आतापर्यंत प्राथमिक रुपात गज़ल पाठविलेल्या लोकांची नावे १) जयश्री अंबासकर २) डॉ. गजानन ३) देवदत्त ४)मनिषा लिमये ५)मेघधारा ह्या सर्व गज़ल मध्ये अत्यंत सुंदर कल्पना वापरल्या गेल्या आहेत. जुजबी चर्चे नंतर त्याची निर्दोष गज़ल व्हायला वेळ लागणार नाही . जाणकारांपैकी १) प्रसाद शिरगावकर यांनी गज़ल पाठवली आहे . सर्वांचेच मनःपूर्वक आभार
|
मला वाटतेयं आज रात्रभर जागल्याशिवाय 'गझल' पाठविणे शक्य होणार नाही! आता करेंगे या मरेंगे!
|
वैभवराव, या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल अभिनMदन. गझल वेळेत पाठवण्याचा प्रयत्न करेन 
|
मी मोजत आहे माझे अंदाज जुने चुकलेले ......... सुरेश भटांच्या या अप्रतिम ओळी आठवण्याचे कारण म्हणजे आता खाली काही मिसरे / ओळी लिहीत आहे . त्यांच मीटर लिहीण्याचा प्रयत्न कोण कोण करेल ? ( जाणकारांना प्रवेश नाही ) १) अता राहिलो मी जरासा जरासा २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी १०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
|
Anilbhai
| |
| Monday, February 26, 2007 - 1:48 pm: |
| 
|
१ चा मिटर लगागा लगागा लगागा लगागा २ चा मिटर डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी लागाग लागगा लागागा लगाग लागा असा आहे का?. जाम कन्फ़ुजन आहे. ;)
|
Jayavi
| |
| Monday, February 26, 2007 - 2:23 pm: |
| 
|
अता राहिलो मी जरासा जरासा लगागा लगागा लगागा लगागा डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी गागाल गालगागा गागा लगाल गागा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गा गागा गागा लललल गागाल लगालल गागा मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गालगाल गाल गाल गालगाल गाल गाल त्या फ़ुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का गा लगागा गालगागा गाल गा गागाल गा वैभव..... ह्या मात्रांचे गट कसे बनवायचे रे?
|
Jayavi
| |
| Monday, February 26, 2007 - 2:31 pm: |
| 
|
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते लगालगागा लगालगागा लगा लगा गाल गाल गाल काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गागा लगा लगागा गागालगाल गागा प्रिया आज माझी नसे साथ द्याया लगा गाल गागा लगा गाल गागा एकाच या जन्मी जणू फ़िरुनी नवी जन्मेन मी लगाल गा लगा लगा ललगा लगा लगाल गा भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले गालगा गा लगा गागा लल लगागा गालगा वैभव....'ख' आणि जोडाक्षर मधे थोडा प्रॉब्लेम वाटतोय
|
Meenu
| |
| Monday, February 26, 2007 - 2:43 pm: |
| 
|
अनिलभाई ला नसणार आहे कधीच ल तरी नाही तर गा तरी .... गुरुजी एवढा गृहपाठ दिल्यावर गज़ल कधी लिहायची आम्ही पामरांनी ... १ लगागा लगागा लगागा लगागा २ गागा लगालगागा गागालगाल गागा ३ गागागा गागालललल गागालल गालल गागा ४ गाल गाल गाल गाल गाल गाल गाल गाल ५ गालगागा गालगागा गालगागा गालगा ६ लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा ७ गागालगा लगागा गागालगा लगागा ८ लगागा लगागा लगागा लगागा ९ लगा लगा लगा लगा लगा ललगा लगा लगा १० गालगाल लल गागा लल लगागा गालगा
|
बापरे!! हे 'गोबरे गोबरे गाल' उर्फ 'ग'-'ल' चं प्रकरण समजावून सांगाल का? मी यमकांच्याच कुबड्यांवर काहीतरी जुळवणार होतो, पण तांत्रिकतेने घाबरायला होतंय...
|
Gajanan1
| |
| Monday, February 26, 2007 - 3:48 pm: |
| 
|
एका माणसाला एकच गजल पाठवता येते का? 'एकगजलव्रता'ची सक्ती आहे काय?
|
घाबरु नकोस वत्सा!! गुरुजी पाठीशी आहेत कायम!! पण वैभव खरच कैतुक वाटत हं तुझं, केवढ्या तळमळीनी करतो आहेस!! आम्हीच घेण्यात कमी पडतोय!
|
Shyamli
| |
| Monday, February 26, 2007 - 5:42 pm: |
| 
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा लगागा लगागा लगागा लगागा २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी गागा लगाल गागा गालल गागा ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गागागा गागा लगागा (कन्फुज १ १ मात्रा मोजायची का २?) हे रिमझिम असं वाटत्य की २लघु ला १ गुरु मोजायचं ) ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गालगाल गालगाल गालगाल गालगाल ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का गालगागा गालगागा गालगागा गालगा ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते लगागा गागाल गालगा गालगा लगागा लगाल गागा ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गागाल गालगागा गागाल गालगागा ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया लगागा लगागा लगागा लगागा ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी लगालगा ललगा लगालगा ललगा लगालगा १०) भोगले जे दुःख त्या ला सुख म्हणावे लागले गा लगागा लगागा गा लगागा गा लगागा हुश्य
|
Pulasti
| |
| Monday, February 26, 2007 - 7:48 pm: |
| 
|
वैभव, गझल पाठवली आहे. -- पुलस्ति
|
Chinnu
| |
| Monday, February 26, 2007 - 8:41 pm: |
| 
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा लगागा x ४ २) डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा ३) ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गा X १४ ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गा ल X ७ ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? गा ल ग गा ल ल गा गा गा ल गा गा गा ल गा ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया ल गा गा X ४ ९) एकाच या जन्मी जणु फिरुनी नवे जन्मेन मी गा गा ल गा ल गा ल गा गा गा ल गा ल गा ल गा १०) भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले गा ल गा गा ल ल गा गा ल ल ल गा गा गा ल गा नंबर पाच आणि दहावर गाडी अडकलीच! CBDG वैभवा स्वप्नांचा गाव आणि इतर उदाहरणे खुप सोपी आणि सुंदर! धन्यवाद!!
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा लगागा लगागा लगागा लगागा २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी गागालगा लगागा गागालगा लगागा ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गागागागा लललल...???( अगागा!! हे काय भलतेच?) ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गालगाल गालगाल गालगाल गालगाल ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का गालगागा गालगागा गालगागा गालगा ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गागालगा लगागा गागालगा लगागा ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया लगागा लगागा लगागा लगागा ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी लगालगा लगालगा लगा...??( पुन्हा अडलो रे लगागा ) १०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले गालगागा गालगागा गालगागा गालगागा (दु:ख आणि सुख वर दिलेल्या जोरामुळे दिर्घ धरले... असे चालते का?)
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा लगागा लगागा लगागा लगागा २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी गागाल गागागा गागागा लगाल गागा ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गागागा गागागा गागागा गागागा गागा ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गालगा लगाल गालगा लगाल गालगा ल ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का गालगा गागाल गागागा लगागा गालगा ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते लगाल गागाल गालगा गालगा लगागा लगाल गागा ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गागाल गालगा गागागा लगाल गागा ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया लगागा लगागा लगागा लगागा ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी लगाल गागागा लगागा गालगा गागाल गा १०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले गालगा गागाल गागागा लगागा गालगा हुश्श!
|
Meenu
| |
| Tuesday, February 27, 2007 - 4:12 am: |
| 
|
हे हे हे सगळ्यांची वेगवेगळी उत्तर भन्नाट एकदम स्वारी स्वारी गुरुजी ओरडतील ...
|
ग आणि ल याना ज़ोडणारी म्हणुन गज़ल का हो गुर्जी?
|
Nachikets
| |
| Tuesday, February 27, 2007 - 4:55 am: |
| 
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा ल गा गा X ४ २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी गा गा ल गा ल गा गा X २ ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता गा गा गा गा गा गा गा X २ किंवा गा X १४ ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गा ल गा ल गा ल गा ल X २ ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ल गा ल गा गा X ४ ('कबीर' ची आठवण झाली, हे वाचतांना) ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गा गा ल गा ल गा गा X २ (वरील क्र. २ प्रमाणे) ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया ल गा गा X ४ ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी गा गा ल गा X ४ १०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले (वरील क्र. ५ प्रमाणे)
|
Suvikask
| |
| Tuesday, February 27, 2007 - 6:01 am: |
| 
|
१) अता राहिलो मी जरासा जरासा लग गलग ग लगग लगग २) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी गगल गलगग गग लगल गग ३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ग गग गग लललल गगल लगलल गग ४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गलगल गल गल गलगल गल गल ५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते लगगगग लगलगग लग लग गल गल गग ७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी गग गग लगग गगलगल गग ८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया गग गल गग लग गल गग ९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी लगल ग लग लग लगग लग लगल ग १०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले गलग ग गल गल लग गगग गलग
|