|
Dakshina
| |
| Monday, April 21, 2008 - 5:21 am: |
| 
|
योगेश......    एक दोन तीन हुश्श....
|
मला हे गाण लहान अस्ताना अस ऐकु येत होत. तुम आ गये हो, मूड आ गया है नही तो सालो से मोच आयी थी. सग ळे मोठे मला हेच गाण गाय ला सान्गत होते आणि एव्ढे हसत होते मल काहीच कळत नव्ह्त. अजुन पण हे गाण मी असच गातो.
|
आण्खी एक गाणा. रमैया वस्तरा लै आ, रमैया वस्तरा लै आ मैने दिल तुझ को दिया. आणि वस्तरा लै आ ही ओळ मी अक्शन करुन दाखवत होतो. सगळे खुप हसत होते. मल कळत नव्हत की वस्तरा आणि दिल चा काय सम्बन्ध आहे.
|
थोडा विषयान्तर, फ़ार पुर्वी सग्ळ्यान्कडे टीवी सेट्स नव्ह्ते, सगळे शेजारी आणी त्यान्ची मुल आम्च्या घरी टीवी पहाय्ला येत. कोण्तीही जाहिरात आली तर आम्ही लहान मुल जोरात ओर्डाय्चो रसना, पर्ले जी. निरोध ची जाहिरात आली कि सर्व मोठ्या लोकाना टेन्शन यायच, आम्ही लहान मुल जोरात बोलायचो निरोध, सगळ्या मोठी मन्डळि ना टेन्शन.
|
तो हम साथ साथ है चा जोक नक्कि काय ते लिहा रे कुणीतरी प्लीज
|
म्हामईकर, लहानपणी आम्ही पोरं कोरसमध्ये अगदी चालीत गायचो- "ज़रासी सावधानी, ज़िंदगीभर आऽऽऽसानीऽऽ!" आणि मग त्यामागचं म्युझिक सुद्धा घ्यायचो "टिणिणिणि टिणिणिणि टिणिणिणि टिणिणिणिक्क्क्क!!"
|
Ashbaby
| |
| Wednesday, April 23, 2008 - 6:43 am: |
| 
|
माझ्या वडिलांची एक आठवण भजं गोविंदम, भजं गोविंदम, गोविंदम भजं मुढमते हे भजन ऐकल्यावर गोविंदाला लोक भजी देउन का टाकत नाहीत असा प्रश्न त्यांच्या मनात यायचा. साधना
|
Mhamaikar
| |
| Wednesday, April 23, 2008 - 9:29 am: |
| 
|
योगेश, खरच फार मजा येत होति.
|
Deemdu
| |
| Wednesday, April 23, 2008 - 10:00 am: |
| 
|
लाज लाजुनी अती मी दमले थकले रे नंद्लाला
|
लाज लाजुनी अती मी दमले थकले रे नंद्लाला इथे फक्त एकच बदल होता आमच्यात "टकले रे नंदलाला" म्हणजे काय तर नंदलाल टकलु वगैरे असावेत आणि म्हणुन हीला लाज वाटली असावी
|
Ashbaby त्या श्लोकात नंतर 'संप्राप्ते संनिहिते काले, नहि नहि रक्षति डुकृं करणे' अशी ओळ आहे... लहानपणी शंकराचार्यांच्या श्लोकात डुक्कर कुठून आलं ते कळेना...
|
डुकृञ् करणे (वा! बर्याच दिवसांनी ञ वापरला) हा संस्कृत व्याकरणातला एक फॉर्म्युला आहे. एक म्हातारा माणूस बिचारा संस्कृत नीट बोलता यावे म्हणून फॉर्म्युले घोकत होता तेव्हा शंकराचार्यांनी त्याला त्यापेक्षा गोविंदाचे भजन कर असा सल्ला दिला अशी ह्या श्लोकाबद्दलची कथा आहे. (माझ्या मते हे चूक. केवळ तो म्हातारा आहे म्हणून व्यवहारोपयोगी त्याने काही शिकू नये आणि निव्वळ हरीहरी करावे असे सांगणे गैर आहे. )
|
Mi_anu
| |
| Thursday, April 24, 2008 - 3:29 am: |
| 
|
ते यु मी और हम मधलं गाणं काय आहे? 'मैने तो मांगा था, सहेली जैसा सैंया, पहेली जैसा सैंया बरेली जैसा सैंया इ.इ.' सैंया मैत्रिणीसारखा बायकी दिसणारा हवा की काय? (मित्रासारखा का नको?)
|
Aashu29
| |
| Thursday, April 24, 2008 - 4:11 am: |
| 
|
बरेलिजैसा सैंया म्हणजे काय? तिकडेही अजय देवगणसारखी आंबट तोंड करुन शिष्ठासारखी फ़िरणारी माणसे असावीत.
|
ते 'बरेली जैसा सैंय्या' नसून 'पहेली जैसा सैंय्या' आहे. "पदरात कोडं पडलं"--- kind of... Dakshina-- खि खि खि!!
|
Psg
| |
| Thursday, April 24, 2008 - 7:58 am: |
| 
|
सहेली जैसा गं अनु- मैत्रीणीसारखा नवरा! (इथे माझ्या नवर्याने, 'मैत्रीणीच्या नवर्यावर का हिची नजर?' असा एक फालतू विनोदही केला होता) आणि ते वाक्य 'दिल्लीमें बरेली जैसा सैंया' असं आहे.. नीट ऐक, वेगळं आहे गाणं जरा चित्रित कसं केलं असेल याची उत्सुकता आहे मला 'यू, मे और हम' मधलं आहे ना?
|
Mi_anu
| |
| Thursday, April 24, 2008 - 11:35 am: |
| 
|
नीट नाही पण आज सकाळी उडत उडत(मी उडत नाही, गाणं उडत!) रेडियोवर ऐकलं. 'एली' हे अंत्ययमक वापरुन बर्याच शब्दांना वेठीला धरलं आहे. 'सहेली जैसा सैया,बरेली जैसा सैया,पहेली जैसा सैया' मध्ये कुठेतरी हवेली जैसा सैय्या पण ऐकल्याचा भास झाला. (याच नियमाने पुढे 'हथेली जैसा सैय्या,चमेली जैसा सैय्या,दबेली(आपली कच्छी दाबेली) जैसा सैय्या' सुद्धा गाण्यात परफेक्ट बसतील किनै?)
|
दक्षिणा, कृपया तुमचे पोस्ट डीलीट केलंत तर बरे होईल. तुम्ही भयानक विचित्र काहीतरी लिहिलय. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल... म्हणून सांगतेय. यौप्पर तुमची मर्जी.
|
Dakshina
| |
| Friday, April 25, 2008 - 1:14 pm: |
| 
|
नेमस्तक, कृपया माझी पोस्ट उडवून टाका.... माझ्याकडून होत नाहीए....
|
Admin
| |
| Friday, April 25, 2008 - 3:54 pm: |
| 
|
Done
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|