Slarti
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:05 am: |
| 
|
... ... ... ......
|
Monakshi
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:38 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Cutepraju
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:29 am: |
| 
|
माझी आइ आमच्या पिठाच्या गिरणीवाल्या भय्याला सान्गायची " भय्या ये दळण जल्दी दळके चाहिये. और पीठ के उपर पीठ मत डालना!!
|
" आज़ा मेरे आन्ग पे, ले ले मेरा जीव" अरे काय हे!!!हे तर माझ्या हिंदीवरुन वरचढ झाल. परवा माझ्या एका मित्राच्या हातुन भाजिचे भांडे जोरात जमिनिवर आदळले आणि ती भाजी त्याच्या नाकातोंडात गेली. बेसिनसमोर तो डोळ्यात पाणी मारत होता मी त्याला म्हणालो ''ऐसे ओंजळमे पानी ले और उसमे आंखे डुबा"
|
Amruta
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:02 pm: |
| 
|
परव apple garden ला गेलेलो तेव्हा आमच्या बरोबर असलेल्या गुल्टी ला मी म्हंटल "ये देखो झाड पे कितने apple लगडे हुए है"
|
Rashmee
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:54 pm: |
| 
|
माझी एक आत्या खूपच शुद्ध मराठी बोलते आणी लहानपणी आम्हाला कधी कधी ती काय बोलतेय हे नीट कळायचं नाही. एकदा उन्हळ्याच्या सुट्टित आम्ही भावंड खूप हल्ला करत होतो आणी आत्याला झोपायच होतं. त्यावरून तिने आम्हाला दम दिला की अता एकाचा ही आवाज येता कामा नये, आणी तिच्या मुलानी तिच्याशी मुजोरी केली. तर आत्या त्याला म्हणाली "अता एक शब्द ही काढलास तर अशी थोबाडीत देइन की चार गटान्गळ्या खाशील" हे ऐकून माझी लहान बहिण जोराने रडायला लागली. सगळ्याना वाटलं ती घाबरली...म्हणून आजीने तिला जवळ घेऊन कारण विचारलं तर ती म्हणट्ली " आवाज आम्ही सगळे करतोय आणी आत्या फ़क़्त दादाला गटागट च्या गोळ्या देईन म्हणतेय" आधी कुणालाच कळलं नाही ती काय म्हणतेय आणी जेव्हा लक्षात आलं तेव्हा ह. पु झाली. हा incident खरं तर मराठी नीट न येत असल्या मुळे झालेला घोळ आहे पण कुठे पोस्ट करु न कळल्या मुळे ह्याच BB वर टाकतेय...
|
तर अशी थोबाडीत देइन की चार गटान्गळ्या खाशील" हे खुप शुध्द मराठी आहे??
|
Rashmee
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:44 pm: |
| 
|
नसेल तर हसून सोडुन द्या हो...माझ्या सारख्या Madhya Pradesh वाल्यां साठी ते अत्यन्त जड शब्द आहेत. कारण गटान्गळ्या हा शब्द अजून ही मला वाक्यात वापरता येत नाही.
|
>>>एकदा उन्हळ्याच्या सुट्टित आम्ही भावंड खूप हल्ला करत होतो कुणावर हल्ला करत होतात?
|
Meeradha
| |
| Thursday, November 22, 2007 - 11:35 pm: |
| 
|
आमचे शेजारी आणि watchman चा संवाद (शेजार्यांना श्राध्दासाठी गोवरी पाहिजे होती) शे.- watchman कहि गोवरि मिलेगी क्या? व.-गौरी? कौन गौरी साब? श.- अरे वो cow dung का. व.-काउदन्ग? ये सरनेम है क्या? श.- अरे नहि रे व.- नये लोग है building मे? शे.-अरे नहि वो गाय का गोल गोल होत है न वो चाहिये. व.- गाय कहासे आयी साब? शे.-अरे गोवरी मतलब गाय के संडासका(त्यांना बिचार्यांना गोबर हा शब्दच आठवत नव्हता) dry गोल गोल बनाते है ना वो चाहिये. व.वो क्या वो ला के देता है मै साब. पहले हि ठिक से बोलना चाहिये ना
|
meeraadha!! लोटपोट झालो हसून-हसून!! (आम्ही Bullshit ल 'सांडशी' म्हणतो! आम्ही भरतनाट्यम मुद्रा पण केली आहे त्यासाठी! ) असो- विषयाकडे. आमच्या मराठी मित्रमंडळातला एक मुलगा लग्न ठरवून इथे परतला, आणि आम्हाला पार्टीसाठी जेवायला घेऊन गेला. बरोबर त्याचा एक कानडी रूममेट पण होता. आता वेळ आली उखाण्यांची. ह्या नवरोबाला उखाणा काही सुचेना. मी त्याच्या कानात उखाणा सांगितला- तरीही. मला म्हणाला, "तूच घे!" "ऐका रे abc काय म्हणतोय!" अशी प्रस्तावना करून मी उखाण्याची पहिली ओळ म्हणालो, तोच आमचा अमराठी पाहुणा म्हणाला... "योगेश क्या बोलता है?" टेबलाच्या दुसर्या टोकावरून एक मित्र ओरडला- "वो ना, इसकी बीवी का नाम ले रहा है!" आमच्या आजूनबाजूच्या पाच टेबलांवर स्मशानशांतता- अर्ध्या सेकंदात आम्हीच आमच्याच वाक्यावर हसून खल्लास!!
|
Piapeti
| |
| Monday, December 10, 2007 - 10:05 am: |
| 
|
हसुनहसुन आता माज़े पोट खूप दुखतय
|
Ekrasik
| |
| Monday, December 10, 2007 - 7:00 pm: |
| 
|
meeradha, खत्री संवाद आहे. मी नेमका पाण्याचा घोट तोंडात असताना वाचाला... आणि अता monitor पुसतोय !! हसुन हसुन वाट लगली !!
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:15 am: |
| 
|
दोघीजणींचा आजच ऐकलेला किस्सा: पहिली: मैने कल केक बनाया था. दुसरी: मैने लास्ट वीक मे बनाया था. लेकिन मेरा केक फुगाच नही. तेरा केक फुगा क्या? पहिली: हां मेरा केक तो फुगा था..
|
मराठीत गाव हा शब्द ज्या अर्थाने वापरतात तो अगदी वेगळा आहे. उदा. पुण्यात गावात जातो म्हणजे लक्ष्मी रोड, सिटीपोस्ट अशा कुठल्यातरी अमेरिकन भाषेत बिझनेस डिस्ट्रिक्टला जाऊन येणे. सुट्टीला आम्ही मामाच्या गावाला जातो असे म्हणताना ते शहर आहे की खेडं ह्याचा गावाशी सन्बंध नाही. मात्र हिंदीत गांव म्हणजे खेडं. हिंदीतला गांव मराठीसारखा व्यापक शब्द नाही. माझा एक मित्र वारणसीचा रहाणारा. दुसरा पुण्याचा. बोलता बोलता हिंदी मित्राच्या शहराविषयी बोलणे चालू झाले. मराठी मित्र तो तुम्हारे गाव जानेको कितना टाईम लगता है? उ.प्र.मित्र: (खवळून) अच्छा? तो वाराणसी गांव है? तो क्या सिर्फ तुम्हारा पुना शहर है? मराठी मित्र गोंधळात पडला. ह्याला असे भडकायला काय झाले. मग मी दुभाषाची कामगिरी केली आणि समजावले. (असो. हा किस्सा महाराष्ट्राबाहेर घडला त्यामुळे लोक हिंदी का बोलत होते वगैरे विचारू नका. )
|
Hkumar
| |
| Sunday, January 20, 2008 - 7:45 am: |
| 
|
मस्कतमध्ये काम करणारे drivers जेव्हा भारतात आपल्या 'गावी' जावून येतात तेव्हा ते 'मुलुख मे जाके आये' असे सांगतात.
|
Aasavari
| |
| Wednesday, April 16, 2008 - 7:03 pm: |
| 
|
mazi aai ekda aamchya ithlya bihari bhabhinshi boltana mhanali hoti,'' are aap apne bete ko topda bandho nahi to usko pavan lagega to sardi ho jayegi''.
|
मीराधा, ह ह पु वा....खुपच मजेशीर संभाषण आहे...मी आता हा बी. बी. ऑफ़िस मधे असताना वाचायचा नाही असे ठरवले आहे..... माझा नवरा हिंदी भाषक आहे...त्याच्याशी बहुतेक बोलणे हिंदीतुन होते आणि मुलाशी मराठीतुन. पण कधी ह्या दोघांशी एकत्र बोलतान तर कधी बोलण्याच्या ओघात मराठीतुन हिंदी, हिंदीतुन मराठी असे बोलले जाते. एखाद्या वेळेस अगदी चपखल शब्द नाही मिळाला तर मी मराठी शब्द ठोकुन देते. काही नमुने- "तु उसका ज्यादा कौतुक मत कर, वो तेरेही सर पे मिर्या वाटेगा" "इसका सोने का कोइ लक्षण नही है" "येह तो मस्त टेबल के नीचे बैठ के फ़राळ कर रहा है" (मुलाने चीरिओ चा डबा खली ओढुन घेतला होता आणि खाणे चालु होते) "प्रीति और अभी आ रहे है उस दिन प्रीति का फ़ास्ट है तो मै सब के लिये फ़राळ ही बनाती हु" "आज इडली का आटा अच्छा फ़सफ़सा है" "इस बार गणेश वेल अच्छा उतरा है" (हे त्याच्या साफ़ डोक्यावरुन गेले. गणेश वेलाचे बी ज्यात लावले तो पॉट गळका असावा असे त्याला वाटले आणि तो म्हणाला- दुसरा अच्छा पॉट लाते है.)
|
माझ्या कार्यालयात तर 'कुर्सी में मांडी डालके बैठना' हा शब्दप्रयोग एकदम रूढ झालाय आणि इतरांचे सोडा उत्तर भारतीयही बिनधास्त वापरतात!
|
Itsme
| |
| Thursday, April 24, 2008 - 8:15 am: |
| 
|
miradha, मस्तच ... cinderella, बिचारा तो मुलगा, कुठली भाषा बोलणार कोण जाणे ? तो फोन वरचा किस्सा पण टाक की 
|