Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बालकविता

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » बालकविता « Previous Next »

Moderator_5
Saturday, March 31, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'जगु' यांच्या विनन्तीवरून

Jagu
Monday, April 02, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा फ़ळ भाज्यांची सभा भरली
प्रत्येकाने आप-आपली स्तुती गायली

काकडी म्हणाली,
मी कधी सरळ कधी वाकडी
सगळ्यांत थंड आहे मी एकटी

गाजर म्हणाला,
रंग माझा सगळ्यांत सुंदर
माझ्यामुळे स्वच्छ होते नजर

बिट म्हणाला,
भोवर्‍याच्या आकाराचा मी बिट
माझ्यामुळे राहतात सगळे फ़िट

टोमटो म्हणाले,
माझा रंग आहे लालेलाल
माझ्यामुळे होतात गुलाबी गाल

कांदा म्हणाला,
मी आहे जरासा तिखट
खाउन मला चव जाते फ़िकट

मुळा म्हणाला,
माझा रंग स्वच्छ, सफ़ेद
मला खाताना कसला खेद?

सगळ्यांची मग गट्टी झाली
कोशिंबीर नावाची टिम त्यांनी केली.








Jagu
Monday, April 09, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशातली यात्रा

एकदा एक परी
आली माझ्या घरी

सोबत मला घेऊन
वर उडू लागली

मऊ मऊ ढगांमधून
वाट काढू लागली

तिने आमची स्वारी
मग आकाशात नेली

चांदण्यांची सार्‍या तिथे
एकच गर्दी झाली

चमचम करुन त्यांनी
सुंदर रोषणाई केली

खेळ आपण खेळू
अशी विनवणी केली

आमची लपाछपी मग
तेथे सुरु झाली

खेळता खेळता तेथे
आली चांदोबाची स्वारी

पाहून त्याने मला
जादू एक केली

चाॅकलेट, आइस्क्रीम, खाऊची
रांग तेथे लावली

खाऊ मला भरवायला
सुंदर परी आली

खाऊन सुस्त होताच
मला मांडीवर झोपविली

थोड्याच वेळात तेथे
पावसाची सर आली

ढगांच्या गडगडाटाने
माझी घाबरगुंडी उडाली

जाग येताच पाहिले तर
आईच्या मी कुशित झोपली



Mahesh
Wednesday, April 11, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवली,
जेवढी आठवत आहे तेवढी लिहित आहे.

कवितेचे नाव आहे बिचारी चिमणी

एक होता पोपट
तो चिमणीला म्हणाला
तू मला थोपट

एक होते बदक
ते चिमणीला म्हणाले
दे मला मोदक

एक होती घूस
ती चिमणीला म्हणाली
तू माझे अंग पूस

एक होते कासव
ते चिमणीला म्हणाले
तू मला चड्डी नेसव


Runi
Wednesday, April 11, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश या कवितेचे अजुन १-२ कडवी मला येतात
ती अशी आहेत

एक होता काऊ
तो चिमणीला म्हणाला
तु मला घाल न्हाऊ

एक होती घार
तिने चिमणीला विचारले
तुझे नाव काय


Jagu
Thursday, April 12, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे स्वत्: लिहिलेल्या कविता पोस्ट करायच्या आहेत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators