|
Jagu
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:25 pm: |
|
|
सतीश तुमचे वळण खुपच छान आहे.
|
मयूर,सुमेधा,चिन्नू, Princess,Gobu धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे! मला जे जे काही छान तुम्हा सगळ्यानां देता ये ईल ते ते मी शब्दाच्यां माध्यमातुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेण!
|
Mankya
| |
| Saturday, March 31, 2007 - 5:42 am: |
|
|
का ? कळत नाही का चालतो मी मक्कामाची ओढ का ?.. नाईलाजाने ? चाल अनोळखी का चोखाळतो मी मनाची खोड का ?.. विकृत भावाने ? तोल तरी का सांभाळतो मी संयमाची धोंड का ?... लोकभयाने ? आजूबाजूलाही का ना पाहतो मी नापसंत दिसेल तोंड का ?... ' ग ' आजाराने ? स्वतःशीच उपहासाने का पुटपुटतो मी जाहला हिरमोड का ?... सरावाने ? पुन्हा चालतोय ... हो पुन्हा पुन्हा धुंद मी ... बेफाम मी ... ! माणिक !
|
Desh_ks
| |
| Saturday, March 31, 2007 - 6:03 am: |
|
|
प्रिन्सेस, चिन्नू, स्वाती, माणिक, जगु, तुम्हा सार्यांचे अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. -सतीश. माणिक, नवी कविता 'का' छान आहे. असे प्रश्न पडत राहातात तोपर्यंत आपण आपल्याला 'शोधणं' चालूच असतं; आणि ते केव्हांही चांगलंच ना... -सतीश
|
Jagu
| |
| Saturday, March 31, 2007 - 8:02 am: |
|
|
मी ही कविता माझ्या दिड वर्षाच्या मुलीवर केली आहे. आमची श्रावणी पायांची छुम छुम करत धावते ओठांची बोबडी गुण गुण गाते प्राजक्ताच्या परागातील कण कधी उन कधी पाऊस आमची श्रावणी आजोबांची करमणूक करते आजी सोबत पूजेत रमते अण्णा आजोबांसोबत चांदोबा पाहते आजी आजोबांचे मनोरंजन श्रावणी काकांना नाच दाखवून फ़ोटो काढते काकी सोबत मस्ती करते नटखट, चतुर, गोंडस दिसते काका काकीची लाडकी श्रावणी आत्या सोबत नट्टा फ़ट्टा करते वेग वेगळ्या वेशभूषा करते आत्या मामांची आठवण काढते आत्या मामांची नटखट श्रावणी दादा म्हणजे जीवलग सखा त्याच्या सोबत हसा खेळा दादाचे अभ्यासातून भान हरवीते इटूकली पिटूकली दादाची श्रावणी बाबांसोबत मजेची सफ़र आईला पहाता जगाचा विसर आई बाबांचे काळीज चोरते आई बाबांची निरागस श्रावणी
|
Gargi
| |
| Saturday, March 31, 2007 - 8:37 am: |
|
|
पाउसचिंब पावसाची प्रतिक्षा करणारी वाट अचानक सापडते म्हणून आपण चालत रहातो मनाशी रेंगाळ्णार्या कीतीतरी पाउस कविता अनावर होतात, त्याच बरसु लागतात...... त्यांची ही रीमझीम धूआंधार पावसाची आठवण अधिक गडद करतात अन् वाट अचानक संपते......तेव्हा कळत हा ऋतु अजुन संपायचाय सारे भासच पावसाचे पण मग पाउसचिंब डोळ्यांच काय?
|
Pulasti
| |
| Saturday, March 31, 2007 - 11:52 am: |
|
|
वि.सू.: प्रत्येक शेर हा "शब्दा"ला संदर्भून आहे. शीर्षकाकडे दुर्लक्ष केले तर २-३ शेरांचा स्वतंत्रपणे स्पष्ट अर्थ लागत नाही. म्हणून technically ही गझल होत नाही. - हे मला वैभव,मिलिंद फणसे या जाणकारांनी दाखवून दिले आहे. म्हणून मी माझे शब्द कविता BB वर पोस्टतोय. ही गझल नसे हे पटले मी तिजला कविता म्हणतो "शब्द" शब्दांनी मी उन्मळतो शब्दांनी मग सावरतो! मी लिहितो अलगद मग तो वाचून मला उलगडतो जाणून मनीचे संभ्रम तो फुटताना अडखळतो मजह्रदयी किल्मिष नाही मग तोल तुझा का ढळतो? ओठावर येऊ पाहे डोळ्यातच पण ओघळतो मी तोच - तुझा आवडता मोहरतो, ओठी फुलतो! चित्ताच्या चरख्यावर तो अर्थाचे धागे विणतो! -- पुलस्ति.
