक आणि पाल्य याविषयी असावे. पण शेवटच्या २ ओळी वाचुन खाणेपिणे आणि त्यानुसार बनणारी तब्येत असावे असे वाटते.कोणतं बरोबर?की दोन्ही चुक?
|
Shrini
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:19 am: |
|
|
जेव्हा आपण शरीराच्या गरजेपेक्षा अधिक आहार घेतो तेव्हा त्या अतिरीक्त आहाराचे, शरीर चरबीत रूपांतर करून ती साठवून ठेवते, आणि जेव्हा शरीराला अन्न मिळत नाही तेव्हा शरीराच्या चलन वलना करता ती चरबी वापरली जाते. हे थोडसं बॅंकीसारखंच आहे, म्हणजे बॅंकेत आपण पैसे साठवून ठेवतो आणि गरज पडते तेव्हा ते काढून त्यांचा वापर करतो. या दोघांमधले साम्य मला गमतीदार वाटले म्हणून ही कथा लिहीली, आणि जसे आपल्या करता पैसे महत्वाचे तसे शरीराकरता चरबी महत्वाची, म्हणून ते सोन्याचे रूपक वापरले. मात्र काही जणांना हे रूपक पाल्य / पालकांविषयी का वाटले ते कळले नाही. पालकांना 'बॅंक' समजणे हे माझ्या मते फारच ढोबळ आणि कंटाळवाणे आहे!
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:42 am: |
|
|
हुश्श! चला म्हणजे मला जे वाटल ते बरोबर होत तर.
|
कधी नव्हे ते माझाही अंदाज बरोबर ठरला. मला हे रूपक जास्त भावलय.
|
Disha013
| |
| Tuesday, May 15, 2007 - 3:07 pm: |
|
|
श्रिनी,पालक्== बँक न्हवे. तर शाळा==बँक असे वाटले. कर्मचारी म्हणजे शिक्षक आणि पाल्य म्हणजे सोने. आणि पालक म्हणजे ग्राहक असे रुपक आहे असे वाटलेले. म्हणजे पुर्वी सुसंस्कारित मुले शाळेत जायची,प्रामाणिक शिक्षक मनापासुन शिकवायचे आणि सोन्यासारखे नागरिक निपजाय्चे. आजकाल तसे होत नाही. पण शेवट्च्या २ लाईन वरुन सोने==चरबी असा इशारा मिळतो. पण कल्पना आवडलि!
|
मला सोने = चरबी हे फ़ारसे पटले नाही. सोने जेवढे जास्त साठेल तितके फ़यद्याचेच असते पण चरबी..? सोन्याचे रूपक / उपमा बहुधा एखाद्या निर्विवाद चांगल्या, मौल्यवान गोष्टीसाठी वापरतात. असो. <cbdg>
|
Yog
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:13 pm: |
|
|
छे! अपेक्षाभन्ग! काहीतरी महान दडलय अस वाटत होत. किमान ही कथा "मायबोलीची" आहे इतपत तरी बरेच parallels दिसले : सोने करून देणे म्हणजे इथल्या जागेचा फ़ुकट वापर, तळघर म्हणजे archives , रासायनिक प्रक्रीया म्हणजे देवनागरीकरण, शुध्धीकरण म्हणजे शुध्धलेखन, ग्राहक आता भान्डखोर झालेत, आजकाल चित्र बदलले आहे म्हणजे नुसत्या बट्बटीत जाहिराती दिसतात, जुने दिवस आठवतात,तू बारीक झाला आहेस (कमी दिसतोस या अर्थी) आणि dieting म्हणजे तेच HH ची व्यसनमुक्ती वगैरे असे वाटले होते.. अरेरे! इथे येवून काहितरी "सकस" शोधायची सवय अजून जात नाही हेच खरे. (लेखकाने पुन्हा एकदा रूपक नीट तपासून पहावे.) ~D
|
Ashwini
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:13 pm: |
|
|
योग.. अगदी. श्रीनि, मला पण सगळ्यात आधी सोने=चरबी असेच वाटले होते. पण ही श्रीनिची कथा आहे हे लक्षात घेता तो अर्थ फारच सोपा आणि अळणी वाटला. मग ही भारताची राजकीय किंवा सामाजिक स्थिती असेल का पासून ते मायबोलीमधले सध्याचे बदल (योगने म्हंटल्याप्रमाणे) असे काहीही वाटले. पण नेहमीसारखी मजा आली नाही हे खरं. दोष वाचकांचा नाही, तुझ्याकडून जास्त अपेक्षा करायची सवय लागली आहे.
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:18 am: |
|
|
खी खी खी.. श्रिनी चेष्टा नाही करत तुझी पण चरबी बरोबर सोने हे एकदम विनोदी होते आहे. मैत्रेयीने लिहिल्या प्रमाणेच माझे मत आहे.. तुझ्या चिमुकल्या कथा वाचताना मला त्या गणितासारख्याच लक्षात घ्यावा लागतात. एक एक वाक्य पुर्वीच्या वाक्याशी जोडत, त्याचे logic घेत घेत ती कथा समजवून घ्यावी लागते. परत वाचून झाली की ते गणित सुटेलच असे नाही.. :-)
|
Shrini
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:12 am: |
|
|
आईला, कमाल आहे. आधीच्या माझ्या काही गोष्टी कठीण वाटल्या म्हणून एक सोपी गोष्ट लिहीली तर म्हणे, सोपे का लिहीतोस!!! थांब ऍश, आता एक झेन कथाच लिहीतो! मैत्रेयी, 'मौल्यवान' ही संकल्पना सापेक्ष आहे. शरीराकरता 'चरबी' ही अतिशय मह्त्वाची गोष्ट आहे. देव न करो, पण जर तुला काही दिवस सक्तीचा उपवास घडला, तर याची प्रचिती येईल! असो, किमान नंदिनी आणि दिशा ला हे रूपक आवडले हे वाचून बरे वाटले. आता मी ही भवभूतीच्या चालीवर म्हणतो, की 'कालो ही अयं निरवधीय विपुला च प्रूथ्वी!'
|
पृथ्वी असे लिहा pRuthvI
|
Ashwini
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:52 pm: |
|
|
अरे लिही की. तुझ्या झेन कथा वाचून खूप दिवस झालेत, खरच! फार तर आणखी एक पोस्ट टाकून अर्थ पण लिही म्हणजे झालं
|
|
|