|
मागे वळुन पाहताना आज माझ्याजवळ सर्व काही आहे. तरिही कशाची तरी उणीव भासते आहे. मी माझे सारे आयुश्य माझ्या मरजीप्रमाणे जगले. ज्या वेळी जे वाटले ते ते आणि तेच करत आले. पण आज आयुश्याच्या उतरणीला लागले असताना कशाची तरी रुख रुख लागली आहे कशाची बरे याचा विचार करता करता माझ्या ही नकळत मी आयुश्याचा आढावा घेउ लागले. आणि मागे वळुन पाहताना मनाशी विचार करु लागले मी नेहमीच बरोबर होते का? मी घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर होता का? सगळ्यानच्या हिताचा होता का? आज इतक्या वर्शान्नी मी ते आत्मपरीक्शण का काय करते आहे. पण माझे निर्णय घेताना मी किती तरी लोकान्ना दुखावले आणि कितितरी कोवळ्या फ़ुलान्ना सुखावले. पण पाप पुण्याच्या हिशोबात कोण कोणावर मात करेल? ज़्याना दुखावले ती सगळी माझी मणसे होती. पण ज्यानच्यासाठी मी हा निर्णय घेतला त्याना तर कोणीच नवते. विचारानच्या नौकेत बसून मी माझ्या २० व्या वर्शात पोचले. आई, वडील, दादा अशा सगळ्यानच्या भक्कम छायेत माझे बालपण गेले. घरात शेन्डेफ़ळ म्हणुन तर माझे खूप लाड झाले. सगळे मला फ़ार जपत. मी म्हणेन ते घरात होत असे. पण याच माझ्या प्रेमळ आई, वडिलान्नि, दादा वहिनीने मला जेव्हा त्यान्च्या साथीची खरच गरज होती तेव्हा साथ दिली नाही. कदाचित त्यान्ना वाटले असेल सतत घरट्याच्या उबेत राहणारि हि मुलगी आपण हात दिला नाही तर अखेर घरट्यात परत येइल. आपला जगावेगळा हट्ट सोडुन देइल. चार चौघीनप्रमाणे रितीचे आयुश्य जगेल. त्याना तेच तर हवे होते. पण मी हरणार्यातली नवतेच मुळी. कुणाच्या सोबतीने वा सोबतीशिवाय मी माझी वाट पुढे चालणारच होते. त्याचे असे झाले, मी बारावीला असताना मला एक जिवाभावाची मैत्रीण भेटली. ऊमा. ऊमा अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालि होती. आणि तिने ठरवले होते की ती शिक्शण पुर्ण झाल्यावर तिचे आयुश्य अनाथ मुलान्ची सेवा करण्यात घालवणार आहे. मिही अधुन मधुन तिच्या बरोबर काही अनाथ आश्रमात जात असे. तिथल्या मुलान्चा अभ्यास घेणे, त्यान्ची आजारपणात शुश्रुशा करणे, त्यान्ना कधी कधी बाहेर फ़िरायला नेणे अशा प्रकारच्या लहान सहान कामात मिही तिच्या बरोबर सहभागि होत असे. आणि हळु हळु मला जाणवू लागले की मी किती भाग्यवान आहे की मला आई, बाबा, दादा, वहिनी सगळ्यान्चे प्रेम मिळाले. आणि हि छोटी छोटी मुले. आई बापाविना कशी वाढत असतील. आनाथ आश्रमात राहुन उमे प्रमाणे किति धडपडीने शिकत असतील. आयुश्यातला प्रतेय्क प्रश्ण त्यान्ना स्वताहुन सोडवावा लागतो. त्यान्च्यावर निरपेक्ष प्रेम कोणी करत असेल का? त्यन्चे लहान सहान हट्ट ही इथे पुरे होत नसतील. कोण त्यान्ना प्रेमाने जवळ घेत असेल, त्यान्च्या गालावरुन मायेने हात फ़िरवत असेल?आजही घरी गेले की दिवसभरात काय काय झाले ते आई ला सन्गितल्याशिवाय मला चैन पडत नाहि. या मुलान्चे ऐकुन घ्यायला तरी कोणाला वेळ असेल का? आजही आपल्याकडे मुले दत्तक घेण्याचे प्रमाण फ़ार कमी आहे. फ़ार थोड्या मुलान्ना त्यान्चे हक्काचे घर मिळते. इथे अनाथ आश्रमात अपुरे माणुस बळ, अपुरा पैसा, शिवाय आपले राजकारण या आणि अशा अनेक समस्यान्ना इथलि कार्यकारी मन्डळी तोन्ड देत असतात. त्यान्च्याही कर्माला मर्यादा या येणारच. क्रमश:
|
Sunidhee
| |
| Friday, March 30, 2007 - 10:08 pm: |
|
|
फार फार हळवा विषय आहे गं
|
खरंच, मी पाहिलयं तिथलं वातावरण......... खुप वाईट वाटतं गं त्या मुलांचं
|
hello????????????? मनाली, कुठे गायब झालीस ?
|
Rangoli
| |
| Friday, April 06, 2007 - 9:58 am: |
|
|
हे, फुलपाखरु.......... कुठे गेलात उडुन? कथा पुर्ण करा की!! वाट बघत आहोत. वेगळा विषय आहे. उत्सुक आहोत कथा वाचायला.
|
Fulpakhru
| |
| Saturday, April 07, 2007 - 6:45 am: |
|
|
१ २ दिवसात पुरी करते. सध्या office मधे खूप काम आहे. weekend ला पुरी करायचा प्रयत्न करेन.
|
मी उमेबरोबर सिन्धूताइन्च्या आश्रमात अधुन मधुन जात असे. त्या निरागस मुलानकडे बघताना कधी डोळे पाणावत हे माझे मलाच कळत नसे. मला होइल तितकी मदत मि करत होतेच. आर्थीक मदत करणे मला शक्य नवते पण तिथे शारिरीक मदतीचीही तितकीच गरज होती. माझे संवेदनाशील मन, मुलान्बद्दलचा कळवळा, त्यानच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड सिन्धूताइ पहात होत्या. १ दिवस मि आणि उमा आश्रमात आलो असताना कोणीतरी धावत आश्रमात येताना दिसले. सिन्धूताइन्नी मला आणि उमेला त्याच्याशी बोलायला पाठवले. त्याला देवळाच्या पायरीशी १ तान्हे बाळ सापडले होते. १ किन्वा २ दिवसान्चे ते बाळ पाहुन तो सिन्धूताइन्ना सान्गायला आला होता. ताइ लगेच त्याच्या बरोबर गेल्या आणि त्या दुपट्यात गुन्डाळलेल्या इवल्याशा जिवाला आश्रमात घेऊन आल्या. त्या बाळाला पाहून माझ्या मनात असंख्य विचार रुन्जी घालू लागले. वाटले कोण असेल याची आइ, जिने आपल्या पोटच्या तुकड्याला हे असं देवळाच्या पायरीवर टाकून दिल परिस्थीतीपुढे इतकी हतबल झाली असेल की आपल्या काळजावर दगड ठेऊन तिने हा निर्णय घेतला असेल कि तिच्यावरच्या अत्याचाराचे हे बाळ फ़लित असेल म्हणुन तिने त्याला असे वार्यावर सोदुन दिले असेल? जे काही असेल त्यात या इवल्याशा जिवाची काय चूक? आणि आता हे बाळ आइ बापाविना अनाथ म्हणुन वाढ्णार. त्याला काय आणि कोणाला काय कधीच त्याच्या आइ बापाचा पत्ता ही लागणार नाही. त्या क्षणी मला माझ्या आइ बाबान्ची माझ्या उबदार घरट्याची आठवण झाली आणि माझं मन भरून आले. खरं तर अपत्य प्राप्ती म्हणजे केवढा मोठा आनन्द. शेजारच्या वहिनीला मुलगी झाली तेव्हा सगळे किती खुश झाले होते. इतक्या वर्शान्नि घरात लहान बाळ आले याचा आनन्द सगळ्यान्च्या चेहर्यावरून ओसन्डून वहात होता. वहिनीची किती कोड कौतुकं चालली होती. बाळाचे बारसं देखील काकुन्नी किती थाटात केलं होतं. आणि आज माझ्यासमोर हे बाळ होतं. तितकच गोन्डस. पण याच्या नशिबी यातलं काहीही येणार नवत. उलट मोठा झाल्यावर "काय रे तू अनाथ आहेस का? तुला म्हणे तुझ्या आइ ने टाकुन दिले होते?" या आणि अशा प्रश्णाना त्याला सामोरे जावे लागेल. त्याच्या मनात कधीही न पाहिलेल्या आइ विशयी घ्रुणा निर्माण होईल. मणाने कणखर असेल तर या सगळ्याना तो पुरून उरेल. आणि नसेल तर नसेल तर या विचारानसरशी मझ्या आन्गावर काटा आला. आश्रमात मी बरीच घुमी, सतत आपल्यातच रममाण असलेली किती तरी मुलं पाहिली होती. खेळाबागडायच्या वयात नको तितकी गम्भीर झालेली ही मुलं पाहिली की मला फ़ार वाइट वाटत असे. लोकान्चे उपहासात्मक बोलणे नको म्हणुन जनसम्पर्क तोडु पाहणारी ही मुले पाहुन माझ्या पोटात तुटत असे. त्या दिवशी मी अस्वस्थ मनाने घरी परतले. माझ्यात झालेला बदल आइ च्या लक्शात आल्याशिवाय राहिला नाही. तिने मला त्याबद्दल विचारले. पण मी तिला काही बोलले नाही. क्रमश्:
|
Adi787
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:10 pm: |
|
|
फुलपाखरु, छान जमलीय कथा.. कामामधुन थोडा विसावा घ्या रोज एखादा तास
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:51 am: |
|
|
फ़ुलपाखरु इथे पहा तुला formatting ची माहिती मिळेल शिवाय देवनागरीत लिहिण्यासाठी मदत अशी एक लिन्क तु लिहिताना उजव्या हाताला दिसेल तिथे तुला काही माहिती मिळेल. कथा विषय छान आहे.लवकर पुर्ण कर.
|
Nalini
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:55 am: |
|
|
ह्या लेखातल्या सिंधुताई म्हणजे सिंधुताई सपकाळ का?
|
नलिनी, मला पण तेच वाटतंय................ काय, मनाली अंदाज चुक की बरोबर?
|
|
|