Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 18, 2007 « Previous Next »

Mankya
Tuesday, April 17, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मस्त बहरलय !

मयुरा .. मयुरा .. काय बोलू मित्रा !
श्वास श्वास .. माती माती .... काय लिहून गेलास हे, वाह !
अप्रतिम कविता अन ओघ !

दाद .. जबरदस्त गं !
विस्कटलेल्या नजरेत .. आह !

स्मि .. पाऊस अन जगणं दोन्ही आवडल्या !
चुकार तुषार .. सही है !
तोच स्पर्शते मी .. कल्पनेला सलाम !

सुमेधा .. विरह आवडली गं !

वैभवा ... कविता कुठय रे !

माणिक !


Vaibhav_joshi
Tuesday, April 17, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेक ऑफ ...


नेहेमीप्रमाणेच प्लेन टेक ऑफ करतं ...
खाली बघताना जाणवतं
" हे आपलं शहर " .
काही क्षणांपुर्वीच आपणही ,
जीव पणाला लावून धडपडणार्‍या
गर्दीतलेच एक होतो ..
मग आताच असं
आभाळाला हात लागल्यागत का होतंय ?
की हलकं झालंय मन ,
आपल्या असण्या नसण्याची जबाबदारी
आपल्यावर नसल्याने ?
अतिशय वेगात पुढे चाललंय सगळं .....
सगळं सगळं ... त्या विश्वात्म्यावर सोपवून
सगळेच एका निरपेक्ष भावाने वावरतायत ...
अगदी त्या पायलटच्या पण कपाळावर
पुसटसं अष्टगंध दिसलं होतं मघाशी ...
इतकं हलकं वाटतं ? एकदा देवावर सोपवलं की ?
मग पोटात भीतीचा गोळा नसताना ...
पाय जमीनीवर असताना ...
का जमत नाही कर्तव्य करीत पुढे जाणं ?
.....
देवघरातली अष्टगंधाची डबी ...
कुठाय कुणास ठावूक .....



Mankya
Tuesday, April 17, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .. वैभवा .. वाह !
का जमत नाही कर्तव्य करीत पुढे जाणं ? ... अप्रतिम लिहिलस !
किती वेगळा विषय घेऊन आलास .. प्रचंड आवडली !

माणिक !


Astitva
Tuesday, April 17, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दावाचून पुस्तके मुकी आहेत
शब्दावाचून भावना मुक्या आहेत!

शब्दास शब्द आहे
शब्दावाचून शब्दच नि: शब्द आहेत!

शब्दास अर्थ आहे
शब्दास समानार्थ आहे!

शब्दास माझ्या अर्थ आहे
जिवनास माझ्या सार्थ आहे!

भुकेल्या वाचकासाटी, शब्दात
एक माझा शब्द आहे!

विचाराचा हा मेळ आहे
शब्दाचा हा ख़ेळ आहे!

शब्दास आहे मोल
पेश्या परी ख़ोल!

न होवो शब्दाचा बाजार
शब्द आहेत माणसाचा आधार!

'रोहित' ऊर्फ़ 'साहिल'


Meenu
Tuesday, April 17, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड तुझ्या कवितेवर कालपासुन सतत विचार करत होते विशेषतः या शेवटच्या दोन ओळींवर ..

तशी काहीच गरज नव्हती, ते जसेच्या तसे तू परत केले होतेस;
फक्त त्या ढगांमधला पाऊस तेवढा बदलून गेला होता...


एकदा वाटलं तुला सांगावं की अर्थ सांग .. पण अंहं त्या दोन ओळीत खुप अर्थ आहे .. बरच झालं तुला नाही विचारलं ते ..

वैभव टेक ऑफ मस्तच. मी पण याच्याशी संबंधित अशाच विषयावर गेले कित्येक दिवस विचार करतेय.

मयुर मस्तच ..

शलाका वाह शेवटचं कडवं फारच सुंदर हं ..


Meghdhara
Tuesday, April 17, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा वैभव.. सुंदर. अगदी स्वताःच्या मनातलं वाटून हसू आलं.. )

झाड.. फक्त पाऊस बदललेला.. शब्दच नाहीत.

शलाका.. काय कल्पना आहे.. विस्कटलेल्या नजरेत.. वाह.

मीनू नदी अगदी मिखळ आनि दरी वाह:-)
मयूर मस्त.. खुपच छान. अशी वेगाने आलेय ही कविता.. सुंदरच.

स्मि शेवट तर जबरदस्त.. व्वा.

इतक्या सार्‍या सुंदर कविता एक पुर्ण आत येत नाही तोच दुसरी..

मलाही एखादी जुनी तरी पोस्ट करावी असं वाटू लागलय. :-)

मेघा



Chinnu
Tuesday, April 17, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव प्राजक्ताची आत्महत्या टचिंग!
झाड घन बरसले. छान वाटलं वाचुन. सुमेधा, स्मि छान. मीनु दुसरी आवडली.
शलाका मन खिन्न केलस..

मयुरा, काय लिहितोस रे, वाह वाह..

हातांमध्ये हात असू दे
मौनातही ओठ हसू दे
ह्या नक्षत्रांच्या रांगोळीची
मी राख होऊ देणार नाही

छान. जाणीव फारच आश्वासक आहे. पुन्हा जगायची भूल नाही पडली, तरच नवल!

अशी हतबल होऊ नकोस
एकांती क्षण ओवू नकोस
उन सावलीचा खेळ वेडे
अर्ध्यामध्ये संपणार नाही.

खासच. एकांती क्षण ओवाण्याची कल्पना अतिसुंदर.

मला जरा आठवून पहा
थेंब थेंब साठवून पहा
उरल्यासुरल्या सयींची
शपथ जुनी सुटणार नाही

किती छान समजुत घातलीस!

