|
जयश्री अंबासकर ऋतू येत होते ऋतू जात होते परी मी सख्याच्याच ध्यासात होते सखा आज येणार माहीत होते नजारे तसे आसमंतात होते तिन्ही सांज आली उन्हे पेटवूनी धुमारे तिच्या मंद श्वासात होते कसा गंध वाहे पुन्हा तो फिरुनी निराळेच अंदाज वा-यात होते कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते कसा रंग येईल त्या मैफ़लीला तुझे सूर सारेच मौनात होते
|
Shyamli
| |
| Saturday, March 03, 2007 - 11:44 am: |
| 
|
कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते>>>> आहा खास जयु touch गझल, आवडेश वैभव रसग्रहण हवच प्लिज! त्यामुळे अजुन छान समजते गझल
|
Pulasti
| |
| Saturday, March 03, 2007 - 1:13 pm: |
| 
|
जयश्री - पौर्णिमेची मुजोरी खासच! मक्ताही आवडला. -- पुलस्ति
|
Meenu
| |
| Saturday, March 03, 2007 - 1:28 pm: |
| 
|
कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते >>> जयावी मस्तच ग ... मक्तापण मस्तच गं उन्हे पेटवूनी >>> हे मला कळलं नाही गं ...
|
Manas6
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:16 pm: |
| 
|
..कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते... आई शपथ
|
Mankya
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:57 pm: |
| 
|
जया ... मला तर खूपच गोड वाटली बरं हि गजल ! कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते सहिSSSSS ..... एक नंबर गं ! एक शंका आहे : ह्या गजलेत जवळजवळ सगळ्या शेरांचा एक दुसर्याशी संबंध आहे अस मला वाटतं . कितपत प्रभावी असतं हे ? चु. भु. दे. घे. माणिक !
|
Dineshvs
| |
| Saturday, March 03, 2007 - 4:45 pm: |
| 
|
जयु, याहि क्षेत्रात बाजी मारलीस की.
|
Sarang23
| |
| Saturday, March 03, 2007 - 5:04 pm: |
| 
|
स्वाती, असे काय त्या श्यामरंगात होते! वा!!! जयु...! कल्पना आवडल्या छान आहेत... बाकी सविस्तर नंतर लिहीतो... पेटवूनी, फिरूनी नाही आवडले नाही...! आणि तिन्हीसांज आली उन्हे पेटवूनी नाही कळाले... किंवा पटले म्हण...
|
Manas6
| |
| Saturday, March 03, 2007 - 6:48 pm: |
| 
|
ऋतू येत होते, ऋतू जात होते सख्या मी, तुझ्या रोज ध्यासात होते ...असे केले तर कसे वाटेल,जयश्री?..एकदम सपाट वाटते का?..अणि मी ही एकाच ध्यासात होते.. असे म्हटले तर? एक वेगळे परिमाण येईल का?(आणि एक वेगळा परिणाम साधल्या जाईल..नको तिथे कोट्या, सुधरो, मानस६, सुधरो)) सखा आज येणार ठाऊक होते नजारे तसे आसमंतात होते ..नजाकतभरा शेर..'माहित' हा शब्द जरासा रुक्ष वाटतो..ठाऊक मधे 'फेमिनाईन आत्मविश्वास' जास्त जाणवतो' हा..हा तिन्ही सांज आली उन्हे पेटवूनी धुमारे तिच्या मंद श्वासात होते..ह्या शेरातली कल्पना ..उन्हे पेटवुनी?..अधिक स्पष्ट आणि अलवार झाल्यास छान.. कसा गंध वाहे पुन्हा तो फिरुनी निराळेच अंदाज वा-यात होते ..पुन्हा आणि फिरुनी ही द्विरुक्ती झालीय, नाही का?..उगाच तीन-चार मात्रा कशाला वाया घालवायच्या?..आणि दोन्ही मिसरे एकमेकांना अधिक पूरक झाल्यास अजून चांगले वाटतील.. उरी कस्तुरीने सुखावून जावे, असे काय अंदाज वाऱ्यात होते?..हे कसे वाटतेय कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते ..ह्या शेराने तर अर्जुनाच्या बाणासारखा अचूक लक्ष्य-भेद केलाय कसा रंग येईल त्या मैफ़लीला तुझे सूर सारेच मौनात होते ...हे एक ऑप्शन बघ.. तुझे रे जिथे सूर मौनात होते
|
Chinnu
| |
| Saturday, March 03, 2007 - 8:01 pm: |
| 
|
जयु, मानसने उल्लेखलेले बदल केल्यास अतिशय सुंदर गझल होते. मानस शेवटच्या ओळीतला बदल छान आणि उरी कस्तुरीला.. पण सुंदर! जयु, पौर्णिमेची मुजोरी सर्वांत छान. उन्हे पेटवुनी, मला जे समजलय ते म्हणजे सख्याचा ध्यास आणि तो दाह इतका जीवघेणा झाला कि तिन्ही सांज, (जी नेहमी शीतल सुखावह असते,) ती सुद्धा उन्हं (देखील) पेटवु शकेल, इतकी दाहक झालेली होती. कदाचित मी फार कठीण प्रकारे विश्लेषण केले , पण कल्पना खुप सुंदर आहे. गुड वन जयु! माणिक, काही वेळेला शेर एकमेकांना पुरक आणि एकाच विषयाला उधृत करणारे असतात. वरील गझल मध्ये जसे विरहाचे सूर जाणवतात तसे. प्रत्येक शेर कल्पनापुर्ण आणि independently strong असतील तर अशी गजलही गुंफता येणे शक्य आहे. उदाहरणासाठी गजल बीबी चाळणे.
|
Jo_s
| |
| Sunday, March 04, 2007 - 3:42 am: |
| 
|
जयश्री छान आहे गझल, येणार नाथ आता या गाण्याची आठवण झाली
|
Ashwini
| |
| Sunday, March 04, 2007 - 4:10 am: |
| 
|
जयू, मस्त ग. छान आहे गझल.
|
Jayavi
| |
| Sunday, March 04, 2007 - 4:58 am: |
| 
|
मित्रांनो, तुमच्या मनापासून दिलेल्या अभिप्रायाने खूप सुखावलेय अर्थात ह्याचं क्रेडीट वैभव च्या टीमला. इतका सुरेख अनुभव दिलाय ना ह्या कार्यशाळेनं. आता माझ्या गझलबद्दल. गझलेत प्रत्येक शेराचं स्वतंत्र अस्तित्व असतं हे मान्य आहे. पण मला स्वत:ला का कुणास ठाऊक.......गझलेच्या सगळ्या शेरांचं काहीतरी connection असावं असं वाटतं. म्हणून मी एकच विचार continue केलाय. तसंही मला अजूनही 'प्रेम' ह्या विषयाच्या बाहेर पडता आलेलं नाहीये. Manufacturing defect म्हणा हवं तर मानस.... तू इतक्या खोलवर विचार करुन बदल सुचवलेस.....खूप छान वाटलं. पहिल्या शेरातला बदल मला खूपसा पटला नाही रे. सख्याच्याच ध्यासात...जास्त पटतंय. रोज हा शब्द थोडा रुक्ष वाटतोय का? माहीत च्या ऐवजी ठाऊक.......एकदम पटेश उन्हे पेटवूनी चं चिन्नु नी दिलेलं स्पष्टीकरण बरोबर आहे. त्या पेट्लेल्या उन्हाचे धुमारे अजूनही त्या सांजेच्या श्वासात आहेत. पण शेर असा समजवावा लागत असेल तर ती लिहिणार्याची हार आहे हे नक्की. शेर वाचल्याबरोबर अगदी आत पोचला पाहिजे....जसे मीनूचे सगळॆच शेर कसे मस्त जमून आले आहेत. पुन्हा, फ़िरुनी.......हो..... आता जाणवलं की खरंच द्विरुक्ती झालीये. मानस, तू सुचवलेला बदल खूप गोड आहे. पण निराळेच अंदाज वार्यात होते ही ओळ न बदलता काही बदल करता येईल का रे? शेवटच्या शेरातला बदल......... अजून काही सुचव ना तर एकूण काय..... गझलेच्या प्रेमात पाडलंच शेवटी ह्या कार्यशाळेनी इतक्या छान अनुभवासाठी ...........खूप खूप आभार 
|
Saavat
| |
| Sunday, March 04, 2007 - 7:55 am: |
| 
|
कसा रंग येईल त्या मैफ़लीला ? तुझ्या सू(र)-रंगात 'मी ' नहात होते.... ऋतू येत होते,(अन्)ऋतू जात होते.....(एवढी सुंदर 'ओळ'दिल्याबद्द्ल,धन्यवाद वैभव!!) अस काहितरी चालेल काय? हे सगळ रसभरित वर्णन वाचून कधीही गजल न लिहलेल्या मला, मोडक-तोडक लिहावस वाटण, हेच या कार्यशाळेच यश आहे. सगळ्यांना मन:पुर्वक धन्यवाद! मराठी भाषेला हे व्यासपीठ यथायोग्य न्याय देत आहे हे निश्चित. गजलेमधे असणारी भावोत्कटता जाणवणे,हे गजलेच यश आहे. मिनूच्या, जयूच्या गजलेत माझ्यासारख्या अशिक्षिताला 'ती' जाणवली,गजलकारांचे तोंडभरून कौतूक!
|
ऋतू येत होते, ऋतू जात होते कुणाला कधी हे न ध्यानात होते असंच उगाच सुचलं.. जयवी आणि मिनू ..सुंदर आहेत गझला.. जयवीसाठी शेवटचं कडवं: कसा रंग येई न त्या मैफ़लीला सख्या मी तुझ्या अंतरंगात होते जमतंय का?
|
ओये जयु! छान ग! २ आणि ५ आवडले!!
|
Princess
| |
| Sunday, March 04, 2007 - 6:14 pm: |
| 
|
जयु, मस्त ग... चांदणे बाहुपाशात... मार डाला!!!
|
जयु,व्वाह! मान्स, मस्तच रे गड्या. खरच गुलमोहर बहरलाय!
|
Psg
| |
| Monday, March 05, 2007 - 5:15 am: |
| 
|
जया, छान गझल 'उन्हे पेटवूनी' समजतंय.. 'तो' आता कधीही येईल आणि तो आल्यानंतर अर्थातच संध्याकाळ शीतल राहणार नाही! ही गझल 'मुसलसल' आहे ना? म्हणजे सगळे शेर एकच अर्थ ध्वनित करतात.. हाही एकप्रकारचा गझल प्रकारच ना?
|
कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी >>> इथे चांदणे बाहुपाशात होते >>> वा!! जबरदस्त. जयश्री फर्मास जमलीय (लावणी असे ओघानेच लिहीले जाते खरे तर. ) गझल.
|
कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते आहा!! लयी भारी!झकास!! एकापेक्षा एक शेर जबरदस्त झाला आहे! तरीही... 'सखा आज येणार माहीत होते नजारे तसे आसमंतात होते' हा शेर खरंच आवश्यक आहे का? म्हणजे प्रभावी मतल्यानंतर आलेला हा शेर तितका ईफेक्टीव वाटंत नाही. चू.भू.दे.घे. पहिल्या दोन गझलांनी (१) मीनु २)जयू) प्रचंडच गरूडभरारी घेतली आहे! आमच्या सारख्या पामरांची गझल नुसतीच 'बेडूक-उडी' ठरणार असं दिसतंय... (इथे दात दाखवायचे होते.. पण 'स्माईली चिन्ह' सापडले नाही.. म्हणून स्मित हसतो ) पण बेडूक भी कभी गरूड बनेगा इस कार्यशाळासे!!
|
कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी इथे चांदणे बाहुपाशात होते vaahhhhhh!!!!!!
|
"पौर्णिमेची मुजोरी...." वाचून चंद्र शरमला असणार...! कल्पनेला आपला सलाम...!!!
|
Desh_ks
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:07 am: |
| 
|
'सखा आज येणार' संकेत होता नजारे तसे आसमंतात होते हे कसं वाटतं पाहा. या संदर्भात मला असलेली एक माहिती अशी- शेराच्या पहिल्या ओळीत एकटा रदीफ़ येत नाही. पण रदीफ़चा शब्द, जो इथे 'होते' असा आहे, तो त्या ओळीत दुसया जागी येऊ शकतो. जाणकार मत देतीलच. आणि 'पुन्हा वादळाची चाहूल होती निराळेच अंदाज वार्यात होते' हे ही पाहा.
|
|
|