|
Tiu
| |
| Friday, February 29, 2008 - 9:25 pm: |
| 
|
जागं झाल्यावर मी डोळे उघडायलाच विसरले. मला काही शंका आहेत. १. उठुन हॉलमधे येतांना कुठे अडखळला नाहीत का? २. डोळे बंद असतांना लाईटचा स्विच लगेच सापडला का? सापडला नसेल तर आपले डोळे बंद आहेत हे तेव्हा समजलं नाही का? नंदिनी...जरा पटेल अश्या थापा मार. उगीच काहीही फेकाफेकी करु नको. ;-) कृ . ह . घ्या बाकी काही लोकांचे डोळे कायम बंदच असतात. त्यामुळे त्यांना आपण केलेल्या मोठमोठ्या चुकाही "दिसत" नाहीत. बरं दुसर्याने "दाखवुन" दिल्या तरी काही उपयोग नसतो. तेव्हाही डोळे बंदच! :-) त्यापेक्षा हे बरच बरं आहे...
|
Zakki
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:29 pm: |
| 
|
अरे देवा, आता बहुतेक इथेपण विषय बाजूला, नि आप आपसात (शाब्दिक) मारामारी सुरू होणार!! लवकर या इथे, पहिल्यापासून वाचा म्हणजे विषय कुठे नि कसे नि कोण भरकटत नेतो ते कळेल!
|
टीऊ, मी डोळे बंद ठेवून अख्खं घर फ़िरू शकते. लाईटच काय टीव्ही लावू शकते, (मला झोपेत चालायची सवय नाही, पण रात्री जाग आल्यावर मी लाईट न लावता डोळे बंद ठेवून फ़िरते. हॉस्टेलमधे मुलीना मी झोपेत चालतेय असं वाटायचं कित्येकदा.
|
Palla
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:42 am: |
| 
|
माझा कालचा वेंधळेपणा. कुकर लावताना डाळिमध्ये हळद आणि हिंग घालण्याऐवजी तांदुळामध्ये चुकुन हळद आणि हिंग टाकले. त्यामुळे मस्त दिदिची बोलणी खाल्ली. आणि तो विचित्र चवीचा भात.
|
Sheshhnag
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:29 am: |
| 
|
त्यामुळे मस्त दिदिची बोलणी खाल्ली. आणि तो विचित्र चवीचा भात. ======== दोन्ही खाल्लंत! एक खायचं अन एक शेअर करायचं.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:23 pm: |
| 
|
शिल्पा आणी राजुला एक गोंडस मुलगी झाली त्याच दिवशी संध्याकाळी हॉस्पिटल मधे त्याना भेटायला गेलो. सोबत अजुन एक जोडप होतच. मग काय आम्ही कुठेही असलो की गप्पागोष्टींची मैफ़िल सुरु. मला मधुनच काय सुचल कुणास ठाउक. म्हटल मुलीचे नाव "राशी" ठेवायला हवे होते म्हणजे राजुचा रा आणी शिल्पाच.... लगेच जीभ चावुन एकदम तोंड बंद, एकीच्या सोडुन कोणाच्या लक्षात नाही आले म्हणुन बरे नाहीतर मार खायची पाळी आली होती. बर हे सगळ झाल आता निघायची वेळ झाली सगळ्यांचा निरोप टाटा बाय बाय करुन घेतला आणी दरवाजा उघडुन बाहेर आलो.. तो काय समोर अंधार आणी मी रेस्टरूम (टॉयलेट) मधे पोहोचलेलो. बर शिंच्यान्नी टॉयलेट ते नेमक मुख्य दरवाजाच्या बाजुला का म्हणुन ठेवाव. बाहेर आलो तर हास्यस्फ़ोट झालेला. म्हणाले अरे तिथुनही तुला बाहेर जाण्याचा रस्ता होता की.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:29 pm: |
| 
|
टीऊ, मी डोळे बंद ठेवून अख्खं घर फ़िरू शकते. लाईटच काय टीव्ही लावू शकते मायबोलीवर लिहुही शकते
|
Chyayla
| |
| Wednesday, March 26, 2008 - 10:06 am: |
| 
|
आईनी सांगितलेला तीच्या लहानपणीचा किस्सा. आजोबान्नी घरी एक धर्मार्थ दवाखाना काढला होता. तेंव्हा पाटी लावली होती "बायो केमी धर्मार्थ दवाखाना". एक खेडुत ती पाटी वाचुन विचारायला लागला हे "बायको मेली धर्मार्थ दवाखाना" म्हणजे काय?
|
"बायको मेली धर्मार्थ दवाखाना" म्हणजे काय? SIMPLY GREAT -
|
Deepurza
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:08 am: |
| 
|
कालचाच अनुभव एटेईम वर गेलो होतो तिथे फ़क्त कार्ड दाखवुन कोड टाकयचा होता सर्व प्रोसिजर केलि आणी वाट बघत बसलो कार्ड बाहेर येत नाही म्हणुन मागे लाइन मधे थाबलेले लोक मी बाहेर का येत नही ह्या विचारात अनि मी आत कार्ड बाहेर का येत नाही ह्या विचारात नन्तर लक्शात आले खुप ऑड वाट्ले त्या वेळी...
|
Dineshvs
| |
| Saturday, April 19, 2008 - 4:33 pm: |
| 
|
आज जरा मिटिंगमधे गुंतलो होतो. आल्यावर भरकन पीसी वर maayboil.com टायपून मायबोली उघडायची वाट बघत बसलो. बराच वेळ काहि झाले नाही आणि मग साईट नॉट ओपनिंगचा बोर्ड आला. आमचा आयटी मॅनेजर तिथेच होता, त्याला म्हणालो, बघ रे जरा, काय प्रॉब्लेम आहे तो. तो स्क्रीनकडे बघून म्हणाला, अशी साईट आहे का ? मी ठाम होकार दिल्यावर तो म्हणाला, साहेब कांदा कणकेचं पोटिस बांधा, गळूच झालय ना ? माझ्या लक्षात यायला वेळ लागला, आणि आले त्यावेळी खुर्चीतून खाली पडायचाच काय तो बाकि होतो.
|
Sayonara
| |
| Sunday, April 20, 2008 - 12:10 pm: |
| 
|
छ्या, मला अजिबात कळलं नाही तुम्हांला काय म्हणायचंय ते. चार वेळेला वाचलं. पण रामा शिवा गोविंदा.
|
Arch
| |
| Sunday, April 20, 2008 - 1:53 pm: |
| 
|
सायो, आणि मला वाटलं मीच एकटी न कळलेली असेन.
|
Slarti
| |
| Sunday, April 20, 2008 - 2:34 pm: |
| 
|
आर्च, सायोनारा, त्या पोष्टातला एकमेव रोमन लिपीतील शब्द नीट वाचा... तुम्ही एकदम बाफवरच प्रात्यक्षिक दिलेत दिनेश, नशीब त्या म्यानेजरने 'तुमच्या आईला गळू झालय का ? ' असं नाही विचारलं
|
Dineshvs
| |
| Monday, April 21, 2008 - 3:19 am: |
| 
|
आभार स्लार्टि, मलाहि खरेच खुप वेळ लागला होता, काय प्रकार आहे ते कळायला.
|
Arc
| |
| Monday, April 21, 2008 - 4:22 am: |
| 
|
स्लार्टि, तरी पण नाही कळले? कोकणी भाषेत आहे का काही?
|
Arc
| |
| Monday, April 21, 2008 - 4:24 am: |
| 
|
ओहह कळले, आधी नीट वाचलेच नव्हते
|
Dakshina
| |
| Monday, April 21, 2008 - 5:10 am: |
| 
|
दिनेश, मला तर अजूनही झेपले नाही.... इल्ले....
|
Dineshvs
| |
| Monday, April 21, 2008 - 5:23 am: |
| 
|
छे, आता सांगायलाच पाहिजे, मी maayboli च्या जागी maayboil टाईप केले ना, त्याने सगळा घोटाळा केला.
|
>>म्यानेजरने 'तुमच्या आईला गळू झालय का ? ' स्लार्ती, तिथे मनेजर जर बी असता तर
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|