|
Suvikask
| |
| Wednesday, March 28, 2007 - 11:14 am: |
|
|
पहीला प्रयत्न आहे.. समजुन घ्याल ही अपेक्षा!!! नेहेमी प्रमाणे शरदची स्वारी १५ दिवसांच्या टूर वरुन घरी आली. घरात शुभदाची दिवाळीची तयारी करण्याची धावपळ चालली होती. साफसफाई, फराळाचे पदार्थ करण्याची तयारी, कपडे, फटाक्यांची खरेदी या सगळ्या गोष्टीना वेळ देता देता तिच्या नाकी नौ आले होते. तरी पण आफीसमधुन मिळेल तशी सुट्टी घेउन उत्साहाने ती सगळ करीत होती. दुपारची जेवणे आटोपल्यानंतर सगळेजण निवांत बसल्यानंतर शरदने बोलायला सुरुवात केली. "शुभदा, तुला माहितच आहे कि आमच्या कंपनीची टेक्निकल कोलबरेटर असलेली कंपनी जर्मनीत आहे. मला तेथील नोकरीची संधी चालुन आली आहे. तिचा मी सध्या विचार करतो आहे." हे सांगितल्यावर शुभदा दचकलीच.. "काय?? कधीपासुन?? आणि हे सगळ तु कधी ठरवलेस?? मला याची काहीच कल्पना नाही." यावर शरद म्हणाला "तस काही ठरवल नाही ग अजुन.. पण काही दिवसांपुर्वी मीच त्यांच्याकडे विचारणा केली होती. त्याबाबतच त्यांनी इंट्रेस्ट असल्याचे कळवले. दिवाळीनंतर फॉर्मल इंटरव्ह्यु आहे... त्यासाठी मला २-३ दिवस तिकडे जावे लागेल." हे ऐकुन शुभदा मनात म्हणाली... "नेहेमीप्रमाणे याने सगळ आधीच ठरवल आहेच... आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. " तिने विचारले "अरे पण किती दिवसांसाठी वगैरे काही ठरवल असशीलच ना?" तो म्हणाला "३ वर्षांसाठी" "काय?? ३ वर्षांसाठी??? आणि एकटाच?? ३ वर्षे मी आणि निखिल तुझ्याशिवाय राहु इथे? आधीच तर तुझ्या इथे असताना सुद्धा सतत टूर असतातच. एकट राहण्याचा अगदी कंटाळा आलाय मला." "अग मी तिकडे शिफ्ट करण्याचाच विचार करतो आहे... नाहीतरी काय आहे इथे? निखिलcया शाळेची सोय होइलच तिकडे.. ब-याच इंटरनशनल शाळा आहेत तिकडे.. चांगल एक्स्पोजर मिळेल त्याला तिथे.. शिवाय मलाहि ग्लोबल एक्स्पिरीअन्स मिळेल.. " "शिफ्ट करण्याचाच विचार करतो आहे" हे ऐकुन शुभदा पुन्हा एकदा दचकली. "अरे वा! छानच!! तु सगळा विचार केलायस तर... पण माझ्या नोकरीचे काय? हे बघ...माझी सरकारी नोकरी आहे... एवढी रजा मला मिळणे अशक्य आहे आणि मी डिपार्टमेंटcया परवानगीशिवाय देश सोडु शकत नाही. तसे केल्यास तो गुन्हा होऊ शकतो" "मग त्यात काय एवढ??? सोडुन दे तु नोकरी. तिकडे मिळेलच तुला.. कारण सध्या आयटी सगळीकडे जोरात आहे" हे सगळ जे काही चालल होत, ते शुभदाला असह्य होत होतं "अरे, तु अस कस नोकरी सोडुन दे म्हणतोस? तुझ्या ३ वर्षासाठी मी माझी नोकरी सोडु? आणि तिकडे मिळेलच कशावरुन? माझा अनुभव आणि नॉलेज तिकडे नोकरी मिळण्याकरता अपुर आहे.. शिवाय सरकारी नोकरी म्हणजे.. आयुष्यभराची दोघानही काळजी नाही... खाजगी असती तर एक वेळ सोडण्याचा विचार करता आला असता.. शिवाय ३ वर्ष तिकडे शिकुन पुन्हा इकडे येउन शिकायच म्हणजे निखिलच्या शिक्षणाcईही वाट्च लागेल.. " "हो तेही बरोबरच आहे म्हणा.. पण मला वाटत नाही कि ३ वर्षानी आपण परत येउ.. बहुतेक पुढे कॉन्ट्रक्ट वाढेल.." निखिल तर हे सगळ ऐकुन तिकडे जायला उतावळा झाला होता. तिकडची शाळा, परीक्षा, विषय, टिचर यावर त्याची बाबाशी चांगलीच चर्चा रंगली. यात शुभदाच्या मनाची मात्र तगमग चालली होती. काय करावे काही सुचत नव्हते. रजा मिळाली नाही तर नोकरी सोडुन द्यायचे तिच्या अगदी जीवावर आले होते. तिला पहीले पोस्टींग बाहेरगावी सोलापुरला मिळाले होते, ते दिवस तिला आठवले. त्यावेळी निखिल लहान होता.. म्हणजे २रीत होता. त्याला हा बदल स्विकारणे खुपच जड गेले होते. पुणे-सोलापुर दर आठवड्याला ती अप्-डाउन करीत असे. त्यावेळी निखिलनी आणि शरद ने तिला बहुमुल्य साथ दिली होती. निखिल एवढा लहान पण अतिशय समंजसपणे वागला होता. सुरुवातीला ती निघाली की तो रडायचा.. त्यावेळी तिच्याही मनात कालवा कालव व्हायची.. नको ती नोकरी असे वाटायचे.. पण ती सरकारी नोकरी असल्याने तिने वर्षभर हेही दिवस कसेबसे काढले आणि शरदने नेटाने प्रयत्न करुन तिची बदली पुण्यात करुन घेतली होती. त्यानंतर सगळेच रुटिन छान चालले होते. आणि आता पुन्हा एकदा निर्णायक क्षण येउन ठेपला होता. आपली माणस, मैत्रिणी, घर, नोकरी हे सगळ सोडुन दुर कुठेतरी जाण्याचा तिला धीरच होत नव्हता. पण एवढी चांगली चालुन आलेली संधी सोडणेही मुर्खपणाचे होते. तिचे आइ बाबा तर ती लांब जाणार या विचारानेच बेचैन झाले होते. पण नव-याचा आणि मुलाचा उत्साह पाहुन तिला यातुन माघार घेणेही नको वाटत होते. शेवटी तिने नव-याला साथ देण्याचा निर्णय घेतला. आधी रजेसाठी अर्ज करुन पहायचा.. मंजुर झाली तर दुधात साखर.. नाहीतर सरळ राजीनामा... असा विचार करुन पुन्हा ती दिवाळीच्या तयारीला लागली. पण तरीही तिच्या डोक्यात विचार आलाच की हि संधी शरदला मिळाली म्हणुन त्याच सगळे जण कौतुक करत आहेत. त्याच्या जागी मी असते तर.. मी हा सगळा विचार केला असता तर.. शरदने दिली असती का मला साथ?? सोडल असत का त्याने त्याच करीअर, देश, मित्र, आइ-वडिल माझ्यासाठी?? माझही असच कौतुक झाल असत का? याची उत्तरं तिच्या मनात नकारार्थीच होती. कारण एक बाहेरगावी राह्ण्याचा अनुभव तिच्या गाठीशी होता. त्या काळातच सगळे जवळचे वाटणारे नातेवाइक सुद्धा "काय पैशाच्या मागे लागलिये... एवढा सोन्यासारखा संसार, मुलगा, नवरा सोडुन कशाला ही बाहेरगावची नोकरी पत्करली?" हाच टोमणा मारायचे!! शेवटी "संधी हा शब्द स्त्रिलींगी आहे म्हणुन पुरुषच तो साधु शकतो" असा अर्थ लावुन तिने विचार चक्र थांबवले.
|
Princess
| |
| Wednesday, March 28, 2007 - 11:54 am: |
|
|
सुरेख... शेवटचे वाक्य तर समस्त पुरुषवर्गाला ऐकवावे असे आहे नवर्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी स्वत:च्या करीअर वर पाणी सोडणार्या कित्येक मैत्रिणी आठवल्या
|
Manuswini
| |
| Thursday, March 29, 2007 - 12:14 am: |
|
|
हा शेवटचा para अतीश्य आवडला. आपले चांगले करीयर सोडुन इथे h4 एवुन फक्त घरी रहणया कीती तरी आहेत ज्यांचे नवरे लग्नानंतर फक्त स्वःताच्या करीयरचा विचार करुन येतात. संसाराला साथ देण्यात चुकी काही नाही पण 'वरती' लिहिलेला टोमणा हा स्त्रीला एकावा लागतो बहुधा.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:50 am: |
|
|
छान आहे कथा. पत्नीसाठी देश सोडुन गेलेले पति मला माहित आहेत. पण त्यानाहि वेगळेच टोमणे ऐकावे लागतात.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:35 am: |
|
|
छान आहे कथा. पण मला वाटत अशा वेळी तर adjustment येते ना. अर्थात कोणी adjust करायच हि सारासार विचार करायची गोष्ट आहे. आपल्याकडे जनरली स्त्रिया aDjusT करुन घेतात. पण समजा पत्नी ला खुप मोठा ब्रेक मिळणार आहे किंवा तीने जर घरामधे मेजर भुमिका कमावण्याच्या बाबतीत घ्यायचा निर्णय घेतला आणि ती ह्या बाबतीत खंबीर असेल तर पुरुष देखील adjust करु शकतात. काही कुटुंब आहेत अशी दिनेशदा म्हणाले त्याप्रमाणे. पण ह्याच प्रमाण खुप कमी आहे. मला वाटत फ़क्त "संधी हा शब्द स्त्रिलींगी आहे म्हणुन पुरुषच तो साधु शकतो" असा विचार करण्यापेक्षा तिने संधी शोधाव्या करुन दाखवाव. कोण काय म्हणत ह्याचा विचार करु नये. आपल कुटुंब एकत्र असल की झाल.
|
Suvikask
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:41 am: |
|
|
प्रिन्सेस, मनु, दिनेशदा, झकासराव प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद!!! झकासराव, कोण काय म्हणत याच्याकडेच लक्ष देऊन बायकांना आपले संसार करावे लागतात... तीच तर गोची आहे.. विचार करा जर सगळ्याच बायकांनी त्यांच्या मनाप्रमाणे वागायच ठरवल तर...??? ..... तर मी १००% खात्रीने सांगु शकते की ९९.९९% संसार अयशस्वी झाले असते.
|
Maasture
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:19 pm: |
|
|
सुविकासके ही कथा नाही, हा एक अनुभव झाला, अशा अनुभवाचा बीज म्हणून वापर करून कथा फुलवावी लागते. प्रयत्न चालू ठेवा. कथेत सुरुवात्-कथानक्--निरगाठ्-उत्कंठा-उकल्-शेवट असा ढोबळ आकृतीबंध असावा लागतो.
|
माझ्याकडून Princess ला अनुमोदन!!!!!!!!!!!!!! व्यवहारात पाहिले की हे वाक्य तंतोतंत पटते. मला वाटते दुसर्यांना सांगण्याआधी आपण स्वत:ला पडताळून पाहणे आवश्यक आहे. i mean स्त्री घराबाहेर पडली की किती स्त्रिया तिला support करतात?
|
Srk
| |
| Monday, April 09, 2007 - 5:37 am: |
|
|
सुविका, कथा आवडली. आम्हाला एक कविता होती ती आठवली. "घरट्यातुन गगनातुन शापित मी तगमगतो"
|
R_joshi
| |
| Monday, April 09, 2007 - 9:20 am: |
|
|
कथा छान लिहिलि आहे.
|
|
|