|
Slarti
| |
| Wednesday, April 16, 2008 - 3:15 am: |
| 
|
गुंडा आहे गूगल व्हिडीओवर. पण फक्त बघून थांबू नकोस रे (सूचक स्मित चेहरा)
|
Farend
| |
| Wednesday, April 16, 2008 - 3:48 pm: |
| 
|
अरे त्याचा रिव्यू तर Economic Times पासून भल्या भल्यांनी केलेला आहे. विकीपेडिया वर आहे
|
No entry.... मला सुद्धा हा मुव्ही आवडला नाही. खूप स्लो वाटला.
|
फारएंड,गुंडा बघुन फक्त थांबु नकोस.. मग लोहा बघ, आग हि आग, जवान, सैनिक, गनमास्टर जी ९ बघ.. मिथुनचे जे मिळतील ते सर्व सिनेमे बघ त्यात एक निर्भेळ सुख आहे गुंडाच्या ऑर्कुट वरील कम्युनीटीज तपास.. त्यात मॅनेजमेंटच्या केस स्टडीज गुंडातील डायलॉग वापरुन सोडवलेल्या दिसतील तुला.. दिखने मे बेवडा, भागने मे घोडा और मारा तो हाथोडा
|
Farend
| |
| Thursday, April 17, 2008 - 3:19 pm: |
| 
|
जी ९ म्हणजे सुरक्षा ना? तो बघितला आहे. चला म्हणजे अगदी पहिल्यापासून सुरूवात नाही
|
देव आनंद चे Awwal number,Censor, Love at times square, Mr. Prime Minister, हे सिनेमे तर "चुकवु नये असे काही" या सदराखाली येतात.
|
Aashu29
| |
| Friday, April 18, 2008 - 3:44 am: |
| 
|
देव आनंदचा हम नौजवान अगदी अ. आ. आहे. त्यात खुनाचा पुरावा काय तर म्हणे U W. अगदीच ह. ह.पु. वा
|
नाही बहुतेक, सुरक्षा शेपरेट.. गनमास्टर जी ९ हा देसी जेम्स बॉन्ड आहे..
|
कुणी अजय देवगण काजोलचा यु, मे और हम बघितला का? असे ऐकले की थोडा हटके आहे म्हणुन..
|
Orchid
| |
| Friday, April 18, 2008 - 8:54 am: |
| 
|
जी ९ म्हणजे सुरक्षा ना? नाही त्या पिक्चरच नाव आहे 'वारदात'. यात मिथुनबरोबर काजल किरनही होती.
|
Satishbv
| |
| Friday, April 18, 2008 - 10:13 am: |
| 
|
अव्वल नंबर मध्ये देव आनंद सामर्थ्यवान, माजी क्रिकेटपटु, कप्तान, सेना प्रमुख (सैन्यातील अधिकारी), आयुक्त (कमीशनर), वै. सबकुछ दाखवीला आहे या चित्रपटात आमिर खान फलंदाजीसाठी जाताना एक मोठा transistor खिशातुन घेउन जातो.
|
Farend
| |
| Friday, April 18, 2008 - 1:24 pm: |
| 
|
Orchid जी ९ नक्कीच सुरक्षा मधे आहे. पण वारदात मधे तीच थीम पकडून त्याला तसाच रोल दिला असू शकतो. सुरक्षा मी एक दोन वेळा बघितला आहे (!) नवीन लागला तेव्हा लोकप्रिय झाला होता आणि नंतर गंमत म्हणून पण या दोन्ही चित्रपटातील गाणी चांगली आहेत.
|
No Country for Old men एकदम सॉल्लेट मूवी अहे! हाविएर बार्डेम तर.. awesome !! दोन्ही अर्थाने शेवट जरा वेगळा हवा होता असं वाटलं.कुणीतरी मला सांगितलं की original पुस्तकात वेगळा आहे शेवट थोडा.. ***spolier**** शेवटी हाविएर ते पैसे अत्यन्त निर्विकार पणे तिसर्या एका पार्टीला 'डिलिवर' करतो, थोडक्यात, he does have some 'values'(?!!) he is not at all after money..he is just crazy!! चिगर चे एकून ' कॅरेक्टर' पहाता हा शेवट जास्त कन्विन्सिन्ग वाटतो. कुणी वाचलंय का ते पुस्तक? असंच आहे का त्यात?
|
Maanus
| |
| Monday, April 21, 2008 - 6:09 pm: |
| 
|
जॉनी गद्दार मस्त आहे, आवडला. चित्रपट संपल्यावर तो नविन चेहरा कुणाचा हे पाहीले तर तो मुकेश चा नातु असल्याचे कळाले. आणि मग त्याच्या नाजुक आवाजाचे रहस्य देखील
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 23, 2008 - 3:16 am: |
| 
|
काल HBO वर, An inconvenient Truth , नावाची सुंदर ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी दाखवली. परत दाखवली तर अवश्य बघा. ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे, बस यापेक्षा जास्त सांगून उत्सुकता कमी करणार नाही.
|
Dakshina
| |
| Wednesday, April 23, 2008 - 5:15 am: |
| 
|
माणूस, जॉनी गद्दार मला पण आवडला.... पण पिक्चर संपल्यावर मी जरा सुन्न झाले होते. कारण तो सिनेमा इतका फ़ास्ट आहे, की एका दृष्याचं आकलन होईपर्यंत पुढे काहीतरी घडते... शेवटी मला असे वाटले की हा पोरगा इतका गोड दिसतो.... जरा शाहरूख सारखी गोड गोड हिरॉईनींच्या मागनं बिगनं फ़िरण्याची कामं करायची सोडून हे असलं काम त्यानं कशाला केलं असेल?
|
Deepant
| |
| Wednesday, April 23, 2008 - 10:48 pm: |
| 
|
"यू मी और हम " बघितला. वेगळा विशय आहे. पण खूप बोअर मूव्ही आहे.
|
Ankyno1
| |
| Saturday, April 26, 2008 - 4:33 am: |
| 
|
'टशन'.... द स्टाईल, द फार्मूला, द गुडलक.... पण स्टाईल चा अतिरेक झाला की फशन वाईट होते.... फॉर्म्यूले खूप झाले की गणित अवघड होतं..... आणि या दोन्ही चा एकत्रित अतिरेक झाला की गुडलक चं बडलक होतं... अत्यंत बकवास सिनेमा आहे.... कथेशी काहीही देणंघेणं नाही... कारण मुळात कथाच नाही... दिग्द. विजय कृष्ण आचार्य ला काय सांगाय्चं आहे ते त्याचं त्यालाच कळलं नाहिये... सुरवातीच्या १ मिनिटातच अत्यंत टुकार बक-प्रोजेक्शन चा सीन आहे.... त्यावरूनच सिनेमाची लेव्हल कळते.... (आणि हा सीन नंतर ही एकदा बघावा लागतो...) यशराज चा पुढचा सिनेमा हा डिस्ने स्टुडिओ बरोबरचा एनिमेशनपट आहे...(ट्रेलर दाखवतात...) मग थोडं बरं एनिमेशन यात वापरलं असतं तर?) अक्षय तर काहीही करू शकतो... एका सीन मधे तो घरच्या पत्र्यावर चढून शेजारी रस्त्यात पुरलेला दिव्याचा खांब उपटून त्याच्यावर हल्ला करणार्या २५-३० लोकांना मारतो... तो अधून मधून क्रिश असल्यासारख्या उड्या ही मारतो... आणि बरच काही... चहूबाजूनी गोळीबार होत असताना मुख्य पात्रांना एकही गोळी लागत नाही... लागलीच तर पुढच्या सीन मधे जखमही दिसत नाही... फाटलेले कपडे परत व्यवस्थीत होतात.... एकूण काय.... मसालेदार पदार्थाच्या नावाखाली नुसतेच ५-६ मसाले मिसळून दिलेत... अपचन होणार नाही तर काय..... त्यामुळे...पैसे वाचवा... जुन्या क्लासिक्स च्या डीव्हीडीज घ्या.... पण 'टशन' पाहून 'टेंशन' घेऊ नका... माझ्याकडून ५ पैकी १ तारा... तो ही लोकेशन्स आणि सिनेमटोग्राफी करता...
|
Manuswini
| |
| Saturday, April 26, 2008 - 5:27 am: |
| 
|
यु मी और हम हा ईन्ग्लीश चित्रपटावरून( notebook 2004 ) घेतला आहे नी as usual मुळचा चित्रपट अतीशय भावनाशील आहे.
|
Lovevin
| |
| Monday, April 28, 2008 - 2:55 am: |
| 
|
क्रेझी ४ कुणी बघीतला का? नसेल बघीतला तर बघूही नका. अचाट आणि अतर्क्य मधे मोडणारा आहे. राकेश रोशन ला वाटतय की एक र्हीतिक च गाणं टाकलं की झाला पिक्चर हिट......
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|