|
Pulasti
| |
| Saturday, March 31, 2007 - 11:57 am: |
|
|
या कविता BB वर तर प्रचंड घडामोडी होताहेत! वैभव-स्वातीने लावलेल्या गझल-नादामुळे इथे अगदीच फिरकलो नाही नियमीत इथेही यायला हवे.... -- पुलस्ति.
|
Desh_ks
| |
| Sunday, April 01, 2007 - 8:52 am: |
|
|
प्रेमासाठी प्रेमासाठी रणामध्ये वीरांची बलिदानं प्रेमामुळेच बाळासाठी आईच्या ओठी अंगाईगाणं प्रेमासाठी झुरत कुणी प्रियेसाठी गातो गीत प्रेमापायीच बाप कधी देतो पोराच्या कानपटीत एकाच्या वेदनेच्या दुसर्यालाही कळा प्रेमासाठीच कुब्जेलाही श्रीरंगाचा लळा प्रेमापायी अयोध्येतही भरत राहतो वनवासी प्रेमापायीच कंसालाही उद्धरतो ह्रषीकेशी प्रेमासाठी यमुनेच्या तीरावर रास रंगे प्रेमासाठीच कुरुक्षेत्री भगवंत गीता सांगे प्रेमासाठी "अमुकच एक" असं काही करायचं नसतं प्रेमच तर तसं पाहता बरंच काही करून घेतं प्रेमामुळे फुलणं आणि प्रेमासाठी सुकणं प्रेमामुळेच हसणं आणि प्रेमामुळेच रडणं प्रेमामुळेच धीर अन प्रेमामुळेच विसावा शीणभार सारा कसा प्रेमामधेच विसरावा "अनुभवणं" कदाचित काहीच न करता शक्य आहे, मात्र व्यक्तच होऊ नये हे प्रेमात अशक्य आहे समुद्राला येतेच भरती चंद्र आकाशात येतो तेव्हां पाखरं गाऊ लागतातच पूर्वा उजळते जेव्हां नकळत होतं सारं कुणी मुद्दाम करत नाही हळव्या कोंभात दिसतेच ना पण जपणारी मऊ भुई? "करणं" नाही "होणं" आहे, यातच सारं मर्म आहे; "असणं आणि दिसणं" हा तर प्रेमाचा धर्म आहे प्रेम आहे आणि दिसत नाही असं कधी असेल का? प्रेमाशिवाय कुणावर कुणी उगाचच रुसेल का? "मी" नसतो पण "माझं" असतं; व्यवहार नसतो, पण देणं-घेणं असतं प्रेमाच्या विश्वातलं सारं काही जगापेक्षा वेगळंच असतं सुंदर दिसतात डोलणारी पानं, वारा कानात गुणगुणतो गाणं प्रेमामुळेच नाही का हे सुंदर होऊन जात जगणं? "प्रेम नसतंच" म्हणतो कुणि ह्रदयाची कवाडं बंद करून बंद खिडक्या, बंद दारं, मग यायचंच की अंधारून! -सतीश
|
पुलस्ति.. "शब्द" छानच..पण मला कळले नाही ही 'गझल' का होऊ शकत नाही? कधी कधी कवीला गझल लिहिताना जर अर्थाची उकल करण्यास एकापेक्षा जास्त शेरांची गरज भासल्यास काय करायचे त्याने? मी सध्या 'गुलिस्ताने-गझल' हे जे पुस्तक वाचतोय त्यात उर्दू काव्यप्रकारात 'किता' हा एक काव्यप्रकार नमूद केलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की 'किता' हा गझलेचा अंश होऊ शकतो. संपूर्ण अर्थाची उकल होण्यासाठी जे शेर कवीला अपरिहार्य म्हणून वापरावे लागतात त्या गझलेच्या तश्या शेरांनाकाव्यपंक्तींना 'किता-बंद शेर' असे संबोधतात. कवीलागझलकाराला आशय-पूर्तता करण्यास जर एकापेक्षा अधिक द्विपदींची गरज भासल्यास त्या शेरांचा समूह 'किता' म्हणून ओळखला जातो.म्हणून मी सध्या तरी असेच म्हणेन की 'शब्द' ही 'छान गझल आणि कविता' आहे. जाणकारांनी ह्या 'किता' वर प्रकाश टाकावा ही विनंती
|
Daad
| |
| Monday, April 02, 2007 - 5:50 am: |
|
|
मस्तं मस्तं कविता आल्यात इथे. सतीश, खूप दिवसांनी काहीतरी छान वाचल्याचं जाणवलं तुमच्या दोन्ही कविता! एक साधा सोप्पा पण म्हणुनच व्यक्त करायला कठीण message आहे तुमच्या कवितांत. शब्द सुंदर आणि चपखल, कवितेला नाद आहे. लिहीत रहा, छान लिहिता!
|
सतीश तुमची पहिली कविता .. " वळण " ... फार मस्त होती .. माणिकराव .. lepas and bounds पुलस्ति :- कोंदण लाभो ना लाभो हा हिरा स्वयं झळझळतो गार्गी .. अशा सायंकाळी सुरेख आहे . मयूर .. शब्दातीत आवडली .. जगु .. तुमची श्रावणी आवडली .
|
Mankya
| |
| Tuesday, April 03, 2007 - 11:11 am: |
|
|
आहा ... वैभवा फक्त प्रतिसाद, सादही अपेक्षीत होती रे ! मनःपुर्वक आभार वैभवा, सतिश ! गार्गी .. अचूक शब्द वापरतेस ... मस्तच ! पुलस्ति .. जाम आवडली ' शब्द ' ! सतीश .. भावना मस्तच उररल्यात हो ! जगू ... पिल्लू गोड आहे हो .. आवडली निरागस श्रावणी ! माणिक !
|
Chinnu
| |
| Tuesday, April 03, 2007 - 2:47 pm: |
|
|
माणिक, तुमचा चालण्यातला आशावाद आवडला. गार्गी 'पाऊसचिंब' हा शब्द फार आवडला. बंद दारं, बंद खिडक्या मग यायचच की अंधरुन! सतीश मस्त. पुलस्ती, शब्द हा विषय सुंदर, मांडणी सुंदर! "मी लिहितो अलगद मग तो वाचून मला उलगडतो " "जाणून मनीचे संभ्रम तो फुटताना अडखळतो " वाह! "ओठावर येऊ पाहे डोळ्यातच पण ओघळतो " सुरेख! ह्या सर्वच ओळी अतिशय आवडल्या. चित्ताच्या चरख्यावर तो अर्थाचे धागे विणतो! Classic! . तुम्ही ही रचना, गझल म्हणा की कविता, पण आहे खुप सुंदर!
|
Desh_ks
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:28 am: |
|
|
दाद, माणिक, वैभव, चिन्नू, सार्यांचे मनापासून आभार. -सतीश
|
Bee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:44 am: |
|
|
आठवणीतला हिवाळा असा होता उबदार मायेच्या दुलईत बेफ़िकिर निजलेला.. परंतू.. होते वयाला वाढणे दिवसांचे सरत जाणे आताची पानगळ पाहून चेहरा कृष्णछायेनी झाकलेला..
|
Princess
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:24 am: |
|
|
बघ आले आभाळ भरुन, आणि मग सोसाट्याचा वारा अंगोपांगी फुलला ग, कसा शहारा शहारा कसे कागदावर उतरवु, जे वाटते मनाला न सांगताही कळले, बघ जगाला जगाला सदा प्रपंच असे, माझ्या मनी वसलेला गर्दीतही असे जीव, तरी एकला एकला मीच मांडलाय इथे, माझ्या सुखाचा पसारा एक लाट येता दु:खाची, मग उधळला उधळला वार घेतले कित्येक उरावर परक्यांचे ज्याने घात केला, तो म्हणे आपला आपला. प्रिंसेस
|
Mankya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:32 am: |
|
|
प्रिंसेस .. सही है सही ! मनापासून आवडली गं ... एक वेगळीच लय निर्माण झाली ' शहारा शहारा ' अश्या रचनेने ! शेवटचं कडवं तर कहर गं कहर ! ( ते गाणं आठवलं ' अपने ही गिराते है नशे मन पे बिजलिया ... गैरो नो आके ..') Bee... शब्दरचना अन शब्द खूपच आवडून गेले ! माणिक !
|
Bee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:39 am: |
|
|
प्रिन्सेस, कविता कडव्यागणिक फ़ुलत जाते.. एकदम खरे लिहिले आहेस..
|
Princess
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:45 am: |
|
|
धन्स माणिक आणि बी. शेवटचे कडवे लिहुन झाल्यावर मला पण एक शेर आठवला होता... मेरी कश्ती वहां डुबी जहां पानी कम था.
|
|
|