मित्रांनो .. आफ़ताब च्या रचनेत मला ती so called तबीयत दिसली . काही काही शेरात लहज़ा फार मस्त आलाय . आफ़ताब ऋतू येत होते ऋतू जात होते ऋतूंच्या तरी काय हातात होते? तुझ्या फ़क्त एका कटाक्षात, वेडे जगाची तबाही अतोनात होते कितीदा बुडालो, नि तरलो कितीदा बदलते किती भाव डोळ्यात होते तुला पाहण्याचे व्यसन रोज जडते जरी सांगता रोज मरणात होते युगांपासुनी हा बघे वाट म्रुत्यू ऊगा का, तुझे श्वास श्वासात होते ?
|
Zaad
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:18 am: |
| 
|
तुझ्या फ़क्त एका कटाक्षात, वेडे जगाची तबाही अतोनात होते आहा!!! खूपच सही....!!!
|
तुला पाहण्याचे व्यसन रोज जडते जरी सांगता रोज मरणात होते किती सहज!! वा... युगांपासुनी हा बघे वाट म्रुत्यू ऊगा का, तुझे श्वास श्वासात होते ? आह... जरी मृत्यू वाट बघतोय, तरी उगाच नाही मी अजून जिवंत आहे! क्या बात है! लिहीत रहा!!
|
Nachikets
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:26 am: |
| 
|
सुंदर गज़ल, आफ़ताब. सगळेच शेर छान!!!
|
Meenu
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:54 am: |
| 
|
वा !! आफताब मस्त ..!!
|
Jo_s
| |
| Wednesday, March 21, 2007 - 6:59 am: |
| 
|
व्वा, छान आहे गझल.
|
तुझ्या फ़क्त एका कटाक्षात, वेडे जगाची तबाही अतोनात होते वा!! खूप काही सांगून गेला हा शेर.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:30 am: |
| 
|
आफ़ताब.......मान गये उस्ताद! सगळे शेर एकाहून एक आहेत. मतला.....एकदम सही! तुझ्या फ़क्त एका कटाक्षात, वेडे जगाची तबाही अतोनात होते ......... हा शेर तर लाजवाब! कितीदा बुडालो, नि तरलो कितीदा बदलते किती भाव डोळ्यात होते ....... अहा...! तुला पाहण्याचे व्यसन रोज जडते जरी सांगता रोज मरणात होते ..... अगदी देवदास type 
|
Imtushar
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:32 am: |
| 
|
आफ़ताब, अप्रतिम गज़ल... 'जगाची तबाही'... अतिसुंदर... 'तुला पाहण्याचे व्यसन रोज जडते जागची तबाही अतोनात होते' हा शेरही खूप आवडला, पण 'व्यसन रोज जडते' थोडं खटकलं मला असं वाटतं की व्यसन हे एकदाच जडतं... मोह रोज होऊ शकतो. हा अर्थात या सुंदर गज़ले मध्ये मला खटकलेला एक शब्दप्रयोग, माझी शंका चुकीची असू शकते आणि यासहीतही मला ही गज़ल खूपच आवडली. --तुषार
|
तुझ्या फ़क्त एका कटाक्षात, वेडे जगाची तबाही अतोनात होते ... क्या बात है...
|
Meghdhara
| |
| Wednesday, March 21, 2007 - 10:27 am: |
| 
|
क्या बात है!!! तुझ्या फ्क्त.. व्वा! मेघा
|
Vshaal78
| |
| Wednesday, March 21, 2007 - 10:48 am: |
| 
|
आफताब, छान आहे. मला आवडलेलि दुसरि गजल
|
Psg
| |
| Wednesday, March 21, 2007 - 11:18 am: |
| 
|
आफ़ताब, मस्त आहे गझल!
|
Bee
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:12 pm: |
| 
|
तबाही हा उर्दू शब्द मराठी घझल मधे घेतला तर चालतो का?
|
Pulasti
| |
| Thursday, March 22, 2007 - 3:07 am: |
| 
|
आफ़ताब, मतला मस्तच! "काळाचे वाहाणे काळाच्या तरी कुठे हातात असते" - क्या बात है! व्यसन - छान शेर आहे. तुषारची शंका रास्त आहे. "तुला पाहण्याचे व्यसन रोज करतो" असे केले तर निरसन होऊ शकते. अगदी "देवदास" तबियत सांभाळून मक्ता नीट कळला नव्हता, पण आनंदयात्रींचा प्रतिसाद वाचून अर्थ लागला आणि भावलाही. तबाही शेर ठीक वाटला. विशेष आवडला नाही. अर्थात हा माझ्या "तबियतीचा" प्रश्न आहे माझ्या मनात एकदम ठसलेला शेर "डोळ्यांचे भाव".. खूप आवडला!! -- पुलस्ति.
|
Giriraj
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:06 am: |
| 
|
अगदी झरझर उतरली असावी लेखणीतून,इतकी सहजसुंदर.. लहान लहान बाबींकडे लक्षही जाऊ नये इतकी सुंदर.. दहा गावं बक्षीस रे!
|
वा!! गिरी..तुम्ही दहा गावं बक्षीस दिलीत.. आमच्याकडूनही एक सुभा असो. मक्त्यामध्ये सानी मिस्-यात 'ऊगा' च्या जागी 'उगा' असे हवे ना?
|
Aaftaab
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:08 am: |
| 
|
प्रिय मित्र मैत्रिणींनो शतश: धन्यवाद! माझ्याकडे धन्यवाद व्यक्त करायलाच शब्द नाहियेत. माझ्या पहिल्या genuine ग़ज़लेच्या प्रयत्नाला इतके प्रोत्साहन मिळाले.. या कार्यशाळेत भाग घेण्याचे सार्थक झाले.. आता काही शंकांचे निरसन... १. ऊगा तो बहुतेक typo असावा. ते 'उगा'च आहे. २. तबाही सर्वांच्या स्तुतीबद्दल आभार. पुलस्ति तुमच्या अभिप्रायाचीही मी प्रामाणिक दखल घेतो आणि मान्य करतो. हा शेर वैभवच्या review मेलला रिप्लाय करताना आधीचा एक शेर cancel करताना असाच सुचलेला आहे. ३. व्यसन मोहाचा अतिरेक म्हणजे हव्यास किंवा व्यसन. मला addiction हाच अर्थ अभिप्रेत असल्याने व्यसन शब्द वापरावा लागला.. मला अभिप्रेत अर्थ असा तुला पाहिले तर घायाळ होऊन मरण नक्की आहे. आणि नाही पाहिले तर व्याकूळ होऊन मरण नकी आहे. म्हणून ह्या व्यसनाची सांगता रोज मरणात होते. अर्थात एखादा व्रुत्तात बसणारा चांगला पर्याय असला तर मला ते बदलायला आवडेल. सर्वांचेच अभिप्रायाबद्दल आभार.. गुरुजींना तबीयत आणि लहजा दिसला अजून काय पाहिजे? thank you गुरुजी..
|
'व्यसन हे एकदाच जडतं' ह्या तुषारच्या मताशी सहमत. असा एक option होऊ शकतो का?--? तुला पाहण्याचे व्यसन हे(का) सुटेना(?) जरी सांगता रोज मरणात होते. कंसातले पर्याय वापरून शेराचा tone थोडासा बदलता येईल. पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!
|
Aaftaab
| |
| Thursday, March 22, 2007 - 7:21 am: |
| 
|
मयूर.. पर्याय छान आहेत. यावर आणखी जाणकारांची मतं वाचायला आवडतील.
|