|
Cool
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:21 am: |
|
|
Qanyavaad maMDLIÊ.. ha Aaho tÜrNaaÊ %yaacyaa p`caMDgaD naavaalaa saajaosaa..
|
Giriraj
| |
| Thursday, December 15, 2005 - 6:22 am: |
|
|
आयला.. काय दिसते झुंजार माची! मि तोरणा सोडत नाही आता!
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 8:46 am: |
|
|
गडप्रेमींना माझी एक विनंती आहे. पुढल्यावेळी भ्रमंतीबद्दल जे काही लिहाल तेंव्हा गड कुठे आहे, कसे जावे, मार्ग हे सर्व लिहिता आले तर पुढे ह्याचा इतरांना उपयोग होईल. वर तोरण गड कुठे आहे हे कळत नाही. बर्याच जणांचा व्यवहारीक भुगोल इतिहास माझ्याहून कच्चा असू शकतो आणि ही माहिती सुरवातीला किंवा अखेरीस परिच्छेद करून दिली की लवकर सापडायला मदत होईल. प्रवास वर्णनात अशा तृटी योग्य नाहीत. गोविंद, गिरिराज, कूल आणि इतर दखल घ्या ही विनंती..
|
Gs1
| |
| Thursday, December 15, 2005 - 9:28 am: |
|
|
bee, please read my second and third para
|
Kedarrp
| |
| Thursday, December 15, 2005 - 12:24 pm: |
|
|
बी, प्रवासवर्णन किंवा वृत्तांत हा केवळ अनुभव प्रकटनासाठी लिहिला जातो. त्या ठिकाणी कसे जायचे इ. माहितीचे अंतर्भूतन अध्याह्रत नसते. तरी देखील, आपल्या सूचनावजा विनंतीस (अथवा विनंतीवजा सूचनेस) मान देऊन यापुढे ही माहिती देखील अंतर्भूत केली जाईल. केदार. (हलकेच घ्याल, अशी आशा आहे. )
|
Naatyaa
| |
| Thursday, December 15, 2005 - 1:28 pm: |
|
|
तसेच बाजारात आनंद पाळंदे, घाणेकरांसारख्या लेखकांची अनेक पुस्तके आहेत.. त्यात सखोल माहिती आहे या गडांबद्दल.. young zingaro नावाच्य group ने संकलित/प्रकाशित केलेल्या सांगाती सह्याद्रिचा या पुस्तकात तर अक्षरश: प्रत्येक गडाचा फोटो पण आहे. पुस्तक जरा महाग आहे. साधारण ७००-८०० ला पडत असावे.. पण संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.
|
Dhumketu
| |
| Thursday, December 15, 2005 - 3:03 pm: |
|
|
तोरण्याचा रॉकपच चढल्यावर डावीकडून बहूतेक रस्ता जातो टाक्याला.. लगेच टाके आहे.. जास्त वेळ लागत नाही.. पण आम्हालाही टाके शोधायला वेळ लागला होता... सांगाती सह्याद्रीचा मस्तच पुस्तक आहे... फ़क्त जरा महाग आहे.. पण माहीती च्या दृष्टीने ते चांगले आहे.
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 3:15 pm: |
|
|
धन्यवाद! जमेल तसे करा.. मला ह्या छायाचित्रांमधे पर्वातांच्या दुरून दिसणार्या खाचा खूप आवडल्यात. डोंगर दर्यांची हीच मज्जा अधिक असते की उंचावरून निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घेता येतो.. मोकळी हवा असते.. आकाश चांदण्यांनी फ़ुललेल असत आपल्या आवडीचे मित्र मैत्रेणी सोबतील असतीला तर आणखीच बहार येतो...
|
आणि न आवडणारे मित्र मैत्रिणी सोबत असतील तर मी चांगली ठिकाणं बघायला जात नाही... बी, दिवे घ्यालच...
|
Amitpen
| |
| Thursday, December 15, 2005 - 11:34 pm: |
|
|
'सांगाती सह्याद्रीचा' ला पर्याय म्हणजे आनंद पाळंदेंच डोंगरयात्रा'.... छोटे एक दिवसाचे ट्रेक करायचे असतील तर प्र. के. घाणेकरांचे साद सह्याद्रीची भटकंती किल्यांची' उत्तम, त्यात प्रत्येक गडाचा थोडा इतिहासही आहे... अजुनही बरीच पुस्तके आहेत.... आणि ती पुस्तके खरतर विकत घेतली पाहिजेत.... तसेही मराठी पुस्तकांना वाईट दिवस आलेत.... इंटरनेटवर पण बरीच माहिती उपलब्ध आहे...उ.दा. www.trekshitiz.com , www.bhramanti.com हि माहिती केवळ नविन लोकांसाठी...माहितगारांसाठी नाही
|
Bee
| |
| Friday, December 16, 2005 - 1:52 am: |
|
|
विनय, हो दिवे घेतले न आवडणारे मित्र मैत्रीणी असले तर एकटे बाहेर पडायला मला काही वाटत नाही. मी पॅरीसला जेंव्हा गेलो होतो त्यावेळी तिन मित्र सोबतीला होते. सगळ्यांना museum नको होते. आणि museum मधे काय काय जपूण ठेवले आहे हे मला खूप आधीपासूनच माहिती होते. मग मी त्यांना कल्टी दिली.
|
Mansoon
| |
| Tuesday, July 31, 2007 - 1:28 pm: |
|
|
मि आनि माज़े मित्र तोरना रजगड,व मुलशी लेक ला पिकिनिकला जणार आहोत,आम्हाला रात्र गडावर काडायचि आहे तर त्यसाटि कोणता गड चन्गला आहे,तोरण्यावर राहण्याचि चन्गलि सोय होउ शकते काय,आनि मन्दिरात एका वेळेला किति माणसे राहु शकतात.
|
Dhumketu
| |
| Tuesday, July 31, 2007 - 2:16 pm: |
|
|
पावसात?? तोरणा नाही एव्हढा चांगला राहण्यासाठी.. राजगड विचार करा. मुळशी ला कसे जाणार बुवा तुम्ही तोरणा राजगड वरुन?
|
Madhavm
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:34 am: |
|
|
जाणकार मंडळी, कर्जत वरून भिमाशंकर ह्या trek ची माहिती हवी आहे. कसे जायचे, trek कितपत कठीण आहे, वर कुठे रहायचे असे अनेक प्रष्ण पडले आहेत माझ्यासारख्या नवख्या माणसाला.
|
Mansoon
| |
| Wednesday, August 01, 2007 - 8:01 am: |
|
|
माहिती दिल्यबद्दल आभारि आहे,पण ते तिन स्पोट आम्हि गाडी घेउन करणार आहोत,मला एक सन्गा राजगडावर तरि राहण्याची चान्गलि सोय होउ शकते का?
|
Dhumketu
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:54 am: |
|
|
माधव.. मी ईथे लिहीले आहे. mansoon , राजगडाविषयी ईथे लिहीले आहे. तुम्ही जरी गाड्या घेऊन जाणार असाल तरी तोरणा वा राजगडवरून मुळशी कसे आणी कुठल्या रस्त्याने करणार?
|
Madhavm
| |
| Wednesday, August 01, 2007 - 12:07 pm: |
|
|
धुमकेतू, माहितीबद्दल मणभर धन्स
|
Mansoon
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:16 pm: |
|
|
राजगडाचि माहिती दिल्याबद्द्ल आभारि आहे,मुलशी तलाव जमल्यास करणार.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|