Jagu
| |
| Monday, April 09, 2007 - 7:36 am: |
|
|
अम्रुता तुमच्या कवितेत भावना अगदी सहज उतरल्यात, छान झालेय एक विचारु
|
Mankya
| |
| Monday, April 09, 2007 - 8:06 am: |
|
|
पुलस्ति, मेघा ... मःपुर्वक आभार ! मीनू ... ' जगणं ' खूपच अर्थपुर्ण, सहीच उतरलिये, आवडली ! वाक्य आठवल हे वाचून " माणूस असा जगतो की कधी मरणारच नाही अन माणूस असा मरतो की कधी जगलाच नाही !" माणिक !
|
मीनू.. "जगणं " खुपच छान! वर वर हसताना, खोल खोल मनात कुढत राहण्याला, कसं म्हणावं जगणं ..? माझ्या मनातले शब्द! खुपच छान!
|
दिसतोय? तो मोडकळीस आलेला पूल? त्यावरचे शिलालेख? त्या पांढरट खुणा? ते पुराच्या चढ उताराचे आलेख? .. तसं बरंच काही वाहून गेलय त्या पुरात काही नविन.. बरचसं जुनं बरीचशी सावली, अन थोडिशी उन्हं कानी पडतेय एक आर्त साद अन वाहून गेलेत सारे प्रतिसाद वाहून गेलेत सारे ध्यास तरीही उरलेत कुठलेसे श्वास उरलीयेत गणितं सारी सुटली आहेत फक्त सुत्रं राहिल्यात फक्त सादळलेल्या भिंती आणि त्यावरची कोरडी चित्रं -देवदत्त
|
अग.... अग.... बी....मस्तंच लिहिलयस... एकदम आवडलं.. बाभळीला पालवी.... म्हणजे आठवणींचे काटे टोचत होते तेव्हा...तरीसुद्धा फुटलेली पालवी... आनंद, एकदम ठोंब्या म्हणूनच डोळ्यासमोर आलास... शलाका, यमकं आणि त्यातला गर्भितार्थ खूपच भावला... न भेटलेले सगळे दिवस... भुर्रकन उडून गेले... माणिक... तू तर खूपच भावुक आहेस... असा कुठेही... असलात आपले आपल्यामधे की
|
सगळे दिवस सापडले... हरवलेत फक्त १८ मार्चपासून २१ मार्चपर्यंत... बरेच शोधले... पण नाहीच गवसले... अर्काइव्ह उलटेसुलटे पालथे घातले... आता करू तरी काय....?
|
Mankya
| |
| Monday, April 09, 2007 - 3:38 pm: |
|
|
देवा ... कसलं लिहिलयस यार ..Just great !! बरीचशी सावली, अन थोडिशी उन्हं, उरलेत कुठलेसे श्वास, त्यावरची कोरडी चित्रं ... आवडलं ! कुठल्या जगात घेऊन गेलास तेही कळलं नाही मित्रा पण चित्रच उभा राहिलं डोळ्यासमोर ! नीलकांती ........ !! माणिक !
|
Pulasti
| |
| Monday, April 09, 2007 - 9:52 pm: |
|
|
मीनु, जगणं मनाला भिडले. काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या गज़लेतल्या या ओळी लिहायचा मोह आवरत नाहिये -- जगण्याचा झगडा प्राणांतिक बघवत नाही बघणे, नुसते बघणे, असले जगवत नाही... -- पुलस्ति.
|
Daad
| |
| Tuesday, April 10, 2007 - 12:02 am: |
|
|
माणिक, चिन्नू, पुलस्ति, मेघधारा, नीलकांतीताई- thanks heaps! मीनू, नेहमीप्रमाणे मस्तय "जगणं". जगण्याच्या व्याख्येवरचे खूप basic प्रश्न आहेत्- तुम्हा आम्हा सगळ्यांनाच कधीना कधी पडणारे. देवा, "पुरात वाहून गेलेली बरीचशी सावली अन थोडिशी उन्हं" - काय जबरदस्त कल्पना आहे! व्वा!
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:00 am: |
|
|
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचा आभारी आहे..
|
भौतिक इच्छा आकांक्षा पुर्या करत, दिवस ढकलण्याला, कसं म्हणावं जगणं ..? वर वर हसताना, खोल खोल मनात कुढत राहण्याला, कसं म्हणावं जगणं ..? दिसायला दिसत असेलही, संपन्न, शांत .. अशा धुमसण्याला, कसं म्हणावं जगणं ..? वर्षानुवर्ष जगुनही, ध्येय न सापडता .. चालत राहण्याला, का म्हणावं जगणं ..? बरोबर आहे... बरोबर आहे... बरोबर आहे.... अशा जगण्याला म्हणतच नाहीत जगणं... कुढणं... धुमसणं... ध्येय न सापडता चालत रहाणं.... सगळे तेच करतात म्हणून आपणही तेच करणं... मग आपण ते वेगळे काय... आपण ते वेगळे कोण... आपल्यासाठी तरी...? कुढताना हसलो जरी वरवर.... तरी नसा होतातच मोकळ्या... वरवर शांत राहून धुमसलो जरी आतवर.... तरी श्वास होतोच की मोकळा... अन असेच जरी राहीलो चालत... तरी वाटा सापडतातच... होत रहातात नवीन ओळखी... येतात मग नवी ध्येये हातात हात घालून त्यांच्या साथी.... हे असं वारंवार बदलत रहाणं..... कुढता कुढता हसणं... हसत हसत कुढणं... शांतपणे धुमसणं....धुमसून धुमसून शांत होणं.... चालता चालता जगणं.... जगत जगत चालत रहाणं... असंच असतं आयुष्य... राजा... असंच असावं आयुष्य.... प्रत्येक क्षणाचं नाविन्य... अन नवा नविन प्रत्येक क्षण... असंच असतं जगणं.... हेच असतं जगणं...
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:45 am: |
|
|
स्वर्गाहूनही सुंदर कदाचित पण तुझ्या जगात प्रवेश करताना ह्या वाटेचे मोल कसे विसरू? त्यागलेल्या जिवापाड वाटा एकसाथ हाका मारत येतात पण आता कुठलीच वाट माझी आपली उरली नाही हे जेंव्हा तळमळीने जाणवते तेंव्हा प्रिय होऊन जाते मला मी निर्माण केलेले माझे जग ज्याचे त्यालाच लखलाभ असो..
|
Jagu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:10 am: |
|
|
सार्थक जीवन स्वत्: साठी जग नाहीतर फ़सवेल तुला जग घे ध्यास स्वातंत्र्याचा नको करु विचार प्रपंचाचा घे ऊंच भरारी फ़िरु नकोस माघारी घे वर्तमानाची साथ आख भविष्याची वाट जीवन हे कर सार्थक मृगजळ आहे निरर्रथक
|
कालपासून सगळेजण कुठे दडी मारून बसलेत...?
|
Meenu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:42 am: |
|
|
नीलकांती मॉड सांगतीलच की इथे फक्त आपण स्वतः लिहीलेलं साहीत्य पोस्ट करणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही लिहीली आहेत ती कविता एका मायबोलीकराचीच आहे .. प्रसाद शिरगावकरची. त्याची वेबसाईट इथे आहे http://www.sadha-sopa.com/
|
sorry! मला माहित नव्हते...!
|
बरं झालं सांगितलं, मी त्यांच्या साइट वर जाऊन त्यांना सांगू शकले, मला त्यांची रचना आवडली म्हणून... त्यांनी इतकं स्पष्ट लिहिलं आहे की इथलं साहित्य कौपी पेस्ट करू नये, तरी ह्या राज नावाच्या माणसाने असे का बरे करावे..? केलं तर केलं पण त्यांचं नावही नाही दिलं... ethically wrong...so sorry... thanks meenu...!
|
Devdattag
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:19 am: |
|
|
मॉड.. वरची माझी कविता पूर्ण पोस्ट नाही झालीये माझ्याकडूनच.. मधलं कडवच नाहीये अख्खं.. ती कविता उडवता का?.. मग मी पूर्ण कविता पोस्ट करेन..
|
मॉड.. मधला अर्धचन्द्र कसा लिहायचा? तसंच अन मधला न चा पाय कसा मोडायचा?
|
Daad
| |
| Thursday, April 12, 2007 - 7:35 am: |
|
|
घन भरून आले काही घन भरून आले काही घन ओले काजळकाठ सरसरून आल्या सयी मालवत्या सांज उन्हात अशी उभी उभी दारात लावून क्षितीजा दृष्टी भोवती सयींचा पिंगा पाऊल उंबर्या आत मन कोठे? दृष्टीपार मी उभी अजुन दारात सरसरून आल्या..... कोसळतो दूर तिथे तो त्या सवे चिंब हो मन रोखला कसा सांगू मी पापणीआड मग घन तन अल्प शिल्प मातीचे मृद्गंधच हो श्वासात सरसरून आल्या... होऊनिया वादळ्वीज भेटला छेडित पुरिया मी माझी ना राहिले मी उरले पाऊसछाया कोसळला पागोळ्यांनी तन अवघे अश्रूस्नात सरसरून आल्या... -- शलाका
|