Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गेम केला रे

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » ललित » गेम केला रे « Previous Next »

Yog
Sunday, March 25, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊ ला ला ला...

Ireland नी पाकचा गेम केला, बान्गलादेश ने भारताचा अन media ने सर्व cricket fans चा. प्रशिक्षक वूल्मर यान्चा गेम कुणी केला यातल "अन्तीम" सत्त्य बाहेर पडेपर्यन्त कदाचित भारताने क्रिकेट विश्वचषक जिन्कलाही असेल कारण they say cricket is a funny game! I disagree, cricket was a funny game, now its part of "entertainment" at best and entertainment is risky business. One party will always have to give..

क्रिकेट वर बोलणे ही काळाची गरज आहे. "कालची" गरज आहे असे म्हटले तर योग्य ठरेल कारण आता बोलून काही उपयोग नाहीये तरिही कल हो ना हो म्हणतात तेव्हा आजच मन शुध्ध करून घ्यावे म्हणून हा प्रपन्च. तेव्हा बोलायला काय लागत? आता मन्दीरा बेदी पासून आज तक वरील कुठलीही मुलगी क्रिकेट बद्दल बोलू शकते तर आपण का नाही? माफ़ करा मला लिन्गवाचक टीका अजीबात करायची नाहीये. खर तर भारतीय महिला सन्घ देखील super 8 साठी qualify करू शकला असता अस माझ मत आहे. पण निदान मि टाइम्स शिल्ड मधे खेळलो आहे इतके qualification क्रिकेट बद्दल बोलायला पुरेसे असावे. यात फ़ुशारकी मारण्याचा हेतू नाही, मध्यम वर्गातील गुणवत्ता आमच्या लहानपणी उपजिवीकेची बान्धील होती. "यावर आयुष्य जगायचे आहे का" या प्रश्णाला तेव्हा आमच्याकडे उत्तर नव्हते किव्वा या खेळात एका रात्रीत आयुष्य बदलण्याची "माया" आहे इतकी दूरदृष्टि बहुदा आम्च्या पालकाना नसावी. अर्थात तेव्हाही काही विशेष फ़रक पडला नाही अन आताही नाही. म्हणजे हे लिहीण्या आधी किव्वा नन्तरही काहीच बदलणार नाही.
आता इथेच सहा महिन्यापूर्वी लिहिलेला हा लेख अजूनही "ताजा" वाटतो तेव्हा काही बदललय असही नाही :
/hitguj/messages/119403/118676.html?1163453422

म्हणजे अस बघा कदाचित उद्या बर्म्युडा जिन्कलाच तर पुन्हा क्रिकेट च्या नावाने शन्ख करणारे सर्वजण डोळे फ़ाडून सामने बघतील. चुकून भारताचा खेळ सुधारला तर inverters ची विक्री वाढेल, जाळलेले पुतळे पुन्हा उभे रहातील इत्यादी इत्यादी. वसिम अक्रम अन शोयेब चा चेन्डू reverse swing होत नसेल इतके बेफ़ाम आम्ही प्रेक्षक स्विन्ग होत असतो. अपेक्षा अन आशा यान्च्या झुल्यावर भले भले गरगरलेत तिथे आम्हा सामान्यान्ची काय कथा?
एखाद्या गोष्टीचा वीट आला की त्याबद्दल लिहीण बोलण नको होत तसच खर तर झालय. पण या सर्वाची उत्तर आम्ही स्वताच कोनाड्यात लपवून ठेवली आहेत.

वेस्ट इन्डीजच्या गार्नर, होल्डीन्ग, मार्शल, रॉबर्ट्स या तोपखान्यापुढे इन्च इन्च लढवत खेळणारे वेन्गसरकर, गावसकर, त्यान्च्या उसळत्या उर्मट चेन्डूना (शिव्याना नव्हे तो फ़क्त australians चा जन्मसिध्ध हक्क आहे) हूक करून सडेतोड उत्तर देणारे मोहिन्दर, देशाभिमानाचा दाणपट्टा फ़िरवत प्रत्त्येक वेळी जीवाची बाजी लावणारे कपिल देव, आणि अर्जूनाच्या एकाग्रतेप्रमाणे आयुष्यभर खेळपट्टीवर तळ ठोकून उभे राहणारे गावसकर, विश्वनाथ याना खर तर असे कुठले million dollars contract, sponsorships होती? ते सर्वान्च्या गळ्यातील ताईत असतील पण डोक्यावर घेतलेले दगड नव्हते.
गुणवत्तेची जागा पैशाने घेतली अन क्रिकेटचा खेळच बदलून गेला. विरुध्द सन्घाच्या उत्कृष्ट चेन्डूवर, फ़टक्यावर दिलखुलासपणे दाद देणारा, क्रिकेट खेळाची खरोखरीच जाण असलेल्या प्रेक्षकान्बरोबर stadium मधे बसून लहानपणी सामने बघितले आहेत. आता तसा प्रेक्षकही उरला नाही अन तसा खेळही नाही. उरले फ़क्त रन्गीबेरन्गी दिखावे.
बरेच लोक म्हणतात काळ बदललाय, pressure, expectations, stakes are high.. पूर्वी तितके नव्हते. कबूल आहे पण अजूनही तीनच स्टम्प्स आहेत, क्रिकेटचा मूळ खेळ तोच आहे, bat and ball तेच आहेत अन अजून तरी दोन हात अन पाय असलेलेच लोक खेळत आहेत मग बदललय काय? कबूल आहे आजकाल aggression ला जास्त महत्व आलय. बागलादेशच्या तमिम इकबाल ने जहीर आणि कम्पनीला लोळवल तो त्याचाच पुरावा आहे. इतकेच कशाला खुद्द सचिन जेव्हा नविन होता तेव्हा इम्रान अन अक्रम ला पुढे येवून फ़टके मारण्याच्या त्याच्या तन्त्रापेक्षा त्या attitude ने अवघ्या राष्टाला भुरळ घातली होती. त्या दिवसापासून आजपर्यन्त तरी क्रिकेट बदलेल नाही. aggression हे रक्तात असाव लागत. भारतीय सन्घात aggression ची तुरळक उदाहरणे म्हणजे श्रिकान्त, मोहिन्दर. तन्त्र, शैली, अनुभव आत्मसात करता येत पण शेवटच्या चेन्डूवर षटकार मारून शारजाच्या वाळवन्टातही आग लावणारे मियादाद जन्माला येतात ते aggression घेवूनच बहुदा. पाकीन्च्या ते रक्तात आहे. (रक्तात "होत" अस आता ireland चा सामना बघितल्यावार म्हणायची पाळी आलीये. अर्थात पाककडे दूरदृष्टि असणारे बुश नाहीत, अन्यथा पाकची हार अन नन्तर वुल्मरची हत्त्या यामागे अल कायदा आहे असे सान्गून अवघ्या जगला बेवकूफ़ बनवणारे मुशर्रफ़ दिसले असते.) ऑस्ट्रेलियन्स आणि इन्ग्लीश खेळाडू किव्वा एकन्दर पान्ढर्‍या कातडीचे खेळाडू हे तसेच born aggressive म्हटले तरी चालेल. gilchrist, ponting, kallis, hayden , ही aggression ची जिवन्त उदाहरणे आहेत. गेल्या दशकातल क्रिकेट बघितल तर हेच जाणवत की बरेचसे सामने या attitude वर जिन्कले गेलेत. अर्थात मूळ तन्त्र, आणि कौशल्य होतच पण so called high stakes च्या जगात अत्यावश्यक ठरल ते aggression किव्वा attitude . गर्भार पोट डुलवत पळणार्‍या रणतुन्गाच्या सन्घात agression जन्माला घातल ते मात्र जयसूर्याने. एकदिवसीय सामन्यात पहिल्या पन्धरा षटकात त्याने ठोकाठोक करायाला सुरुवात केली तेव्हा आमच्या श्रीनाथ, प्रसाद च्या तोन्डच पाणी पळाल होत. लारासारखे काही अपवाद अजूनही आहेत ज्यान्च्या bat ला ताला सूरावर नाचायला अन इतराना नाचवायला आवडत पण असे अपवाद तुरळक. गान्गुलीला आम्ही का डोक्यावर घेतला होता? उर्मट aussies ना डोळ्यात डोळे घालून प्रत्त्युत्तर देणारा तो पहिला होता अन अनुभव, कौशल्य, तन्त्र, यान्ची कसलिही उणिव नसलेल्या आमच्या सन्घाला त्या तेव्हड्या एका गोष्टीची आवश्यकता होती. पण ते फ़क्त औट घटीकेच वादळ ठरल. चेतन शर्मा हा या agreesion आणि पैशाच्या खेळाचा पहिला बळी ठरला. क्रिकेटचा gentleman's game मला वाटत तिथेच सम्पला आजकाल होतात त्या फ़क्त लढाया. बळी तो कान पिळी हे दुर्दैवाने क्रिकेट मधे खर ठरतय.

खेळात काही बदलल असेल तर या सर्व गोष्टी. आणि त्या बदलत्या गोष्टीन्च प्रशिक्षण देता येत नाही ती एक वृत्ती आहे ती अन्गी बाणवायला हवी.

खर तर भारत विश्वचषक जिन्केल हे मेडीया ने दाखवलेल, गोन्जारलेल एक मोठ स्वप्न होत, आहे. एकवार नजर फ़िरवली तर अगदी गल्लीतील पोरगही म्हणेल की बेभरवशाचा सेहवाग, कधिही न जमलेली opening pair , सम्पलेला सचिन, थकलेला द्रविड, spin च्या विरुध्ध शुध्ध तन्त्र नसलेला युवराज असे खेळाडू घेवून अशी स्वप्न पहाणे हा एक chocolate चा बन्गला आहे. तो सोनेरी, चन्देरी अन चमचमताही असेल पण ऐकायला मजा येते बस इतकच.
मुनाफ़ च्या वेगाला घाबरून मुरलीधरन ला देखिल पळताना पाहिलेल नाही, पठाण अन जहीर यान्ची गोलन्दाजी भेदक आहे असे म्हणणे म्हणजे plastic च्या चमच्याना अडकित्ता म्हणणे आहे. आगरकर ची गोलन्दाजी अन लक्षुमी रोड वरील नावाजलेल दुकान यात काही फ़रक नाहीये, कधी शटर डाऊन होईल सान्गता येत नाही. फ़िरकी गोलन्दाजी ने हरभजन,कुम्बळे यान्च्याशी कधिच घटस्फ़ोट घेतलाय. फ़िरकीची बया फ़क्त आयुष्यभरासाठी मुरलीची(मुरलीधरन) दासी आहे अन तीचा उपभोग कसा घ्यायचा, तीला कशी वापरायची याची अक्कल अन जाणही त्याच्याकडे आहे, ती एक वृत्ती आहे, contract आणि sponsor ने दिलेली भेट नाही. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे धोनिला मुरलीने परवाच्या सामन्यात एका चेन्डूत शिकवल.(तो शिकला अस आपण मानूया) हातात भीमगदा असून उपयोग नाही, ती कधी कशी कुठे चालवायची याचा विवेक ठेवावा लागतो अन त्याच प्रशिक्षण मिळत नाही त्यासाठी बलदन्ड बाहून्वर सन्तुलित डोक असायला हव अन नसल तर त्या भिमाला शान्त करणारा श्रीकृश्ण हवा.
chappel च्या हातात सुदर्शन नाही तर एक दुष्टचक्रच नक्कीच होत अन ते सोयिस्करपणे न पाहणारे ध्रुतराष्ट्र क्रिकेट च सत्ताकारण अन अर्थकारण करण्यात मग्न होते. या युध्धात हार पान्डवान्ची आहे हे उघड होत फ़रक इतकाच होता की आपल्याला सान्गितलेल अन दाखवल गेलेल महाभारत वेगळ होत.
हाच सूर्य हाच जयद्रथ म्हणत खेळणारे आमच्याकडे अनेक सूर्य रातोरात तळपले पण सत्त्य हेच आहे की हे सर्व सूर्य नेमक्या वेळी दगा देतात अन ढगाआड जातात, तळपतो तो एकच "जयसूर्या".
सचिन, द्रविड, गान्गुली यान्च्या गुणवत्तेवर किव्वा मेहेनतीवर किव्वा अनुभवार शन्का घेणे म्हणजे भरल्या विहीरीत किती पाणी आहे याची खात्री करायला उडी मारून बघण्या सारखे आहे पण अलिकडे या विहीरीन्तून एक बादलीभरही पाणी निघत नाही हा दोष रहाट गाडग्याचा आहे का आमच्या कमकुवत दृष्टीचा? जगातल्या प्रचन्ड दुथडी भरून वाहणार्‍या ponting, Lara, Gilchrist, Gibbs इत्यादी धबधब्यान्पूढे या झर्‍यान्ना आम्ही विहीर समजून बसलो का हे आम्हालाच ठावूक. Donald, Brett Lee, McGrtah यानी असन्ख्य वेळा त्यान्च्या तुफ़ान वेगावर अन स्विन्ग वर या सर्व झर्‍याना किती वेळा आटवलय ते आम्ही सोयीसकर रीत्या विसरलो कारण कुणितरी युवराज, धोनी झालाच तर सेहवाग अधून मधून त्या पाण्याची कमतरता भरून काढत होते. पण विहीरीच पाणी आटलय हे रोज पाणवठ्यावर पाणी भरणार्‍या म्हातारीलाही कळत अन मग ती एकीकडे पाणी साठवून ठेवते तर दुसरीकडे नविन विहीरीच्या शोधात लागते. bcci च्या म्हातार्‍याना इतकही कळत नसेल तर त्यान्ची अक्कल पाणि भरायला गेली आहे एव्हडच आपण म्हणू शकतो.


प्रतीस्पर्ध्याच्या कानाजवळून बन्दूकीच्या गोळीगत सू सू करत जाणारे चेन्डू टाकणारे हात आपल्या गोन्दाजान्चे नसणारेत (देवाने तस शरीर अन हवा भारतापासून दूर ठेवलीये), समोरून भन्नाट वेगाने येणार्या चेन्डूला हेल्मेट न घालता अन न घाबरता चिन्गम चघळत उद्दामपणे फ़ोडणारे रिचर्ड्स, कालीस, हेडन भारतात पैदा होणार नाहीयेत (झालेच तर bollywood मधे मुकेश रीशी सारख्या बाहुबल्लीना ते complex देण्यात आयुष्य घालवतील.). आईच्या मान्डीवर झट्पट कुशी बदलणार्‍या बाळागत कुठल्याही मैदानावर चेन्डूवर झडप घालणारे Jonty Rhodes किव्वा चपळ महानामा सारखे क्षेत्ररक्षक आमच्या मातीत पैदा होणार नाहीयेत. एका हातावर कधिही सामना जिन्कून देणारे भरवशाचे अष्टपैलू खेळाडू घडवणारे कारखाने अजून तरी आपल्याकडे उभे राहिलेले नाहीत. हे सर्व माहित असताना ज्यान्च्याकडे शतकानुशतके या गोष्टी नैसर्गीकरीत्या उपलब्ध आहेत त्याना हरवून विश्वचषक जिन्कण्याच स्वप्न कुणि पहात असेल तर त्याला मूर्छा येण्या आधीच डोळ्यात अन्जन घालायला हव. बान्गला देशने तेच केलय म्हणून त्यान्चे अनेक आभार.

वयापरत्वे शरीराच्या हालचाली, reflexes , दम कमी होतो, प्रत्त्येक खेळाडू या स्थितीतून जात असतो अन त्या टप्प्यावर येवून पोचत असतो. फ़ेकलेल्या तुकड्यावर जगायच का शक्ती कमी होते तेव्हा युक्ती, अनुभव अन instincts च्या बळावर शिकार करायची हे सिहाने ठरवायच असत. आमचे शेर घायाळ अन म्हातारे आहेत पण ते शेर आहेत असे आम्ही मानत असू. अरविन्दा डिसिल्वा नावाचा असाच एक सिव्ह शेवटपर्यन्त डरकाळ्या फ़ोडूनच निवृत्त झाला होता. आमच्या सिहानी त्याच्याकडून बरेच काही शिकण्या सारखे आहे.

आकडे, stats प्रार्थना, पाठीम्बा या बळावर सामने अन चषक जिन्कता आले असते तर प्रत्त्येक स्पर्धा अन चषक आम्ही जिन्कले असते कारण करोडोन्च्या लोकसन्ख्येला कोट्यावधी देव देवता आहेत. पण जोपर्यन्त माणसाला डोक्यावर घेवून भगवान म्हणून नाचवायचे अवडम्बर आम्ही बन्द करत नाही तोपर्यन्त बहुतेक खुद्द ब्रह्मा विष्णु महेश अवतरले तरी काही फ़रक पडेल असे वाटत नाही. त्यानाही बहुदा जुगार, सट्टेबाज, बुकीज अन sponsors यान्च्या कचाट्यातून जावे लागेल अन त्यातूनही सुटलेच तर कोण त्यान्चा "गेम" करेल याची शाश्वती नाही.

पदलालित्त्य, body balance , एकाग्रता, fine adjustments या गोष्टी ज्यान्च्या खेळात कायम टिकले ते महान ठरले. सर विवियन रिचर्ड्स, क्लाईव लोयीड, गूच, ऍलन बॉर्डर, गावसकर हे आम्ही पाहिलेले महान खेळाडू. त्या आधीच्या दशकातले महान Sir Sobers, Bradman , वगैरे ऐकलेले अन वाचलेले. शक्ती अन युक्ती योग्य वेळी वापरून प्रतिस्पर्ध्यावर मात करणारे असे खेळाडू महान ठरले. पण अलिकडे पाट्या खेळ्पट्ट्यान्वर गुडघ्यापेक्षाही वर न उसळलेल्या चेन्डून्वर अनेक विक्रम करणारे, शतके ठोकणारे आमचे खेळाडू आम्हाला भगवान झाले. मग south africa, australia, west indies च्या दौर्‍यान्वर याच देवतानी कधी डोक्यावर, कधी खान्द्यावर, कधी पाठीवर चेन्डू झेलत camera समोर डोळे मिचकावले तेव्हाही आमच्या डोळ्यान्वरची झापड आम्ही तशीच ठेवली? अन्धश्रध्धा म्हणतात ती याला. या क्षेत्रात अन्ध्श्रध्धा निर्मूलन समितीला करण्यासारखे बरेच काही आहे. मेधा पाटकर अजून यासाठी उपोषणाला कशा बसल्या नाहीत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. निदान तो तरी आपला प्रान्त नव्हे हे बायीना कळले असावे. लोक म्हणतात भारतात क्रिकेट हा धर्म आहे. अजीबात नाही धर्माच्या नावाखाली भारतात सरकार पडते, बदलते तसे अजून क्रिकेट च्या बाबतीत झालेले नाही. तूर्तास तरी बिचारे वुल्मर पडले. अजून कुठे किती पडझड होते ते बघायचे.

अशा मूळात कमकुवत सन्घाला Wolrd Cup favorites बनवून आमच्या गळी उतरवायचे काम ज्यानी केले त्यान्चे पायच धरायला हवेत.

खर तर 80-90 मधेही क्रिकेट ला glamor नव्हत अस नाही पण निदान कमरेच वस्त्र कमरेलाच होत. डॉलरमिया अन पैसा क्रिकेट मधे शिरला अन कमरेच सोडून आम्ही डोक्याला कधी बान्धल कळलच नाही. एका खेळीवर अनेक करोडो उधळले गेले अन रातोरात धोनी, रैना, सेहवाग, नेहरा, उदयास आले. commom sense जिथे सम्पतो तिथे "दूरकी सोच" वगैरे बद्दल चिन्ता करणारे मूर्ख ठरतात. परकीय कोचना बोलावून घरतील महान खेळाडून्ना मूर्खात काढणार्‍या bcci ने हेच दाखवून दिलय. कोकणात अम्ब्याची बाग फ़ुलवायची तर अरबाला बोलावून उपयोग नाही तिथे लागतात त्या कुळातले त्या जातीचे. दुर्दैव इतकच की हे कळायला फ़ार उशीर झालाय, अम्ब्याचा मोहोरही झडलाय अन आता season ही सम्पलाय. एक करता येईल, नविन बियाण रुजून झाडाला फ़ळ येईपर्यन्त तूर्तास उरलेल्या एक दोन हापूस च्या बळावर कलम लावा.

जाता जाता :
1. poetic justice च इतक सुन्दर उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही. ज्या बर्म्युडाला आपण धोबीघाटावर नेवून धुतल अन वाळत टाकला आज त्यान्च्याच हातात आपल्या सन्घाच दैव.
2. बान्गलादेशची घुसखोरी खरोखरच दाराशी येवून ठेपली आहे. वेळीच इलाज केला नाही तर घर बुडणार निश्चीत.
3. श्रीलन्केच्या सिहान्कडे "मुरलीधर" आहे हे युध्धातील इतर सर्व भीम, अर्जून, दूर्योधनानी लक्षात ठेवावे. हसत हसत गळा कापण्याची sorry दुसर्‍याचा गेम करण्याची मुरलीधराची कला हजार वर्शे जुनी आहे.
4. bermuda अन बान्गलादेश यान्च्यातील काट्याची टक्कर झाल्यावर कैलाश खेर ने "काटा रुते कुणाला आक्रन्दतात कोणी" हे गाणे आमच्या सन्घाचे मनोबळ वाढवण्यासाठी गावे यासाठी अनेक sms करायची माझी तयारी आहे.
5. क्रिकेट चा खेळ बन्द करून सर्व खेळाडून्चे धन (मानधन ची द्वीरूक्ती टाळली आहे)जप्त केले (ज्यात match fees, contracts, sponsorships, etc आले) तर निदान महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यान्चे कर्ज माफ़ करून त्याना वरून अनुदान दिले तरी तिजोरीत पैसे शिल्लक रहातील. कदाचीत असे प्रायश्चित्त घेतले तर सन्घाचे, bcci चे हे घोर पाप धुवून निघेल.
6. सध्ध्या भारतीय राजकारणात कुठलाही मह्त्वाचा विषय नसल्याने भारतीय सन्घाची हार हा विषय शून्य प्रहरात चर्चेस घेतला जावा.
7. या सर्व धामधूमित राखी कशी मागे राहील? "क्रेझी किया रे" च्या तालावर तीचे एखादे "गेम किया रे" असे item song idiot box वर झळकू द्या.
8. ईश्वर वूल्मर यान्च्या आत्म्यास शान्ती देवो. खेळाचा हा गळफ़ास सर्वानी लक्षात ठेवावा.
8. या सर्वाच्या मूळाशी (कारणिभूत?)घट्ट असलेल्या तुम्हा आम्हा सर्व क्रिकेट प्रेमी साठी : Yes! Cricket is a funny "Game". So watch it ONLY for fun..

Asami
Sunday, March 25, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावना पोचल्या पण लेख गंडलाय. media पासून players पर्यंत सगळ्यांना जबाबदार धरतोयस आणी defend पण करतोयस :-)

Yog
Sunday, March 25, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाळा धन्य आहे! Defend करण्यासारख काही शिल्लक आहे का? :-)

Jayavi
Monday, March 26, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ऐकलंय की भारत आणि पाकीस्तानच्या टीमला डोकं वर काढू देता येऊ नये हिच चॅपेल आणि वूल्मर ची कामगिरी होती आणि त्यांनी ती व्य्वस्थित बजावली.

Rajankul
Monday, March 26, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ऐकलंय की भारत आणि पाकीस्तानच्या टीमला डोकं वर काढू देता येऊ नये हिच चॅपेल आणि वूल्मर ची कामगिरी होती आणि त्यां>>>. जयावीबाई शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी.
तुमची मुक्ताफ़ळे छान आहेत ह.
आख्खा भारत आणि विद्वान क्रिकेटपटु यांची बुध्धी घास खायला गेलीली आहे का? जरा स्पष्ट करुन सांगा की आम्हालाही कळेल.


Jayavi
Monday, March 26, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्ताफ़ळं..... हं! हे मी म्हटलेलं नाहीये रे राजन..... अरे अशी पण गमतीदार विधानं ऐकायला मिळतात आजकाल... त्यातलंच एक टाकलंय इतकंच. बाकी भारतीय लोक आणि क्रिकेट खेळणारे , बघणारे ह्यांच्या बुद्धीबद्दल काहीही बोलायची माझी पात्रता नाहीये.
कालतर असंही ऐकलंय की ह्या क्रिकेटीयर्स च्या डुप्लिकेट ना पण मारलं म्हणे लोकांनी....:-)

Saavat
Monday, March 26, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठतरी वाचल की भारत worldcup च्या बाहेर गेला, कारण इंदिरा गांधी....?

बांगलादेश इंदिरा गांधी मुळे बनला! बघा,म्हणजे planning कधी पासून चालू झाले ते!


Manya2804
Wednesday, March 28, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याही पुढचं म्हणजे हनुमानाने लंका पूर्णपणे जाळली नाही म्हणून तो पण भारताच्या पराभवाला जबाबदार आहे.....

Patilchintaman
Tuesday, April 03, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो देशी असो अगर विदेशी, कोच पाहीजे कशाला?
तुम्ही तर आधीच शिकलेले क्रिकेटर असताना मन्ग नव्याने कोणी तुम्हला कशाला कोचींग करायला पाहीजे? हात तुमच्या.........





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators