Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Aamche PET's

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » विनोदी साहित्य » Aamche PET's « Previous Next »

Chaffa
Friday, April 06, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा दोस्तलोक पण ही कथा गेल्या वर्षात अपुर्णच राहीली होती आत लिंक देउन सगळ्यांनाच त्रास देतोय पण
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्/cगि-बिन्हित्गुज्शोवगि?त्प्c=११९४०३&पोस्त्=९२९७९०#PऑSट२९७९०
संघ्याकाळी दिवसभराच्या पाट्या टाकुन परतताना जिन्यात भेटणारे आमचे शेजारी माझ्याकडे आज जरा वेगळ्याच नजरेने पहात असल्याची जाणीव झाली आणी परत मनाने चिंतेच्या समुद्रात एकदा गटांगळी खाल्ली. आज घरात काय वाढून ठेवलय याचे तर्क पेक्षा कुतर्कच करत मी बेलचे बटण दाबले.आणी सौ. चा नेहमीचा चिडखोर "आले आले " हा प्रतीध्वनी ऐकायला मनाची तयारी केली पण आज आतुन चक्क भुंकण्याचा आवाज आणी एका क्षणात जिन्यातल्या त्या बोचर्‍या नजरांचे अर्थ कळले. म्हणजे आता आमच्या घरात श्वानराजांचे आगमन झाले होते तर
"आहो पहा तरी कित्ती गोंडस आहे तो लब्बाड" सौंई ईतक्या प्रेमाने कधी एकुलत्या एक पुत्ररत्नाचाही उल्लेख केला नव्हता.
मी स्थान ग्रहण करायच्या आधिच महाराज अक्की एका पामेरीयन कुत्र्याला घेउन बाहेर आले आणी ओरडले
पप्पा उधर नै बैठनेका अभी वो सोफ़ेपर डार्लींगने गंदा किया है." मी हातभर उंच उडालो या वितभर कार्ट्याची डार्लींग? ती पण असली गंदगी करणारी आणी मुळात या घरातल्या मुलुखमैदानी तोफ़ेसमोर ती याने कशी काय आणली? प्रश्नांच्या भोवर्‍यात पार बुडुन जाण्याआधी सौंए स्पष्टिकरण दिले "आहो, त्याचे नाव डार्लींग ठेवलेय. इषारा त्या कुत्र्याकडे असल्याची खात्री करत मी म्हणालो
"अग, पण डार्लींग हे काय कुत्र्याचे नाव झाले का ? "
का त्या धूम पिक्चरमधे नव्हते का चांगली नावं काय फ़क्त त्यांनीच ठेवायची का ?" सौ.ला हे नाव चांगले वाटत होते. तिच्या बोलण्या कडे नेहमीप्रमाणे कानाडोळा करत मी पुन्हा सोफ़्याकडे मोर्चा वळवला. " आहो, आत्ता ऐकलेत नाही का? तिथे बसु नका म्हणुन अक्कीने सांगितलेले ?" ती जागा आता डार्लींगची. म्हणजे मी आसन ग्रहण करण्याआधीच त्या आसनाला ग्रहण लागले होते तर मनातल्या मनात चरफ़डत मी बाजुच्या खुर्चीवर बसलो. मला पाण्याचा ग्लास देताना सौंए त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता. मनातल्या विचारांना मनातच चिणुन टाकत मी पुढ्यात काय चाललेय ते पाहू लागलो." डार्लिंग हे पहा कोण आलय ते हे पण आपल्या घरातच रहातात" आता मात्र मी खुर्चीतुन पडायचाच बाकी राहीलो. अरे, मी पण घराच्या मालकाचा असा अपमान पण सौॅह्या अद्यानाला धक्का लावण ईष्ट नव्हतं म्हणुन राग आणी पाणी दोन्ही मुकाटपणे गिळलं. " आहो, हा लगेच माणसं ओळखतो बरं, ते खालच्या मजल्यावरचे नाना आहेत ना आज पेपर मागायला आले तेंव्हा कसला जोरात भुंकला त्यांच्यावर." सौ. गोडवे गात होती. " आता परत पेपर मागायला येतील असं वाटत नाही".
"अगं पण त्यांच वाचनालयाचं पुस्तक आता नक्की परत मागतील त्याच काय माझं आजुन वाचुन व्हायचय," माझी दुर्बलता.
काही नाही हो देउन टाका नाहीतरी सदा न कदा बघाव तेंव्हा मेलं ते पुस्तकात डोकं खुपसुन बसण मला नाही बै आवडत" त्या पेक्षा संध्याकाळी डार्लींगला फ़िरवायला घेउन जा तेवढाच तुमचा पण व्यायाम होईल"
हे बघ ते कुत्र्याला फ़िरवणं वगैरे आपल्याला नाही जमणार तो तुम्हा दोघांचा व्याप आहे तो तुम्ही संभाळा". संकटाची जाणीव होताच माझ्यातला नवरा जागा झाला.
" असो उद्या येताना तेवढ डॉगफ़ुडचा डब्बा आणा म्हणजे झालं ". म्हणजे आता या कुत्र्यामुळे माझ्या मधल्यावेळचा हॉटेलातला चहा आणी सिगारेट्सवर संक्रान्त होती तर. निमुटपणे मी आपला टि.व्हीॅहे कार्यक्रम पहायला लागलो.
रात्री कुणाच्यातरी विव्हळण्याने जाग आली आगदी कान देउन ऐकले तर बाहेर गॅलरीत हा आमचा नविन कुत्रा रडत होता आणी आमचे दोन्ही विर दिवसभराच्या श्वानप्रेमाने थकुन गाढ झोपले होते. मी सौ.ला जोरजोरात हलवले तरीही जाग यायची चीन्हे दिसेनात बाकी झोपेच्या बाबतीत तरी ही मायलेकरं प्रचंड नशिबवान पडल्यापडल्या अशी झोपतात की बाहेर प्रलय झाला तरी जाग येणे शक्य नाही. अखेरीस हार पत्करुन मीच गॅलरीचा दरवाजा उघडला. तत्क्षणीच ते कुत्रं घरात शिरले आणी सरळ पलंगावर उडी मारुन बेधडक आपल्या बापाचे घर असल्यासारखे झोपले. उठवायचा प्रयत्न केला तर सरळ माझ्याच अंगावर घुरघुरुन त्याने संताप व्यक्त केला. अखेर मी चुपचाप माझे उशी पांघरुण उचलले आणी बाहेरच्या खोलीचा रस्ता धरला.
सकाळी जोरदार भुंकण्याने आणी कचकचीत घातलेल्या शिवीने ताल धरलेल्या भुपाळीसारखी जाग आणली आणी पाठोपाठ आपला डार्लिंग दुधवाल्याला चावला हे शुभवर्तमान घेउन सौ ही प्रकटल्या. मनातल्या मनात देवाचे नाव घेत मी उठलो आणी यथाशक्ती सगळी आन्हीकं आवरुन पुन्हा ऑफ़िस नावाच्या त्या चक्कीत भरडून घ्यायला निघालो.
दोन,तिन दिवसात त्या कुत्र्याने सगळ्या कॉलनीत आपला दरारा बसवला, परीणाम म्हणुन खालच्या मजल्यावरचे नाना जाता येता माझ्याकडे तिरस्काराने पाहू लागले, दुधवाला आजकाल मध्येच दांड्या मारु लागला हे काय कमी होते म्हणुन गस सिलींडरही खालच्या मजल्यावर ठेउन गॅसवाल्या त्या पोर्‍याने मलाच दोन जिने भरला सिलींडर घेउन चढणे किती कष्टप्रद असते याची जाणीव करुन दिली. दिवसेंदिवस आयुष्य आणखी खडतर व्हायला लागले आणी या रविवारी त्याने कळस गाठला. शेजारच्या काकुंचा कुठलातरी लांबचा भाचा पोलीसात असतो म्हणजे करतो कारकुनीच पण पोलीसात आहे. तो त्यांच्याकडे आला मी आपला शांतपणे पेपर वाचीत घरात पडलेला तेवढ्यात सगळ्यांची नजर चुकवुन ते कुत्तरडं बाहेर पळालं आणी नेमकं या काकुंच्याच घरात शिरलं आता अर्थातच त्यांचा भाचा रुबाबात त्याला हाकलायला गेला आणी त्या कुत्र्याने आपल्या मजबुत जबड्याची ताकद त्याला दाखवली. काकुंच्या घरातला आरडाओरड ऐकुन मी तिथे गेलो तर समोरचे चित्र पाहुन माझ्या काळजाचे पाणी झाले आमच्या कुत्र्याने काकुंच्या भाच्याची पोटरी पकडलेली आणी तो पोलीसस्टेशनात ऐकलेल्या ईरसाल शिव्या देत आख्ख्या खोलीभर फ़िरतोय. क्षणभर मती गुंग झाल्याने मला काहीच सुचले नाही पण पाठोपाठ मी अक्कीच्या नावाने एक भिषण आरोळी ठोकली ताबडतोब अक्कीने येउन त्या कुत्र्याला की काकुंच्या भाच्याला की दोघांनाही एकमेकांपासुन वेगळे करायचे प्रयत्न चालु केले त्याचा हा हस्तक्षेप न आवडल्याने अक्कीच्या मनगटावर आपले दात रोवुन त्या कुत्र्याने आपला निषेध दर्शवला. बर्‍याच वेळाच्या आणी बर्‍याच जणांच्या प्रयत्नांना यश येउन अखेरीस कुत्रा बाहेर पळाला. आता काकुंच्या भाच्याला जोर चढला आणी त्याने पोलीसी खाक्यात त्या कुत्र्याची चौकशी अर्थात आमच्याकडे सुरु केली, रजिस्ट्रेशन आहे का असेल तर तसा बिल्ला त्याच्या गळ्यात आहे का आणखीही बरेच प्रश्न.

मी आता आपल्यावर पोलीस कधी हातकड्या घेउन येतात त्याची वाट पहात आहे. आक्की किती ईंजेक्शनांवर काम भागेल या चिंतेत आहे तर सौ. शेजारच्या काकुंना रोज घरातुन भाजी कढी असली लाच देउन त्यांना थंड करायच्या प्रयत्नात आहे. आणी या सगळ्याला कारणीभुत तो डार्लिंग? त्याला कधिच घरापासुन दुर नेउन सोडला आहे.

समाप्त




Sunidhee
Friday, April 06, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगले जमले आहे.. सर्व कोट्या आवडल्या..

Zakasrao
Saturday, April 07, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या हा भाग जास्त चांगला जमलाय. कुत्र्याच नाव, त्याची वागणुक ,घरच्यांची वागणुक भारी लिहिली आहेस. लिहित रहा.

Dhoomshaan
Saturday, April 07, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सकाळी जोरदार भुंकण्याने आणी कचकचीत घातलेल्या शिवीने ताल धरलेल्या भुपाळीसारखी जाग आणली आणी पाठोपाठ आपला डार्लिंग दुधवाल्याला चावला हे शुभवर्तमान घेउन सौ ही प्रकटल्या.


सही रे सही!!!
भन्नाट....... ह. ह. पु. वा.


Durandar
Saturday, April 07, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पाण्याचा ग्लास देताना सौंए त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता.

कुणितरी माझी खुर्ची धरा रे पार वाट हसुन हसुन


Ankushsjoshi
Sunday, April 08, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसानंतर छान वाचायला मिळाल विनोदी साहित्य मधे..
Keep it up Bravo


Ganeshbehere
Monday, April 09, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,
लई भारी, मजा आ गया........


Proffspider
Wednesday, April 11, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा छान जमुन आला आहे. :-) Keep it up!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators