|
Slarti
| |
| Wednesday, April 16, 2008 - 3:59 am: |
| 
|
हे महान होतं. तो पाईप पकडल्यावर दिसणार्या shockwaves ...एका ठोश्याने २० - २५ फूट उडणारे गुंड... ढाई किलो का हाथ चे प्रात्यक्षिकच जणू खरं तर एकदा गदर पचला की या सर्व लीला लिलया वाटू लागतात.
|
Shraddhak
| |
| Wednesday, April 16, 2008 - 5:12 am: |
| 
|
चित्रपट: छोटी बहू. दृश्य: छोटी बहू, शिल्पा शिरोडकर, कजाग सासू बिंदूला धडा शिकवू पाहते. म्हणजे घरातली कामे कधी नव्हे ते बिंदूला करायला लागतात. मग एकदम ती खाली कोसळते. डॉक्टर येतात. तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. डॉक्टर म्हणजे साक्षात धन्वंतरी. ते स्टेथास्कोपने सगळी तपासणी करून तिला ' पेसमेकर ' लावावे लागेल असे सांगतात. पेसमेकर म्हणजे ' सांस की मशीन ' असे स्पष्टीकरण पुढे येते. ( आता बिंदू सास असल्याने आणि पेसमेकर तिला लावायचे असल्याने त्याला सांस की मशीन म्हणाले असावेत.) दृश्यबदल: कादर खान आपल्या नाठाळ मुलगा व सुनेशी बोलत आहे. पेसमेकर उर्फ सास की मशीन लावायला पैसे हवेत. याच मुलावर सर्व आशा होत्या पण तो त्या आता धुळीला मिळवतोय. कादर खान: बेटा, तुम्हारी मां के इलाज के पैसे चाहिये.... मधला नाठाळ मुलगा: पिताजी, मै दे देता लेकिन अभी अभी हमने सारे पैसे अपने नये घर मे एसी मशीन बिठाने मे खर्च किये... कादर खान: वा बेटे, तुम्हारी मां को सांस की मशीन की सख्त जरूरत है और तुमने घर मे एसी मशीन बिठा ली... वगैरे वगैरे.
|
Deepurza
| |
| Wednesday, April 16, 2008 - 9:41 am: |
| 
|
लेटेस्ट कोणी वहिनी साहेब बघतय का सगळच अ. अ. आहे आई एक ही भाग चुकवत नाही कथानका शी काही घेण देण नाही साड्या बघायच्या असतात वहिनी साहेबाच्या आम्ही फार चिडवतो तिला. एखादा भाग असाच सन्ध्याकाळी पेपर वाचताना बघितलेला ती सई खलनायीका असुनही आवडली गोड पोरगी आहे. असम्भव न चुकता बघतो गेले १०-१५ दीवस सुलेखा दखवलीच नाही
|
Ladtushar
| |
| Thursday, April 17, 2008 - 8:57 am: |
| 
|
'नवरा माझा नवसाचा' नंतर सचिन पिळगावकर 'आम्ही सातपुते' हा नवा कोरा करकरीत चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. याच महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटावर आधारीत असल्याची चर्चा आहे. त्याची कथाही काहीशी तशीच आहे. सचिन यांनीही 'सत्ते पे सत्ता' मध्ये काम केले होते. पण त्यांनी हा चित्रपट 'सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' या मूळ इंग्रजी चित्रपटावरून प्रेरीत असल्याचे म्हटले आहे. पण याची कथा 'सत्ते पे सत्ता' शी मिळती जुळती आहे. ती अशी- पूर्णा (सुप्रिया) एक अनाथ मुलगी आहे. तिला अण्णा (अशोक सराफ) आपली मुलगी मानून ते सांभाळतात. अण्णांना स्वतःच्याही सहा मुली असतात. अण्णांची खानावळ आहे. पूर्णा अण्णांच्या किचनचा ताबा घेते. किचनमधील सगळं व्यवस्थापन ती घेते. भाज्यांपासून स्वयंपाकापर्यंत सारं काही ती बघते. सहाजिकच तिच्यामुळे खानावळीचा दर्जाही वाढतो. पूर्णाची अन्नपूर्णा होते. कांद्या ( सचिन) हा अण्णांच्या खानावळीला भाज्या पुरवत असतो. रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने कांद्या आणि पूर्णाचा संबंध येतो आणि दोघे विवाहबद्धही होतात. लग्नानंतर पूर्णाची भेट होते ती कांद्याच्या सहा भावांशी. हे सहा भाऊ म्हणजे अर्क आहेत. कुठलेही संस्कार त्यांच्यावर नाहीत. एकमेकांशी लबाडी करणे आणि परस्परांवर कुरघोडी करणे हा त्यांचा उद्योग. या सहा भावांची नावे अशी- बटाट्या (केदार), तांब्या (नयन), कोब्या (आनंदा), हरभर्या (वृषसेन), दोडक्या( सचिन कुलकर्णी) आणि सर्वांत लहान चिंगळ्या (स्वप्निल) कांद्याचे एकेक दिव्य भाऊ पाहून सटपटलेली पूर्णा अखेर त्यांना शिस्त लावायला पहाते. त्यासाठी कठोर उपाययोजना करते. एकेकाला चांगलेच सरळ करते. संस्कारहीन मुलांवर ती योग्य संस्कार करून त्यांना चांगल्या घरातली मुले अशी ओळख मिळवून देते. संतापी भावांना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याचे धडेही देते. पुढे काय होते, योगायोगाने या भावांची भेट पूर्णाच्या सहा बहिणींशी होते. आणि ते सगळे त्यांच्या प्रेमात पडतात. आता काय करायचं? कांद्या एक शक्कल लढवतो आणि त्या सहा बहिणींचे अपहरण करण्याची योजना आखतो. अण्णांना पत्ता न लागू देता तो हा प्लॅन आखतो. हा प्लॅन काय असतो? कांद्याचे भाऊ पूर्णाच्या बहिणीचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात का? पूर्णा याला संमती देते का? अण्णांना हे मान्य होते का? या सगळ्यांचा शेवट गो़ड होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'आम्ही सातपुते' बघायला पाहिजे.... हा कोपी क्याट बघायचा का ?
|
Aashu29
| |
| Friday, April 18, 2008 - 3:51 am: |
| 
|
सचिनचा नवरा माझा तरी काय bombay to goa ची true copy होता आणि आता सत्ते पे सत्ता . काहितरी नवं खुमासदार द्यायला काय होतं यांना? पक पक पकाक किती छान मग त्यापेक्षा.
|
Dakshina
| |
| Monday, April 21, 2008 - 9:24 am: |
| 
|
इतकंच काय? नवरा माझा नवसाचा मध्ये तो बोललेला नवस सोडून सगळीच कॉपी होती. थोडा Bombay To Goa आणि उरलेला साधू और शैतान...
|
Arc
| |
| Tuesday, April 22, 2008 - 3:56 am: |
| 
|
पक पक पकाक खरेच खुप मस्त सिनेमा होता. अर्थात सई परान्जपे आणि गौतम जोगळेकर ही नावे वाचुन कुणीही अगदी BLACK ने सुधा तिकीटे काढेल. सक्शम कुलकर्णी ज्योती सुभाष आणि नाना पाटेकर तिघान्ची कामे मस्त झाली आहेत त्यात.ती heroin थोडी डावी वाटली ह्या तिघान्पुढे.पण एव्हढीही वाइट नव्हती.
|
Aashu29
| |
| Tuesday, April 22, 2008 - 5:25 am: |
| 
|
ज्योती सुभाश कोण?पक पक मधली?
|
Arc
| |
| Tuesday, April 22, 2008 - 7:36 am: |
| 
|
आजीचे काम केलेली, ती सगळ्याच सिनेमात आजीचे काम छान करते. अभिराम भडकमकरच्या आम्ही असु लाडके मधेपण छान काम केले आहे तीने, तो पण छान सिनेमा आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 22, 2008 - 1:59 pm: |
| 
|
ज्योति सुभाष, प्रतिभावान अभिनेत्री आहेत. सुहास जोशी आणि त्या एकत्र एन एस डी मधे होत्या आणि त्या दोघीत कायम एक निकोप स्पर्धा असे. आत्मकथा या नाटकात त्या दोघी आलटून पालटून एकमेकीच्या भुमिका करत असत. त्यात डॉ. लागू, आनि शुभांगी संगवई ( गोखले ) पण होते. त्यानी मुलगी झाली हो, हे एक सुंदर पथनाट्य केले होते, पुढे याच नावाचा सिनेमाहि निघाला होता. अधांतर हे पण त्यानी गाजवलेले नाटक. या नाटकात, संजय नार्वेकर, भरत जाधव, राजन भिसे, लीना भागवत पण होते. मला त्यांची रुक्मावती कि हवेली, या सिनेमातली भुमिका पण खुप आवडली होती. या सिनेमात पुरुषपात्र नव्हते, त्यांच्यासोबत, उत्तरा बावकर, किट्टू गिडवानी, इला अरुण, पल्लवी जोशी आणि सोहिला कपुर या कलाकार होत्या. केवळ एका हवीलीत चित्रीत केलेला हा सिनेमा, आणि एकाच काळ्या रंगाचा पेहराव केलेल्या या कलाकार, असूनही, सिनेमा खिळवून ठेवत असे. हे कथानक परकिय आहे खरे पण याच कथानकावर, वाडा भवानी आईचा, या नावाचे नाटक आले होते, त्यात रोहिणी हत्तंगडी होत्या. आनंदी गोपाळ या कथानकावर एक मालिका आली होती, त्यातही त्यांची सुंदर भुमिका होती. त्या फ़क्त आजीच्याच भुमिका करत नाहीत, हे सांगण्यासाठी इतके लिहिले. आणखी एक ओळख म्हणजे त्या अमृता सुभाषच्या मातोश्री.
|
Ramani
| |
| Wednesday, April 23, 2008 - 5:10 am: |
| 
|
आर्क, आशु, दिनेशदा, एड्मीन मोड ऑन्: ह्यात अचाट आणि अतर्क्य असे काहीही नाहीय. कृपया विषयाला धरुन बोला. एडमीन मोड ऑफ़. काहीतरी अ आणि अ येउ द्यात की.
|
Dakshina
| |
| Wednesday, April 23, 2008 - 5:49 am: |
| 
|
अरे, मैंने प्यार किया वर लिहा रे कुणितरी..... प्लिज.... इतका (अ. आणि आ.) सिनेमा अजून तुम्ही बाकी ठेवलाच कसा ?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 24, 2008 - 3:23 am: |
| 
|
आभार रमानी. Admin चे काम ते करतीलच. आवडत्या अभिनेत्रीबद्दल, गैरसमज नसावा म्हणुन लिहिले आणि तसा स्पष्ट उल्लेख केलाच आहे पोस्टमधे. बाकी अ. आणि अ. ची निदान मायबोलीवर तरी कमी नाही हो.
|
Arc
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:15 am: |
| 
|
आवडत्या अभिनेत्रीबद्दल, गैरसमज नसावा म्हणुन .....त्या चान्गल्या अभिनेत्री आहेत ह्यात वादच नाही. माझेच वाक्य phrase करताना चुकले रमा or admin , plz सान्गु शकल का की मायबोलिवर commercially फ़ार चान्गला performance नसलेली पण तरीसुध्दा ज्याला वाखाणण्याजोगी कलाकृती म्हणता येईल अशा नाटक सिनेमाबद्दल कुठे पोस्टायाचे
|
Ramani
| |
| Thursday, April 24, 2008 - 11:26 am: |
| 
|
दिनेशदा!! तेवढे दिवे लिहायचे राहीले, आणि तुम्हे लग्गेच जड घेतलेत हो!! बर्रेच दिवसात इकडे काही नविन अ. आणि अ. आलं नाही म्हणुन लिहिल तसं!! गैर्समज नसावा! *ते, मदतपुस्तीकेवर, सारखे दिवे देउ नका अस सांगणारे तुम्हीच ना? तुमच्यासारख्या बुजुर्गांचा सल्ला ऐकला, तरी बघा!! आता नक्की कसं करु बाई? (क्लीपआर्ट्: एक हुकलेला चेहरा) *
|
Ramani
| |
| Thursday, April 24, 2008 - 11:28 am: |
| 
|
दुसरे एक्: माझे नाव रमणी आहे हो.

|
Farend
| |
| Thursday, April 24, 2008 - 12:16 pm: |
| 
|
Arc ते तुम्हाला येथे योग्य फळा पाहून लिहिता येईल.
|
Mansmi18
| |
| Thursday, April 24, 2008 - 7:54 pm: |
| 
|
कभी अलविदा ना कहना हा "अचाट आणि अतर्क्य" मधे येतो का?
|
Aashu29
| |
| Friday, April 25, 2008 - 2:45 am: |
| 
|
मनस्मि अगदि अ. आ. आहे तो सिनेमा आणि त्यातल्या पात्रांची प्रतारणेची कारणे कोणाला कळालि असतिल तो शिणेमा पाहुन तर जरा मलाहि कळु द्यात
|
Slarti
| |
| Friday, April 25, 2008 - 2:47 am: |
| 
|
मनोज, तो करण जोहरचा चित्रपट आहे, त्यामुळे तो जरी 'चाट आणि तर्क्य' असला तरी झोडायला काय हरकत आहे ?! त्याचे बाकीचे पापच तसे आहे...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|