|
Ekrasik
| |
| Wednesday, May 21, 2008 - 6:36 pm: |
|
|
नायगारा च्या शेजारी Niagara on The Lake हे छोटस गाव आहे. तिथे नायगारा हुन Niagara River Parkway नी जाता येत. दुसराही रस्ता आहे, पण हा नायगारा नदी च्या काठावरुन जातो. सध्या Spring असल्यामुळे एका बजुला फ़ुलांनी बहरलेली झाड नि एका बाजुला नायगारा नदी अस सुंदर द्रुश्य बघायला मिळत. नायगारा ते टोरोंटो रस्त्यावर अनेक Wineries आहेत. Guided tours ची सोय आहे. Hamilton चे Royal Botanical Garden पण प्रसिद्ध आहे. http://www.rbg.ca/ Hamilton ला अफ़्रिकन लायन सफ़ारी आहे. http://www.lionsafari.com/home.html सफ़ारी मधे स्वत: च्या कार मधुन फ़िरायची सोय आहे. वाघ, सिंह आणि इतर अनेक प्राणी जवळुन बघता येतात.
|
Ekrasik
| |
| Wednesday, May 21, 2008 - 6:46 pm: |
|
|
फ़ुलांची आवड असणार्या साठी Royal Botanical Garden मध्ये सध्या Lilac Festival सुरु आहे. ३१ मे १,७ जुन ला Iris and Peony Festival आहे. www.rbg.ca
|
टोरांटो डाउन टाउनहून 'हिप्पो' टूर्सच्या बसेस निघतात. डाऊनटाऊन, आजुबाजूचा भाग, राणीसाहेबांचा थाट सगळं फिरवून लेक ओंटारिओमधे ह्याच बसची बोट करून फिरवतात. मजा येते.
|
Farend
| |
| Wednesday, May 21, 2008 - 10:10 pm: |
|
|
मृण्मयी, 'हिप्पो' म्हणजे बॉस्टन आणि आता SF मधे सुद्धा ती डक टूर्स म्हणून आहेत तसेच काही आहे का?
|
लोकहो, नायगर्याला जाताना खूप अंतराची road trip होत असेल तर विमानाने जाण्याचा पर्याय निवडा. मागच्या आठवड्यात नायगर्याला जाणार्या ६ भारतीयांच्या अपघाताची बातमी वाचुन वाईट वाटले. ३-४ वर्षांपूर्वी देखील अशीच बातमी ऐकल्याचे आठवते. ड्राईव्ह करणार असाल तरी भरपूर थांबे आणि विश्रांती घ्या. लगोलग परत येणे टाळुन तिथे मुक्काम करा. आपण देसी लोकांना ग्रूप बरोबर असला की लांब रोड ट्रिप किरकोळ बाब वाटते, पण safety first हे लक्षात ठेवा.
|
सगळ्याना Thanks a lott !! info दिल्या बद्दल.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, June 04, 2008 - 3:21 pm: |
|
|
http://www.torontohippotours.com/html/home.html ही त्या हिप्पो टुर्स ची लिंक! फारेंडा, हो तसलाच टूर आहे.
|
Mandarnk
| |
| Wednesday, June 04, 2008 - 4:17 pm: |
|
|
मी कालच नायगरा, टोरांटो ट्रीपहून आलो, त्यामुळे माझ्याकडे येकदम लेटेस्ट इंफो आहे! आम्ही नायगरा पासून चालत ५ मिनीटावर असलेल्या Imperial Suites या हॉटेल मधे राहीलो होतो. छान हॉटेल आहे, आणी मुख्य म्हणजे Maid of the Mist वगैरे चालत ५ मिनीटावर असल्यामुळे सोईस्कर आहे. रुम मधे coffee maker, fridge आहे. पार्कींग $ ५ आहे. नायगरा River Road वरुन पुर्ण दिसतो, आणी तिथेच खाली Maid of the Mist आहे, आणी जवळच Journey Behind the Falls आहे. या दोन्ही ठिकाणी चालत जाता येतं. तिथून कारने ५~१० मिनीटावर White Water Walk आहे, तिकडे नायगरा नदीच्या कडेने चालत जायला एक Trail आहे. तिथून अजून पुढे गेल्यावर Butterfly Conservatory आहे, तिथे २५०० फुलपाखरे पहायला मिळतात. Rides चे दर असे आहेत~ Maid of the Mist : $14.50 Journey Behind the Falls : $12.00 White Water Walk : $8.50 Butterfly Conservatory : $11.00 ही सर्व ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. सगळी वेगवेगळी तिकीटे घेण्यापेक्षा तिथे Adventure Pass मिळतो $ ३९ ला, त्यात ही सर्व ठिकाणे included आहेत, आणी एक दिवसाचा बसचा पासपण मिळतो. ( White Water Walk आणी Butterfly Conservatory थोडं लांब आहे, त्यामुळे तिथे जायला बस लागते, किंवा कारने गेलं तर पार्कींग free आहे.) टोरांटोला जायला आम्हाला Traffic मुळे दिड तास लागला. टोरांटो जवळ आल्यावर CN Tower दिसतोच, त्याच्या जवळपास Paid Parkings आहेत (दिवसाला $ १० साधारणपणे). इथे कार पार्क केल्यावर CN Tower आणी शेजारीच Rogers Center बघून झालं, की जवळच Harbourfront Center आहे, तिथून Boat Rides घेता येतात. बोटीतून टोरांटो च्या skyline चा मस्त view मिळतो. या Harbourfront Center ला CN Tower पासून चालत जायला १०~१५ मिनीटं लागतात, आणी जर कार नी गेलं तर परत Pay n Park मधे $ १० देउन पार्क करावी लागेल. त्यानंतर Downtown मधे कार मधून फिरायला मजा येते. मग Baldwin Street आणी Henry Street यांच्या Intersection ला रस्त्यावर मिटर पार्कींग आहे, आणी २-३ देशी रेस्टॉरंट आहेत, तिथे खाउन कार तिथेच ठेवून चालत ५ मिनीटात China Town ला जाता येतं (On Spadina Avenue) . या व्यतिरिक्त आम्हाला तरी टोरांटो मधे काही विशेष दिसलं नाही. हुश्शऽऽऽ जेवढं आठवलं तेवढं लिहून झालं, अजून काही आठवलं तर परत लिहीन!
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. /node/2241
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|