Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 30, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through May 30, 2008 « Previous Next »

Shanky
Sunday, April 27, 2008 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला पाहते रे तुला पाहते जरी पांगळी मी तुला पाहते

Dakshina
Monday, April 28, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Admin .
नंदिनी, बरं झालं बाई लक्षात आणून दिलंस ते.... Thanks



Prachee
Thursday, May 01, 2008 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ऐका... माझी लेक गाते..
ये इश्क हाये बैठे बिठाये...
जंगल दिखाये हां...:-)


Dakshina
Friday, May 02, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधा अकबर मी पाहीलेला नाही, पण त्यातले ख्वाजा... मेरे ख्वाजा.. हे गाणे रेडिओवर बर्‍याचदा (ऐकून कानाला बुरशी आली) वाजवले जाते. मी आपली माझ्या परीने त्याचा अर्थ लावत असे. २/३ आठवड्यांपुर्वी अनारकली लागला होता तो पाहीला.... त्यामूळे अकबर म्हणजे पृथ्वीराज कपूर आणी जोधा म्हणजे दुर्गा खोटे.... (पुढील सर्व समिक्षा हे माझे इमॅजिनेशन आहे, कारण मी नविन जोधा अकबर पाहीलेला नाही. )

तर... ही दुर्गा खोटे आपल्या लहानग्याला ( या लहानग्याच्या ठिकाणी तुम्ही दिलिप कुमार किंवा आपला ऋतिक याची कल्पना करा.. दिलिप ऐवजी खरंतर ऋतिक जास्ती टग्या दिसतो त्यामूळे तोच बरा...दिलिप तसा भाबडा हो...! खाजाच काय... देईल ते मुकाट खाईल.) खाजा खाण्याचा अग्रह करतेय.... (ती काय बाबा राजघराण्यातली, आणि तिचं पोरगं पण ते काय आमच्यासारखं बिस्किट थोडंच खाणार आहे?)
पहील्या ध्रुपदात ती त्याचे भारी कौतिक करते... म्हणजे... शाहोंका शाह, अली का दुलारा.... आणि हे सगळं त्याने खाजा खावा म्हणून. शिवाय म्हणे त्याने खाजा खावा म्हणून दरबारातले लोकही सर झुकाते है अवलिया.....

नंतर खाजा चे कौतुक, "छाया है खुमार तेरा".... (हे सगळं ती खाजा कडे पाहून म्हणते.)
आता इतकं करूनही कार्टं ऐकत नाही म्हणून ती "राजाजी, राजाजी' म्हणून पृथ्वी ला हाका मारते. आणि म्हणते.. आता बघू कसा हा खाजा खात नाही ते, दरबारातल्या शिपायाना सांगून हातपय बांधूनच खाऊ घालते कशी...


Ladtushar
Friday, May 02, 2008 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टु मच.... सहिच कल्पना इम्याजीन केली आहे...

Aashu29
Friday, May 02, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, सही. ह. ह.पु.वा

Sameer_ranade
Friday, May 02, 2008 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा हा... दक्षिणा..

आणि हो एवढं करुनहि तो खाजा खात नाहि म्हणुन सगळे वरती खुदा कडे बघुन विनवणी करतात, की खाउदे बाबा. पण हे पण त्या लहान्ग्याला कलत नाहि आणि तो पण त्यन्च्यात सामिल होतो.. :-)..


Dakshina
Friday, May 02, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे? मी इमॅजिन केलाय तसाच शीन आहे की काय पिच्चर मधे?


Sameer_ranade
Friday, May 02, 2008 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि नाहि अस काहि नाहिये गाण्यामधे. फक्त तुझ्या इम्याजिनेशन ला दाद दिली. हे गाणं अकबराच लग्न होतं त्या दिवशी काहि सुफ़ी गायक हे गाणं म्हणतात...

Dakshina
Friday, May 02, 2008 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू सगळ्ळे झाडून पिच्चर बघतोस वाट्टे...
कामधंदा काही करतोस की नाही?




Chinya1985
Friday, May 02, 2008 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा ह ह पु.वा!!!!!!!!!! भारिच लिहिलय!!!!

Sameer_ranade
Friday, May 02, 2008 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा आम्हाला आमच्या ऑफ़िशियल टुर मध्ये शिनेमा allownce पण मिळतो..
यायचय का आमच्या कंपनीत.. :-)..


Dakshina
Friday, May 02, 2008 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्कू.... काल रेस नावाचा सिनेमा पहायला थेटरात बसले असताना माझ्या बॉसचा कामासाठी फोन आला होता, मी सांगितले सिनेमा पाहतेय म्हणून....
आज त्याने विचारले, कुठला शिनेमा बघितला..? मी म्हनले रेस....
त्याने म्हनले.... असले शिनेमे बघू ने.....
म्हनून... मी आजपासून पिच्चर बघनार नाही....



Itgirl
Friday, May 02, 2008 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉसला विच्चाराचे ना की का रे बाबा,तुला बे कस्से माहीत रेस 'असला' शिनिमा हाय त्ये?? :P

Dakshina
Friday, May 02, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूला देते त्याचा नंबर ... तूच विचार

Itgirl
Friday, May 02, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्को बॉ, बॉस तुझा, फोनतो तुला, तेह्वा तूच विचार, तेच जास्त ठीक दिसेल

Farend
Friday, May 02, 2008 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'रेस' वरून भेदभाव करणे बेकायदा आहे म्हणून सांग बॉस ला :-)

Dakshina
Monday, May 05, 2008 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा बॉस म्हणेल, रेस पहा, नाही तर लावा.(अन्यथा खड्ड्यात जा) मला काय त्याचं...

Yogesh_damle
Saturday, May 10, 2008 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोरीताईंच्या "हे श्यामसुंदर राजसा" मधल्या ओळी-

"पानजाळी सळसळे का, भिवविती रे लाख शिंका"


Girivihar
Friday, May 30, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाजा मेरे खाजा, सुरेख कल्पना विस्तार.........

वाचुन मजा आली......


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators