Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » ललित » भोचक, खोचक आणि वेचक » Archive through April 03, 2007 « Previous Next »

Supermom
Tuesday, March 27, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यात अनेक प्रकारचे मनुष्यस्वभावाचे नमुने आपल्याला रोजच भेटत असतात. हसवणारे,फ़सवणारे, चिडवणारे,रडवणारे... एक ना दोन. अनेक प्रकार. पण या सार्‍यात भोचक माणसांची एक वेगळीच गंमत असते. त्यांचा रागही येतो, अन कधीकधी हसूही येतं. भोचक म्हटल्यावर मला खूप वर्षांपूर्वीचा एक मजेशीर प्रसंग आठवला.

सकाळची वेळ होती. आम्हा बहिणींची कॉलेजला जायची घाई सुरू होती. बाबा सुद्धा कोर्टात निघायच्या तयारीत होते. तोच गावाकडचा एक वृद्ध माणूस आपली केस घेऊन आला. वयाने बराच असावा. बाबांनी आईला चहा पाठवायला सांगितले. बाबांच्या ऑफ़िसच्या दारातून त्याला घरातले थोडेफ़ार दिसत होते.
जरा सावरून बसत, त्याने प्रश्न केला,
'सार्‍या लेकीच का जी वकीलसायेब? पोरगा न्हाई तुमाला?'

'नाही.' बाबांचे डोळे त्याच्या कागदपत्रांमधे.
'जरा बोलू का जी?' खाजगी आवाजात विचारून, तो बाबांच्या फ़िरत्या खुर्चीजवळ सरकला.

'अजून एक लगीन करून टाका. व्हईल पोरगं....'

आईने आतमधे गाळणी खाड खाड वाजवून आपला राग व्यक्त केला. आम्ही मुली खुसुखुसु हसायला लागलो.

हसू न आवरल्याने बाबाही काही तरी निमित्त काढून आत आले.
'जा घेऊन हा चहा तुम्हीच...' आई वैतागली.

'अग, आता कोणी सांगितल्याने मी या वयात दुसरं लग्न करणार आहे का? तू तरी कमालच करतेस.'

आमच्या सार्‍यांच्या हास्याचा एकत्रित स्फ़ोट झाला.

आता बाबांना मुलगा आहे की नाही, यात पडायची त्या माणसाला काहीच गरज नव्हती. त्यातून दुसर्‍या लग्नाचा भोचक सल्ला देऊनही तो मोकळा झाला.

तर असे हे भोचक लोक. सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात अन त्यावर फ़ुकट सल्ले दिलेच पाहिजेत हा त्यांचा आग्रह.

अशीच एक आणखी व्यक्ती. माझे बाबा खूप आजारी असताना मी मुलांना घेऊन काही काळ भारतात गेले होते. तेव्हा या व्यक्तीला जेवायला बोलावले होते. पहिला घास घेतला, अन या नमुन्याचा प्रश्न.

'आता तुम्ही मुली सासरी गेलात. बाबाही आजारी असल्याने वकिली बंदच. मग आईबाबांचा चरितार्थ कसा चालतो?'

'वकिली बंद असली तरी त्यांच्या इतक्या वर्षांच्या गुंतवणुकी, बचत वगैरे नाही का? '
मी रागावर कसाबसा संयम ठेवीत उत्तर दिले.

'पण तेवढ्याने होतं त्यांचं?' पुन्हा चोंबडा प्रतिप्रश्न.

(जणू काही मी नाही म्हटले तर ती व्यक्ती 'मी या महिन्यापासून मनीऑर्डर पाठवीत जाईन' असेच म्हणणार होती.)

आईने मला 'दुर्लक्ष कर' असे डोळ्यांनीच दटावून सांगितले म्हणून बरे झाले.
तर असे हे मनुष्यप्राणी.
माझी बहीण मेरिटमधे आली तेव्हाही 'मुलींना काय करायचंय शिकवून? शेवटी चुलीतच आयुष्य जायचं. त्यापेक्षा लग्न करून टाका लवकर.'
असा भोचक शेरा एका नात्यातल्या बाईंनी मारला होता.(अशा लोकांना नात्यातले म्हणणे ही देखील शिक्षाच. नाही का?)

भोचकसारखेच त्रासदायक, किंबहुना अधिकच तापदायक लोक म्हणजे खोचक. सार्‍या जगाशी यांचे भांडण असल्यासारखे, जणूकाही सर्व लोकांवर सूड उगवायचा असल्याप्रमाणे हे लोक सतत खवचटच बोलत असतात. खरेतर ही कोण्या एका गावाची मक्तेदारी मुळीच नव्हे. या प्रकारचे लोक भूतलावर सगळीकडे सापडतील अशी माझी खात्री आहे.









Manuswini
Wednesday, March 28, 2007 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting गं सुमॉ दुसर्‍याला असा फुकटा सल्ला की चक्क दुसरे लग्न करा काय म्हणायचे त्यांना?

भोचक नी खोचक ह्यातला फरक काही नीट कळत नाही पन उदाहरणामुळे थोडाफार कळला गं सुमॉ,

आजु बाजुला खोचक लोकच ज्यास्त असतात नै त्यांचाकडे इतका वेळ कसा असतो हेच कळत नाही. किंव गरज का भासते हेच कळत नाही. मुद्दामहुन दुसर्‍याला दुखवायचे हाच एक मार्ग असतो वाटते.
वेचक काय प्रकार आहे गं सुमॉ? आधीच खुप घाई झाली वरचे वाचुन म्हणुन विचारतेय नाहीतरी कोणीतरी इथे येवुन खोचक पणे काहीतरी म्हणतील. :-)

असो,

आमच्याकडे असेच एक ओळखीचे गृहस्थ यायचे, business होता स्वःताचा, रवीवारी सकाळपासुन हजर,पप्पा बिचारे वयाने ते मोठे म्हणुन हो हो करत गप्पा एकायचे, घरात आल्या आल्या ते गृहस्थ सभोवार नजर टाकायचे मग एखादी नवीन वस्तु दिसली रे दिसले की, केव्ढ्याला घेतली हा सरळ प्रश्ण. हद्द म्हणजे एकदा kitchen मध्ये येवुन आईच्या हातातली folding पक्कड बघुन कीतीला घेतली विचारले. आईला रागच यायचा तसापण. तीनी जरासे बर्‍यापैकी वैतागुन फुकट मिळाली म्हटले. त्याच्यावर दहा प्रश्ण. कशी काय फुकट मिळाली? कुठे सेल होता का? मला देता का ती मग तुम्ही दुसरी घ्या, तुम्हाला काय कमी? no jokes तो हे अगदी Seriously विचारत होता. त्यांना ती घाण सवयच होती. बरे गरीब होते असेही नाही, त्यांचा business होता मिरचीचा retailer म्हणुन. एकदा माझ्या कानातले पण सोन्यात आहेत का? कुठल्या भावाने घेतले? बनवुन घेतले का कानातले? बरे मोजक्या शब्दात सांगुन पण परिणाम नाही. आणि काय होते माहीत नाही त्यांनी विचरलेल्या वस्तुची किम्मत आम्ही नाही सांगीतली किंवा लक्ष दीले नाहीतर ती वस्तु नुकसान करायची. घरातील एक छान vase होता खास singapur वरुन पप्पांने आणलेला, किम्मत काय विचारले ह्या गृहस्थांनी. ह्या प्रश्णावर पप्पानी उत्तर देले नाही, दुसर्‍या दिवशी तो फुटला नी भली मोठी काच पप्पांच्या पायाला नी हाताला जखम. एकदा माझ्या कानातले कीतीला विचरले, दुसर्‍या दिवशी माझे कानातले कुठेतरी पडुन हरवले. भावाला paintings मध्ये बक्षिस मिळाली होते नी घरी असेच मित्र आले होते त्याला wish करायला, तर हे होतेच रविवारी, तर कीतीचे बक्षिस रे? काय करणार त्या पैशाचे तु आता असे प्रश्ण. तिसर्‍या दिवशी भावाचा हात fracture . अश्या बर्‍याच गोष्टी झाल्या नी आम्हाला पक्के जाणवले की काहीतरी ह्यांच्या नजरेत आहे. शेवटी ते घरी आले के आई, पप्पा घरात नाही करुन आम्ही आत घेणे बंद केले. ह्यांना काय म्हणायचे व हे कुठली category ती मी अजुन सांगु शकत नाही.
आणखी गृहस्थ यायचे, आईचे patient होते. diabetic होते म्हणुन यायचे. सगळा वेळ नुसते बसुन रहात आईच्या office मध्ये. कीती तुम्ही पैसे कमावता ह्या आमाच्या रोगावर असे comment करत.
सगळी मुले का English medium मध्ये एवढा खर्च हा झेपतो ते आमच्या खिषातील पैसे काढुन. खरे तर आई त्यांना मोफ़त treatment करायची फक्त insulin ची cost त्यांना द्यावी लागत असे ती सुद्धा अर्धी.
वयाने मोठे म्हणून दुख होईल असे बोलु नये पण शेवटी आईनी सांगीतले की असे बसुन राहील्यास त्रास होईल sugar चा जरा चालत फिरलात तर बरे होईल. सतत बाकी रोग्याबरोबर इथे office मध्ये बसु नका व्यायम करत जा.

आणखी म्हणजे एक बाई इतक्या जळु ना की सतत कशाला ते मुलांना शिकवलात शेवटी बघा तुम्हाला सोडुन गेलीत ना, आई बाप इथे जगतात का मरतात पन बघत नाही. रोज हीच comment जेव्हा भेटे तेव्हा. आई म्हणाली मुलांन बाधुन ठेवले नाही आहे आम्ही. आणि आमचे हात पाय ठिक आहेत तोवर कशाला त्यांन त्रास द्या. स्वःताचा मुलगा दहावी पण नापास होता ना....


Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ तुम्ही इतके बोल्ड का लिहिले? एक भोचक प्रश्न. D~
सुमॉ आणि मनु अशा वेळी त्या माणसाना आपणही एकदा प्रेमाने सांगावे नाही कळाले तर खोचक भोचक अशा चढत्या क्रमाने सांगावे तो ज्या categari मधे येतो त्याला तशा प्रकारे बोलल्यावर कळते आपोआप. नाहीच कळाले तर मग आहेच न संबंध ठेवण्याचा मार्ग. आता मी शांत बसतो नाहीतर म्हणाल हा कोण भोचकपणे सल्ला देणारा.


Abhishruti
Wednesday, March 28, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येक दिवसानी तुमच्या लिखाणावरुन एक गोष्ट आठवली. मी माझ्या पहिल्या बाळंतपणाला आजोळी गेले होते मी माझ्या तीन महिन्याच्या मुलीला मांडीवर बसवून डोलवत होते , आजोबांच्या बंगल्याच्या पायरीवर बसले होते . बरोबर माझ्या मावशीचा नवराही बसला होता गप्पा मारत . एवढ्यात एक माळ्यासारखा दिसणारा माणुस गेटात आला आणि त्याने आजोबाना विचारले की नातवंड का? तर आजोबा म्हणाले नाही जी तिला डोलवतेय ती माझी नात आणि मांडीवर बाळ आहे ते माझं पणतवंड मग नेहमी प्रमाणे त्यानी विचारलं की मुलगा की मुलगी? आणि आजोबानी मुलगी म्हंटल्यावर इतक्या जोरात 'छी छी' म्हणाला की माझा मावसा उखडलाच. त्याला म्हणाला तुला काय त्रास रे? तर एकदम वरमला आणि म्हणाला तस नाही बापाला त्रास, लग्न जमवताना हुंडा तयार ठेवला पाहिजे . तेंव्हा माझा मावसा म्हणाला ती मुलगी बसलेय ना तिने स्वतःच लग्न जमवल, एक पैसा हुंडा न देता लग्न झालं आणि आता ती जाॅबसाठी अमेरिकेला चालली आहे . तू पुरुष होऊन काय दिवे लावलेस, लोकांच्या माडावर चढुन नारळ तर पाडतोस!
मला एकंदरीतच सगळ्या प्रकारचं हसू आलं आणि वाईटही वाटलं .


Rajankul
Wednesday, March 28, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर माझ्या मावशीचा नवराही बसला होता गप्पा मारत .>>.माझ्या मावस्यांसोबत (जरा आदराने)गप्पा मारत बसले होते, अस म्हटल असत तर वाचायला बर वाटल असतं.

Sanghamitra
Wednesday, March 28, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ विषयच भारी आहे.
पण असे लोक म्हणजे spice of conversation . बहुतेक भोचक लोक हे निरागस असतात एक प्रकारे. आपण इतरांना काही खाजगी विचारून त्रास देतोय हे त्यांना समजतच नाही.
कित्येक लोक थोडी ओळख झाली की पगार किती विचारतात डायरेक्ट!
खेड्यात तर फार कौतुकाने विचारतात आणि कितीही आकडा ऐकला की कुठल्या तरी मावशीच्या पुतण्याच्या मित्राला यापेक्षा जास्त आहे असे पण म्हणतात(हा निरागस खोचकपणा).


Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु.मॉ. तुमचे म्हणणे बरोबर आहे. माळरानात वाढणार्‍या खुरट्या गवतासारखे असतात हे लोक. चांगल्या पिकातुन तण काढुन फ़ेकावे तसे ह्या लोकांना भाव न देता बाजुला करत जावं. Involve झालोच तर मनस्ताप आपल्यालाच होतो. हा स्वानुभव आहे.

Zakki
Wednesday, March 28, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राने मला विचारले की तुम्ही अमेरिकेत येऊन काही शिकलात का, कुठल्या कॉलेजात वगैरे? मी नाही म्हंटले. तर तो म्हणतो तरीसुद्धा तुम्ही घर घेतले, मुलांची शिक्षणे केलीत? आश्चर्य आहे!

त्यांनी स्वत: इथे येऊन MS व MBA केले आहे. त्या जोरावर ते मला वाट्टेल त्या विषयावर सल्ला देतात. अगदी कॉम्प्युटर प्रोग्रॅम कसे लिहावे (त्यांना स्वत:ला एकहि प्रोग्रॅम लिहिण्याचा अनुभव नाही, मी १५ वर्षे प्रोग्रॅमिंग केले), केमिकल इंजिनियरिंग ची कॅल्क्युलेशन्स कशी करावी (ते स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, मला बंगलोरची M.E. आहे)), लोकांना काय सांगावे म्हणजे ते नोकरी देतील अश्या प्रकारचे सल्ले ते देत असतात. मी त्यांना अनेकदा सांगितले की अहो, मी अत्यंत समाधानाने सेवानिवृत्त झालो आहे, मला पैसे मिळवायची गरज नाही, केवळ वेळ जावा म्हणून व आता लोक बोलवतात म्हणून मी कधी गणित रसायनशास्त्र इ. शिकवायला जातो. त्यावर 'तुम्ही पूर्ण वेळ काउंटि कॉलेजात नोकरी का करत नाही? कारण तुम्हाला चांगल्या कॉलेजात घेणार नाहीत. त्यांना सांगा, पहा, मी असा असा शिकलो आहे, नि मला हा अनुभव आहे'.

एकूणच मला पाहिले की लोकांना माझी अपार दया येऊन कुणिपण मला सल्ले देत असतात, असे करा, तसे करा, वगैरे.


Sanghamitra
Thursday, March 29, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>एकूणच मला पाहिले की लोकांना माझी अपार दया येऊन
झक्की मायबोलीवरचे तुमचे लिखाण वाचायला द्या त्यांना म्हणजे दया बिया यायची बंद होईल. (अजून एक निरागस सल्ला.)



Storvi
Thursday, March 29, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला राहुन राहुन 'जश्यास तसे भेटे अन मनचा संशय फिटे' ही म्हण का बरे आठवतीये? :-O

Sunidhee
Thursday, March 29, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, तुमची चेष्टा म्हणुन लिहीत नाही बर का पण.... संघमित्रा लईच ईनोदी हायेस की तु.. क्लिप- एक निरागसतेने हसणारा चेहरा..

Jhuluuk
Friday, March 30, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मला असे वाटतेय, की तुम्ही पुढे पण लिहिणार आहात नं, का संपला लेख? अजुन तुमच्या लेखणीतुन खोचक आणि वेचक उतरायचे आहेत....

संघमित्रा, मला पण अशा बिनओळखीच्या माणसांनी पगार विचारलेला आठवतोय :-)


Bee
Friday, March 30, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच उदा. वाचायला मिळालीत इथे..

Zakki
Friday, March 30, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे एक मित्र कायमचे भारतात रहायला गेले. त्यांनी सांगीतलेले हे काही अनुभव.

'तुम्हाला इथे पगार किती मिळतो? अमेरिकेत किती मिळत होता? म्हणजे इथे त्याच्या कितीतरी कमी? मग इथे का आलात?
तुम्ही एक मोठ्ठ्या स्क्रीनचा TV का घेत नाही? (अहो, इथे जागा कमी आहे, जेमतेम चार फूट दुरून TV बघायचा तर फार मोठा घेऊन कसे चालेल?) तुम्ही मायक्रोवेव्ह का घेत नाही? (अहो इथे आम्हाला गरज वाटत नाही). तुम्ही गाडी का घेत नाही? (अहो, मी काय पुण्यात गाडी चालवणार, हिंमत नाही.). मग तुम्ही ड्रायव्हर ठेवा. (नि कुठे भटकत बसू गाडीतून? अमेरिकेत लाखो मैल भटकलो तेव्हढे पुरे झाले.)

तुमचे घर केव्हढ्याला विकल्या गेले? या प्रश्नाला उत्तर द्यायला नकार दिल्यावर त्याच लोकांनी म्हंटले की NJ त आजकाल घराची average किंमत इतकी आहे. म्हणजे तुम्हाला इतके पैसे मिळाले असणार. याही प्रश्नावर काही प्रतिक्रिया नाही. नंतर शेवटी directly , तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये द्याल का? उत्तर: अहो कशाला? तुमच्याजवळहि आहेत की चिक्कार पैसे. 'पण तुमच्या जवळ खूप जास्त आहेत'!

माझ्या मित्राच्या सांगण्याप्रमाणे, गर्दी, प्रदूषण, लाचलुचपत, कामे न करणे, ह्या सगळ्याशी जुळवून घेणे सोपे आहे, पण देवा, या नातेवाईकांची नि मित्रांची असली बोलणि नको.



Abhishruti
Saturday, March 31, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजन, आपले म्हणणे अगदी बरोबर आहे पण माझ्या मावशीच्या नवर्‍याला मी त्यांच्या लग्नाच्या आधीपासून ओळखते (कारण सोप्प आहे मावशीचा प्रेमविवाह आहे त्यामुळे मी त्याला आधीपासुनच अरे तुरे म्हणते आणि माझी मावशी माझ्यापेक्षा पाचच वर्षानी मोठ्ठी आहे . आणि तो मला खूप close आहे त्यामुळे लिहिताना हे लक्षातच आले नाही)
हे लिखाण जरा मुद्याला सोडून होतय, अगदी मान्य! तेंव्हा पूर्णविराम.


Swasti
Saturday, March 31, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन तीन किस्से आठवले ...

आमच्या शेजारि एक काकु रहायच्या तुम्हाला जर घराबाहेर पडताना त्यानी विचाराल ' कुठे चाललात ?" की समजा तुमच्या कामाचा बोर्‍या वाजला आणि त्याना हे विचारायची खोडंच होती. result च्या दिवशी आम्ही त्यान्ची नजर चुकवून बाहेर पडायचो .

माझी एक मैत्रिण होती . तीच लग्न झाल आणी नन्तर कधिही भेटली की नातेवाईक विचारायचे " फ़िर , मिठाई कब खिला रही हो ? कोइ good news " प्रश्न सामान्यच पण तिला भयन्कर खोचक वाटायचा शेवटी तिने तेवढीच भयन्कर उत्तर द्यायला सुरुवात केली .

" रोज जोरदार प्रयत्न चालू असतात , बघु आता कधी काय होत ते "
किंवा
" मी आणी माझा नवरा दोघेही रात्रि ११ वाजता दमून घरी येतो . त्यानतर काही करायची ताकदच नसते . पण बघू , करु काहितरी लवकरच "


Ajjuka
Sunday, April 01, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदीपच्या (नवऱ्याच्या) गावी पहिल्यांदा गेलो होतो. लग्न होऊन ३ वर्षे झाली होती. वाडीतल्या सगळ्यांकडे पाया पडणे आणि सुनेचे मिरवणे झाले करून. एका भोचक काकूंनी विचारलेच. "३ वर्ष झाली ना गो लग्नाला? मग अजून मुलबाळ कसं नाही बाय? प्लॆनिंग करतेस वाटतं! तसं काही अजिबात करायचं नाही बरंका."
यावर काय बोलायचं काय कळेचना मला. खरंतर त्यांच्या तोंडावर फस्स्कन हसायला येणार होतं मला.

दुसरं एक... मी एम. ए. केलं आणि नंतर एक वर्ष इथेच काही कामं आणि GRE-TOEFL etc करत होते. HOD नेच assistantship offer केल्याने, परिक्षा ही फक्त औपचारीकताच होती. तर जून ९८ मधली गोष्ट जेव्हा माझे फक्त व्हिसाचे सोपस्कार बाकी होते. घरातल्याच एका लग्नाला सांगलीला गेले होते मी. तिथे सगळ्यांना हे माहित होते की ही चालली अमेरीकेला म्हणून. चुलत आत्येभावाचं लग्न होतं आणि त्या आत्याचा एक दीर थोडा वेडसर होता. मुळात खूप हुशार IIT Scholar असलेला माणूस काही कारणाने वेडसर झाला होता. त्यावर थोडेफार विनोद ही होत होतेच. तर माझी एक काकू अचानक मला म्हणे "सोने, लवकर लग्न करून टाक हो नाहीतर अशी खुळी होशील." मी संपूर्णपणे चकणी झाले होते. हे कुठून आलं हेच कळेना.

Sunidhee
Monday, April 02, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, लग्न करा लवकर, एक मुलं होउ द्या लवकर असे म्हणुन गाडी थांबत नसते..
मला तर ' अगं तुझी मुलगी ३ ची होईल आता.. दुसरं आणा आता लवकर, केव्हा विचार करताय ?? '. असे ही म्हणणारे भेटत आहेत. काय बोलाव कळत नाही.. आमच्या घरचे पण विचारत नाहीत असे काही.


Disha013
Monday, April 02, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही us वरुन देशी गेलेलो. मुलगा ५ महिनांचा होता. पहीले नातवंडं. नवरा,सासरचे खुष होते. भेटायला म्हणुन गावातली मन्डळी यायची. अशीच एक दुरच्या नात्यातील बाई आलेली. सगळे चांगले बघवले नसेल. सासु आणि माझ्याबरोबर बोलताना कुचकट्पणे म्हण्ते कशी, तुझी सासु लग्नाच्या वेळी मस सुन येणार, सुन येणार करत होती. मी तेव्हाच तिला म्हटलेले, मारे बोलतियेस आता,सुन बघ, राहाते का तरी तुझ्याजवळ. दुखावले गेले होते मी.पण बावळटासारखे हसण्यावाचुन काहीच करु शकले नाही. आता यांच्या मुलाचा job त्या गावात नाहिये,यात माझा काय दोष? पण ती बाई काय किंवा सासु काय, कोणाला सांगणार? पण त्यानंतर सासुच्या वगण्यात फ़रक पडलाच.
काय मिळते असे कुचक्यासारखे बोलुन या लोकांना

बंगलोरला माझी (कलकत्त्याची) एक शेजारीण होती.
एरवी तिखट न खाणारा माझ्या मुलाने तिच्याकडे तिखट पावभाजी खाली. मी आपले केले कौतुक. तुमची अवडली,घरी तर तिखट खात नाही अजिबात, etc. etc. . तर ती मला तोंडावर म्हणते,
तुमच्या हाताला टेस्ट नसेल ना,म्हणुन खात नसेल. माझी मस्त होते पावभाजी. अशा एक ना हजार गोष्टी.
कौतुक कराय्ची पण सोय न्हवती.
आम्हा दोघांआही दिखाव्याची आवड नाही. आणी शेजार्‍ईण तर show off queen होती. आम्ही मुलाला भरपुर डोनेशन देवुन एका नामांकित शाळेत घातले, तर तेव्हाही ऐकावे लागले, मराठी माणसे अशी राहतात ना,म्हणुन त्यांच्याकडे खुप पैसा असतो.
:-(


Limbutimbu
Tuesday, April 03, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अश्या बर्‍याच गोष्टी झाल्या नी आम्हाला पक्के जाणवले की काहीतरी ह्यांच्या नजरेत आहे.
मनुस्विनी, अशी माणस असतात! बेक्कार नजरेचि! अशा वेळेस खरोखरच घरात लिम्बु मिरची टान्गुन ठेवावि त्या तसल्या माणसाला दिसेल अशी!

सुपर मॉम, भन्नाट टॉपिक हे!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators