|
Kilbil
| |
| Thursday, February 07, 2008 - 9:06 am: |
| 
|
माझ्या एका काकांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. मोठी झाल्यावर काकांच्या माघारी तिने काकीला घराबाहेर काढले. काकांच्या सर्व मिळकतीवर ह्क्क दाखवुन त्यांच्या सख्ख्या मुलीला, जी थोडीशी वेडी होती, निराधार केले. तसेच एका आत्यालाही दत्तक घेतलेल्या मुलीने असाच खुप त्रास दिला. अर्थात, आजकाल सख्खी मुलेही अशी वागणार नाहीत याची खात्री देता येत नाही. पण असे अनुभव आले की मन थोडे साशंक होते.
|
Shyamli
| |
| Thursday, February 07, 2008 - 9:19 am: |
| 
|
मुळात अश्या अपेक्षा आपण आपल्या मुलांकडुन ठेवण्यात पण काहीच अर्थ नाहिये आपण कितीसं आपल्या आईवडिलांसाठी वा सासरच्या मंडळींसाठी करु शकतो आपण एकिकडे तर ते सगळे एकिकडे. केवळ सामाजिक जाणीवेतुन हा निर्णय घ्यायचा असेल तरच ठीक आहे मग हे मुलं मला सांभाळेल etc गोष्टींना काही अर्थ नाही. दत्तक मूल हे काहीतरी वेगळ आहे ही जाणिव त्याला होवू न देता वाढवता यायला हवं.
|
Psg
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:15 am: |
| 
|
शेवटी महत्वाचे सूत्र एकच! जर दत्तक एकदा घेतले, त्यादिवसापुरते ते लक्षात ठेवावे, व नन्तर विसरून जावे की आपण अमुक तमुक बाळ दत्तक घेतले आहे! ते आपलेच बाळ आहे असे स्वतःच्या मनावर ठसविणे अत्यावश्यक हे! अत्यंत महत्त्वाचे वाक्य! घरात एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेणं हा आधी धाडसी निर्णय. त्यासाठी घरातल्या सर्वच सदस्यांचा ठाम पाठीम्बा हवा. एक जरी साशंक असेल तर हा निर्णय घेऊ नये. घरातलं मोठं मूल तर अगदी सहजपणे हा निर्णय स्वीकारतं. प्रॉब्लेम हा मोठ्या माणसांबद्दलच असतो. घरातले सगळे खंबीर असतील तर मूलाला कधीही मायेची, प्रेमाची उणीव भासणार नाही. तसंच, ते मूल दत्तक आहे हे त्याच्यापासून कधीही लपवण्याचा विचारही करू नये. कुठूनतरी ते समजतंच. त्यापेक्षा दत्तक मूलाला 'टीन-एज' यायच्या आत, शक्यतो १०व्या वर्षाआधीच स्वत: आई-वडीलांनी ही कल्पना द्यावी की ते मूल दत्तक आहे. ते वय असं असतं की ते मूल हा फ़ॅक्ट पचवू शकेल. आडवयात हे अचानक समजलं तर ते मूल ज्या पद्धतीने रीऍक्ट करेल हा त्याचा दोष नसून त्याच्या वयाचा दोष असतो. तेव्हा मन घट्ट करून त्याला थोडी समज आली की हे सांगावेच सांगावे. शेवटी बाळं ही इतकी गोड आणि निरागस असतात की काहीच दिवसात त्यापुढे आपण हे बाकीचं सगळं विसरूनही जातो आणि त्याची देखभाल अगदी आपल्या स्वत:च्या मुलासारखीच करतो
|
Akhi
| |
| Friday, February 08, 2008 - 4:34 am: |
| 
|
एकदम बरोबर पुनम.. जर कोणि चांगला विचार करत असेल तर त्याला पाठिंबा द्यायलाच पाहीजे घरातल्या लोकानी. आज किति तरी जण १का मुलाचा विचार करतत पण तर आर्थिक क्शमता असेल तर काय हरकत आहे १ पाउल पुढे जाउन मदत करायला.. अस विचार करायला पण खुप मोठ मन लागते. आणी शेवटी संस्कार महत्वाचे. आता आजकाल स्व:त ची मुले पण आई वडिलांची काळजी घेतिल अस नाही ना..... मग कुणाच आयुष्य आपल्या मुळे नीट मार्गावर येत असेल तर का नको??? कोणी म्हणेल कि, त्याचा पुर्ण खर्च करा पण घरी नका आणु विनाकारण Complications कशाला? त्यावर माझ मत अस आहे की, फ़क़्त पैसा माणसाच्या सगळ्या गरजा पुर्ण करत नाही. त्याला मानसिक आधार पण तितकाच महत्वाचा आहे. राहाता रहिला प्रश्ण नातेवाइक तर सगळे वाइट असतील अस धरुन कशाला राहायाचे? आपण असे संस्कार करुन त्याला strong बनवायच... कि ह्या जगामधे सगळ्याना तोंड देइल. बाळ जरा मोठ होइ परंत त्याला सगळ्या लोकां पासुन वेगळ ठेवा.... speaciallly अगाउ लोक..... त्याच्या बाल मनाची काळजी घ्या....
|
Vrusha
| |
| Wednesday, May 14, 2008 - 12:27 pm: |
| 
|
I wish to get more information of Pune orphanages. Also want to here your/your friend's experiences. Pls write to me if any of you have details. thnx
|
Mpa
| |
| Wednesday, May 14, 2008 - 7:56 pm: |
| 
|
व्रुशा तुम्हाला काय माहिति हवी आहे?
|
Vrusha
| |
| Wednesday, May 21, 2008 - 9:56 am: |
| 
|
I want - 1. addresses of good orphanges in Pune and how good their service is. 2. to know some experiences to understand problems while adjusting with kid. handle difficult situations when biological child is there at home, etc
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|