Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सांजवेळ

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » सांजवेळ « Previous Next »

R_joshi
Wednesday, March 14, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रयत्न पहिलाच आहे संभाळुन घ्या आणि मार्गदर्शन ही करा. :-)

सांजवेळ

सांजवेळ मधुला खुप आवडायची. अस्ताला जाणारा सुर्य जेव्हा स्वत:भोवती लाल शाल पांघरायचा, तेव्हा तो सुर्यास्त किती मोहक वाटायचा. त्या सुर्याबरोबर अनेक चिंताहि जणु अस्त पावायच्या. घरट्याकडे परत फिरणा-या पाखरांकडे पाहुन तिला मुलांची आठवण व्हायची आणि मग तिची गडबड सुरु व्हायची.

मधुच जीवन म्हणजे एकमार्गी झाल होते. या घराची सुनबाई होऊन ती घरी आली होती खरी पण जराशा नाराजिनच. तिचे हे...म्हणजे माधव तिला आवडला नव्हता अस नाहि पण माधवमध्ये तो लुक नाहि असे तिचे मत होते. पण आईवडिलांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिमंत तेवढि नव्हती.

माधव तसा दिसायला बरा होता,पण त्याच्या काहिशा अबोल स्वभावामुळे चारचौघात तो जरा बिचारा असल्यासारखाच वाटायाचा. मधुला बघताक्षणि त्याने पसंत केले आणि लग्नानंतर तिच्यासाठी स्वत:ला बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण नाही जमल त्याल त्यात तो काय करणार? आयुष्याचा जोडिदार म्हणुन स्विकारल्यावर आता कशाची रुखरुख.

"आई आम्ही आलो." स्वानंदचा हसरा आवाज कानी पडताच मधु आपल्या विचारातुन बाहेर पडली. तोपर्यंत स्वानंदने मधुच्या कुशीत बैठक मारली होती.

"मधु आज जरा ऊशीर झाला खरा. काळजी करत नव्हतिस ना " माधव


R_joshi
Thursday, March 15, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधवच अस लाघवी बोलणच मधुला त्याच्या प्रेमात पाडत असे.
"अग,त्याच काय झाल आज प्रशांत भेटला होता. काहि कामानिमित आलाय परत, काम झाल कि लगेच जाणार म्हणत होता. तुलाहि विचारत होता."
प्रशांतच नाव ऐकताच मधु परत एकदा विचारमग्न झाली.

प्रशांत.... काय नव्हत त्याच्यात. श्रीमंती, रुबाब सर्वच होत त्याच्याकडे. त्याच्याकडे नव्हता तो गर्व. त्यामुळेच तर माधव आणि प्रशांतमध्ये दिलखुलास मैत्री होती. स्वत:च्या बुद्धिकौशल्यावर त्याने वडलांच्या बिझनेसला भरभराटिचे दिवस आणले होते. मग त्याच्यावर आपला जीव जडला, यात काय चुकले आपले?

मधुला विचारमग्न बघुन माधव अस्वस्थ झाला.
"सॉरी...... माझ चुकलच. ..प्रशांतविषयी.... मी उगाचच बोललो. माझ्यामुळे तुझ मन दुखावल गेल ना. सॉरी." माधव अडखळत बोलला.
माधवच्या याबोलण्यावर मधु भानावर आली. किती मोठा फरक या दोघांमध्ये. माधव स्वत:पेक्षा एतरांची मने जपणारा आणि प्रशांत........ त्याल बहुदा हे ठाऊकच नाहि, एतरांहि मने असतात.

"माधव...." मधुचा आवाज ऐकताच माधव अजुनच वरमला.
"माधव, खर म्हणजे तुमची माफि मी मागायला हवी. आणि तुम्हि मला झिडकारुन द्यायला हवे."
"मधु असे का बोलतेस? तुला त्रास व्हावा म्हणुन मी प्रशांतचाविषय काढला नव्हता."
"माधव नेहमी माझाच विचार का म्हणुन. लग्न झाल्या दिवसापासुन मी तुम्हाला किती त्रास दिलाय."
"मधु..."
"माधव, आजच्या या सांजवेळेची बहुदा मी वाट बघत होते. आज बोलु द्या मला....." मधुच्या या बोलांनी माधवहि स्तब्ध झाला.


Maku
Thursday, March 15, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

changnali katha ahe good keep it up !!!

Jhuluuk
Friday, March 16, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय रुपल,
good start..
इतरांची हे असे itaraa.nchii लिही.


Varadakanitkar
Friday, March 16, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे गोष्ट..पुढे येऊ द्या ना...

Visoba_khechar
Saturday, March 17, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>स्वत:च्या बुद्धिकौशल्यावर त्याने वडलांच्या बिझनेसला भरभराटिचे दिवस आणले होते. मग त्याच्यावर आपला जीव जडला, यात काय चुकले आपले?

धत तेरीकी! म्हणजे मधुचं आणि प्रशान्तचं आधीचं लफडं होतं की काय?! ;) च्यामारी वाटलंच मला!

R Joshi,

आपण चांगलं लिहिता. पहिलाच प्रयत्न असला तरी चांगला आहे. पण आपल्याला एक अनाहूत आणि फुकटचा सल्ला द्यावासा वाटतो!

आपण 'माहेर', 'ललना', 'कथाश्री', 'माझं घर' यासारखी मासिकं फार नका वाचत जाऊ हो!

कथा लिहायची म्हणून लिहू नका. जे काय लिहायचं ते स्वान्तसुखाय लिहा. आपल्या आजुबाजूला असंख्य घटना घडत असतात. चांगल्या लेखनाचं बीज हे त्यातच कुठेतरी सापडतं/असतं! लेखनाचा मूळ स्त्रोत किंवा गाभा आपल्या आजुबाजूलाच कुठेतरी असतो. तो शब्दात पकडून मांडता आला पाहिजे, आणि अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात कागदावर उतरला पाहिजे. म्हणजे मग आपलं लेखन अधिकाधिक परिणामकारक होईल, असं मला वाटतं!

असो! पुढील लेखनाकरता मनापासून शुभेच्छा!

आपला,
(वाचक) तात्या.

Read me at :
http://tatya7.blogspot.com/

R_joshi
Saturday, March 17, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. पहिला प्रयत्न आहे तेव्हा जरा संभाळुन घ्या. आणि हो आपण नमुद केलेल्या मासिकांमधिल एकहि मासिक मी वाचलेले नाहि.
मकु, झुळुक, वरद धन्यवाद:-)


R_joshi
Saturday, March 17, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळापुर्वीची शांतता यालाच म्हणत असावेत, असे क्षणभर का होईना माधवला वाटुन गेले. स्वत:ला सावरत तो मधुला काहि बोलणार एवढ्यात मधुचा धीरगंभिर आवाज त्याच्या कानावर पडला.
"माधव, मी हे तुला यापुर्वीच सांगायला हवे होते. पण ते कसे सांगावे हे मला कळत नव्हते. लग्नानंतर माझ्या नकळत मी तुझ्यात गुंतत गेले. तु माझ्यापासुन दुर जाशिल ह्या भीतिने मला हे सत्य सांगण्यापासुन परावर्तित केले."
"मधु अग एकदाच सांगुन टाक." माधवचा प्रथमच चढलेला आवाज ऐकुन मधु दचकली.
"हे बघ काहिहि ऐकुन घेण्याची तयारी मी केली आहे. माझा तोल ढासळण्याआधी सांगुन टाक."
"माधव, मी...आअणि.... मी आणि..."
"मधु बोलते आहेस का.... मला आत हे असह्य होतय कि मी जिच्यावर जीवापाड प्रेम केले अशा माझ्या माझ्या मधुच्या हातुन काहितरी चुक झाली आहे."
"माधव, मी प्रशांतला आपल्या लग्नाआधीपासुन ओळखत होते. आमची मैत्री कॉलेजपासुनची. प्रशांत मला मनोमन आवडायचा,पण हे त्याला सांगायची माझी कधी हिमंत झाली नाहि. मी त्याच्यात गुंतले आहे, हे प्रशांतने मात्र जाणले.

"मधु माझ्यात गुंतली आहेस हे खरे ना?" प्रशांतच्या या बोलांनी मधु मनोमन सुखावली.
"तुला कोणी सांगितल हे?" मधु
"तुझा चेहरा सगळ काहि सांगतो मला. खरच या मैत्रिला वेगळ नाव द्यायला माझी काहिच हरकत नाहि. आपल एकमेकांवर प्रेम आहे, मग भीति कशाचि बाळगायचि. आणि माझे नर्णय घ्यायला मी स्वतंत्र आहे."
"प्रशांत..... मला खरच आज खुप आनंद झालाय."

"तुम्हा दोघांच एकमेकांवर प्रेम होत तर माझ्याशी लग्न का मधु?" माधवच्या या प्रश्नाने मधु बानावर आली.
"आपल्याबाबतीत कोणती गोष्ट का होते,याच उतर आजवर कधी कोणालाही सापडले नाही,माधव. माझ्याबाबतित ते सर्व का घडले याचाच विचार मी करते.पण ऊत्तर सापडत नाहि."

"कॉलेजमध्ये अजुन कोणालाहि कळले नाहि म्हणुन, नाहितर एवढ्यात किती चर्चा झाली असति याविषयावर नाहि प्रशांत"
"तु घाबरतेस वाटत?"प्रशांत
"तस नाहि. जोपरयंत सगळ काहि पाक्क ठरत नाहि,तोपर्यंत नकोच कोणाला कळायला.एवढच वाटत."
"किती भोळि आहेसग मधु तु." प्रशांत


Adm
Sunday, March 18, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, चित्त्पावन ग्रूप आणि मनोगतावर झेंडे फडकवून झाल्यावर तात्या आता इथे पोचले वाटतं... :-)

r_joshi good one.. keep writing..


Visoba_khechar
Sunday, March 18, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Adm,

>>अरे वा, चित्त्पावन ग्रूप आणि मनोगतावर झेंडे फडकवून झाल्यावर तात्या आता इथे पोचले वाटतं...

हो, चित्तपावन ग्रुपवर तर भांडणं, गळ्यातगळे रोजचेच असतात. तिथे आम्ही जाऊन-येऊन असतोच.

मनोगताचं म्हणशील तर तेथील हल्लीचं प्रशासकीय सुतकी धोरण आम्हास पसंत नाही. कुठल्याही लेखाला किंवा प्रतिसादाला असलेली प्रशासकीय अनुमती (moderation) आम्हास जाचक वाटली, वाटते, आणि नेहमीच वाटत राहील! म्हणून आम्ही आमची वळकटी,पथारी मनोगतवरून हलवली!

आता काही काळ येथे मायबोलीवर निवांतपणे घालवायचा विचार आहे. येथील प्रशासनाच्या ध्येय,धोरणात अजून तरी आमचा जीव गुदमरला जात नसून उलट लिहिण्यास थोडं मुक्त आणि स्वतंत्र वातावरण आहे. मुख्य म्हणजे येथे "प्रशासकीय अनुमती" ची मुजोरी नसल्यामुळे आम्ही खुश आहोत. सबब, सध्या आम्ही आमचा मुक्काम, डेरा, पथारी, मायबोलीवरच टाकली आहे. जोपर्यंत येथील दाणापाणी आमच्या भाग्यात असेल तोपर्यंत येथे आनंदाने राहू!

आपला,
(मायबोलीकर!) तात्या अभ्यंकर.

Dhoomshaan
Sunday, March 18, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जोशी!!!! मानलं तुम्हाला....................
अतिशय सुंदर सुरवात केलीस कथेची
अशीच लवकर
posts टाकत जा म्हणजे झालं!!!

R_joshi
Thursday, March 22, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतच अस मधाळ बोलण, मला अजुनच त्याच्याकडे आकर्षित करायचे. अजाणतेपणी मी त्याच्यात गुंतत होते आणि हे गुंतणेच मला संकटाच्या वादळात नेणार होते.

"मधु, माझ्यावर प्रेम करतेस ना?" प्रशांतचा आवाज जरासा धीरगंभीरच होता.
"आज हे काय नविन. आणि कितीदा सांगु तुला माझ तुझ्यावरच प्रेम आहे म्हणुन." मधु
"नाहि तस नाहि...... आता कस सांगु तुला... मी...मला....'
"प्रशांत काय झाल.मला नाहि सांगणार? सांग ना काय झालय ते?"
"मला तुला विचारायचे होते.... जाऊ दे.. नकोच."
"प्रशांत अरे विचार रे लवकर काय ते. "
"मधु, आज रात्री माझ्यासोबत माझ्या मित्राकडे येशिल. त्याचा वाढदिवस आहे आज. त्याने आपल्या दोघांनाहि बोलावले आहे.येशिल ना माझ्याबरोबर?"
"तुझ्या मित्राचा वाढदिवस, मी तेथे काय करणार? मी नाहि येऊ शकत प्रशांत."
"माझ्यासाठी मधु.प्लीझ."
" बर. पण घरी लवकर परतायच. चालेले?"
"थंक्स मधु."

प्रशांतच मन तेव्हा ऊमगल असत तर... पण या जरतरच्या गोष्टि, जे घडायच ते घडुनच राहत. बोलता बोलता मधुने माधवकडे पाहिले. तो बराच शांत झाला.

"माधव, खरच मी अजाणतेपणी प्रशांतच्या जाळ्यात अडकले होते."

त्या रात्री प्रशांतबरोबर त्याच्या मित्राच्या घरी गेले,तर त्याच्या तिथे कोणीच नव्हते.
"प्रशांत इथे तर कोणीच नाहि. आपण चुकिच्या ठिकाणी तर आलो नाहि ना?"
"मधु, तु खरच भोळी आहेस. माझा काय विचार आहे हे साध तुझ्या लक्षात हि येऊ नये."मधुला मिठित घेत प्रशांत बोलला. प्रशांतच्या अशा वागण्याने मधु चक्रावली.
"प्रशांत तुझा विचार काय आहे?"
"मधु, तुला अजुन कळल नाहि माझा विचार काय आहे."प्रशांतच वाक्य पुर्ण होईपर्यंत मधु पर्णपणे प्रशांतच्या मिठित कैद झाली होती.
"प्रशांत मला....... सोड. मी त्यातली मुलगी नाहि आहे.... मी तुझ्या पाया पडते.... सोड मला." मधुची आर्जवी हाक प्रशांतच्या कानापर्यंत पोहचलि नाहि.
"प्रशांत काय चाललय हे? सोड तिला." प्रशांतच्या मित्राच्या या वाक्याने प्रशांत भानावर आला. आणि माझ अस्तित्व मिटता मिटता वाचल. त्यानंतर प्रशांतबरोबरचे सर्व संबंध मी तोडले. माझ्या आयुष्यातील ती काळरात्र इतराच्या जीवनात श्राप बनु नये, म्हणनच मी लग्नापासुन माघार घेत होते.



R_joshi
Thursday, March 22, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मधु, याआधी तुला हे सर्व सांगावस नाहि वाटल. विश्वास नव्हता माझ्यावर.... माझ्या प्रेमावर?" माधव
"माधव, मी मनातुन फार घाबरले होते. हे तुम्हाला कळले तर तुमच्या वियोगाचे दु:ख मी पचवू शकले नसते. तुमच्या मित्रावर तुमचा खुप विश्वास आहे.मी काय सांगते आहे, हे तुम्ही समजुनच घेतले नसते तर? या सर्व विचारांनीच मी आजवर गप्प होते."
"मग आजच का वाटल मी तुझ्यावर विश्वास ठेविन?"
"आज... तुम्हि जेव्हा म्हणालात कि आज प्रशांत भेटला होता, तेव्हा मनात कोठेतरि भीतिची पाल चुकचुकली.वाटल त्याने तुम्हाला सर्व सांगितले तर... मी सावरत असलेला संसार एका झट्क्यात उधळला जाईल. आणि तुमचा विश्वासहि मी गमावुन बसेन." बोलताबोलता नकळत मधुच्या डोळ्यातुन अश्रु ओघळले.
मधुच्या जवळ जात माधवने तिला प्रेमाने जवळ घेतले.त्याच्या या स्पर्शात एकप्रकारची आश्वासकता होती. मधुला शांत करत माधव बोलला
"मधु, मी प्रशांतला चांगल ओळखतो. त्याचे गुण जसे मला ठाऊक आहेत, तसाच त्याच्याठायी असलेल्या अवगुणांशी हि माझा परिचय आहे.त्याने तुलाच नाही तुझ्यासारख्या अनेक मुलिंना आपल्या नादी लावले होते. हे माहित असुनही तो माझा चांगला मित्र आहे,कारण त्याच्या चांगुलपणावर माझा अजुनही विश्वास आहे. आणि तुझ्यावरही."
"माधव.."
"मधु, तुम्हि मुली बघता ते रुप,पैसा, श्रीमंती. पण या पलिकडेहि मानवाच विश्व असत. ते त्याच्या चांगुलपणावर आधारलेले असते. तु मनाने निर्मळ आहेस म्हणुन ऊशीरा का होईना तु मला तुझ्यावर बेतलेल्या प्रंगाबद्दल सांगितलेस. खर सांगतो मधु तुला, जर हे मला बाहेरुन कळले असते तर खरच मी तुला माफ केले नसते. पण तु आपणहुन मला सर्व सांगितलेस.... माझ्यावरचा विश्वास सार्थकि लावलास."
"माधव, तुम्हि खरच फार मोठे आहात."
माधवने प्रेमाने माधुला जवळ ओढले आणि आपळ्या मिठित बंदिस्त केले.

मधुच्या जीवनातील ह्या सांजवेळेने तिच्या सर्व काळोख्या सांजवेळा पुसुन टाकल्या. आता तिच्या नविन आयुष्याची सुखद सांजवेळ ती अनुभवत होती.

समाप्त. :-)


Dhoomshaan
Sunday, March 25, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

................. अश्या तर्‍हेने "ती" सांजवेळ मधुच्या आयुष्यातली संस्मरणीय ठरली!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Sneha21
Sunday, April 01, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथा होति....लिहित रहा असेच all the best...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators