Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दोन ओंडक्यांची होते... ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » दोन ओंडक्यांची होते... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 25, 200720 03-25-07  8:04 pm

Adm
Sunday, March 25, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually typing in Marathi on maayboli is bit complicated on as compared to Baraha.. Also as the size of the post increases the respose time increase on devnagari screen... And if we use baraha then font size gets messed up.. can any one suggest on this?

R_joshi
Monday, March 26, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी मॉडरेटरला सांगुन तर बघ. चुका दुरुस्त करुन मिळाल्या तर चांगलच आहे. नाहितर वाचताना नाहि लक्षात येत कधीकधी.

Suvikask
Tuesday, March 27, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनि आणी संघमित्रा,
सुविकासके असेच आहे ते... माझ्या आणी मुलाच्या नावाच्या आद्याक्षरात नवर्‍याला बसवला आहे..


Marhatmoli
Tuesday, March 27, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग लग्नानंतर दोघान्च्या वैचारिक आवडिनिवडिंमधला फ़रक स्पष्ट व्हायला लागला. अमित (स्निग्धा चा नवरा) हा सुखवस्तु कुटुंबात वाढलेला एकुलता एक मुलगा. मनाविरुध्ध झालेल काहि सहन करण्याचि त्याला सवय नव्हति. जशि कल्पना केलि होति तशि हि बायको नाहि म्हंटल्यावर त्याने ७-८ महिन्यांतच divorce च सुतोवाच केल. स्निग्धा साठि हा एक मोठा धक्का होता पण इतक्या सहजासहजि लग्न मोडण हे तिच्या संस्कारात बसणार नव्हत. तिने अमितशि जुळवुन घेण्याचे बरेच प्रयत्न केले (तसे आधिहि ति प्रयत्न करतच होति म्हणा), समुपदेशन घेण्याविषयि अमितच मन वळवण्याचा प्रयत्न केला पण अमितला हे लग्न टिकवण्याचि इछछाच नसल्याने त्याच्या कडुन या प्रयत्नांना काहि प्रतिसाद नव्हता. अमितच्या आइवडिलांना तिने मदत करण्याविषयि सुचवुन बघितल पण त्यानि हि 'आम्हि मध्ये पडलेल अमितला आवडणार नाहि' अस म्हणुन आपण काहिहि करणार नसल्याच स्पष्ट केल.

कुठ्ल्याच प्रयत्नाला यश येत नाहि म्हंटल्यावर स्निग्धा हताश झालि. अमितच्या वागण्यात काहि बदल नव्हताच. मग सहाजिकच भांडण वाढायला लागलित आणि एक दिवस अमितने स्निग्धावर पहिल्यांदा हात उगारला.

हे सगळ असह्य झाल्यामुळे स्निग्धा ने शेवटि तिच्या आइवडिलांना सगळ सांगितल. या सगळ्या प्रकाराचि काहिच कल्पना नसल्यामुळे सहजिकच त्यांना धक्का बसला. हा ताण सहन न झाल्यामुळे तिच्या बाबांना mild heart attack आला. त्यांच्या जिवाला धोका नव्हता, पण स्निग्धाच्या मुळच्या depression मध्ये 'आपल्यामुळेच हे सगळ झाल' या guilt चि भर पडलि.

तिचा अमितवरचा राग आतल्याआत धुमसत होता. अश्या मनस्थितित एक दिवस तिने 'काय वाटेल ते झाल तरि तुला divorce देणार नाहि' अस अमितला सांगितल. अर्थातच भांडण वाढलित आणि त्याच बरोबर तिचा निर्धारहि. या सगळ्याचा परिणाम अमितवरहि होत होताच. लग्नानंतरच्या दोन वर्षात हि त्याचि तिसरि नोकरि होति.


Dhoomshaan
Sunday, April 01, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते अश्या वेळी देऊन टाकायचा ना divorce!
i mean रोज रोज असं मरत बसण्यापेक्षा एकदा मेलेलं काय वाईट?
anyway, रश्मी, लिखाणातली improvement बघून बरं वाटलं

Manuswini
Sunday, April 01, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे स्निग्धा स्वःताला विसरतेय स्वःताचा जगण्याचा हक्क ती divorce न देण्यामागे विसरून गेलीय.

Marhatmoli
Tuesday, April 03, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत खोलवर कुठेतरि तुटल हे सगळ ऐकुन. नक्कि काय चुक आहे स्निग्धाचि? आणि तिचि जर नसेल तर मग नक्कि कोणाचि चुक हि?

खुप विचार करुनहि मला उत्तर मिळालि नाहित. दरम्यान स्निग्धाशि मैत्रि मात्र झालि. खुप गप्पा मारल्या तिच्याशि, तिच्या लग्नाविषयि मात्र काहि बोलायच धाडस झाल नाहि कधि मला. पण एकदा बोलण्याच्या ओघात ति म्हणुन गेलि, "जुइ लग्न कोणाशि करायच आणि कधि करायच हे निर्णय तु स्वत्: घे. म्हणजे पुढे काहि गणित चुकलिच तर मझ आयुष्य यापेक्शा वेगळ असु शकल असत अस तरि तुला वाटणार नाहि."

माझा दिल्लितला मुक्काम लवकरच संपला. एकमेकिंच्या touch मध्ये रहाण्याच नक्कि ठरवुन मी स्निग्धाचा निरोप घेतला. आज मागे वळुन बघताना वाटत 'दोन ओंडक्यांचि होते सागरात भेट...." या गीत रामायणातिल गाण्याप्रमाणे झालेलि स्निग्धाशि मैत्रि नक्किच माझ्या आयुष्याला वेगळ वळण देवुन गेलि.

मला थोडा संघर्ष करायला लागणार याचि कल्पना मला होतिच, पण तरिहि घरि गेले तेन्व्हा मला धक्काच बसला. ज्या विवाह मंडळाचे forms भरुन गेले होते त्या विवाह मड़अळातुन माझा photo बघुन कोणि वैद्य बाईंनि घरि phone केला होता, आणि कांदापोहे कार्यक्रम ठरवण्यासाठि आई-बाबा माझि वाटच बघत होते!

मी स्निग्धाबद्दल आई-बाबांना सांगितल आणि सोप नव्हत, पण मला हे 'निखिल वैद्य' च स्थळ बघायच नाहिये हे पण बाबांना सांगितल. ते अर्थातच त्याना पटल नाहि. 'तुला काय वाटत आम्हि काय असल काहि कधि ऐकल नाहिये याच्या आधि? सगळेच काहि असे नसतात, शिवाय हे लोक गावातच रहातात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चवकशि करता येइल' अस बरच काहितरि ते बोलत होते.


Dhoomshaan
Thursday, April 05, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाप्त?
का अजुन आहे????





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators