Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

Desh_ks
Wednesday, March 28, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आजच्या युगात"

हा तर आहेच ना सल
की अयोग्य त्याचाच असतो मान
बुद्धी पडते गहाण आणि बेदखल विवेक
आजच्या युगाचा मंत्र म्हणजे
ऐश्वर्याला अभिषेक!



Mankya
Wednesday, March 28, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश्वर्याला अभिषेक ... शब्दश्लेष मस्तच साधलाय !
आवडलं रे !

माणिक !


Desh_ks
Wednesday, March 28, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिकराव,

अहो त्यात "सल, मान आणि विवेक (बेदखल) ही आहेत"

पाहा संदर्भ म्हणजे गंमत वाटेल. आणि थोडीशी गंमत हाच तर हेतु आहे.



Mankya
Wednesday, March 28, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Desh_ks... हो रे मित्रा ! लक्षातच नाही आलं आपण काहि च्या काहि कविता वाचतोय ... सवय ... दुसरं काय !
छान जमली रे मित्रा !

माणिक !


Sanjuda
Friday, April 06, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाटून आले आसमंत
रडू लागले सारे संत
अवघ्या महाराष्ट्राची एकच खंत
आली कुठून ही राखी सावंत


Meghdhara
Friday, April 06, 2007 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजुदा खरं तर..

अवघ्या महाराष्ट्राची एकच खंत
आलो कुठपर्यंत?
तर राखी सावंत.
:-)

मेघा


Visunaik
Monday, April 16, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश्वर्याला अभिषेक! - काय खतर्नाक काव्य आहे! डोके!!!

Devdattag
Tuesday, April 17, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटलं नव्हतं
एवढ्याश्या साध्या चुकी मुळे
बदलतील काव्याचे अर्थ
कुणी येइल विचारत मला
शेकडो प्रश्नांची उत्तरं
आत्ता पुरती समजूत घातलीये म्हणा..
..
तसं हे ही कुठे वाटलं होतं
की कुणीतरी असेल वाचणारं
मी लिहिलेल आणि मी ही न वाचलेलं
आता, मागली सारी प्रुफं तपासायला हवीत


Zakasrao
Wednesday, April 18, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आली कुठून ही राखी सावंत >>>>>
हि चारोळी तुमची आहे का? कारण ही मी ब-याच दिवसांपुर्वी वाचली आहे मेल वर ( ते राखी मिका प्रकरण झाल्यानंतर २ दिवसात).

Devdattag
Wednesday, April 18, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक होता काऊ, एक होती चिउ
काऊच घर होतं शेणाचं
चिऊच घर होतं मेणाचं
एकदा काय झालं.. खूप पाऊस आला
आणि मोठ्ठा पूर आला
त्यात काऊचं घर गेलं वाहून
काऊ मग गेला चिउ कडे मदत मागायला
चिऊ म्हणाली थांब..
आपण आधी यावर विचार करू
एवढा पाऊस कशामुळे झाला
'ग्लोबल वॉर्मिंग' मुळे तर नसेल?
तसं असेल तर माझं घर सुद्धा वितळून जाईल
मी आधी पक्के घर बांधते
आणि मग ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय शोधते
आणि तुला मदत करते

एक होता काऊ, एक होती चिउ
काऊच घर होतं शेणाचं
चिऊच घर होतं दगडाचं


Sonchafa
Wednesday, April 18, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रे देवा आवडली

Badbadi
Wednesday, April 18, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा :-) बंगळूर मध्ये पण इतकं उकडतंय का रे?? कि कार्यबाहुल्य कमी झालंय??

Devdattag
Wednesday, April 18, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे..:-).. कळतात बरं का हे टोमणे.. जरा कुठे कामाच्या व्यापातून वेळ मिळाला आणि काही(च्या काही) लिहावं म्हंटलं की लगेच सुरु टोमणे मारणं..:-(:-)

Jo_s
Wednesday, April 18, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा दोन्ही छान आहेत, दुसरी जास्त चांगली वाटली




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators