Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 12:38 pm: |
| 
|
धन्यवाद, झकासराव. अरे राम, आता त्या रेशमिया मियाची नि त्याच्या इथल्या असंख्य पंख्यांची माफी मागितली पाहिजे. तर लोकहो, तुमच्या आवडत्या माणसाला ओंगळ म्हंटल्याबद्दल मला माफ करा.
|
आज चा सारेगमप आरती प्रभूंवर आहे हे पाहून खूप आनन्द झाला ते माझे आवडते कवी आहेत. सलील कुलकर्णीजी नुसते दर्दी सन्गीतकारच नाहीत तर प्रभूंच्या काव्याचे त्यांनी मधून्-२ केलेले रसग्रहण ही आवडले व त्यांच्याबद्दल आदर द्विगुणित करून गेले.आशाताई तर थोरच. psg thank you-
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:03 pm: |
| 
|
अगदि योग्य बोललात रविउपाध्ये, अतिशय सुरेख चाल्लेला आहे कार्यक्रम.. काय सुंदर गाणि ऐकायला मिळतायत. आणि हे परिक्षक खरच आवडले.
|
आरती प्रभु, आरती प्रभु.. जबर्याच... मला कुणी सांगेल का की नेटवर हा कर्यक्रम कुठे बघता येइल.. मागे एकदा अश्याच एका टीव्ही वरील कार्यक्रमात त्यांची वाट नावाची एक अफलातून कविता भजनी अंगाने सादर केली होती. नाहितर सहसा ह्रुदयनाथने संगीत दिलेल्या सोडुन त्यांच्या बाकी कविता मी कधी गाणे ह्या रुपात ऐकल्या नाहीत.
|
Mansmi18
| |
| Tuesday, March 04, 2008 - 9:18 pm: |
| 
|
you can watch zee marathi at www.watchindia.tv it is $9.99 / month planetvu.com is down and out I think.
|
Maanus
| |
| Monday, March 31, 2008 - 11:24 pm: |
| 
|
काय पण ड्रामा सुरु असतो ह्या reality shows मधे. त्या rock-n-roll family मधे यायचे म्हणुन बहिणीला बायको केले... काहीही. आणि बुगी वुगी मधले dances , त्यांची ती गाण्यांची choice . हे असले program लोक लहान मुलांसमोर बघतात? तरी बरे त्या अजय दिवगण ला थोडी अक्कल म्हणुन त्याने मुलांना आत पाठवले आणि अर्जुन रामपाल ने स्वतः आपल्या मुलांना अजुन ओम शांती ओम बघुन दिला नाहीय.
|
ते सारेगमप संपले काय? आज काल तो rock n roll चालु असतो?
|
Sayonara
| |
| Tuesday, April 01, 2008 - 2:19 am: |
| 
|
श्या, मलातरी तो rock n roll काढायचा म्हणून काढलेला शो वाटतो. कसला प्रचंड बोअर आहे. अर्धा बघितला आणी पुढे सहनच होईना.
|
Uday123
| |
| Tuesday, April 01, 2008 - 2:47 am: |
| 
|
SVOI मधे 'छोटे उस्त्ताद(न?)' साठी अन्वेशा आणि एश्वर्या अंतिम टप्यात आहे. दोघीही छानच गातात आणि नाटकं कमी करतात, फ़क्त आभास खुप कर्कष्ष ओरडतो.
|
Rock n roll family अगदीच टिंपाट show आहे ! ती मौली आणि शरद केळकर दोघही माठ वाटतात anchor म्हणून ! आणि judges मधे काजोल - तनुजा - अजय असले non dancers का बसवलेत ! छोटे उस्ताद मधे final 2 दोघीही मस्त गातात , classical based गाणी जास्त चांगली गातात .
|
Runi
| |
| Wednesday, April 02, 2008 - 1:08 am: |
| 
|
आणि judges मधे काजोल - तनुजा - अजय असले non dancers का बसवलेत >>> मला वाटत डीजे यात चांगले डान्सर असणे पेक्षा पैसा वाचवणे हा उद्येश असेल, अजय देवगणचेच होम प्रॉडक्शन आहे ना ते? जज्जेस ना कशाला पैसे द्या असा विचार केलेला दिसतोय.
|
Uday123
| |
| Thursday, April 03, 2008 - 3:37 pm: |
| 
|
नाही हा अजुन एक शेवटचा प्रयत्न आहे त्यांना काही प्रेरणा घेऊन शिकता येते कां म्हणुन. पैसे वाचवणेला तसे दुय्यम स्थान आहे.
|
Shailaja
| |
| Friday, April 04, 2008 - 4:46 pm: |
| 
|
मराठी सा रे ग म प कोणी बघत नाही वाट्त?
|
Arch
| |
| Friday, April 04, 2008 - 8:12 pm: |
| 
|
सोनीवर Mr. and Ms. TV show पाहिला का कुणी? मी काल आणि परवा पाहिला. पूरबी जोशी आणि स्वप्नील जोशी quite talented आहेत हं. मजा आली बघायला. रविवारी Finale आहे. मधूर भांडारकर आणि सोनाली बेंद्रे judges आहेत. छान दिसते सोनाली. ती judge व्हायच्या लायकीची आहे की नाही हा दुसरा भाग.
|
Prachee
| |
| Saturday, April 05, 2008 - 6:03 am: |
| 
|
खरंच आर्च, हल्ली जे celebrity reality shows आहेत. त्यात हाच एक बरा आहे. मुख्य म्हणजे जास्त न लांबवता लवकर संपवत आहेत. त्यामुळे जास्त बोरिंग वाटत नाही.
|
एका पेक्षा एक मधे गेले काही भाग सुकन्या dull perform करतेय तरी सचिन तिला जास्त च डोक्यावर चढवतोय असं वाटलं . Call back मधून मूळात दोन लोकांना सचिन ने आणालं तेंव्हाच शंका आली . त्या वेळी अजिंक्य चे performances किती तरी चांगले झाले असताना सचिन ने आवडत्या सुकन्याला आणलच . आल्या नंतर item song round, चले जैसे हवाए हे दोन performances अगदीच dull झाले तिचे . आणि सचिन च्या सगळ्या themes संपल्या का म्हणून पुन्हा जुन्या गाण्यांवर सगळ्यांना perform करायला दिले ?? त्यात सुकन्याने चांगले केले पण एकूण गेले काही episodes पहाता मला मृणाली किंवा सॅड्रिक जास्त deserving वाटतात . अर्थात voting प्रमाणे सुकन्याच पुढे आहे आणि तिलाच जिंकवणार असं दिसतय !
|
Dineshvs
| |
| Friday, April 18, 2008 - 1:49 pm: |
| 
|
काल झी मराठीवर छुम छुम छननन असा लावणीनृत्याच्या स्पर्धेचा छान कार्यक्रम होता. सुरेखा पुणेकर, माया जाधव अश्या मातब्बर परिक्षक होत्या. काल एका ग्रुपने, पारवाळ घुमतय कसं या जुन्या लावणीवर छान नाच केला. सगळ्यानी अगदी परिक्षकानीदेखील वन्स मोअर दिला. आज पण असेल हा कार्यक्रम. अवश्य बघा.
|
Ajjuka
| |
| Saturday, April 19, 2008 - 6:57 am: |
| 
|
ही लावणी रघुवीर खेडेकर सह कांताबाई सातारकरांच्या फडात रघुवीर च्या बहिणीने मंदाराणीने सादर केलेली मी नुकतीच पाह्यली. तसंच 'वाटलं होतं तुम्ही याल!' ही सुद्धा. आमच्या नाट्यविभागाच्या ( मुंबई विद्यापीठ) वसंतोत्सवाचे उदघाटन(मोडका पाय कसा टायपायचा.. अजून जमत नाही!) तमाश्याने झाले. कलिनाच्या मैदानात तंबू कनाती लावून फड उभारला होता. काय मजा आली! असो!
|
Mansmi18
| |
| Monday, April 21, 2008 - 7:14 pm: |
| 
|
काल झी मराठीवर छुम छुम छननन असा लावणीनृत्याच्या स्पर्धेचा छान कार्यक्रम होता. --------------------------------------------- दिनेश, हा कार्यक्रम कधी होता? त्याची जाहिरात पाहिली नाही.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 22, 2008 - 3:12 am: |
| 
|
हा बहुतेक शुक्रवारी आणि शनिवारी रात्री साडेनऊला असतो. यातले कलाकार आणि परिक्षक एवढे कसलेले आहेत कि निवेदक पुर्णपणे निष्प्रभ झाले आहेत. शिवाय परिक्षक, अभिनय, ताल, पेहराव, दागिने या सगळ्याच बाबतीत आग्रही असल्याने, बहुतेक नृत्ये सुंदर होताहेत.
|