Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ह्याला जीवन ऐसे नाव ...

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » ह्याला जीवन ऐसे नाव « Previous Next »

Swatiyardi
Wednesday, September 17, 2008 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोली ची एक नुकतीच झालेली सभासद. "माझा अनुभव" ह्या सत्राखाली मला एक खुप जवळुन पाहीलेला अनुभव मांडावासा वाटतो आहे.
ही व्यथा आहे माझा एका अगदी जवळचा व्यक्तीची. एका मुलीची जिचे नाव रितिका. जी एका खुप शिकलेल्या, सुसंस्क्रुत मराठी घरातली मुलगी. घरतल्या सगळ्यांचीच लाडकी. मेहनत करून सोफ्टवेअर इंजिनीर झाली.
मुंबई मधे तिचाच कार्यालयात काम करणारा एक यु पी चा मुलगा अंकुश. दोघांची चांगली मैत्री झाली, कामामुळे. एकमेकांना कायम मदत करायचे. अशाच काही दिवसां नंतर रितिकाचा मनात त्याचा विषयी काही भावना निर्माण झाल्या. ज्या स्वाभावीक होत्या. तिने सहज म्हणून अंकुशला विचाराले की त्याचा मनात तिचा विषायी काय आहे. त्याने सरळ नकार दिला आणी वर हे ही सांगीतले कि "आमचा यु पी ला असाले प्रेमविवाह वगैरे प्रकार नसतात." ती मनातुन दुखावली गेली पण तिने तसे कही दाखवले नाही.
.
.......असेच काही दिवस गेले आणि ती नोकरी चा निमित्ताने पुण्याला गेली. ह्या काळात सुद्धा दोघांची मैत्रि होतीच. ती पुण्याला गेल्यावर अंकुशला कदचित तिची कमतरता जाणवु लागली आणि काहि दिवसांनी त्याने तिला लग्नाची मागणी घातली. रितिकाला काय करावे सुचेना. एकिकडे मेंदू सांगत होता 'नको' आणी एकिकडे मन सांगत होते 'हो' म्हण. तिने प्रथम 'नाही' म्हणून सांगितले.पण अंकुश तिला सारखा फोन करायला लागला. रडुन आरडुन तिला समजवायला लागला. त्याने एकदा तिला आत्महत्या करायची धमकी पण दिली. शेवटी रितिकाने हार मानली आणि 'हो' म्हणाली त्याला.

.......दोघांचा घरी कळाले. शेवटी सगळे ठरले आणी अचानक रितिकाला नवीन नोकरी ची संधी आली. नशीबाने अंकुशलाही तिथेच नोकरी मिळाली होति. नवीन नोकरी ला रुजु होतानाच रितिकाला यु के ला जायची संधी आली. आणी ती गेलीही. जायचा आधी एक सोपस्कार म्हणून दोघांचा साखरपुडा झाला.

......तिथे गेल्यावर मात्र अंकुशचा स्वभावात फरक पडू लागला. आधी तिचासाठी काहिही करायला तयार असलेला तो आता मात्र तिचावर मानसिक दबाव आणु लागला. "आमच्या यु पी मधे हे चालत नाही, असं करायचा नाही, असं बोलायचं नाही" वगैरे....वरती भर म्हणून "लग्नात किती खर्च करणार, हे पाहिजे, लग्न असेच व्हायला पहिजे" हे हि चालू झाले. रितिका खुप दुखावली गेली. हे असं काही होणार असं तिला वाटलं ही न्हवतं. तिने ह्या सगळ्या गोष्टी तिचा जवळचा मित्राला अमितला सांगितल्या. त्याने तिला आधार दिला. काहि वाईट होणार नाही असा विश्वास दिला. पण अंकुशचे हे वागणे चालुच राहिले. त्याने पैशावरुन तिचा घरचांना ही बोलायला सुरुवात केली. शिविगाळ चालु केली. त्याचे एकाले नाही तर लग्न मोडायची धमकी दिली.

हळुहळु रितिकाचा मनातुन तो उतरात गेला......कारण त्याचा खरा चेहरा तिला कळाला होता. आणी कुठेतरी तिचा अमित तिचा जवळ येत चालला होता. तिला कोणाचा हि आधार न्हवता. घराचे तिला बोलायला लागले की तिचा चुकीच्या निवडिमुळे सगळ्यांना हा त्रास होतो आहे. त्यांनिहि तिचाशी बोलणे टाकले. आधार होता फक्त अमितचा. दिवस दिवस ती रडायची अमित ला फोन करून सगळं मनातलं सांगायची आणि तो ही तिला कायम समजवून सांगायचा पण त्याला ही मनातुन रितिका आवडत होती आणी तिच्या बाबतीत हे असे व्हावे आणि आपण काही करू शकात नाही हे कळुन तो हि उदास व्हायचा.

....शेवटी धीराने रितिकाने निर्णय घेतला साखरपुडा मोडायचा. आणी तो तिने अंकुशला कळवला. हे ऍकाल्यावर त्याचा पारा चढला. त्याने रितिकाला बरबाद करायची धमकी दिली. तिचा घरी फोन करून तिचा वडिलांना शिविगाळ केली. त्यांनाहि धमकी दिली कि जर हे लग्न मोडले तर मी रितिका बरबाद करून टाकेन. तिला दुसर्या कोणाची होवु देणार नाही.
......काही दिवसांनी अमित ने रितिका ला प्रपोज केले. रितिका अजुनाच उदास झाली. तिला काय करावे सुचेना. तिचा आत्मविश्वासच कुठेतरी ढासाळला होता. तिची निर्णय घ्यायची क्षमताच गेली होती. का ती परत असा निर्णय घ्यायला घाबरत होती?
तिने शेवटी मला ह्या बद्दाल विचारले. काही वेळ मलाही सुचाले नाही कि तिला काय सल्ला द्यावा. परत विषाची परिक्षा घ्यावी का. पण मी अमित ला ही खुप जवळुन ओळखते. अतिशय शांत आणि गुणी मुलगा. कोणचा अध्यात ना मध्यात. स्वभावाने अतिशय चांगला. कोणालाही अगदि आवडावा असा. त्याने ही त्याचा मनातल्या रितिका बद्दलचा भावना मला सांगिलल्या. तिला होणाय्रा त्रासाबद्दल बोलताना त्याचा डोळ्यातले ते पाणि.....ते प्रेम्.....मला समजले....

....आणी शेवटी मी खुप विचार करुन रितिकाला अमित बद्दल एकदा तरी विचार करायचा सल्ला दिला........ति हि तयार झाली....आणी आता दोघे खुप खुश आहेत्.....पण अजुनहि अंकुश तिला त्रास द्यायचं सोडत नाही. एकाच ऑफिस मधे असल्याने सारखं तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. तिला फोन करुन धमकी देतो.....पण अमित चा आधार असल्याने रितिका आता परत खंबीरपणे उभी आहे. तिचातला हरवलेला आत्मविश्वास कुठेतरी परत येतो आहे फक्त अमित च्या आधारने......

पण राहुन राहुन वाटतंय मला.......कदाचित मी तिला चुकीचा सल्ला तर दिला नाही ना.....एकदा ठेच खावुन रक्तबंबाळ झालेली रितिका आता तरी सुखी होईल का? अंकुश चा त्रास कधी संपणार आहे तिचा आयुष्यातुन्....काय करावे तिने आता.......

ह्या प्रश्नांची उत्तारे मलाही मिळत नाहियेत्.......ह्यालाच का "जीवन ऐसे नाव"?

Admin
Friday, September 19, 2008 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/3639

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators