Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Vishva

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » Vishva « Previous Next »

Manogat
Thursday, May 10, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पाठमोरा व्हीलचेअर वर बसुन क्षितिज खीडकितुन बाहेर बघत होता. डोक्यात जीवनाच्या हजरो विचारांचि गुन्तागुन्त चालली होति. ग़ेलेल्या दिवसांच्या आठ्वनित गुंतुन तो रोज सारख त्या खिडकी जवळ बसुन बाहेर बघत होता त्या दिवसाच्या आठ्वनित….ती भयानक रात्र जी त्याच्या जीवनाला अस्ता-व्यस्त करुन गेली..

सकाळीच क्षितिज ची आई तो जाणार म्हणुन तयारीत लागली होती. क्षितिज चे बब पेपर नुस्ताच हातात पकडुन होते, पण त्याना आठवत होता तो लाहानसा चिमुरडा क्षितिज किती रागवाव लागायचा त्यला अभ्यासाकरता. त्यानि कधी विचर पण न्हवता केला कि हा इतका मोठा होउन परदेशि स्वकर्तुत्वावर जाइल म्हणुन.. ह्या विचारांनि त्यांच चित्त अभिमानाने फुलुन आल आणि नकळत दोळ्यात पाणि. तसे ते पहिलेपसुनच हळवे होते..पण क्षितिज ची आई मात्र गंभिर होति तिला माहित होता बाबांचा हा स्वभाव. म्हणुन स्व:ताच क्षितिजच्या पासपोर्ट च्या कामापासुन तर त्याच्या packing सुद्ध तिनेच केल होते.

आता क्षितिजच्या खाण्याच्या वस्तु तयार करतांना तीला माहित होत, बाबा विचारमगन असतिल म्हणुन तीने त्याना आपल्याला मदत कारायच्या निमित्त्याने बोलवुन समजविण्याच्या सुरात सांगितल "अहो तो आता मोठा झालाय कशाला काळजी कराता जाईल व्यवस्तिथ अणि आपण जाणार आहोत न त्याला सोडायला airport वर. आहो आजकालच्या युगात इतक्या सहुलति आहेत आपण करुयात न त्याच्याशि रोज chat .. तीचे हे शब्द ऐकुन बाबांनि तिला एक सुरेखसे स्मित हास्य दिले आणि दोघेही दोळ्यातुन एकमेकांना या एकटेपणाचि समजुत काढु लागले.
तेवढ्यातच क्षितिज लगबगित्न बाहेरन आल आणि आई च्या नावाचा त्याचा जप सुरु झाला. क्षितिज बरोबर नीयती पण आलि होती त्यादीवशी.. नीयती क्षितिज चि होनरि बायको. नाहि love marragi नाहि arrange marriage . नीयती म्हण्जे बाबांच्य मित्राचि मुलगी. अगदी एका नजरेत भावेल अशी.

बाबांच्या आग्रहा वरुन क्षितिज नियतिच्या भावाच्या लग्नत गेला. आई बाबंच्या मनात लग्नच खुळ असेल हे त्याला ठाउक पण नह्व्त. पण नियतिल पाहताच त्याला ती आवडली अणि त्याच्या दोळ्यतला हा भाव त्याच्या बाबांनि अचुक पणे टिपला. मग काय रोजच नीयतिचा विषय घरी नीघु लागला आणि क्षितिज पण त्यत intrest घेउ लागला. क्षितिज पण देखणा होता उंच पुरा, सावळा पाहताक्षणि नियतिच्या पण मनात तो उतरला होता. त्यच ते कोमल बोलण अणी नीखळ हास्य तील भावल होत.
शेवटि लग्न जुळल आणि दिवाळितली तारिख निघालि.


Mahe
Thursday, May 10, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सुरुवात केलीस, अजुन पुढे काय होइल ह्याची उत्सुकता...
लवकर लिही.

भाग्यश्री


Rani_2007
Thursday, May 10, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवात चांगली आहे. पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्दया म्हणजे वाचायला सोपे जाईल.

Manogat
Friday, May 11, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ कस सुरळीत चालल होत, त्यादरम्यान क्षितिजला त्याच्या boss नी तीन महीन्या साठि onsite ची विचारणी केली. इतका चांगला chance आणि लग्नाला पण ६ महीने असल्यामुळे त्याने लगेच होकार दिला. नियति आई बाबा सगळेच ही बातमी ऐकुन खुश झालेत पण मनातन दुखावले पण, क्षितिज इतक्या दुर कधी त्याच्या पासन गेलाच न्हवता. आई ने तर लगेच याच श्रेय नीयतिला दिल "तिच पायगुन लाभला"म्हणुन बाबांना कौतुकाने सांगु लागली.

पाहता पाहता जाण्याचा दिवस उजाडला रात्री २ ची flight होति.त्यामुळे आई, बाबा अणि क्षितिज असे तिघेहि कारनी निघणार होते. तशी नियतिचि पण खुप इच्छा होति पण तीचा पेपर दुसर्या दिवशि असल्यामुळे क्षितिज तिचा वारंवार आग्रह असतांना पण नाही म्हणाला. ती त्याच्या वर रागवली पण होति, पण त्याच्या फ़सव्या हास्यानी तिला कधिच मनवल होत.

अनि पाह्ता पाह्ता ६:०० वाजलेत तसेच यांचि निघायचि घाइ सुरु झालि बाबांच आई च्या मागे लवकर चला हा जप सुरु झाला. सगळी तयारी आटोपुन शेवटी सगळे car मध्ये क्षितिजचे सामान भरु लागले..

आईने देवा पुढे दिवा लावला आणि क्षितिजला देवाला नमस्कार करायला लावला. देवाला नमस्कार करुन क्षितिजने आई ला नमस्कर केला तर आई ने लगेच त्यचा हात पुढे घेउन देवा जवळचा एक काळा धगा बांधला
आणि त्यला म्हणाली ह धागा तुझी सुरक्षा करेल, सगळ्या संकटातन तुला वाचवेल, क्षितिज त्यावर हसला अणी तीला म्हणाला तुम्हि दोघ आहात ना माझ्या बरोबर मला कहीच होणार नाही अणि आई च्या मिठित शिरला आत्ता पर्यंत गंभीर असलेली आई त्याला मिठित घेताच रडु लागली, पण बाबांची येण्याचि चाहुल लागताच तिने स्व:ताला सावरल. क्षितिज बाबांच्या पाया पडला तर बाबा खंबीर पणे त्याला म्हणाले जप स्व:ताला. पण स्व:ता क्षितिजच त्यांच्य जवळ जाउन रडला आणि दोघही कळजी घ्या अस भरल्या अवाजात त्यांना सांगु लागला. त्याला थोपटुन बाबा काही न बोलताच बहेर गेले. आई तर बाबांच हे रुप पहुन चकीतच झाली होती पण तिला माहीत होत बाबा क्षितिज नसतांना किती रडले होते.
तसा क्षितिज काही दिवसां कर्ताच चालला होता पण का जाणु तिघेही इतके भावुक झाले होते.

आई बाबा गाडित बसले आणि क्षितिज आणि नियतिने दोळ्यातुनच एकमेकांना निरोप दिला.. तिच ते मोहक रुप दोळ्यात साठवुन क्षितिज गाडित बसला, त्यांचि गाडि निघायचीच होती पण नियतिच्या ह्रिदयचा एक ठोका चुकला अणि त्याने जाउ नये असे का जाणु तिच्य मनात विचार आला, पण क्षितिज पहिल्यांदा आपल्याला सोडुन निघाला असावा म्हणुन आपल्याला अस वाटत असाव. म्हणुण तिने हा विचार कोणालाच बोलुन दाखवला नाहि. आणि हासत हासत सगळ्यांना निरोप दिला.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators