|
मेघा, फालतू ? , हहपुवा.. पूनम.. बधीर, राग, कीव... सध्या कोणत्या स्थितीत आहेस? विनय, LOL सहज आठवले. एकदा भोपाळला गेलो होतो कामासाठी. तेंव्हा एस्टीने एका गावी चाललो होतो. शेजारी बसलेल्याने काय करतो वगैरे जुजबी विचारून मग एकदम माझी एक मुलगी आहे करणार का लग्न असच विचारल. मी काहितरी कामासाठी आलोय वगैरे बोलून गप्प झालो. तर तो म्हणाला माझ्या ५ मुली आहेत. सगळ्या बघ आत्ताच अस मागे लागला. मी पटकन आलेल हसू लपवल पण नंतर खूप कीव आली कारण तो चक्क माझ्या थांब्याला उतरून मला समजवायला लागला. त्याला खरतर पुढे जायच होत.
|
Sonalisl
| |
| Monday, December 24, 2007 - 7:00 pm: |
| 
|
मुलीला चष्मा आहे म्हणुन नकार देणारे काहीजण पाहीलेत मी.... अरे.. लग्नानंतर चष्मा लागला तर काय तिला सोडून देणार का? काहीपण
|
Arch
| |
| Monday, December 24, 2007 - 7:31 pm: |
| 
|
सोनाली मला ह्यात काही चुकीच वाटत नाही. मुलीपण विचारतात न? मुलाला नोकरी आहे न? तेंव्हा मुलगा म्हणतो का अरे लग्नानंतर नोकरी गेली तर त्याला सोडून देणार का? काहीपण
|
Manuswini
| |
| Monday, December 24, 2007 - 9:17 pm: |
| 
|
लग्नांनतर तसे बरेच काही काही होवु शकते काय नाही होवु शकत विचारा......... जसे बधीर, मूक (हे एक उदाहरण म्हणजे बायको बडबडी नवरा आपोआप मूक होतो वगैरे... ). तरी सगळे लग्नाआधी आपापल्या परीने preferences जाहीर करणारच. बघून,परखून घेतातच ना;तो हक्क असतोच ना? आमच्या ओळखीतला एक मुलगा मुलीला साधारण अगदी एखादी जरी एक pimple ,बारीक पुटकळी वगैरे चेहर्यावर ( जे कधी कधी 'सामान्य'' नजरेने दिसणार नाही असे ) असले तरी मुलीला नाकारायचा. नो जोक्स. म्हणे मुरूमे असलेली मुलगी नको. मला clean चेहर्याची मुलगी हवीच. गोरी तर हवीच. वर पत्रीका पण पुर्ण ग्रहमीलान,गुणमिलन झालेली पाहीजे. .. स्वतला भिंगाचा चष्मा होते त्याचे काय. माणसाने स्वःताच्या दोषाकडे पण पहावे नाही का? एकेक नमुने.... माझा आणखी एक recent अनुभव म्हणजे आई वडीलच email लिहिणार,फोन करणार वगैरे वगैरे. सुरवातीला अतीशय संयम ठेवून बोलले अगदी दोन महीने(आपल्या आई पप्पांची शिकवण ना ) म्हणजे हे सुद्धा विचारले नाही की मुलगा कुठेय,का नाही फोन करत का बोलत? इतका सुद्धा वेळ मिळत नाही. इथे वाढलेल्या मुलांना स्वतचे बरेच individuality,freedom वगैरे ज्ञान असते मग इथे आई वडील का इतके पुढे पुढे करतात. तर म्हणे मुलगा busy असतो? इतका busy ? ३० - ३२ वर्षे वयाच्या मुलाला स्वःताच्या लग्नासाठी वेळ नाही. बर्याच शोधानंतर असे आढळले की काय असते ना इथे राहीलेल्या मुलांना देसी आई वडील convince करत असतात की देसी मुलीशी लग्न करावे. ते पण अगदी मराठी किंवा कोकणी असे त्यांच्या culture शी ओळख असलेली. (ही त्यांची चुकी नाही) मग मुलांना दबाव आणतात. मग खरे तर ह्या मुलांना interest नसतो ह्या process through जाण्यात. मग त्यांचा attitude असा असतो Dad n mom you can check out, I will follow you guys. मग आम्ही मुली काय येड्या आहोत काय असे treat करायला? हे आई वडील ABCD मुलांकडून अश्या अपेक्षा पण का बाळगून असतात. no offense to anybody here but not ABCD.I am also raised here; I am just sharing my exp. . anyways सगळे त्रासदायक प्रकार आहे हा. त्या पेक्षा प्रेमात पडून लग्न केलेले बरे इतके पिळवणूक आहे ह्या process मध्ये, आधी career चक्कर मध्ये लक्षात येत नाहे. असो.
|
Arch
| |
| Tuesday, December 25, 2007 - 6:08 am: |
| 
|
मुलाला टक्कल असल की मुली नकार देतातच की. आणि लग्न झाल्यावर टक्कल पडल म्हणजे?, मग काय पटल का सोनाली? 
|
Zakki
| |
| Tuesday, December 25, 2007 - 5:59 pm: |
| 
|
लग्न झाल्यावर टक्कल पडल साधारणपणे तोपर्यंत नवरा दिसायला कसा हवा यातला बायकोचा interest नाहीसा झाला असतो. मग, अहो जरा घरकामाला मदत करा, घरात लक्ष घाला, एव्हढ्याच माफक अपेक्षा असतात.
|
Tonaga
| |
| Tuesday, December 25, 2007 - 6:40 pm: |
| 
|
माझ्या भाचीला मुलगा पहायला गेलो. स्थळ चांगले होते. मुलगा स्मार्ट होता पण अनुपम खेर इतके टक्कल होते. मुलीचे वदील नाराज झाले म्हतले लोक नावे ठेवतील. मी म्हतले मुलीला विचारा. ती म्हनली. लग्नानन्तर टक्कल पदले असते तर काय केले असते? लग्न जमले.... जक्की तुलातक्कल आहे कारे बाबा?
|
Sonalisl
| |
| Wednesday, December 26, 2007 - 1:48 am: |
| 
|
Arch, बरोबर आहे तुझं, कारण शेवटी ज्याची त्याची निवड अन आवड. माझ्याच नात्यातल्या एका मुलीला एक स्थळ आलं होतं, सगळं छान पण मुलाला टक्कल, म्हणून ती नाही म्हणत होती. सगळ्यांनी समजावलं, मुलगा कसा दिसतो त्यापेक्षा तो कसा आहे ते बघ. मग ती मुलाला एक-दोन वेळा भेटली अन मग तीने होकार दिला. मला वाटतं, लग्न झाल्यानंतर चष्मा लागणं, टक्कल पडणं किंवा काहीही झालं तरी त्यामुळे काही फ़रक पडत नाही (किंवा नसेल) कारण तोपर्यंत नवरा बायको ला एकमेकांचा स्वभाव, एकमेकांची काळ्जी घेणं, चांगले गुण माहीत झालेले असतात. अन एकदा प्रेमात पडल्यावर तो/ ती कशी दिसतोदिसते हा प्रश्नच उरत नाही.
|
Manuswini
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:38 am: |
| 
|
टक्कल वरून सांगायचे माझ्या मावशीला माझा राग आला होता कारण तिच्या सासरच्या ऑलखीतले मुलाचे स्थळ मी पन नाकरले होते. मला ही टक्कलू मुलगे नको आहेत हे माहीती असताना. तेव्हा मावशी बर्या पैकी रागाने म्हणली तुझे आहेत ना लांब केस तेच चिकटवना त्याला त्यात काय, एवढे काय टक्कालचे घेवून बसलीस. मी पण गमतीने उत्तर दीली, त्याचे टक्काल कवर करतान अमी टकली होईन त्याचे काय.?
|
Hkumar
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:51 am: |
| 
|
मंडळी, टक्कलधार्यांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्यांच्या वार्षिक अधिवेशनात ते सभासदांना ' sunshine, moonshine असे किताब देतात! माजी पंतप्रधान गुजराल त्या सं. चे पूर्वी सभासद होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|