|
Ashbaby
| |
| Wednesday, June 04, 2008 - 9:27 am: |
|
|
गिरीविहार, टप्पा पार करायला दोन दिवस लागले, म्हणजे दोन दिवस तो तसाच लोंबकळत राहिला?? थांबण्यासाठी आजुबाजुला कुठे गुहा वगैरे दिसत नाहि म्हणुन विचारले. ज़ीएस, तुमचा हा ट्रेक छानच झाला, मागच्या पिकनिकच्या तुलनेत. काल पहिला पाउस झाला. आता पावसाळ्याच्या ट्रेकची वाट पाहतोय. साधना.
|
साधना, (एॅशबेबी), टप्पा पार करायला दोन दिवस लागले म्हणजे काही तो तसाच लोंबकाळत बसला नसणार. दोर लावून संध्याकाळी परत खाली उतरले जाते. दुसर्या दिवशी जिथपर्यंत दोर आहेत तिथपर्यंत जुमारच्या सहाय्याने पटापट वरती चढून मग पुढची चढाई सुरु होते. महाराष्ट्रातील कातळाच्या भिंतींवर रात्र काढता येईल असे प्लॅटफॉर्म्स दुर्मीळ. बरेचसे कडे (पिनॅकल्स) किंवा भिंती ह्या उभ्या सरळसोट आहेत. (कोकणकड्याबद्दल माहिती नाही पण जे फोटो मी पाहिले आहेत आजवर त्यात असा प्लॅटफॉर्म कुठे दिसला नाही. उलटा एक जबरी ओव्हरहॅंग आहे ह्या भिंतीवर) अर्थात, पिटॉन्सना टांगता येतील असे तंबू आता उपलब्ध आहेत. असे तंबू वापरून कड्यावर लोंबकळत रात्र काढता येउ शकते. मी मागे डिस्कवरीवर दक्षिण धृवावरील एका १८०० फूटी भिंतीवरची चढाई पाहिली होती. त्यामध्ये ५००-६०० फुटानंतर ते लोक असे टांगत्या तंबूमध्ये राहिले होते.
|
Gs1
| |
| Wednesday, June 04, 2008 - 9:54 am: |
|
|
साधना, पावसाळ्यात सरसगड करायचा का ? शिवाय झाड्फूकबाबाला घेउन भीमाशंकरला जायचे आहे माहितीपर नेचर ट्रेलसाठी
|
Girivihar
| |
| Wednesday, June 04, 2008 - 11:25 am: |
|
|
साधना खालील फोटो त्यान्चे रात्रीचे निवरास्थान दिसत आहे, ही जागा कोकणकड्यावर सुमारे दीड हजार फ़ुटावर आहे.
|
Girivihar
| |
| Wednesday, June 04, 2008 - 11:37 am: |
|
|
साधना, तेच निवारास्थान कोकणकड्याच्या खालील फोटोत दाखविले आहे.
|
Girivihar
| |
| Wednesday, June 04, 2008 - 11:45 am: |
|
|
जेईस, भीमाशन्कर ट्रेकसाठी मी आत्तापासुन हात वरती केलेला आहे.....
|
Ashbaby
| |
| Wednesday, June 04, 2008 - 5:22 pm: |
|
|
जीएस, i am dying to come... झाडफ़ुसबाबा आणि भीमाशंकर म्हणजे समसमासंयोग असं काहीतरी म्हणतात तेच होईल...... पावसा लवकर पड रे बाबा..... साधना
|
Ashbaby
| |
| Wednesday, June 04, 2008 - 5:31 pm: |
|
|
गिरीविहार, सॉरी मी काहिच्या काहीच विचारतेय, पण हा कोकणकडा किती उन्च आहे? रात्रनिवा-याचा फ़ोटो पाहिला. इथे झोप येणे अशक्यच.... कधी कडेलोट होईल सांगता येणार नाही. टप्पा पार करायला दोन दिवस म्हणजे एक रात्र निवा-यावर काढावी लागणार. म्हणजे एका दिवसात, कडक उन्हात आणि बहुतेक जोरदार वा-यात दिड हजार फ़ुट चढाई करावीच लागणार... जमते हे एका दिवसात?? साधना
|
सर्वसाधारणपणे कोकणकड्यासारखी २ ३ दिवसांची चढाई करताना पिटॉन्सना टांगण्याच्या hamocks वापरल्या जातात. त्यात झोपतात लोक. किंवा जर वर चित्रात दिली आहे तशी ridge असेल तर तिथे दोरीच्या सहाय्याने बांधून घेऊन झोपतात. परत पुर्णपणे तळाला खाली येण्याचा मार्ग शेवटचा असतो. कारण जुमारिंग करायचे म्हटले तरी कष्ट असतातच. आणि हातातली ताकद परत ७ ८ शे फूट चढायला वापरणे हितावह नसते. विशेषत्: नंतर overhang चढायचा असेल तर. टण्या, त्या फोटोमधली रिज फेमस आहे. कोकणकडा चढणारे जवळपास सगळेच ती वापरतातच.
|
Abhay
| |
| Wednesday, June 04, 2008 - 7:42 pm: |
|
|
छान माहिती रे लेकानो, अजून लिहा रे...........
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे /node/2245
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|