|
Shrini
| |
| Friday, March 23, 2007 - 10:28 am: |
|
|
बस पुण्याला पोचायला आता सुमारे अर्धा तास उरला असावा. मी बसमधे बसलो तेव्हाच बस निम्मी अधिक रिकामी होती. मधय्ल्या स्टॉप्स वर काही लोक उतरल्यानंतर आत बसमधे मोजकी चार, पाच माणसे राहिली होती. माझ्या समोरच्या सीटवरचे दोघे मात्र माझ्या सारखेच सुरुवातीपासून बसम्धे होते. तो हातात सोन्याच्या अंगठ्या घातलेला, गळ्यात सोन्याची चेन असलेला, सोनेरी फ्रेमचा चष्मा घातलेला, लठ्ठ पोटाचा, मोठ मोठ्याने बोलणारा, एखादा नवश्रीमंत दिसत होत. ती आकर्षक चेहर्याची, बांधेसूद देहयष्टीची, फॅशनेबल तरुणी होती. तिचा उत्तम पेहराव, काखेतली भारी पर्स, हातातील मोबाईल, तिच्या चांगल्या सांपत्तिक स्थितीची कल्पना देत होते. ती दोघे पतिपत्नी नक्कीच नव्हती. तो तिच्याशी लघळपणा करत होता, पण तिने त्याला थांबवले नसले तरी त्याला ती एका मर्यादेपुढे जाऊही देत नव्हती. त्यांचे झाले इतके निरीक्षण पुरे झाले, असे म्हणून मी हातातल्या 'द माझरीन स्टोन' मधे डोके खुपसले, आणि 'I am a brain, Watson. The rest of me is a mere appendix.' या होम्सच्या वाक्याला मनोमन दाद दिली. इतक्यात त्या दोघांच्या बोलण्याने माझे लक्ष पुन्हा वेधून घेतले. 'जादू, सिद्धी या सगळ्या गोष्टी खर्या आहेत!' तो म्हणत होता, तर ती तरुणी त्याला शांतपणे पण ठामपणे विरोध करत होती. मी हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि त्यांच्या समोरच्या सीटवर, यांच्याकडे तोंड करून, गुढघ्यांवर बसलो. 'माफ करा,' मी म्हणालो, 'मी तुमचे बोलणे ऐकले. जादू, सिद्धी, या गोष्टी पूर्ण खर्या आहेत, आणि मी हे सिद्ध करु शकतो'. 'ते कसे काय ?' त्याने हेटाळणीने विचारले. 'कारण माझ्याकडे अशी एक सिद्धी आहे. मी दुसर्यांच्या मनातले विचार ओळखू शकतो', मी म्हणालो. 'चेहर्यावरुन तर तुम्ही एखादे कारकून दिसता, पण तुमची सिद्धी तुम्ही सिद्ध कशी करणार ?' त्याने विचारले. 'ते सोपे आहे. माझ्याकडे एक पत्त्यांचा कॅट आहे, त्यातली तीन पाने तुम्ही काढून घ्या आणि पहा. मग मी ती ओळखून दाखवेन', मी त्याला सांगितले. 'आणि तुम्हाला हे जमले नाही तर ?' 'पैज लावता पाच हजाराची ?' मी त्याला खिजवले. आता त्या तरूणीलाही आमच्या संभाषणात रस वाटू लागला होता. 'लावा हो तुम्ही पैज', ती म्हणाली, 'पाहू तरी हे गृहस्थ काय करतात!' आता तिच्या समोर तो माघार कशी घेणार ? रकमेबद्दल घासाघीस कशी करणार ? 'ठीक आहे! पैज!' तो उसन्या अवसानाने म्हणाला. मी माझ्या खिशातील पत्ते बाहेर काढू लागलो, पण तिने मला थांबवले. 'समजा तुमच्या पत्त्यांवर काही खुणा असल्या तर ? समजा तुम्ही काही हातचलाखी केली तर ? त्यापेक्षा हे माझ्याकडचे पत्ते वापरा.' असे म्हणून तिने तिच्या पर्समधले पत्ते काढून माझ्याकडे दिले आणि पर्स त्याच्या शेजारी ठेवली. मी पत्ते त्याच्या समोर धरले. त्याने तीन पाने काढून घेतली. ती पाने पहात त्या तरुणीने एका बोटाने आपल्या गालावर ताल धरला होता. 'बदाम एक्का!' मी म्हणालो. त्याच्या चेहर्यावर आश्चर्य उमटले, तिने तोंडाचा चंबू केला. 'इस्पिक दश्शी', मी म्हणालो. तो उघड उघड थक्क झाला होता, आणि तिने चकित होत एक हात आपल्या तोंडावर ठेवला होता. 'किल्वर पंजी', मी म्हणालो. त्याने निराशेने हातातील पाने खाली टाकली. मी ती उचलून पाहीली. माझे अंदाज अचूक ठरले होते. मी काही न बोलता त्याच्या पुढे हात केला. त्याने मुकाट्याने माझ्या हातावर पाच हजाराच्या नोटा ठेवल्या आणि मी आपल्या जागेवर जाऊन बसलो. गाडी स्थानकात शिरुन थांबली. तो तिला आपल्या बरोबर चलण्याचा आग्रह करत होता, त्याला तिने मान झटकत नकार दिला आणि ती खाली ऊतरली. तोही तिच्यामागोमाग उतरुन निघून गेला. मी सर्वात शेवटी उतरलो. ती तरूणी अजूनही बसपाशीच रेंगाळत होती. तिला पाहून मी हलकेच मान हलवली आणि सावकाश पार्कींग लॉटकडे आलो. 'विजय', माझी तिथे वाट पाहणार्या त्या लठ्ठ पोटाच्या माणसाला मी म्हणालो, 'तिची पर्स तू साफ केली असशीलच, पण यापुढे बायकांबरोबरचा तुझा लघळपणा जरा कमी कर!'
|
वा! नवीन वळण. पण पत्त्यातल्या जादूची (खरंतर तीही जादू नाहीच, हातचलाखी) सिद्धी बरोबर तुलना?
|
हे.. मस्त.. धमाल.. आणि शेवट अनपेक्षित.. सुंदर कथा..
|
Bee
| |
| Friday, March 23, 2007 - 11:08 am: |
|
|
म्हणजे ह्यानंतर अशा जादूई प्रकारात जो कुणी नविन मनुष्य टपकेल तो त्याचाच भागीदार असे ओळखावे शेवट छान आहे..
|
Saee
| |
| Friday, March 23, 2007 - 11:09 am: |
|
|
अगदी श्रीनी स्टाईल.. short & sweet
|
Badbadi
| |
| Friday, March 23, 2007 - 12:38 pm: |
|
|
वा!!! मस्त च... अगदी अगदी श्रीनी स्टाईल..
|
Supermom
| |
| Friday, March 23, 2007 - 12:53 pm: |
|
|
एकदम छान गोष्ट. मला मात्र ती बाई अन जादू करून दाखवणारा साथीदार वाटले होते.
|
वा श्रिनि.. मस्त स्टाईल रे लिहिण्याची.. मजा आगया
|
Disha013
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:49 pm: |
|
|
छान,सुटसुटीत गोष्ट! मला पण ती बाई आणि जादुगार मित्र वाटलेले. मग त्याने त्या बाईने दिलेले पत्ते खरोखरच जादुने ओळखले की काय? ते नाही बुवा समजले.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:55 am: |
|
|
गोष्ट मस्त होती... सही जादु वगैरे काही नाही असे संभाषण तो जाड्या सुरु करतो. हाच एक मोठा clue होता. दुसरे बाईच्या हातात पत्ते न्हवते ते त्याच्या भागीदारच्या हातात होते. quite posisble की त्यांना माहीती असेल the way he holds cards or some finger or sign that tells the opposite person what card is it ... this is my guess पण काही जादुगर सही असतात. माझी एक मैत्रिणीला एका जादुगराने बोलवले आम्ही त्याचे खेळ बघताना आणी तो म्हणाला आता हीचे दोन तुकडे करतो गादीवर झोपवुन. आम्ही spectators होतो stage पासुन खाली दहा फुटावर. ती stage वर गेली व त्यानी तीला गादीवर झोपवले. गादीचा table वर खाली केला नी दाखवले की काहीच नाही आहे जिथे तीला लपवु शकतो. मग काहीतरी १० मीनीटे मंत्र पुटपुटला... मैत्रिणीला डोळे बंद करायला सांगीतले नी तलवार फिरवली. गर्दीतील बर्याच बायका किंचाळल्या. मी पण पुर्ण टरकुन आ...आ करुन बघत होते. भास होता की खरे माहीती नाही पण तीचे दोन तुकडे झालेले दाखवले टेबल वेगळे करुन. २ मिनीटे इतका गोंधळ ना मग पुन्हा काहीतरी केले नी मैत्रिणीला एकसंघ केले. खाली आली तेव्हा तीला जरा गरगरल्यासारखे होत होते नी काहीच आठवत न्हवते. तीने चारदा तरी विचारले की मी काय खरोखर वरती stage वर गेली होते काय? एक गम्मत म्हणजे हा फक्त खेळात photo घेण्यास मनाई केली होती. का????? माहीत नाही.
|
Shrini
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:53 am: |
|
|
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! संघमित्रा, कथेचा नायक खोटे बोलतो गं, त्याला जर सत्यासत्याची चाड असती तर तो लोकांची फसवणूक करता का मनुस्विनी, गुड गेस, पण पत्ते साथीदाराच्या हातात असले तरी ती बाई ते पहात असते की! दिशा, त्या विजयने सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला असतो असा सुरुवातीला उल्लेख आहे. नायक त्याच्या चष्म्याच्या काचांमधे ती पाने पाहतो. या गोष्टीचा मूळ गाभा आणि तिचे शीर्षक यांचा जवळचा संबंध आहे. एखादी जादू ही सामान्यतः 'मिसडायरेक्शन' ने केली जाते, तसेच या गोष्टीतही 'मिसडायरेक्शन' वापरलेले आहे, म्हणून शीर्षक 'जादू'. कोणीतरी यावर कॉमेंट करेल असे वाटले होते, पण ती कोणी केली नाही, म्हणून मीच करतो!
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:31 pm: |
|
|
श्रिनी, गोष्ट आवडली. आधी वाचल्यासारखी वाटली.
|
Disha013
| |
| Wednesday, March 28, 2007 - 3:44 pm: |
|
|
ओह..तो ये है राज की बात
|
Storvi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:15 pm: |
|
|
मलाही वाटलेले की तो जादुगार आणि ती तरुणी con artists असतील म्हणून, नाहीतर तिच्याकडे नेमका पत्त्याचा कॅट कसा काय निघाला बुवा?
|
Arch
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:25 pm: |
|
|
तिच्याकडे नेमका पत्त्याचा कॅट कसा काय निघाला बुवा?>> शिल्पा, अग ती under cover police असणार आणि नंतर तिनेच ह्या दोघांना पकडून दिल असणार
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:00 pm: |
|
|
कथा छान होती, मलाहि Storvi सारखाच प्रश्न पडला. पण आर्च सारखे उत्तर नाही सुचले.
|
Disha013
| |
| Wednesday, March 28, 2007 - 7:29 pm: |
|
|
मला वाटते, त्या विजयने तिला नादी लावलेच होते,मग तिला पत्त्यांचे वेडही लावले असणार आधी. तिला म्हणुनच पर्समधे पत्ते ठेवायची सवय जडली असणार.
|
Shrini
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:07 am: |
|
|
>>तिच्याकडे नेमका पत्याचा कॅट कसा काय निघाला that was added misdirection! एक मुद्दामहून नमूद करतो : काही वेळा माझी गोष्ट वाचून, 'ही आधी कुठेतरी वाचली आहे' अशा काही कॉमेंटस येतात, पण ती गोष्ट कोणती, लेखक कोण, आधी कुठे वाचली, हा तपशील सोयीस्करपणे गाळला जातो. मी गोष्टी चोरत नाही. एखाद्या इंग्लिश कथेचे भाषांतर / रूपांतर मी केले असल्यास त्या गोष्टीच्या शेवटी मी तसा स्वच्छ उल्लेख करतो. जिथे असा उल्लेख नसतो ती माझी original गोष्ट असते. तेव्हा या लोकांना विनंती, की कारण नसताना अशा छुप्या कॉमेंटस कृपया करू नये.
|
Himscool
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:38 am: |
|
|
श्रीनी, कथा लिहीली चांगली आहे, तुझीच आहे ह्यातही काही शंका नाही. पण काही दिवसांपूर्वी मी ह्याच कथेचा गाभा असलेला इंग्रजी पिक्चर HBO वर बघितला आहे.. ह्या कथेप्रमाणे त्यातही त्या बाईला सुरुवातीला असेच गुंडाळतात आणि नंतर तिला बरोबर घेऊन काही अजुन लोकांना फसवतात.. पण जेव्हा तिच्या लक्षात येते की तिलाच लुबाडण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे तेव्हा शेवटी ती त्या माणसाचाच खून करते.. ह्यात ती नायिका एक मानसोपचार तज्ञ दाखवलेली आहे.. पिक्चरचे नाव आत्ता आठवत नाही आहे
|
Shrini
| |
| Thursday, March 29, 2007 - 9:02 am: |
|
|
Himscool, तू म्हणतोस तो मूव्ही मी पाहिलेला नाही, आणि या गोष्टीची कल्पना कुठल्याही मूव्ही / कथेवरून ढापलेली नाही. ही गोष्ट मी लिहीली ते मुख्यतः 'मिसडायरेक्शन' वापरण्याकरता, आणि त्यात मी बर्यापैकी यशस्वी झालो असे वाटते. मी गोष्टी लिहीतो ते मुख्यतः काहीतरी नवीन विचार करून तो मांडण्याकरता. म्हणूनच मी गोष्टी चोरत नाही, कारण त्यात नावीन्य कुठे आहे ? लेखनामागचा हा माझा इतका साधा हेतू आहे. याला अपवाद एकच, तो म्हणजे जर मला इंग्लिश मधली एखादी गोष्ट / कल्पना विलक्षण आवडली, तर तिचे रूपांतर मी करतो, पण ते मूळ कल्पनेच्या उल्लेखासह. हे सगळे विस्ताराने पुन्हा एकदा लिहायचे कारण एकच, की कुणीही माझ्यावर कथा चोरण्याचा आरोप करू नये, किंवा तसा गैरसमज करून घेऊ नये. इत्यलम!
|
|
|