|
Preetib
| |
| Tuesday, April 22, 2008 - 1:56 pm: |
|
|
राजकुमारी, सगळे समजु शकतात, की तु काय परिस्थितुन जात आहेस, पण तुझा आत्मविश्वास सोडु नकोस. तुला सुखी होन्याचा पुर्ण अधिकार आहे आणि तु नक्की होशिलच.
|
अहो राजकुमारी,शिव्या काय त्या माणसाच्या समोर जाउन प्रत्यक्ष द्यायच्या नाहियेत!!!!!!अजुनच प्रॉब्लेम वाढवुन घ्याल. बर झाल आधीच विचारल ते!!! मी फ़ारही लहान नाहीये माझ्या आयडीवरुन वय लक्षात येतच. दुसर म्हणजे मन:शांती- तुम्हाला एका दिवसात कुठल्याच उपायाने मिळणार नाहीये. ते अशक्य आहे. मन:शांतीसाठी खुप प्रयत्न घ्यावे लागतील. इन्स्टंट फ़ुडसारखी इन्स्टंट मन: शांती नाही मिळू शकत. म्हणुनच मी तुम्हाला पुस्तक वाचायला सांगितली होती. एखार्ट टोल्ले च 'पॉवर ऑफ़ नाउ' वाचा. दुसर म्हणजे त्या शिव्या त्या लोकांपर्यंत पोहोचवुन काहीच होणार नाहीये. कारण तुमची व्हायची तितकी हानी झालेलीच आहे,आता त्या माणसाची आणखी हानी कशाला??आपल्याला फ़ुड पॉइसनिंग झाल्यावर आपल शरीर कसं उलटीद्वारे ते पॉइझन बाहेर फ़ेकुन देत??त्याचप्रमाणे तुमच्या मनातील पॉइझन बाहेर काढायला या शिव्या उपयोगी पडतात. मी स्वत्: हा प्रकार केलेला आहे,खुप हलक हलक वाटत. हा प्रकार करण्यापुर्वीच बालिश वगैरे म्हणु नका,त्यामुळे तुम्ही जेंव्हा ते करत असाल तेंव्हाही 'करायच म्हणुन करु' अस कराल, sincerely करणार नाही. मी माझ्या पोस्टमधे १) अंतर्गत काही प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरे काय आहेत???
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 23, 2008 - 3:05 am: |
|
|
राजकुमारी, एकटे राहंआर्या बहुतेक स्त्रियाना नातेवाईकांकडून हाच अनुभव येतो. हे मी आजचे सांगत नाही, तर तीस वर्षांपुर्वी रेडिओवरील एका गाजलेल्या निवेदिकेची दूरदर्शनवर मुलाखत झाली होती, त्यावेळी तिने हे सांगितले होते. खरे तर एकट्या माणसाला खुप काळजीपुर्वक आर्थिक नियोजन करावे लागते. आपण कुणासाठी काहि केले तर त्या बदल्यात परतफ़ेडीची अपेक्षा ठेवु नये हेच उत्तम. हे लिहिणे सोपे आहे पण आचरणात आणणे, कठिण आहे. पण अशक्य नाही. आपण जे करतो ते आपला स्वभाव आहे म्हणुन, आणि खरे तर आपल्या आनंदासाठी करतो. हे सत्य मनात ठसवावे. शिवाय आपल्यालाही कुणीतरी मदत केलेलीच असते, त्या प्रत्येकाची परतफ़ेड आपल्याला कुठे जमलेली असते. मग या ना त्या रुपात आपण त्याची परतफ़ेड करतोय असे मानावे. आपण त्याचे केले म्हणुन त्याने आपले करावे, या अपेक्षेचे फ़ार ओझे होते. जो करे उसका भला, ना करे उसकाभी भला. आणि तसे अमुक एकाच्या मदतीशिवाय आपले अडते, असे थोडेच आहे. आपले आपल्याला मार्ग सुचतच जातात. आणि ते आपल्याच शोधायचे असतात, असे म्हंटल्यावर जरा लवकरच सुचतात. शिव्या देणे, दुषणे देणे, हे मार्ग मला व्यकिशः पटत नाहीत. मी आयुष्यात कुणाला अपशब्द वापरलेले नाहीत. त्यामुळे कुणा एकासाठी मी माझे तोंड कशाला विटाळु ? रागाच्या बाबतीत, माझे विचार वेगळे आहेत. आपल्याला राग येतो त्यावेळी त्याला कारणीभूत एखादी व्यक्ती वा तिची कृति असते. राग येण्यात आपली बरीच मानसिक आणि शारिरीक शक्ती खर्च होते. अशी शक्ती खर्च करुन समोरच्या व्यक्तिवर अपेक्षित परिणाम होतो का ? तसे होत असेल तर अवश्य रागवावे. जर त्या व्यक्तिला आधीच पश्चाताप होत असेल तर आपली शक्ती का वाया घालवा ? आणि समजा तूम्ही त्याच्यासमोर उघडपणे रागावु शकत नाहीत, किंवा त्याच्यापर्यंत तूमचा त्रागा पोहोचत नसेल, किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम होत नसेल तर का म्हणून आपली शक्ती वाया घालवा ? म्हणजे बघा, रागावण्याचे फ़ायदे किती कमी परिस्थितीमधे होतात, मग का रागवा ? अध्यात्म वगैरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. वेळ घालवणे महत्वाचे. वेळ सत्कारणी लावणे अधिक महत्वाचे आणि वेळेचा सदुपयोग करुन स्वतःला आनंद मिळवणे सर्वात महत्वाचे. काय, जमेल ना ?
|
Rajkumari
| |
| Thursday, April 24, 2008 - 6:54 am: |
|
|
दिनेश, तुम्ही सांगितलेला शब्द न शब्द पटला... मला ही हळू हळू जमू लागलेय. मी संबंध कमी केल्यानंतर मला सर्वात जास्त जाणवले ते म्हणजे त्या लोकांचा माझ्याबाबतीतला कन्सर्न आधीच लिमिटेड होता.... मीच काय ती धावून धावून सगळा जीव पणाला लावत होते. पण आता मला कळून चुकले की इतकं करणं काही गरजेचं नसतं. एक दिलं तरिही एक मिळतं आणि दहा दिले तरिही एकच... मग... बाकीचे जास्तीचे ९ कष्ट आपण वाया कशाला घालवा? पण हा झाला व्यवहारी विचार, तो काही प्रत्येक वेळी म्हणण्यापेक्षा आपल्या माणसांच्या बाबतीत नाही वापरता येत. आपण केलेली मदत परतफ़ेडीची अपेक्षा न ठेवता करावी हे खरंय दिनेश. पण मी पाहीलेलं आहे की लोक अशा मदतीला सोकावतात. एकदा निरपेक्ष मदत केली की पुढच्या वेळी पण त्याच प्रकारच्या मदतीची अपेक्षा ते करतात. rather i would say, they only remember you when they need any help, especially when it is a monitory. unbelieveable. आपण कुणाचा तरी उपयोग करून घेतोय, किंवा कोणाचं तरी आर्थिक शोषण करतोय असा विचार त्यांच्या सद्सदविवेक बुद्धिस पडत नसेल का? की पडत असूनही ते काणाडोळा करत असतील? मझ्या कौन्सिलरच्या मते ते तसं करतात. त्यामूळे आपणच त्याच्या बाऊंड्रीज ठरवायला हव्यात. आणि आत्ता या घडीला तर मला माझे अर्थिक नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले पाहीजे. 'उद्या' कोणी पाहीलाय? नाही का? रागाच्या बाबतीत मी थोडी माथेफ़िरू आहे असे म्हटले तरिही वावगे ठरणार नाही. पण सुदैवाने माझ्या तोंडून रागाच्या भरात अपशब्द, शिव्या कधीही बाहेर पडत नाहीत. आवाज चढतो, पण माझे मलाच हेल्पलेस वाटते, त्याहूनही दुबळे झाल्यासारखे वाटते. आणि एकूणात आलेल्या अनुभवातून आजकाल रागावर नियंत्रण ठेऊ शकते आहे, पण त्याचे रूपांतर हे Emotional vulnerability मध्ये होतंय असं मला जाणवतंय.
|
Mee_na
| |
| Thursday, April 24, 2008 - 10:15 pm: |
|
|
hello gori mala kalale tumache dukkha. khar tar mala pan aahe te dukkha. navara guni, pan pakka phanas. mag micha wichar kela .. jau de pratek manasacha ek swabhav asto. ani to tyachya mul swabhavapekha phar nahi badalu shakat. so mag mi khup god maitrini jamawalyat. jyana mazhyashi god bolata yeil... tumachya mazhyasarakhya... bhavana expresskaratil. tyanchya barobar mi picturla jate , shopping la jaate, festivals celebrate karate. i created my own world.. which will subsititute my phanas navara. navaryala hi kahi tya baddal watat nahi. u can try that. we both r happy now. thode flirting/romantic pana jo ki navaracha karu shakato te .. nahi karayala milat te ek janavate. pan te mi sodun dile aahe. because i know those feelings are there.
|
Aashu29
| |
| Friday, April 25, 2008 - 2:41 am: |
|
|
फ़णस नवरा म्हणजे नक्की काय? आतुन गोड बाहेरून काटे म्हणजे कडक असा प्रकार आहे का? तसे असेल तर राजकुमारीची केस एकदमच वेगळी आहे. पण खरय मैत्रिणींचे जग एकदम वेगळे सर्व विसरायला लावणारे असे असते.
|
Dineshvs
| |
| Friday, April 25, 2008 - 3:25 am: |
|
|
एकटी व्यक्ति उअपलब्ध आहे, असा एक गैरसमज सर्वत्र असतो. पण त्या व्यक्तिसाठी कुणालाही वेळ नसतो. म्हणुन सर्वच बाबतीत स्वावलंबन महत्वाचे. आणि ठाम नकार देता येणे हेही महत्वाचे. मला आता वेळ नाही, मला हे शक्य नाही, असे ठामपणे सांगावे, म्हणजे टेकिंग फ़ॉर ग्रांटेड, असले प्रकार होत नाहीत किंवा कमी होतात. याचा साईड इफ़ेक्ट म्हणजे, शिष्ट आहे असा शिक्का बसतो, पण तो परवडला. आपला नारायण तरी होत नाही. मला तरी वाटते, कि सर्व गोतावळ्यात राहुनदेखील, स्वतःचा एक कोपरा, हवाच असतो. एकट्या व्यक्तीला तर अख्खे आवार मोकळे असते. या स्वातंत्र्याचा मनसोक्त उपभोग घ्यावा. छंद जोपासायची, हि तर उत्तम संधीच मानतो मी.
|
कसं आहे ना, मी_ना सगळेच आपापल्या दुःखातून वाट काढत असतात. तसं पाहीलं तर मला काही दुःख नाही आणि आहे पण. लहानपणी घडलेल्या काही गोष्टींचा पण आपल्या मनावर नकळतपणे परिणाम होत असतो, आणि तो कुठेतरी बॅक ऑफ़ द माईंड active असतो, असं माझा डॉक्टर सांगतो. मला ते पटते. तुमचे जग तुम्ही निर्माण केले, तुम्ही सुखी आहात हे पाहून मला बरं वाटलं पण कुणासाठी तरी substitute निर्माण करणं म्हणजे दुधाची तहान ताकावर भगवण्याजोगं आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? माझी एक आत्या हाऊस वाईफ़ आहे, तिचा नवरा बर्यापैकी कमवतो.... तिच्याकडे कपाटभर साड्या आहेत, ढिगभर, हवे ते दागिने आहेत. अगदी आपल्याला माहीती नसतील ते सगले. लहान होते तेव्हा मला वाटायचं की आपली आत्या काय सुखी आहे, वाह! पण मी मोठी झाले आणि तिला प्रश्नं विचारला.... की काय गं तुमचं relationship कसं आहे? ती म्हणाली relationship? ती कुठली? कारण माझे काका घरात कुण्णाशीही एक शब्द बोलत नाहीत. मग मी म्हणल तु इतकी वर्ष संसार कसा काय केलास? ती म्हणाली, आपल्याला सिक्युरिटी मिळाली, हव्या तितक्या साड्या, दागिने, आणि वेळेस २ घास अन्न मिळतेय ना? बास की. मी आवाक झाले होते तिचं हे बोलणं ऐकून... असो, पण बहीणीची जागा, बहीण, वडीलांची वडील थोडक्यात ज्याची त्याची जागा जो तोच भरून काढू शकतो असं मला वाटतं. आणि शेवटी काय सुख मानण्यात असतं असं म्हणतात. तुम्ही सुखी आहात. खूप छान आहे. अशाच रहा.
|
माझा जरा गोंधळ उडालाय... खरी व्यथा कुणाची आहे? आणि त्यावर समजूत कोण घालतय? राजकुमारीजी, तुमच्या सर्व पोस्ट्स वाचल्या. तुम्हाला दिलेले सल्ले पण वाचले. एक गोष्ट मला जाणवली जी मी इथे लिहितेय. तुमचा प्रेमविवाह झाल्यावर घटस्फ़ोट झाला होता. त्यानंतरचे रीलेशनशिपसुद्ध अयशस्वी ठरले. याबाबत तुम्ही कधी विचार केलात का? तुम्ही सहजासहजी नातं विसरताय किंवा तोडू शकता... अर्थात यामधे चूक काहीच नाही. त्याचबरोबर एखादं नातं भक्कम करण्यामधे पण तुम्ही कमी पडत आहात. तुम्हाला दिलेले सर्व सल्ले हे आजारावरून लक्ष हटवण्यासाठी आहेत. मात्र रोग दूर हूत नाहीये. तुम्हाला मुळात हे समजून घ्यायला हवं की अशा रीतेने जाहीर रीत्या तुमची दु:खे हलकी केल्याने तुम्ही स्वत्:ची कमजोरी लोकाना दाखवत आहात. याचा कुणीही फ़ायदा घेऊ शकतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की तुम्ही अजूनपण कमिटेड रीलेशनशिपला तयार आहात का? तसे असेल तरच लग्नाच विचार करा. त्या आधी तुमची लग्नाची व्याख्या स्वत्:शी तपासोन बघा. सामाजिक सुरक्षा. आर्थिक सुरक्षा, शरीरसुख, किंवा भावनिक सुरक्षा यामधील नक्की कुठल्या कारणासाठी तुम्ही लग्न करून इच्छिता ते स्वत्:ला विचारा. तुम्हाला कसा जोडीदार हवा ते त्यातून स्पष्ट होईल. सुख हे जरी मानण्यात असले तरी त्यासाठी आधी "मला" नक्की काय हवे हे मल माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या गोष्टी माहत्वाच्या ठरतात.. तुम्ही स्वत्:ला विcआरा. तुमची चूक शोधा. ती तुम्हाला सापडली की अख्खा प्रॉब्लेम सुटला.
|
Preetib
| |
| Saturday, April 26, 2008 - 10:58 pm: |
|
|
Wah Nandini good one. So true also.
|
Usha2008
| |
| Monday, April 28, 2008 - 5:20 am: |
|
|
Namaskar! Mi mayybolivar navin ahe, mala ek changla mitra hawa ahe, khup khup gappa marayla,yla , chatting karayla. Mi punnyahun ahe.
|
Kasturii
| |
| Monday, April 28, 2008 - 7:06 am: |
|
|
राजकुमारी, माझा सल्ला थोडा वेगळा आहे. जर तुमची शारिरीक गरज तीव्र असेल तरच लग्न करा. नाहीतर आहेत तशाच सुखी आहात. माझी कहाणी थोडक्यात सांगते.माझ्या लग्नाला ६ वर्षे झालीत. पण माझे आणि नवर्याचे फ़ारसे पटत नाही. आम्ही वेगळे होण्याचाही विचार केला होता. परंतु वर नंदिनी म्हणाल्याप्रमाणे मी विचार केला मला काय हवे आहे? भावनिक आणि शारिरीक गरजेपेक्षा मला सामजिक सुरक्षा हवी होती. आइ वडिल किती दिवस पुरणार? शिवाय मी तर नोकरीही करत नाही. आता खुप सुखी आहे असा भाग नाही..कधी कधी वाटते बरोबर तर केले ना? तुमचा लग्नाचा विचार पक्का असेल तर तुम्ही माणुस नीट पारखुनच लग्न करा.आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडायला नको. तुम्हाला नाउमेद करत नाहीय पण काळजी वाटते म्हणुन सांगितले. चु.भु.द्या.घ्या.
|
Kasturii
| |
| Monday, April 28, 2008 - 7:16 am: |
|
|
आणखी एक सांगावेसे वाटते. तुमचे मन कुठे रमते ते तुम्ही ठरवा. मला आध्यात्म, स्तोत्रे, योगा यात कधीच रस नव्हता. मग प्र्श्न पडला की आता काय करायचे? मग घरी नेट घेतले आता जेव्हा काम नसते तेव्हा मी मराठी साइटवर जाउन कविता कथा वाचते. नाहीतर ऑर्कुटवर जाउन तिथेही बर्याच कमुय्निटीज आहेत त्यात फेरी मारते. हळु हळु सर्व विसरायला होते.तुमची हितचिंतक
|
Aashu29
| |
| Monday, April 28, 2008 - 7:19 am: |
|
|
उषा, तुम्हाला मित्र हवा आहे हे तुम्ही एक खरी व्यथा या BB वर लिहिता आहात याचे तरी भान ठेवा.
|
Arc
| |
| Monday, April 28, 2008 - 7:35 am: |
|
|
जर depression असेल तर doctor कडुन prescription घेउन antidpressents try करु शकता.
|
आर्च antidepressents साध्यासुध्या डीप्रेशनसाठी घेउ नये. त्याने थोड्या काळासाठी relief मिळेल नंतर काय???माझ्यामते राजकुमारींची psychological परिस्थिती मॅनेजेबल आहे(त्यांच्या पोस्टवरुन तसेच वाटते). कस्तुरी असा टाईम पास किती दिवस करणार???काही दिवसानी त्याचाही कंटाळा येईल. तुम्ही ' men r 4m mars n women r 4m venus 'हे पुस्तक वाचलय का???आध्यात्मिक नाहीये. जरुर वाचा. तुम्हाला उपयोग होईल.
|
नंदिनी, तुम्ही मनमोकळेपणाने जे वाटलं ते लिहीलंत हे पाहून बरं वाटलं मी माझ्या सर्वच गोष्टी इथे विस्ताराने लिहू शकले नाहीए, त्यामूळे पर्सेप्शन वेगळे होऊ शकते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी माझा कायदेशीर विवाह झाला आणि मोडला या दोन्ही गोष्टी सहजगत्या विसरले असे तुम्हाला वाटते, पण मध्यंतरी पूलाखालून बरेच पाणी गेले असे काहीसे म्हणतात तसे झालेय. हे मी इथे इतक्यात लिहीतेय म्हणून कदाचित तुम्हाला तसे वाटत असेल. असो... सगळं तपशिलात सांगणं अवघड आहे, पण मला जे अनुभव आलेत ते मी लिहीलेत, घडलेल्या गोष्टीला तुम्ही 'रिलेशन' म्हणालात हे ही ठिक. पण माझ्या मते काही गोष्टीत आयूष्यात तडजोड खरंच होऊ शकत नाही. झालेला डिव्होर्स कुणापासूनतरी लपवायचा? ही गोष्टं मला पटली नाही, तुम्ही थोडा विचार केलात तर अशी गोष्टं बहूतेक करून कुणालाच पटणार नाही. दुसरी गोष्ट, दुसर्या अनुभवात माझी थोडी चूक होतीच मी नाही म्हणत नाही. पण बाहेरून पाहून मनुष्य कसा आहे हे ओळखणे अत्यंत कठिण आहे. And you can not come across only righ people always. आणि मी यामूळेच खाड्कन जागी झालीये. पण रिलेशनशिप unsuccessful होण्यात फ़क्त माझी एकटीची चूक नव्हती. माझा स्वभाव मूळात खूप emotional आहे. माझ्या वैवाहिक आयूष्यातही बरेच अनुभव मी घेतलेत आणि सहनही केलेत. (ते लिहीत नाही इथे) लग्न वाचवण्याचा ही बराच प्रयत्न केला होता. तुम्ही म्हणालात की मी मनाशी विचार करायला हवा की मी कमिटेड रिलेशन्शिपसाठी आत्ता तयार आहे का? हे मात्रं १००% पटले. असे नाही की मी कमिटेड राहू शकत नाही. नक्कीच राहू शकते. पण खरंच हे करायचंय की नाही याचा विचार केला पाहीजे. हा एक नवा विचार आहे माझ्यासाठी. धन्यवाद!
|
कस्तूरी, शारिरीक गरज तीव्र असेल तरच लग्न करावे असे मला नाही वाटत. लग्न म्हणजे फ़क्त शारिरीक संबंधास परवानगी आहे असे मला वाटत नाही. आणि आजच्या यूगात लग्नाशिवायच____ असो. तुमचा दुसर्या लग्नाविषयीचा सल्ला, जरूर लक्षात ठेविन.
|
चिन्या१९८५ तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे सगळं इथे जेव्हा लिहायला सुरवात केली होती तेव्हा माझी परिस्थिती मॅनेजेबल नव्हती. आता मला बरंच बरं वाटतंय.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 29, 2008 - 8:35 am: |
|
|
राजकुमारी, एक शेवटचा सल्ला, तूम्ही आता सावरल्या आहात. नव्याने आयुष्याकडे बघू लागल्या आहात. आता या विचारांच्या गर्तेतून बाहेर पडा. इथे लिहिणे थांबवा. सलग लिहुन काढलेत. इथे चर्चा केलीत, त्याने बरेच मोकळे वाटले असेल. नीट काळज़ी घेत पुढील वाटचाल करा. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, आणि गरज पडू नये, पण कधी लागलीच तर मदत करायला, आम्ही सर्व आहोतच. तेंव्हा हे सगळे इथेच सोडून द्या, पुढे चला. परत एकदा शुभेच्छा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|