ओंजळ ओंजळ रिती रिती
श्वास श्वास...माती माती
शून्यातूनही वजा झालो
काय सांग राहिले हाती?

हे म्हणजे माझ्या डोक्यावर गेले पाणी. शुन्यातूनही वजा झालो, काहीच अस्तित्व उरले नाही. वाह!

आता अंकांची शाळा नको
आयुष्याचा पडताळा नको
आसवांच्या ह्या तोरणांचे
कर्ज कधी फिटणार नाही

काय बोलु? अंकाचा व्यवहार न करणारी आणि आसवांचे कर्ज न मागणारी दुनिया भेटु देत तुला.

शब्दच कसे मुके झाले?
अर्थाचेही का धुके झाले?
काजळ तुझे ओले ओले
अक्षर अक्षर फिके झाले...

लय एकदम बेछुट आहे!

लिहिता लिहिता संपेल सारं
वाहता वाहता कंपेल वारं
ह्या वादळलेल्या कवितेचा
मला निरोप घेणं जमणार नाही.

खरोखरच वादळलेली कविता आहे, वाचल्यावरही मन अजुन थरथरतयं, वावटळीत सापडलेल्या पानासारखं!


Mayurlankeshwar
Tuesday, April 17, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा.. चिन्नू सगळ्यांचेच शत शत आभार :-)
शेवटी मलाही भावना शब्दांतून पोहोचवणं हळू हळू जमायला
लागलंय म्हणायचं... :-)


Swaatee_ambole
Tuesday, April 17, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रे वा! खूप दिवसांनी आले इथे, आणि मस्त वाटलं.
मयूर, झाड, दाद, सुंदर लिहीलंय तुम्ही.
मीनू, दरी मस्त.

वैभव, प्राजक्त अप्रतिम..
टेक ऑफने विचारात पाडलं.. नेहेमीसारखंच.. :-)


Devdattag
Tuesday, April 17, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज जरा निवांत वाचल्या सगळ्या कविता..
मयुर, शलाका.. कविता आवडल्या
वैभव.. टेकन ऑफ..:-)
मीनु.. दरी आवडली.. आणि नदीही
स्मिता दोन्ही कविता आवडल्या.. पाऊस जास्त
झाड.. नेहमीप्रमाणेच भिडणारं.. खासच.. परत परत वाचतोय


Swaatee_ambole
Tuesday, April 17, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अद्वैत

आणि अखेर
वर्षानुवर्षांची वेडी वाटचाल संपून
तो मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत पोचतो
तोवर त्याला ज्ञात असलेलं जग
अंधारात विरून गेलेलं असतं..
जन्मापासून छळत आलेल्या त्या एकाच प्रश्नाची ठिणगी
मूर्तीपुढच्या मिणमिणत्या ज्योतीला आव्हान देऊ लागते..
स्वतःचाच भार असह्य होऊन भुईवर कोसळताना
सारी उरली सुरली शक्ती एकवटून
तो टाहो फोडतो..
'एकदा सांग..
तू खरंच आहेस का?'

उत्तराऐवजी..
नुसतेच निनादत रहातात त्याच प्रश्नाचे शेकडो प्रतिध्वनी..
'तू खरंच आहेस का?
तू खरंच आहेस का..??'

अन् बघता बघता त्याचे डोळे
समोरच्या मूर्तीइतकेच निर्विकार होत जातात....


Chinnu
Tuesday, April 17, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर! .. .. ..

Ameyadeshpande
Tuesday, April 17, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्किलार? .. .. ..

Mankya
Tuesday, April 17, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती .. अप्रतिम !

माणिक !


Swaatee_ambole
Tuesday, April 17, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्किलार? अजिबातच नाही. बघ बरं विचार करून. :-)

Mankya
Tuesday, April 17, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्किलार म्हणजे काय ?????

माणिक !


Ameyadeshpande
Tuesday, April 17, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं. हे खरंतर त्याच्या अगदी विरूद्ध आहे! नीट आठवलं आत्ता. :-)
खूप gap नंतर वाचायला मिळाली तुझी कविता, मस्त वाटलं :-)

माणिक, इस्किलार म्हणजे जी. एंची एक कथा आहे.


Mayurlankeshwar
Wednesday, April 18, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! अप्रतिम... 'अद्वैत'...

'अन् बघता बघता त्याचे डोळे
समोरच्या मूर्तीइतकेच निर्विकार होत जातात.... '
थक्क झालो...


Daad
Wednesday, April 18, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव - 'मग पोटात भीतीचा गोळा नसताना ... '
'देवघरातली अष्टगंधाची डबी ... '

स्वाती, अद्वैत - "त्याचे निर्-विकार होत जाणारे डोळे".

चांगली (उत्तम) कलाकृती, एकतर मूलभूत प्रश्नांना उत्तर तरी देते किंवा अधिक मूलभूत प्रश्न तरी विचारते! परत एकदा सिद्ध केलत, दोघांनीही.
(ए, पण इतक्या दिवसांनी का गं?)


Daad
Wednesday, April 18, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पसारा

कुणाच्या खांद्यावर कुणाचे....

आज ठरवलं
ते काही नाही, सगळा पसारा आवरायचाच
झाडून, पुसून लख्ख करायचं, अगदी नव्यासारखं
नीट लावायचं सारं सारं
उपयोग नाही, वापरात नाही ते सरळ फेकून द्यायचं,
संभाळण्याचाच जाच जास्त, नं काय!

......पण मग सापडलं ते गाठोडं! तू इथे टाकून गेलास ते? माझ्या आठवणींचं?
आधी माझं मलाच आवरेना आणि हे वर पुन्हा!

कुणाच्या खांद्यावर....

-- शलाका





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators