|
Arch
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:11 pm: |
|
|
फ़ारच छान. दोघांच्या विचारांच सामर्थ्य खूपच उत्कृष्टपणे उतरवल आहे.
|
Storvi
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:31 pm: |
|
|
>>जगातल्या सगळ्या आई-वडिलांचं हेच एक काम एक कृष्ण द्यायचा परत या जगाला. आपला म्हणून वाढवायचा आणि जगाचा म्हणून परत द्यायचा. मग गोकूळात राहिला काय, मथुरेत राहिला काय, आपलाच की तो!" >>सहीच.. मस्तं हे सगळ्यांना कळले तर?
|
Madhura
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:00 pm: |
|
|
दाद , एकदम सरस कथा. दाद द्यावी अशी. लिहित रहा. यापुढेही तुझ्या कथा वाचायला मिळू दे आम्हाला. .
|
Manuswini
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:52 pm: |
|
|
मला ही गोष्ट खुप आवडली. खरे तर सर्वसामन्य माणुस हा सतत कुठल्यांना कुठल्या insecurity मध्ये वावरत असतो.... आणी ही insecurity कुठल्या ही रूपात असते त्याच्यासाठी जसे नोकरी, धन, मुले, power , desire to control वगैरे वगैरे. म्हनूनच हे cycle चालते जवळपास. जे काही होते त्याचा base insecurity असते. उदाहरण, मुले मोठी झाली ती आता सोडून जाणार, किंवा ती आपल्या ताब्यात नाही रहणार वगैरे वगैरे अनेक. अश्या अनेक insecurities ना कसे face करावे हेच दाखवते ही कथा. being optimist and lets fact it हा Attitude शेवटी तीने ठेवणे ही साधी गोष्ट नाही एका आईला. कोण देवु शकते का सोडु शकते आपले बाळ असे सहजासहजी एवढी detachment ठेवुन कोणी राहु शकत नाही बहुधा. मन हे मोहाचे जंजाळ असे मी कुठेतरी वचले होते. सगळ्यांना कळु शकते पण वळु शकत नाही बहुधा. हे माझे मत आहे
|
Daad
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:14 pm: |
|
|
सगळ्या सगळ्यांचे आभार. कुणी आपलं वाचून, त्यावर दोन शब्द लिहून काही परत सांगण्याचे कष्टं घेतय, ह्याचं मोल माझ्यासारख्या नव्यानं लिहिणारीला काय आहे, ते "जावे त्याच्या वंशा...."! असो... माझ्याच लिखाणावर माझेच (अजून) दोन शब्द- ह्या "कथेला" कथा बीज आहे आणि मनात आणलं तर फोफाट लिहिता येईल असं बीज. मुळात उद्देश आई-वडिलांची घालमेल दाखवण्याचा आहे. त्यांचे प्रश्न, उलट सुलट विचार, स्वत:ला सावरण्यासाठी केलेली धडपड कुठेतरी शब्दात पकडण्याचा प्रयत्न. मनुस्विनी, तुझं अगदी अगदी बरोबर आहे. कुणीच आईवडील " in their right mind " आपलं मूल detach करू शकत नाहीत. मग पाखरासारख्या उडू पहाणार्या मुलांसाठी आपलं प्रेम पंख व्हायचं की साखळी? तर, पंखच! मग detachment आलीच. ती "सहज" करण्यासाठी स्वत:ची घातलेली समजूत म्हणजे "कृष्णाचं" उदाहरण. देवकीने त्याला यशोदेला "दिलाच", यशोदेनेही त्याला मथूरेत नेण्यासाठी "दिलाच". एक समर्थ "माणूस" म्हणून जगाला आपला(इथे आपला हे महत्वाचं ) मुलगा "दिला". एकदा "आपला" म्हटल्यावर आपल्याजवळ राहिला काय किंवा..... त्या दोघींना कोणत्या उदाहरणाचा आधार होता माहीत नाही..... आपल्याला मात्र त्यांचा आहे! (दोन म्हणता म्हणता दोनशे शब्द झाले की...) परत एकदा thanks !
|
Meenu
| |
| Friday, March 30, 2007 - 4:59 am: |
|
|
दाद तुझ्या कथेला दाद द्यायची राहुन कशी गेली ..? मस्त कथा लिहीलीस .. वेगळा विषय छान पद्धतीनी सादर केलेला ..
|
शलाक मस्त एकदम सही उतरलीय कथा
|
आवडली!
|
Saee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 9:54 am: |
|
|
कथा तर उत्कृष्ट आहेच, पण त्याखालची तुझी दोन शब्दांची टिप्पणी त्याहुन लोभस आहे! पहिल्याच जबरदस्त प्रयत्नाबद्दल दाद द्यावी तितकी थोडीच.
|
Daad
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:54 pm: |
|
|
परत एकदा सगळ्यांचे आभार. उभारी वाटते प्रतिक्रिया वाचल्यावर, परत काही लिहिण्यासाठी.
|
Mvrushali
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:13 pm: |
|
|
अतिशय सुरेख आणि मनस्वी लिहिलं आहेस.
|
Bee
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:53 am: |
|
|
उत्तम आई-वडील होण्याचे का क्लासेस असतात? यशोदा कुणाकडे शिकली? सोप्पं नाहीये हे सगळं.. दाद, डोळे पाणावलेत.. माहिती नव्हतं तुझ्यात एक उत्तम लेखिका दडली आहे..
|
Meghdhara
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:40 am: |
|
|
शलाका, जगातल्या सगळ्या आई बाबांचं.. अगदी. सुंदरच.
|
Srk
| |
| Monday, April 09, 2007 - 4:53 am: |
|
|
दाद घळाघळा रडवण्यापेक्षा डोळे भरुन येणं आणि कथा संपताना पॉझिटीव्ह विचार मनात रेंगाळत रहातील असं लिहीणं कठिण आहे. तुला ते छान जमलय.
|
Fulpari
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:25 am: |
|
|
शलाका, फारच छान ग. मनाला अगदी भिडली तुझी कथा
|
Suniti_in
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:14 pm: |
|
|
कथा फार सुरेख आहे दाद. शेवट छान मांडला आहे.
|
Mankya
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:03 pm: |
|
|
शलाका .. अप्रतिम झालीये कथा अन त्यावरचे दोन शब्द ! किती अन काय काय शब्दात पकडलस गं ! कडकडून भेटली ही कथा मनाला ! माणिक !
|
Daad! Really a nice story ..
|
Thrida
| |
| Friday, April 13, 2007 - 9:22 am: |
|
|
शलाका, खुपच सुन्दर कथा. जगाला एक क्रुश्न द्यायचा हा विचारच खुप सुन्दर आहे. तुज़्या नविन कथेची वाट बघेन.
|
Aaftaab
| |
| Friday, April 13, 2007 - 9:55 am: |
|
|
शलाका!!! शब्दच नाहियेत.. अगदी अप्रतिम आहे ही तुझी कथा.. मला वाचताना भरूनही आलं आणि तू सहज शब्दांत लिहिलेलं ज्ञान पटलंही.. तुझ्या पुढच्या अशाच उत्कट कथेसाठी शुभेच्छा!! -रवि
|
|
|