|
Farend
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:25 pm: |
| 
|
बी धन्यवाद. '१:४० की लास्ट लोकल' त्याच्यासारखा वाटतो. लालू मोठा वीकेंड सत्कारणी लावलेला दिसतोय Mad Money साधा सिम्पल कॉमेडी आहे, पण बघण्यासारखा. Katie Holmes चे काम मस्त आहे. Clayton मला आवडला. अज्जुका, फ्रिडा वर येथे मेक्सिकन लोकांनी टीका केली होती. कदाचित राजपूत व जोधा अकबर सारखे असेल (किंवा जोधा अकबर व कोणीही )
|
Lalu
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:47 pm: |
| 
|
'बेस्ट फॉरेन फ़िल्म' nomination नसेल मग, मला वाटत होते तो मेक्सिकन मूव्ही आहे. farend वीकएन्डला दोनच पाहिले. बाकी काही आधीचे. मागे Rendition पण पाहिला. एकदा पहायला ठीक. 'स्वीनी टॉड' बघायचा प्रयत्न केला. पूर्ण होऊ शकला नाही.
|
लालू क्लेटन बद्दल अगदी अगदी गं ओक्के टाईप्स. लिहिलं होतं मागे मी. रेस पाहिला. TP म्हणून बरा आहे, पण बराच अ. अ. वाटला. ३ री ड मधल्या मुलानी रहस्य कथा लिहिल्या सारखा. एकदा याची फ़्रेन्ड त्याला फ़सवते, मग काय मग त्याची फ़्रेन्ड याला फ़सवते. आणि मग हा मरतो. आणि गेस व्हॉट तो नसतोच मुळी मेलेला, ते आधीचं ना सगळं खोट्टंच असतं!! वगैरे छाप
|
Shonoo
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:15 pm: |
| 
|
अज्जुके रेड व्हाईट अन ब्लू बद्दल लिहि पाहू सविस्तर. कसले मस्त आहेत तिन्ही? सिनेमाटॉग्राफी एकदम टॉप आहे तिन्हींची. त्याबद्दल जरा इन्सायडर व्ह्यू ने लिही बरं.
|
Farend
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:59 pm: |
| 
|
मैत्रेयी, ओव्हरकोट घालून प्रत्येक प्रसंगात गूढपणे वावरणारा माणूस शेवटी पोलीस निघतो असा शेवट आहे का?
|
lol फ़रेन्डा, पुलं ची एक कथा आहे ती आठवली मला. अघळ पघळ मधे आहे वाटते. एक अश्याच लहान पोराने लिहिलेली डिटेक्टिव कथा, "रक्ताचे थारोळे" त्यात कथानायक डिटेक्टिव झुंजार राव गुन्ह्याचा तपास करायला अप्पा बळवन्त चौक, विठ्ठल वाडी असे कुठे कुठे फ़िरतात अन शेवटी स्वत झुंजार राव च रक्ताच्या थारोळ्यात मरून पडतात असले काही तरी होते!! 
|
Chafa
| |
| Wednesday, May 28, 2008 - 1:46 am: |
| 
|
LOL MT! आम्ही पण पाहिला रेस. पण त्याच्या आदल्याच दिवशी JA बघितला असल्याने रेस बराच चांगला वाटला.
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 28, 2008 - 4:26 pm: |
| 
|
नाही रे फारेंडा.. कदाचित फ्रिडाच्या तपशीलात काही चुका असतील ज्या आपल्याला माहित नाहीत हे मान्य पण जोधा अकबर इतकी भीषण नाहीयेरे फ्रिडा. डिझाइन च्या बाबतीत तर अप्रतिमच आहे. आणि सगळ्यांचे performances पण छान. या दोन्ही बाबतीत जोधा म्हणजे कचरा पण बरा अशी आहे. काहीतरी तुलना नको रे करूस.. लालू, थ्री कलर्स बद्दल लिहायची हिंमत नाही गं बाई. माझी असली नसली अक्कल तोकडी आहे त्याबद्दल काहीहे लिहायला. अजून किमान २५-३० वेळा पहावी लागेल ती सिरीज तरच तिन्ही फिल्म्सना जरा तरी न्याय देता येईल मला लिहिण्यात.
|
Zakki
| |
| Wednesday, May 28, 2008 - 11:36 pm: |
| 
|
मंगळवारी आम्हाला फुकट सिनेमा असतो, म्हणून काल Indiana Jones, The Crystal skull तसेच Iron man असे दोन सिनेमे पाहिले. पहिल्यामधे अपेक्षेप्रमाणे जे दनादन मारामारी. सर्वांना मांजरीसारखी नऊ अयुष्ये असतात. अगदी Nuclear explosion मधून सुद्धा ते जिवंत रहातात. कारण तो lead lined दरवाजा असलेल्या रेफ्रिजरेटर मधे लपून बसतो म्हणून! दुसरा सिनेमा म्हणजे Iron man ची मारामारी. तुम्ही जर दहा बारा वर्षाचे असाल तर जरूर बघा!
|
काही दिवसांपुर्वी शौर्य हा चोरी केलेला चित्रपट पाहीला. काही महिन्यांपुर्वी इथे चर्चिला गेलेला 'अ फ़ेव गुड मेन' चित्रपटावरुन उचलेगिरी करुन त्याला हिंदु-मुस्लिम रंग देउन चित्रपट काढला आहे. इथे लिहिण्यात आलेला तो शेवटचा डायलॉगही थोड्याफ़ार प्रमाणात चित्रपटात आहे. बाकी सैनिक जर स्वत्:चा काय बरोबर काय चुक ठरवु लागले तर सैंन्यात अराजक माजायचे.
|
Farend
| |
| Thursday, May 29, 2008 - 3:33 pm: |
| 
|
चिन्या spoiler alert दिला नाहीस! Few good men चीच कथा उचलली आहे पण सादरीकरण एकदम चांगले आहे, निदान क्लायमक्स पर्यंत तरी. काही मूळ इंग्रजी व त्यावरून उचललेले हिंदी किंवा मराठी दोन्ही बघायला आवडले तसाच हा ही. यातील संवाद, राहुल बोस चे व के के चे काम आणि जवळजवळ पूर्ण चित्रपटभर ठेवलेला लाईट मूड त्यामुळे बघायला चांगला वाटतो. फक्त क्लायमॅक्स वेगळा आहे. त्यातील संवाद insensitively बोलल्यासारखे वाटतात. आणि मूळ ज्या गोष्टीमुळे के के तसा वागतो तीच येथे वेगळी आहे.
|
फ़ारेंड,चित्रपट वाईट नाहीये पण चांगला चित्रपट चोरी केला की नविन बनवलेला चित्रपटही ठिक बनतोच. केकेनी उच्च ऍक्टींग केलिय. पण राहुल बोस आर्मीतला वाटत नाही.
|
Farend
| |
| Thursday, May 29, 2008 - 7:03 pm: |
| 
|
राहुल बोस, ते मात्र खरे. काम मस्त केलेय त्याने पण. अरे आणि चांगल्या चित्रपटांची उचलताना पूर्ण वाट लावल्याची उदाहरणे काय कमी आहेत का हिन्दीत? The whole nine yards आणि दीवाने हुए पागल (का असाच कोणतातरी फालतू) एक कॉमेडी सुद्धा नीट न उचलता आल्याचे उदाहरण. Analyze This आणि हम किसीसे कम नही हे आणखी एक. म्हातार्या गॅंगस्टर चा रोल अमिताभने चांगला केला असता उलटा.
|
तरी कॉपी केल्याने त्याचे श्रेय बर्याच अंशी कमी होते.
|
Dineshvs
| |
| Friday, May 30, 2008 - 7:17 pm: |
| 
|
आज परत एकदा जोधा अकबर थिएटरला बघितला. मला तरी त्यातल्या खास घटकांसाठी परत बघावासा वाटला. पण इथे झालेल्या चर्चेनंतर मला जाणवलेल्या काहि आवडलेल्या तर काहि खटकलेल्या गोष्टी. यातल्या कलादिग्दर्शनाची करावी तेवढी तारिफ़ कमीच आहे. अक्षरशः नजर ठरत नाही. तीच गोष्ट दागिन्यांची. मुख्य कलाकारांचेच नव्हे तर सर्वच कलाकारांचे दागिने अत्यंत सुंदर आहेत. यातल्या कपड्यांची पण खुप तारिफ़ झालेय आणि तसे ते देखणे आहेतही, पण एकदोन प्रसंगात ते मला खटकले. त्याकाळी ब्लॉक प्रिंटिंग होते का ? म्हणजे लाकडाचे कोरुन ठसे करुन त्याने छपाई करत असत का ? सोनु सूदचा शेवटच्या प्रसंगातील अंगरखा तसा वाटतोय. आणि समजा जरी ती असली तरी ती हातानेच करायची असल्याने, एवढी सुबक असेल का ? तोच सोनु ज्याच्या मांडीवर प्राण सोडतो, त्या माणसाचा अंगरखा प्रिंटेड वाटतो. ते पण जरा अशक्य वाटतेय. मुख्य नाचातल्या गुजराथी कलाकारांच्यापैकी दोघी जणींच्या साड्या पण अश्याच प्रिंटेड वाटताहेत. अज्जुका, काहि प्रकाश टाकणार का ? यातल्या पहिल्या लढाईची दृषे, तोफ़ांची दृष्ये अप्रतिम आहेत. अश्या प्रकारचे कॅमेराचे कोन भारतीय सिनेमात तरी कधी बघितले नव्हते. पण त्यातल्या सैन्यांचा अगदी कवायतीसारखे आयताकृति रचनेत उभे राहणे खटकले. खुप पुर्वी तारा अलि बेग, दूरदर्शनवर पॅसेज टू इंडिया नावाचा कार्यक्रम सादर करत असत. त्यात दाखवल्याप्रमाणे, चाल करुन जाताना, सैन्याची रचना, बाणाप्रमाणे असे. म्होरक्या त्वेस्षाने मधे पुढे जात असे, व बाकिचे सैन्य दोन्ही बाजुने विस्तारत जात असे. असे केल्याने सैनिक थोडे असले तरी समोरच्याला त्याचा अंदाज येत नसे. शिवाय शत्रुचा सामना करण्यासाठी दोन्ही बाजुच्या सैनिकाना पुरेसा अवधी मिळत असे. या रचनेने, शत्रुच्या गोटात शिरणे सहज शक्य होत असे. असा रचनेचा काहि विचार इथे दिसत नाही. ख्वाजा मेरे ख्वाजा ची बरिच चर्चा झालीय. हृतिकचे त्या नाचात सामिल होणे, मला तितकेसे खटकले नाही. हा नाच तुर्कस्तानात अजुनही प्रचलित आहे. नॅशनल जिओग्राफिक वर दाखवला होता, मीना प्रभुंच्या तुर्कनामा मधे त्याचे सविस्तर वर्णन आहे. त्यानी तो नाच शिकायचाही प्रयत्न केला होता. एका ठाम लयीत स्वतःभोवती गिरक्या घेणे, सोपे नाही. तिथे तसा नाच खुप वेळ नाचतात. सध्या त्याला बाजारु स्वरुप आलेले असले तरी, त्यात भक्तीचा भाग आहे. ते पुस्तक असल्याने प्रत्यक्ष संगीताचा अनुभव नाही घेता आला, पण हे गाणे साधारण त्या पठडीतले वाटले खरे. आता तुर्कस्तानात लालभडक टोप्या आणि त्यावर काळे तुरे असतात. ते नाचताना गोल फ़िरतात. या सिनेमात टोप्यांचा रंग विटकरी आहे. त्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत, आणि वर गोंडा नाही. मीना प्रभुनी लिहिल्याप्रमाणे, हे नर्तक बसलेले असताना काळे अंगरखे घेतात आणि उभे राहताना ते काढून टाकतात, तसे सिनेमात नाही. असे ट्रान्समधे नेणारे संगीत जॉन अब्राहमच्या काबूल एक्स्प्रेसमधेदेखील एका प्रसंगात आहे. नॉट विथाऊट माय डॉटरमधे देखील आहे. आफ़्रिकेतील ख्रिश्चनांमधेदेखील टाळ्या वाजवत, डोलत प्रार्थना करतात आणि आपल्याकडचे नवरात्रीतले घागरी फ़ुंकणे पण त्याच प्रकारचे असते. म्हणुन मला हृतिकचे नाचणे खटकले नाही. ऐश्वर्या आणि हृतिक दोघेही नृत्यनिपुण असले तरी यात दोघांचे नृत्य नाही, पण त्यांची तलवारबाजी तितक्याच ताकदीची आहे. ऐश्वर्याचे पोश्चर्स जास्त देखणे आहेत. हृतिकने संवाद छानच पेलले आहेत, पण मला त्याची चाल खटकली. ती राजाची वाटण्या ऐवजी, रॅंपवरची वाटते. सावत्र भावाला मारण्याच्या प्रसंगात, तर तो किंचीत लंगडलाही आहे. एरवी फ़ालतु असलेल्या मंगल पांडे सिनेमात, राणी मुखर्जी ज्यावेळी जेलमधे जाऊन अमिरला ओवळते, त्यावेळी तिच्या ताम्हणात काड्यापेटीच्या जागी दुसरेच काहितरी असते, पण इथे मात्र हृतिकच्या हाती चक्क काडेपेटीतील काडी दिसते. ऐश्वर्याच्या जेवण रांधण्याच्या प्रसंगात, कॉलीफ़्लॉवर खटकले. एकतर त्या काळात ते प्रचलित होते का ती शंका आहे शिवाय तिच्या मेनुमधे कुठे त्याची गरज नव्हती. ( कदाचित पंचभेळी भाजीसाठी असेल. ) केर सांगरीच्या भाजीसाठी, त्या शेंगा म्हणजे आपल्या शमीच्या शेंगा काहि दिसल्या नाहीत. तसेच ते जेवण शाकाहारी का असायला हवे होते, तेही कळले नाही. तो काहि नेवैद्य नव्हता आणि रजपुत काहि शाकाहारी नसतात. जी भांडी दाखवली आहेत त्यात घीवरासाठी आवश्यक असणारे उभट गंज नव्हते, शिवाज शेवटी ज्या आकाराचे घीवर दाखवलेत ते मेजवानीच्यासाठी फ़ारच छोटे होते. ऐश्वर्या माहेरी आल्यावर, तिच्या आणि तिच्या आईचा छोटासा प्रसंग आहे. त्या प्रसंगात ऐश्वर्याच्या चेहर्यावर व्यवस्थित दुःखी भाव आहे, पण आईच्या चेहर्यावर काहिच टेन्शन दिसत नाही. एरवी रितभात पाळणारी आई, मुलगी कुणीही आणायला गेले नसतानाही, परत आलीय, याची अजिबात काळजी करत नाही ? कुलभुषण खरबंदा एकेकाळी देखणा होता. शान मधला राकाल, खास त्याच्यासाठी लिहिला होता, पण अलिकडे त्याचे संवाद ऐकवत नाहीत. अक्षरशः कुंथल्यासारखे बोलतो तो. बाकिचे स्वच्छ वाणीचे कुणी भेटलेच नाही का ? हृतिकची हत्तीशी झटापट श्वास रोखुन ठेवायला लावणारी आहे, पण त्या प्रसंगात एका बाजुला दगडी भिंत आणि दुसर्या बाजुला पोलादी भिंती हे काहि पटत नाहीत. कोल्हापुरच्या राजवाड्यात साठमारीसाठी लागणारी हत्यारे अजुनही बघायला मिळतात, त्यापैकी काहि तिथे दिसत नाहीत. शेवटी हृतिकचे हत्तीवर स्वार होण्याचे दृष्य सलग न घेतल्याने, मला दुसर्यावेळी बघताना, ते तेवढे थरारक वाटले नाही. इला अरुणचे सर्वच प्रसंग मला अनावश्यक वाटले. तिचे गाणे एकवेळ परवडले पण तिचे दर्शन, किळसवाणे आहे. ती तरुणपणीदेखील मला कधी आवडली नव्हती. वीणानंतर अशी करारी स्त्री कधी बघितलीच नाही. ( आठवा, पाकिजा मधली, तिने शहाबुद्दिनला घातलेली करारी साद. ) ऐश्वर्याची कृष्णाची मुर्ती पण आधुनिक वाटते. त्याचा भडक निळा रंग पटत नाही. शिवाय त्या काळातल्या पुजेतील मुर्तींचा चेहरा खासकरुन राजस्थानी मुर्तींचा चेहरा, वेगळा असेल, असे मला वाटते. यातल्या एकमेव नृत्याच्या नृत्यदिग्दर्शनाची पण खुप तारिफ़ झाली, पण वरुन घेतलेल्या दृष्यात, एक माणुस, रिंगण सोडून बाहेर गेल्याचे स्पष्ट दिसते. यात आसामचे तथाकथित नागा नर्तक आहेत. पंजाब किंवा हरयानामधील ( काश्मिरीदेखील असतील ) नर्तिका आहेत. बनारसच्या कथ्थक नर्तिका आहेत, मग राजपुतान्याच्या घुमर नर्तिका का नाहीत ? निदान जोधाने तरी स्वतःबरोबर आणायला हव्या होत्या. सिनेमात अनेकवेळा मोहोब्बत हा शब्द आलाय. लता मंगेशकरने एकदा सांगितले होते कि हा उच्चार तिने सुरु केला. पुर्वी या शब्दाचा उच्चार माहाब्बत असा केला जात असे. मूळ लेखनात, उकार संदिग्ध आहे. त्यामुळे मोहोब्बत आणि मुहोब्बत दोन्ही उच्चार प्रचलित झाले. फ़ारसी लिपित, उ, ऊ, ओ आणि व साठी एकच अक्षर वापरतात. रहमानच्या संगीताबद्दल काहि लिहिले तर अनेकाना रुचणार नाही, पण नुसताच ढॅणढॅण ताल देऊन, गाणी चांगली होत नाहीत, हे त्याला कुणी सांगेल हा ? एखादी पिरियड फ़िल्म करताना, त्या काळाशी सुसंगत संगीत नको का ? या गाण्यातला ताल, अजिबात पटत नाही. त्याच तालावर सगळ्याच प्रांततल्या लोकानी नाचायचे, हेही पटत नाही. तसा हा ताल काहि ठेका धरायला लावेल असाही नाही. ( आठवा मधुमतीमधल्या, बिछुवा, मधला ताल. ) पार्श्वसंगीतात त्याने थोडीफ़ार कल्पकता दाखवली आहे. हृतिक सासरी येतो त्यावेळी, कोरसने केलेले बसंत रागाचे गायन छान वाटते, पण तो प्रसंग लक्षात घेतला आणि स्थळ लक्षात घेतले तर, पधारो म्हारो देस, अशी देसमधली किंवा मांडमधली रचना हवी होती. त्याने जो ख्याल गायन प्रकार वापरलाय तोही तितकासा बरोबर नाही. खयाल गायकी फ़ार नंतर आली. तानसेन जरी दाखवला नसला तरी त्याकाळी बहुदा, ध्रुपद धमार गायकीच प्रचलित होती. तरानाही नंतर आला. पण आधी लिहिल्याप्रमाणे, हे सगळे दुसर्यांदा बघितल्यावर लक्षात आलेले मुद्दे. मला हृतिक आणि ऐश्वर्या मनापासून आवडतात, त्यामुळे आणखी एकदोनवेळा तरी मी नक्कीच बघणार आहे.
|
Prachee
| |
| Saturday, May 31, 2008 - 3:14 am: |
| 
|
फ़ारेंड, मला वाटतं Whole nine yards ची हिंदी नक्कल म्हणजे 'आवरा पागल दिवाना' हा चित्रपट आहे, 'दिवाने हुए पागल' नाही.
|
Ankyno1
| |
| Saturday, May 31, 2008 - 6:18 am: |
| 
|
दीवाने 'हुये' पागल हा there is something about merry ची नक्कल आहे....
|
Tonaga
| |
| Saturday, May 31, 2008 - 3:36 pm: |
| 
|
जोधा अकबर एका जीनियस दिग्दर्शकाचा फसलेला चित्रपट आहे. तरीही त्याला किमान दर्जा आहेच. गोवारीकरकडून फारच प्रगल्भतेची अपेक्षा होती पण त्याचा अगदी संजय लीला भन्साळी झालाय. एक देखणा पण मृत चित्रपट त्याने दिलाय.शोबिझ मध्ये आशय अगदी दबून गेलाय. तपशीलाच्या चुका तर आहेतच. कपड्याच्या बाबतीत अज्जुका यांनी त्रुटी दाखवून दिलेल्या आहेतच.आता जेवणाचे बारकावे दिनेश नाही तर कोण शोधणार.? दुसर्याच्या ताटाकडे असे बारकाईने पहाणे ब्याड म्यानर्स बरे दिनूभाऊ! ख्वाजा मेरे ख्वाजा चे नृत्य आहे ते तुर्की आहे. मीना प्रभूंच्या पुस्तकात त्याचे सविस्तर वर्णन आहे. त्या गायक भक्ताना दरवेश असे म्हणतात. यू ट्यूब वर ऑथेन्टीक नृत्ये अनेक ठिकाणी आहेत. इच्छुकानी बघावीत. यातले गायकांचे चेहरे अत्यन्त मद्दड वाटतात आणि बहुकोनीही. नृत्येही जोषपूर्ण नाहीत पण पहिल्यान्दा येतेय त्याचे नावीन्य. हृतिकचे शेवटी उठून नाचणे मलाही खटकले नाही.ख्वाजा गाणे मात्र क्लासिकच आहे. माणूस कधी ते आपोआप गुणगुणू लागतो कळतही नाही. रहमानचे संगीत उत्तम आहेच. रहमानच्या संगीताला 'मुरायला' वेळ लागतो. मात्र ते विसंगत आहेच. रहमान हा टेकनो विझार्ड संगीतकार आहे. रहमान फार कमी वयात संगीतकार झाला. .पंचविशीतच. त्याच्यावर भारतीय संगीताचे विशेषत्: लोकसंगीताचे अन शास्त्रीयही, संस्कार फारसे म्हणजे जवळ जवळ नाहीतच असे दिसते.त्याला तर हिन्दी देखील येत नसावी त्यामुळे शब्दांचे अर्थ वजन याची बोम्बच. मग मेहबूब सारखे निरर्थक शब्द चालून जातात. रहमान रशियन जपानी,स्वाहिली, पोर्टो रिकन, अफ्रिकन कुठल्याही गाण्याना संगीत देईल कारण शब्द त्याच्या दृष्टीने केवळ भारवाहू.... त्याच्यावर सिम्फनीज, ऑर्केस्ट्रेशनचा प्रभाव जास्त आहे.त्यात मात्र त्याचा हात धरणे अवघड आहे. ड्रमिंग, तालवाद्ये हे त्याचे शक्तिस्थान आहे. अन र्हिदमही. तसे त्याने लोकसंगीताचे प्रयोग करून बघितले नायकमध्ये राजस्थानी, तालमध्ये पंजाबी पण 'वो' बात जमी नही. ती गाणी उत्तम होती पण ऑर्केस्ट्रेशन पाश्चिमात्यच वाटत राहिले. विसंगत संगीत काही मोठ्या माणसानीही दिले आहे. उदा. जैत रे जैत. त्यातील गाणी अत्युत्तम आणि क्लासिक आहेत पण चित्रपटात ती एकदम उपरी आहेत. विशेषत्: लिरिक्स. गोष्ट घडते सह्याद्रीत अन गाण्यांचे शब्द आहेत खानदेशी. कारण गाणी म्हणून महानोरांच्या कविताच इम्प्रोव्हाईज केल्या आहेत. चावळ चालते हा शब्द जळगाव सोडून कुठे नाही. सकवार वगैरे. तसे रहमानचे संगीत उत्तम असूनही बर्याचदा उपरे ठरते. रहमान स्वत्: सिन्थेसायझरवर सगळे ट्रॅक कम्पोज करीत असल्याने मूळ वाद्यांचा 'आत्मा त्यात येत नाही हेही खरे. हल्ली वादकांचा ताफा लावणेही जिकिरीचे झाले आहे. त्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वाद्यावरच भर जास्त. पण हल्लीच्या संगीत कारात रहमान मला सगळ्यात जास्त आवडतो.... विशेषता जावेद अख्तर आणि रहमान म्हणजे दर्जाची हमीच जणू..... हृतिकने संवाद अन अकबराचे ग्रॅन्जर चांगलेच पकडले आहे.त्याची ही सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणावी लागेल अन आशुतोषचा सर्वात वाईट चित्रपट म्हणावा लागेल. कुलभूषण खरबन्दा खरा बघावा निशान्तमध्येच.' मुझे एक बार चेरमन बना दो साहब, मै ताबडतोब राजीनामा दे दूंगा असे कर्नाडला म्हणणारा. हरलेला सरपंच.पण हल्ली तो फार अन्डरप्ले करतो हीही बाब खरीच. इला अरुण स्वत्: ला रेशमा समजते. रेश्माच्या नखाचीही सर गायकीत नाही.ती अन रिचा शर्माही. दोघीही' 'रेकिस्ताना'तून आलेल्या. अभिनयही अत्यन्त उथळ उठवळ अन सुमार... आणखी एक, , अब्जावधीचे चित्रपट बनवणारे हे लोक दाढ्या अन मिशा अशा का भिकारड्या दर्जाच्या वापरतात नकळे? अगदी अम्बाडीसारख्या दिसतात त्या.... अगदी अमिताभला देखील इतक्या थर्ड क्लास दाढी मिशा लावतात की बस. ... उदा. बघा 'एकलाव्या' नावाचं पिक्चरडं!!!
|
Ajjuka
| |
| Sunday, June 01, 2008 - 5:00 am: |
| 
|
दिनेश, अज्जुका नाही काही प्रकाश टाकणार. मी टाकला प्रकाश की मला इथे कर्तुत्व नाही, लायकी नाही, आयत्या पिठावर रेघोट्या ओढते असलं काहीही ऐकायला लागतं आणि असं म्हणणार्यांच त्यांच्यामते बरोबर असतं कारण ते म्हणे खडतर परिस्थितीतून वर आलेले (खरं खोटं कुणाला महित!) असतात आणि त्यामुळे कुणालाही काहीही बोलायचा त्यांना अधिकार असतो. बाकी जोधा अकबर ही तद्दन भुक्कड फिल्म आहे आणि वेशभूषा दिसायला बरी (तीही फक्त २ व्यक्तिरेखांचीच!) असली तरी रिसर्च, ऐतिहासिक authenticity , अदब, व्यक्तिरेखेशी इमान राखणे या सर्व पातळ्यांवर प्रचंड मोठ्ठी बोंब आहे. सगळ्याच व्यक्तिरेखांसाठी. हे माझे मत आहे. ज्यांना या मताचा त्रास होत असेल त्यांनी हे मत चुकीचे कसे काय आहे याचा अभ्यासपूर्ण गोषवारा द्यावा. तीच वेषभूषा योग्य कशी आहे याचे ऐतिहासिक दाखले, व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने स्पष्टीकरण द्यावे.
|
Tonaga
| |
| Sunday, June 01, 2008 - 5:18 am: |
| 
|
कुलभूषण खरबन्दा खरा बघावा निशान्तमध्येच.'सॉरी, निशान्त नव्हे मंथन. निशन्त मध्ये तो नव्हता आगाशेबुवा होते. बाय द वे, मते व्यक्त करण्याच्या काही नम्र आणि सभ्य पद्धती असतात. तसे ते व्यक्त झाल्यास नुसत्या मतांवर टीका होण्याचे कारण नाही. अहंमन्य वंशश्रेष्ठतेचा तशा पद्धतीनेच समाचार घेतला जाईल....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|