Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 03, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through April 03, 2008 « Previous Next »

Chaffa
Tuesday, March 04, 2008 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आगदी असाच प्रयत्न या झकास आणि सम्याने माझ्यावर केला होता पण मी या मंडळाचा करपॉन्डस मेंबर असल्याने तो फ़सला होता.
ह्या फ़सलेल्या प्रयोगाबद्दल बोलतोय मी सम्या कळलं का? यातही सुरुवात झकासने केली होती.


Zakasrao
Wednesday, March 05, 2008 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर असच पिडायच म्हणुन सुरु केलेला हा उपद्व्याप होता.
पण त्याने अचानक मोठे रुप घेतले. :-)
ती फ़ाइल पाठवली होती त्यात काहीच नव्हत फ़क्त मोठ्या अक्षरात लिहिल होत "मायबोली बकरा" झाल्यावर तुम्हाला कस वाटतय :-)
अर्थात स्वाती पुर्ण फ़सली नाहीच.
अर्धीच फ़सली. पण तिने कॉम्प रीबुट केला हे नक्की.
चाफ़्या हो रे हो. तोच प्रयोग तुझ्यावर ट्राय केला होता. पण तु ओळखलेस लग्गेच.


Yogesh_damle
Sunday, March 09, 2008 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज गेटवेवर live साठी होतो. त्या हजारो कबूतरांपैकी नेमकं एक आजारी कबूतर समोर आलं- जेमतेम चालत होतं. ते गाडीखाली- कुणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून त्याला उचलून आडोशाला ठेवायला गेलो- त्याने नेमकी हातात शी केली. मी ती धुवायला बाटली उघडली तर कॅमेरामन चिडवू लागला- "अरे, त्यांना चणे खाऊ घालतात ना, तेच बारीक पीठ होऊन आलंय- त्यात काय? उलट थोडं पाणी वाचेल!"

हसू ओसरल्यावर म्हणालो, "तू तर बोलूच नकोस रे! असं कर तू ही उद्यापासून हात नको धुवूस!! भाज्या आणि भातच आहे- थोडं पाणी वाचेल!!"


Dakshina
Monday, March 10, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, भलताच इब्लिस हो तुमचा मित्र...

Chyayla
Tuesday, March 11, 2008 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या .... अरे आमच्या योग्या काय कमी ईब्लिस आहे?

Zakasrao
Wednesday, March 26, 2008 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या
एकुणात अस दिसतय की तुझा आत्म्याचा खुन वै होण बंद झालय :-)
तर मंडळी हा एक किस्सा.
ह्यात मी फ़क्त प्रेक्षक होतो.
आम्ही ४-५ मित्र जमलो होतो. टवळक्या सुरु होत्या.
आणि एका मित्राचा फ़ोन वाजला. तो महाईब्लिस प्राणी आहे.
त्याने फ़ोन उचलला तर पलिकडुन क्रेडिट कार्ड घ्या वाला मुलगीचा आवाज.
तिने सुरु केल की सर आप हमारा क्रेडिट कार्ड लिजिये वै.
त्यावर आपल टिपिकल सभ्य उत्तर असत ते म्हणजे नाही नको माझ्याकडे आधीच आहे वै वै.
पण हा मित्र कधी कोणाला सरळ उत्तर देइल तर शप्पथ.
ह्याने तिला राउंडात घ्यायला सुरु केल. लाउडस्पीकर ऑन केला. आणि पुढे बोलला की हो हो मला हव आहे. पण मला सांगा तुम्ही मला किती देवु शकता??
पलिकडची मुलगी गोंधळात पडली.
ह्याच पुढे सुरुच.
की आता इथे माझ्या सोबत ५-६ मित्र देखील आहेत आणि त्याना देखील द्यायच आहे क्रेडिट कार्ड. ते मीच घेवुन देणार आहे.
अशी मला बरीच कार्ड हवी आहेत. माझ एक स्वप्न आहे की मी माझ विजिटिंग कार्ड देतो तस मला क्रेडिट कार्ड वाटायची आहेत सगळ्याना.
मग मी एकदम २०० घेतले तर मला तुम्ही कन्सेशन द्यायला हव वै वै.
तोवर आम्ही सगळे इकडे हसुन हसुन बेजार झालो होतो. इतक्या मोठ्याने हसत होतो की त्या मुलीने त्याला विचारल " सर आप ऐसे क्यो हस रहे है? आप मेरा मजाक उडा रहे है." पण हे बोलताना ती मुलगी देखील स्वताच हसु आवरु शकली नव्हती.
त्यावर मित्राच उत्तर नेहमी तर फ़ोन करुन करुन तुम्ही आम्हाला बोअर करता मग एक दिवस मी जर तुम्हाला बोअर केल तर काय बिघडल. :-)
फ़ोन कट झाला पलिकडुन.
मस्त आहे ना आयडीयाची कल्पना?? :-)

त.टी. : कोणी जर हा कॉल सेंटर वाल्यांचा अपमान समजत असेल तर तो आ. बु. दो. स.



Yogesh_damle
Thursday, March 27, 2008 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या आत्म्याचा खून? साला आपला आत्मा तितकाच 'खुनशी'बी हाय!!
:-)

आत्ता दोन दिवस घरी जाऊन आलो, Voters' ID card बनवून घ्यायला. तिथला एक बाबू लोकांकडून बिनापावतीचे वीस-वीस रुपये मागत होता नव्याने I-Cards बनवायचे...

त्याला तिथल्यातिथे झापून "पावत्या का नाही दिल्यास" म्हणून लंबे केलं, आणि सगळ्यांच्या पावत्या फाडायला लावल्या.

पावत्या लिहाव्या लागल्या मूळ पंचवीस रुपये रकमेच्या. म्हणजे खालून उकळलेले २० तर गेले, वरून पदरच्या पाच रुपयांनी पाप धुवावं लागलं.

बाहेर पडतांना माधव आपटे चावल्यासारखं वाटत होतं! :-)


Kashi
Friday, March 28, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सा. बा. मोठ्ठ्या आवाजात टी.व्ही. बघत होत्या..... सिरीयल मधे बेल वाजली... मी मुलाला मुद्दामुन ओरडुन (तो वर होता) सांगीतले दार उघड... बेल वाजते आहे... सा. बा. गडबडुन उठ्ल्या व मी दार उघडते म्हणाल्या..... व दार उघड्ले.....

Prachee
Friday, March 28, 2008 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही काशी

Sonchafa
Friday, March 28, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही काशी.. खरच ह्या टी.व्ही वरच्या प्रत्येक सिरियल मधे प्रत्येक मिनिटाला एकदा बेल वाजली तर काय बहार येईल.

Dineshvs
Friday, March 28, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सोनचाफ़ा, बर्‍याच दिवसानी !!!
वाटले, मराठीच विसरलीस कि काय ?


Athak
Saturday, March 29, 2008 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायका समरसुन एकरुप होवुन सिरिअल बघतात हेच खरे :-)

Limbutimbu
Saturday, March 29, 2008 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पण तिने कॉम्प रीबुट केला हे नक्की.
आयला, मागे एकदा हा झक्या जीटॉक वर मला बोल्ल्याच आठवतय की चौकोन चौकोन दिस्ताहेत! तेव्हा मी त्याला अरे डब्ब्या तुला चौकोनच दिसणार अस चिडवल अन त्यालाच मशिन बुट करायला सान्गितल्याच आठवतय!
आता त्याला चौकोन दिसत असल्याने तो वाचू शकणार नाही काहीच म्हणजे त्याचा उपयोग नाही म्हणुन मी जीटॉक बन्द करुन झोपी गेल्याची पुसट आठवण हे! :-)
थोडक्यात काय? या झक्याने तो प्रयोग माझ्यावर करायचा प्रयत्न देखिल केला होता तर! :-)
चान्गल हे! तरी बर, मला जीटॉक वर कोणी फारसे मित्र मैत्रीणी नाहीत, नाहीतर दिवसातून दहावेळा मला उल्लू बनवल अस्त या लोकान्नी!


Sonchafa
Wednesday, April 02, 2008 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक, ह्या बायका नव्हे काही.. ह्या सा.बा. म्हन्जे सासूबा(यका) समरसून टी.व्ही. सिरियल्स बघतात. घरातला टी.व्ही. च उचलून बाहेर फ़ेकून द्यावासा वाटतो. आमच्या सा.बा. कधी येऊन जाऊन असतात आमच्याकडे. सगळ्यात हाईट म्हणजे स्वत्: बघतात तर बघतात वर मला इंटरेस्ट असल्यासारख्या सिरिअल ची स्टोरी सांगतात.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार झालं! :-(..

नमस्कार दिनेश, मराठी कशी विसरेन
पोस्टायला काही वेळ होत नाही इतकच.. लिहिते आता काहीतरी..


Kashi
Wednesday, April 02, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा.............. तुला १००% मोदक... माझी ही सध्या हीच परीस्थिती आहे.... संध्याकळी बघीतलेला एपीसोड परत दुसर्‍या दिवशीही त्याच उत्साहात बघतात...

Hemantp
Wednesday, April 02, 2008 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रेडीट कार्ड वरुन मलाही एक ईब्लिसपणा चा किस्सा आठवला.
एकदा मला असाच फोन आला. ती मुलगी ईंग्लीश मधे कार्डची माहीती देत होती. मी तिला मधेच थांबवुन हिन्दी मधे बोलण्यास सांगितले. मग तिने हिन्दी मधे बोलणे सुरु केले. सगळी माहीती सांगुन कुठे काम करता असे विचारले. मग तिने काय काम करता असे विचारले. मी तिला 'मी इथला सीक्युरीटी गार्ड आहे' असे उत्तर दिले. तिने एका क्षणात फोन ठेवुन दिला.


Dakshina
Wednesday, April 02, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी.....
(उफ़्फ़्फ़ ये चार शब्द.. )


Manjud
Thursday, April 03, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा, काशी अनुमोदन

माझ्या सा. बा. सध्या पुण्याला गेल्या आहेत. काल रात्री १०.३०ला अचानक आमच्या लक्षात आलं की अरेच्या, दोन दिवसात आपल्याकडे टिव्हीच लावला गेला नाही.

आणि हाईट म्हणजे नणंदेचा ५व्या मिनिटाला फोन आला की भाची (तिची मुलगी) परीक्षा आहे तरी अभ्यास करत नाहीये. आईबरोबर सारखी टिव्हीच बघत्ये...


Arun
Thursday, April 03, 2008 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलेला इब्लिसपणा च्या नावाखाली सा. बा. बद्दल च्या कुचाळक्या चालल्या आहेत ना ???????????? :-)

दिवे घ्या गं मंजूडी, N काशी आणि सोनचाफा ......... :-)


Manjud
Thursday, April 03, 2008 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अ. आ. चष्मा चढवा डोळ्यावर ती नुसतीच काशी आहे N काशी नाहीये.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators