|
Jo_s
| |
| Monday, April 09, 2007 - 5:41 am: |
|
|
शलाका मस्तच जमल्ये ही गझल. मिटर बद्दल जाणकार बोलतीलच, पण कल्पना सुन्दरच आहेत
|
हज़ल: कार्यशाळेच्या सुमारास सुचलेली ऋतू येत होते ऋतू जात होते कवी आपले मुक्तछंदात होते कुणी आणली ही इथे कार्यशाळा गुरू कोणत्या हाय फंदात होते म्हणे वृत्त मात्रा उगाळा नव्याने जरी खोड सुद्धा न हातात होते मला काय मी शेर पाडून घेतो जरी मूल्य होणार शून्यात होते नसे रे गज़ल प्रांत हा देवदत्ता तुझ्या सारख्यांची इथे मात होते
|
म्हणे वृत्त मात्रा उगाळा नव्याने>>> जरी खोड सुद्धा न हातात होते>>> देवा सहीच रे
|
ऋतू येत होते ऋतू जात होते कवी आपले मुक्तछंदात होते <<<<<<<< बेस्ट...
|
Psg
| |
| Tuesday, April 10, 2007 - 12:01 pm: |
|
|
देवा ही हजल नाही, व्यथित, धडपडणर्या, तरिही मीटरमधे न बसवू शकलेल्या गजलकाराची गजल वाटत आहे मस्तच!
|
Chinnu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:15 pm: |
|
|
मला काय मी शेर पाडून घेतो! खर की काय देवा!
|
Pulasti
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:58 pm: |
|
|
देवा! सणसणीत आहे ही हझल!! मला काय मी शेर पाडून घेतो जरी मूल्य होणार शून्यात होते वा! वा!! -- पुलस्ति.
|
Daad
| |
| Tuesday, April 10, 2007 - 10:49 pm: |
|
|
देवा, मस्तच आहे. म्हणे वृत्त मात्रा.... जरी खोडसुद्धा... बेफाम!! कुणी जाणकार माझ्या वरल्या गज़लच्या मीटरसंबंधी सांगतील का? काही चुकलय का? please ?
|
मला काय मी शेर पाडून घेतो जरी मूल्य होणार शून्यात होते हाहाहाहाहा.. काय बिनधास्त दाद.... मी काही जाणकार नाही तरीही मीटरसंबधी लिहितो.. मीटर बरोबर आहे. 'गालगागा' चार वेळा. मक्त्यामध्ये उला मिसर्-यात आणि मतल्यामध्ये सानी मिस-यात यतिभंग आहे असे मला वाटते. म्हणजे 'गालगागा*२' झाल्यावर थांबायला हवे आणि मग पुढचे 'गालगागा*२' यायला हवेय. --उदाहरण 'गालगागा*२' | 'गालगागा*२' १)जीवना रे, आंधळा हो | ऊन खेळायास ये तू २)आज आनंदात मी, मृ |त्यूस माझा ठाव आहे . इथे यति सांभाळता आला नाही. जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच
|
Me_anand
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:26 am: |
|
|
मित्रान्नो मला या कार्यशाळेची माहिती खुपच उशिरा कळली. त्यामुळे वेळेत भाग घेऊ शकलो नाही. माझा एक प्रयत्न इथे टाकत आहे... त्रुतू येत होते, त्रुतू जात होते जुने तेच गाणे, नवे गात होते फुलावीत गाणी जिथे माणसांची तिथे वासनांचे उरी श्वास होते लकाकून गेले क्षणी म्लान डोळे पुन्हा आसवांचे थवे त्यांत होते विषाने विषाला कशी मात द्यावी विषाचेच नाते जिथे आंत होते घुमावेत वारे तुझ्या वादळांचे तुझे शब्द तेव्हाच मौनात होते मुक्याने तरीही नवे बाळ ओठी नव्यानेच गाणे पुन्हा गात होते
|
Me_anand
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:50 am: |
|
|
नांतर सुचलेला एक शेर... मझ्य मते क्र. ३ वर टाकावा इथे स्वार्थसिध्दी उभा जन्म झाला इथे प्रेमही काय नि:स्वार्थ होते?
|
Chinnu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:49 pm: |
|
|
मी_आनंद गजल छान आहे. पण नंतरच्या शेरामुळे अलामत भंगेल का, मीटरपण गडबडेल ना? लकाकून गेले क्षणी म्लान डोळे पुन्हा आसवांचे थवे त्यांत होते हा शेर छान आहे. पु. ले. शु. दाद तुझ्या गजल बाबतीत मयुराला अनुमोदन. मलापण गडबड वाटली, म्हणुन पाहतांना.
|
Devdattag
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:15 am: |
|
|
धन्यवाद मंडळी.. शलाका गज़ल छान आहे.. आनंद प्रयत्न चांगलाय..
|
आनंद ... कल्पना छान आहेत आणि मीटर ही सांभाळलंय फक्त दोन ठिकाणी काफ़िया चुकला आहे . श्वास आणि तो नंतरचा निःस्वार्थ . आपल्याला ही गज़ल निभावण्यासाठी "त" कारांती शब्द हवे होते . बाकी उत्तम . शुभेच्छा . देवा .. सबमिट केलीस तेव्हा वाचलीच होती पण छानच आहे हज़ल शलाका .... माफ़ कर यार . वाचली होती बर्याच वेळा पण उशीर झाला लिहायला . दाखल्यावर का असेना आज माझे नाव आहे आज आनंदात मी, मृत्यूस माझा ठाव आहे वाह ! झकास आहे . मी उठवला हात, देण्या क्रांतिचा नारा कशाला? घ्या तुम्ही बोलून तुमच्या भाषणाला भाव आहे उठवला हिंदी वाटतं . मी घसा फाडून / गळा काढून देऊ वगैरे बघणार का ? क्रांति मधला ति र्हस्व करावा लागला हे जाता जाता खटकलंच . गाळते आभाळ आसू, अन भिजे माझे कलेवर भंगलेल्या काळजाने सोडलेला ठाव आहे चान्गली सुरुवात झालेला शेर सानी मिसर्यामुळे सपाट होतोय . बराच वेळ स्क्रीन कडे बघत बसलोय पण मला पर्याय सुचत नाहीये . सानी मिसरा बघच पुन्हा एकदा . वेस उघडी, ध्वस्त अंगण, मात्र जाग्या मसणवाटा पाळलेल्या श्वापदांनी राखलेला गाव आहे छान माणसा रे तू कशाला घालुनीया मान खाली तेच लुटती देव ज्यांचे भक्तिमार्गी नाव आहे उला मिसरा अस्पष्ट आहे . तू कशाला घालुनीया ("नि" हवं होतं) मान खाली ... काय ? हसतोस ? फिरतोय्स ? म्हणजे खजिल आहे हे कळतंय पण सुटसुटीत हवा होता माणसा रे तू उभा का वगैरे आणती सौभाग्य विकण्या, लेक बोली लाविती ते राखती जल चाखुनी वर, मालकाचा आव आहे हं ..... आज ती नाही नजर, अन काजळाचे म्यान नाही आजही पण गंधगोरा, खोल जपला घाव आहे) गंधगोरा अतिरिक्त वाटलं जीवना रे, आंधळा होऊन खेळायास ये तू आंधळ्या कोशिंबिरीचा मांडलेला डाव आहे छान .. मतला झकास , दोन शेर छान , एक हं ... आणि बाकींवर काम व्हायला हवं असं माझं प्रांजळ मत .. फोन होईल तेव्हा बोलूच
|
Daad
| |
| Thursday, April 12, 2007 - 11:00 pm: |
|
|
आनंद आवडली गज़ल. आसवांचे थवे विशेष आवडला शेर. वैभव, 'माफ कर' काय? कमाल करतोस. तुझ्या सगळ्या व्यापांमधून वेळ काढून आमचं बोट धरून "चाल चाल" म्हणतोयस. हे का थोडकं? तुझ्या सुचनांवर विचार चालू केलाय. सुधारित शेर इथेच पोस्टेन. ( thanks रे!)
|
Daad
| |
| Monday, April 16, 2007 - 12:48 am: |
|
|
वैभवने केलेल्या सुचनांवर विचार करून सुधारित गज़ल परत देते आहे. यावर अजून टिकाटिप्पणी झाल्यास, आपण ती offline घेऊ इथली जागा वाया जाऊ नये म्हणून. तो 'हं..' वाला शेर उडवलाच! दाखल्यावर का असेना आज माझे नाव आहे आज आनंदात मी, मृत्यूस माझा ठाव आहे मी घसा फोडून द्यावी घोषणा आधी कशाला घ्या तुम्ही बोलून तुमच्या भाषणाला भाव आहे गाळते आभाळ आसू, अन भिजे माझे कलेवर पेटण्याआधीच विझण्याचा चितेचा डाव आहे वेस उघडी, ध्वस्त अंगण, मात्र जाग्या मसणवाटा पाळलेल्या श्वापदांनी राखलेला गाव आहे माणसा रे तू नको घालूस खाली मान कारण, तेच लुटती देव ज्यांचे भक्तिमार्गी नाव आहे आज ती नाही नजर, अन काजळाचे म्यान नाही ठेवला ताजा, उराशी खोल जपला, घाव आहे जीवना रे, आंधळा होऊन खेळायास ये तू आंधळ्या कोशिंबिरीचा मांडलेला डाव आहे -- शलाका
|
गजलप्रेमीनो, ही लिन्क पहा http://www.sureshbhat.in/ !
|
Jo_s
| |
| Monday, April 16, 2007 - 6:16 am: |
|
|
देवा मस्तच आहेरे हजल. सुधीर
|
थँक्स सुधीर.. अजून एक ऋतू.. ऋतू येत होते ऋतू जात होते नवे का भिडू रोज खेळात होते? मला ओळखीचा न वाटे बगीचा फुलाच्या कशी मीच लक्षात होते? निवाले कधी नाहि पांथस्थ येथे कळे ना असे काय पाण्यात होते? झुगारून लज्जेस द्यावे जगाच्या असे खास त्या काय नावात होते? किती ओंजळीतून घ्यावे भरोनी? किती राहिले थेंब प्याल्यात होते? कुणी बोध शाब्दीक देऊन गेला कसे देव त्याच्याच नात्यात होते?
|
Chinnu
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:36 pm: |
|
|
किती ओंजळीतून घ्यावे भरोनी? किती राहिले थेंब प्याल्यात होते? कुणी बोध शाब्दीक देऊन गेला कसे देव त्याच्याच नात्यात होते? देवा वाह! क्या बात है! दिल खुष हो गया. शलाका हं वाला शेर का उडविलास? चांगला होता.
|
शलाका बाप रे! काय लिहिलं आहेस. माणसा रे.. अप्रतिम! मक्त्यापेक्षाही.. देव कुणी बोध शाब्दीक.. व्वा! हज़लमधे म्हणे वृत्त मात्रा.. माझ्यासाठी अगदी अगदी मेघा
|
|
|