Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ढाक बहिरी

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » ढाक बहिरी « Previous Next »

Gs1
Monday, December 26, 2005 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



शनिवार, २४ डिसेंबर. ढाकच्या बहिरीबद्दल काय लिहावे ? बस नाम काफी है असा त्याचा ट्रेकर्सच्या जगात बोलबाला. या ट्रेकमधला शेवटचा थरारक टप्पा, तो बघुनच डोळे फिरल्याने माघारी वळलेले ट्रेकर्स यांच्या अनेक कहाण्या ऐकलेल्या आणि अनेक वर्णने वाचलेली.

गिरिदर्शन या पुण्यातल्या एका चांगल्या ग्रुपबरोबर शनिवारी दुपरी साडेतीनच्या लोणावळा लोकलने शिवाजीनगरहून निघालो. सचिन जोशी हा आमचा ट्रेक लीडर महणजे या क्षेत्रातला अनुभवी मनुष्य, त्याने आजवर दोनशे किल्ले सर केले आहेत, आणि त्यातही बरेच किल्ले तर दहा बारा वेळा...

ढाकचा बहिरी म्हणजे ढाकच्या किल्ल्याच्या कोकणच्या बाजूच्या कड्याच्या पोटातली एक दुर्गम गुहा आणि त्यातला भैरोबा. या गुहेचेच आकर्षण आणि थरार एवढा असतो की वर किल्ल्यावर कोणी फारसे फिरकत नाही. तिथे बघायलाही फारसे काही उरलेले नाही.

रायगड जिल्ह्यातला या बहिरीला जायचे मार्ग तीन. एक म्हणजे कर्जतहून सांदशी या गावी बस वा सिक्स सिटरने यायचे आणि बरीच खडी चढण चढुन यायचे ( चार तास), ही वाट तशीच पुढे भीमाशंकरला जाते.

दुसरा रस्ता म्हणजे लोणावळ्याकडुन राजमाचीच्या रस्त्याला चालू लागायचे, साधारण दीड तासाने उजवीकडे ढाकसाठी फाटा फुटतो. तिथुन पुढे अजुन तीन तास.

आम्ही मात्र तिसर्‍या आणि जरा जवळच्या मार्गाने गेलो.

कामशेतला उतरलो, आणि सहाची जांभिवलीला जाणारी शेवटची बस पकडली. वळवंडी धरणाला वळसा घालून सव्वा सातला जांभिवली गावाला पोहोचलो.

जांभिवली हे पुणे जिल्ह्याच्या आणि देशाच्याही सीमेवरचे गाव. गावात पारावर थोडे विसावून पुढे कोंडेश्वर देवस्थानाकडे निघालो. वीस मिनिटाचा छोटासा चढ ओलांडुन देवळात पोहोचलो आणि मन प्रसन्न झाले. स्वच्छ देउळ, समोर प्रशस्त प्रांगण, पाण्याची तीन खोदीव टाकी, आजुबाजुचे डोंगर आणि पलिकडे कोकणातून उगवलेल्या ढाकचा माथा.

आमचा तब्बल अडुसष्ट जणांचा ग्रुप होता. आम्ही भराभर चालत आल्याने आम्हाला देवळात जागा मिळाली. नंतर बर्‍याच जणांना उघड्यवरच पथार्‍या पसराव्या लागल्या

जेवण गप्पा, आकाशदर्शन, रात्रभर चाललेला कॅंप फायर, गाणी, मध्येच भेटलेले तीन बंदुकधारी शिकारी, थोडीशी झोप यात भराभर रात्र सरली.

सकाळी उठुन साडेसातच्या सुमारास बहिरीकडे प्रस्थान केले. अर्ध्याच तासात एका पठारावर आलो. लोणावळ्याहून येणारी वाट याच पठारावर येउन मिळते. तिकडुन खाली कोकणचा मुलुख आणि थोडा उत्तरेला ढाकचा पहाड दिसला, त्यालाच खेटुन एक निमुळता सुळकाही आकाशात गेलेला दिसला. त्या दोघांच्या मधल्या बेचक्यातूनच आम्हाला ढाकच्या पलिकडच्या मुखावर जायचे आहे असे कळले.

त्या दिशेला भराभर पावले उचलत चालू लागलो. वाटेत एक ' चौक' लागला. डावीकडुन येणारी खडी वाट होती सांड्शीहून आलेली, उजवीकडे ढाक गावामार्गे भीमाशंकर, तर सरळ पुढे बहिरीच्या गुहेकडे रस्ता होता.

कधी चढ कधी उतार असे करत सरळ निघालो आणि आधी दिसलेल्या त्या बेचक्यात निघाल्यापासून दोन तासात येउन पोहोचलो.


आता खरा ढाकचा थरार सुरू झाला. सुळक्याचा आणि मुख्य पहाडाचा अशा दोन कातळामधुन जेमतेम दीड फुट रुंदीची ही घळ होती. जवळ जवळ साठ सत्तर अंशाने खाली जात होती आणि दुसर्‍या टोकाला थेट दरी होती.

घळीच्या तोंडाशीच सॅक ठेवून आम्ही निघालो, पलिकडे पोहोचलो. समोर दरी होती, पुढचा प्रवास हा उजवीकडे वळुन कातळाला बिलगून आडवे सरकत ( ट्रॅवर्स्) करायचा होता. सुरूवातीचे शंभर एक फुट सोपे होते आनी उंचीची भीती वाटत नसेल तर सरळ चालता येत होते. नंअतरचे दीड दोनशे फुट हे दरीकडे पाठ करून कातळला हात, पाय, पोट चिकटवून आडवे जायचे होते तसे गेल्यावर शेवटी आपण गुहेच्या खाली येतो.

तिथे वर दहा पंधरा फुट खोबणीच्या आधारे चढल्यावर सफरीचा कळसाध्याय येतो. आता खोबणीही नसतात तर बांबूच्या जाडीचे झाडाचे पंधरा वीस फुट लांब खोड एका खोबणीत टेकवलेले असते. या बुंध्याला दर दोन फुटांवर एकदा उजव्या तर एकदा डाव्या बाजूला अशा छातलेल्या फांद्या आहेत, चार बॉते लांब आणि आंगठ्याएवढ्या रुंद अशा !!! या बांबूचे वरचे टोक दोराने दगडाला बांधलेले आहे. त्यावरून चढुन वर जायचे असते, चढतांना आपल्या वजनाने तो बांबू कातळाशी दाबलेला राहील अशा प्रकारे भार टाकावा लागतो नाहीतर तो हिंदकळतो आणी पोटात भीतीचा गोळा येतो असे वाचले, ऐकले आणि अनुभवले सुद्धा. बांबू संपला तरी गुहा अजुन पाच फुट वरच होती. आता दोराला धरून वर चढलो आनी वर दाखल झालो.

या सर्व प्रवासात सहा लीडर्स सहा अवघड जागी उभे राहून पाऊल बाय पाऊल मार्गदरशन करत होते त्यामुळेच वर येणे सुकर झाले. तरीही एकेका टप्प्यावर लोक गळत गेले. सर्वांना वर यायला दोन तास लागले.

गुहेत भैरोबा आहे, एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. दुसरेही एक मोठे टाके आहे, त्याच्या तळाशी स्वयंपाकाची व जेवणाची सर्व भांडी दिसतात. आपली वापरून झाली की पुन्हा नीट घासून तळाशी ठेवून जायची असा प्रघात आहे. बाजूला अजुन एक गुहा आहे, तिकडे कोंबडी, बकरे वगैरे बळी दिले जातात.

गुहेच्या अगदी समोरच राजमाचीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांचे सुरेख दर्शन घडते, रेलवेतून दिसते त्याच्या बरोबर उलट बाजूने.

आम्ही ज्या बेचक्यातुन आलो त्या सुळक्याकडे वर पाहिले आणि आमचा डोळ्यावर विश्वासच बसेना. तीन तरूण तो सुळका सर करण्याच्या बेतात होते. जवळ जवळ तासभर त्यांची मोहिम आम्ही झूममधुन निरखली. त्यांच्यापाशी सर्व साधने होती, पण तरीही त्या सुळक्यावर जाणे हे जिगरबाजाचेच काम.

नेहेमीप्रमाणेच चढण्यापेक्षा उतरणे हे जास्त अवघड होते. तो अवघड पॅच उतरलो आणि लगेच माकडांची एक मोठी टोळधाड गुहेवर आली.

नाळीतून वर आलो, सॅक घेतल्या आणि परत फिरलो. पुन्हा देवळाकडे जाण्याऐवजी, सरळ गावाकडे उतरणार्‍या एका वाटेने जांभिवलीला आलो. वाटेत एका आजोबांनी विक्रीला आणलेल कळशीभर ताक पाच मिनिटात संपवले.

जांभिवलीहून चारची बस पकडुन कामशेत आणि मग साडेपाचच्या लोकलने पुणे.

ट्रेकला फारच मजा आली यात शंका नाही, अनेक नवे मित्रमैत्रिणीही मिळाले. पण ट्रेकिंगचा निखळ आनंद हवा असेल तर कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठच्याच गटाने जायला पाहिजे हे माझे मत मात्र अजुन पक्के झाले.



Bee
Tuesday, December 27, 2005 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यावेळेसचे वर्णन अधिक आवडले. तो बांबूंवर पाय ठेवून चालण्याचा प्रसंग शहारा आणतो. काही फोटो असतील तर नक्की टाक.

६८ जण म्हणजे खूप झाले पण खूप जण असले की भितीपण वाटत नसेल.

जांभिवली देशाच्या सीमेवरचे गाव मग दुसरा देश कुठला?


Phdixit
Tuesday, December 27, 2005 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS एकदम परफेक्ट वर्णन
दिड फुट रुन्द घळ ती थेट आश्या जागी सोडते की तिथे जेमतेम ३ माणसे उभी राहू शकतात, त्यापुढे बाजुला काही गुहा आहेत तिथे १५ ते १६ लोक आरामशिर बसु शकतात त्यापुढचा कातळावरील प्रवास त्या नंतर एक ५ लोक बसु शकतील एवढी जागा अणि मग उभ्या कातळावरील खोबणी आणि नंतर त्या जुन्या खोडावरील चढण, त्यानंतर तो दोरखड आणी भैरोबाची गुहा.
त्या गुहेमध्ये स्वैपाकासाठी भांडी आहेत.

GS सगळे चित्र डोळ्यासमोर उभे केलेस.
१० ते १२ वर्षा पुर्वी मी RSS च्या ग्रुप बरोबर हा ट्रेक केला होता. त्या वेळेस लोनावळ्याहुन आम्ही गेलो होतो.


Gs1
Tuesday, December 27, 2005 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतिम चढाईचे दोन टप्पे, फोटो : अभी पटवर्धन

guha2

guha1

Cool
Tuesday, December 27, 2005 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फोटोतच एवढा खतरनाक वाटतो तर प्रत्यक्षात कसा असेल... जायला पाहीजे एकदा..


Bee
Tuesday, December 27, 2005 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे.. मुंग्याच्या रांगेप्रमाणे... हे फ़ारच झाले मात्र.. मला नाही जमणार बुवा :-) आणि मुली देखील सोबत आहेत..काही वरती अशा बसल्या आहेत जणू कट्ट्यावर बसल्यात की काय :-)

खरच किल्ले सर करणारे शूर असतात.. हे कुणा येर्‍यागबाळ्याच काम नाही.

GS1 पायथ्यापासून किती उंचावर आहे हा भाग..काही अंदाज?


Bee
Tuesday, December 27, 2005 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंदा हे सर्व करत असताना तुमचे किंवा तुमच्या इतर कुणा ओळखीचे काही दुखापतीचे अनुभव आहेत का? कारण इतका सरळसोट चढ चढून परत खाली उतरणे खूप कठीण आहे. उतरता भाग असेल तर निदान घसरत घसरत पार केल्या जाऊ शकतो पण हा भाग चढायला कठीण आणि उतरायला तर त्याहूनही कठीण वाटतो. इथूनच परत खाली उतरलात की उतरायला काही सोपा मार्ग होता? आणि दोरखंड वगैरेची गरज नाही का भासली? कशाच्या आधारावर वर चढता आले? त्यालाच खोबणी म्हणतात का?

माफ़ करा खूप विचारतो आहे पण खूप उत्सुक्ता वाटते आहे जाणून घेण्याची. वेळ असेल तर लिहा..


Gs1
Tuesday, December 27, 2005 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहीहंडी वाटतेय ना ? फार सुरेख फोटो काढला आहे अभीने, तो काढणे सुद्धा अवघड होते.
साधारण २७०० फुटांवर आहेत लोक.


Prashantkhapane
Tuesday, December 27, 2005 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sahi re sahi, keep it up GS1 !!

Lalu
Tuesday, December 27, 2005 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख वर्णन. फोटो तर छानच आहेत. तुम्ही लोकानी एकेक गड सर करायचा सपाटा लावलेला दिसतोय. :-)

Pooh
Wednesday, December 28, 2005 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

An interesting site for info about Sahyadri and the forts. It also has pictures.

http://sahyadri.himadventures.net/

Pooh
Wednesday, December 28, 2005 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Above site looks like a commercial venture. I am not affiliated with this venture in any way. Just came across this site when I googled "Sahyadri".

Although. it looks like it has some useful inofrmation.

Dhumketu
Wednesday, December 28, 2005 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Giridarshan ka re? sachin la sang mi aathavan kadhat hoto mhanun...


Indradhanushya
Wednesday, December 28, 2005 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 धाक बहिरीचा अनुभव शब्दात सांगण कठीण... तो फ़क्त अनुभवयाचा असतो... बस्स :-)

Dineshvs
Wednesday, December 28, 2005 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल वाचायचे राहुन गेले रे. छान वर्णन आणि फ़ोटोहि. भाऊ आणि वहिनी अनेकवेळा गेलेत तिथे.

Giriraj
Thursday, December 29, 2005 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जायलाच पाहिइजे!
आता पूर्ण बरा झालो की येतोच!

Dhumketu
Thursday, December 29, 2005 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोणावळा भिमाशकर करताना ढाक चे वेगळेच दर्शन घडते..
त्याचे काही फ़ोटो ईथे
http://members.tripod.com/~danand/home/fly/trek/dhak/dhak.html आहेत.

ढाक च्या वरच्या पठारावर एक शिवलिंग आहे. तिकडे मात्र जरासे रॉक क्लायबिंग लागते.
ढाकचा तो कडा सरळ खाली उतरला की खालच्या गावतून कर्जतकडे जाणारी एसटी मिळते.

जीएस, हे मात्र बरोबर.. की ट्रेक करताना कमी लोक पाहीजेत... तरच मजा येते..


Moodi
Wednesday, January 04, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जी एस तुम्ही ३१ डिसेंबर साजरा केलात ना बाहेर ट्रेकमध्ये? मग अजुन त्याचा वृतांत का नाही? आम्ही वाट बघतोय उत्सुकतेने, लवकर लवकर.

माझे डोळे फिरले तो वरचा पहाड पाहुन.


Arch
Wednesday, January 04, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा ठिकाणी लोक जात असतील आणि जाऊ शकत असतील ह्यावर एरव्ही विश्वासच बसला नसता. तुम्हा सर्वांच कौतुक वाटल आणि तुमच्या Team leaders च तर फ़ारच.

Shyamli
Thursday, January 05, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च म्ह्नणतेय तसच मलाहि वाटतय,
अशा ठिकाणि लोक जाउ शकतात?
मला तर फोटो बघुनच पोटात गोळा आला
ट्रेक करणारे सगळी मन्डळि ख्ररच सां..दण्डवत


Gs1
Thursday, January 05, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाची सुरूवात ऑफिसमध्येच क्लायंट क्लायंट आणि रिलीज रिलीज या खेळात साजरी झाली


Ashbaby
Friday, January 06, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय जीएस,
तुझ्या ह्या खेळामुळे आमची मात्र पुर्ण निराशा झाली. अगदि डोळे लावून बसलो होतो ३१ कडे. शेवटी, ३१ला परत पालीला गेलो आणि उरलेला सरसगड सर करून आलो. प्रत्येक पावलाला तुम्हा सगळ्याची आठवण येत होती.
साधना.


Gs1
Friday, January 06, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा कसला खेळ. ? क्लायंटचा खेळ, आमचा जीव...

बर्‍याच जणांनी रस दाखवला होता, पण मला जमणार नाही असे लXआत आल्याव्र मी २९ लाच तसे कळवले होते सर्वांना.

सरसगडाला कोणकोण गेला होतात वृत्तांत लिही ना सरसगड बीबीवर.. दरवाजापलिकडचे जाणून घ्यायची उत्सुकता आहे...



Dhumketu
Friday, January 06, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वरती गेलाच नव्हता की काय मागच्या वेळेला?
वरती एक देऊळ आणी एक झोपड्याटाईप आहे. आम्ही एक रात्र तिकडे काढली होती...
रात्रीचाच चढला होता आणी त्यावेळेला चुकून स्मशानातून आलो होतो.
वरती राहयाला मस्त आहे. एक तळेही आहे.


Dhumketu
Friday, January 06, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राच्या ओळखीचे नेहमी ३१ डिसेंबर लिंगाण्यावर साजरी करतात...

Naatyaa
Friday, January 06, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपणा सर्वान्ना विकिपीडिया हा मुक्तकोश माहित असेलच.. या साईटवर किल्ल्यांबद्दल एक विभाग आहे. पण तिथे फार माहिती नाही. आपल्या सगळ्यान्न मिळुन त्या माहितीत भर घालण्याचा एक प्रकल्प करता येइल.

Marathi wikipedia:
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0

Maharashtratil kille: http://mr.wikipedia.org/wiki/Category:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87

There is some information about forts in Maharashtra in the English section but not much.
Link: http://en.wikipedia.org/wiki/Category:Forts_in_India

Gs1
Saturday, January 07, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्या छान कल्पना आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators