Zakki
| |
| Monday, March 03, 2008 - 4:21 pm: |
| 
|
चिन्या, तुम्हालाच नाही तर इथल्या अमेरिकनांना सुद्धा ते अगदी तस्सेच ऐकू येत होते. मग त्यांनी विचारले कुडी गुमान म्हणजे इन्डियन भाषेत Pretty woman का? तशी कित्येक हिंदी गाण्यांची चाल अगदी इंग्रजी गाण्यांसारखी असते. आता काय म्हणा, हिंदी चित्रपटातच इंग्रजी गाणी, फक्त त्यांचे उच्चार कळत नसल्याने ती गाणी हिंदीच वाटतात, कुडी गुमानसारखी!
|
Mitraa
| |
| Monday, March 03, 2008 - 7:54 pm: |
| 
|
माझी मुलगी लहान असताना मन्नुभाई मोटर चली पम पम पम म्हणायची त्यात पुढे "चौपाटी जाएगे भेलपुरी खाएगे "च्या ऐवजी "चपाती खाएगे भेलपुरी खाएगे " म्हणायची बिचारीला चौपाटी काय असत ते महीतच नव्हत तेव्हा.
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 04, 2008 - 12:21 am: |
| 
|
चपाती खाएगे >> (chaar shabda)
|
मी लहानपणी एक गाण ऐकल होतं 'कुण्या गावात आलं पाखरु'. ते मला बरेच दिवस ऐकु यायच ' पुण्या गावात आलं पाखरु'. मी विचार करायचो की काय वेडी बाई आहे,पुणे एव्हढ मोठ शहर आहे आणि ही त्याला गाव म्हणते.
|
ते "हरी भजना वीण काळ घालवू नको रे" (चूभूद्याघ्या) हे भजन मला "हरी भजना वेळ फार घालवू नको रे.." हरी भजनात वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी काम कर असं कवीला सांगायचं आहे असं मला वाटायचं..
|
Anaghavn
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:11 am: |
| 
|
महेश, मलाही असच ऐकु यायच आणि त्यामुळे ते गाण आवडायचं. पण नन्तर सत्य कळालं.
|
Shanky
| |
| Friday, March 14, 2008 - 6:04 pm: |
| 
|
मला अजुन एक चुकिचे ऐकु आलेले गाणे बाई माझी करंगळी मोडली त्या मधे एक कडवे आहे समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा.. मी ही चिडले, विहिरीत पडले... :-) मला काही पत्ता लागत नव्हता..काही वर्षानी कळले..
|
Mitraa
| |
| Wednesday, March 19, 2008 - 7:36 pm: |
| 
|
वरचि पोस्ट वाचुन मागे इथेच कुठेतरी वाचलेल बुडाली बुडाली बुडाली खाता खाता बुडाली हो ऽ आठवल (कुणाच्या तरी सुपुत्राच्या बालभाषेतील निम्बुडा निम्बुडा...)
|
Kedar123
| |
| Saturday, April 05, 2008 - 10:12 am: |
| 
|
मागे असाच कुठलासा चित्रपट आलेला 'हमराझ' (अर्थातच नवा) त्यामधे एक गाण होत 'अखीया लडा लडा .......' त्यात मधल्या कडव्यात बॉबी देओल त्याच्याहून ५-६ वर्ष मोठ्या असलेल्या आजीला (१) ऐकवतो तूझी जर अशीच कृपा द्रूष्टी राहीली तर ' गो नानी अगले साल तू परपोता खिलायेगी" (२) ते कित्येक दिवस माझ्या टारगट कानांना ' तू करकोचा खिलायेगी' अस काहीस ऐकू यायच. आणी 'करकोच्या' खाणार्या त्या आजी आणि नातवाच्या जोडीच जाम कुतुहल वाटायच (१) प्रश्न : 'बॉबी देवोल' ला नातू आणि 'मोठ्या बहीणी सदृष महिलेला आजी का बर म्हणायच उत्तरांचे पर्याय: १) बॉबी देवोल बडे (बेवडे) बाप का बेटा हाय म्हणून २) बॉबी देवोल आजी पेक्षा उंच आहे म्हणून ३) आजीने केस रंगवले आहेत म्हणून ४) आले अब्बास मुस्तान च्या मना म्हणून (२) आजीची कृपाद्रूष्टी राहीली तर परपोता कसा उगवणार उत्तरांचे पर्याय: १) निसर्गाची करणी आणि नारळात पाणी तस २) तेच तर रहस्यपटातल रहस्य आहे ३) अमीषा आणी बॉबीची नाडी जूळली असेल ४) हिंदी चित्रपट अचाट आणि अतर्क्य असतात म्हणून
|
Runi
| |
| Monday, April 14, 2008 - 10:27 pm: |
| 
|
तोहफा सिनेमातल गाण आहे ना 'तोहफा तोहफा तोहफा, लाया लाया लाया, प्यार का तोहफा तेरा' त्याबद्दल. माझ्या नवर्याने सागितले त्याला लहानपणी वाटायचे की हीरो कुठुन तरी लढाई करुन खुप तोफा जिंकुन आणतो आणि त्या सगळ्या तोफा तो हीरॉइनला देतो. त्या देत असतांना हे गाणे म्हणतो तोफा तोफा तोफा...लाया लाया लाया.
|
Itgirl
| |
| Tuesday, April 15, 2008 - 12:44 am: |
| 
|
रुनी, रोमात आहेस का हल्ली? येत नाहीस कुवेतला? वाचनात गर्क?
|
Dakshina
| |
| Tuesday, April 15, 2008 - 5:29 am: |
| 
|
रुनी, .... अशक्य.... आणि पुढे त्या तोफ़ा काय करायच्या म्हणे? त्यानेच आणून दिलेल्या, त्याच्यावरच डागायच्या... 
|
Chyayla
| |
| Tuesday, April 15, 2008 - 8:54 am: |
| 
|
हीरो कुठुन तरी लढाई करुन खुप तोफा जिंकुन आणतो आणि त्या सगळ्या तोफा तो हीरॉइनला देतो. रुनी..
|
त्यानेच आणून दिलेल्या, त्याच्यावरच डागायच्या>>>> अरेरे. हल्ली प्रेमा साठी काहीही करु नये. ऐवढ्या जड जड तोफा प्रेमात भेट दिल्या तर आजकालच्या प्रेमिका लगेच त्या डागन्याची भाषाच करतात. . कलयुगाचा परिनाम दुसर काय. दक्षिना दिव्यांचा सोयी साठी ईमेज व टिचकी मारावी.
|
Dakshina
| |
| Wednesday, April 16, 2008 - 5:58 am: |
| 
|
अहो केदार, तुम्हीच हलके घ्या... गंमत पण किती मनावर घेता?
|
Hkumar
| |
| Wednesday, April 16, 2008 - 10:12 am: |
| 
|
झिमझिम झरती श्रावणधारा.... हे गीत मी इतके दिवस 'रिमझिम पडती..' असे म्हणायचो. दशरथ पुजारींवरील लेखात त्याचे बरोबर शब्द कळले.
|
Aashu29
| |
| Friday, April 18, 2008 - 3:58 am: |
| 
|
हम साथ साथ मधला abcd गाण्यातला तो जागतिक पॉझ मला अजुनहि नाहि कळाले रे लोक्स, काय जोक आहे ते(रडवेल्या चेहेर्याचि स्माइली)
|
Mpa
| |
| Friday, April 18, 2008 - 6:57 pm: |
| 
|
चला म्हन्जे मी एकटीच नाही आहे. ते गाण (जोक) न समजणारी. हुश
|
Avikumar
| |
| Friday, April 18, 2008 - 7:12 pm: |
| 
|
मला पण नाही कळलं.... चला, म्हणजे मी पण काही अगदी 'हा' नाहिये.. .... माझी बायको (होणारी) असं का बरे म्हणते मग मला सारखं सारखं...कुणास ठाउक..
|
HKumar , तू 'रिमझिम पडती' ऐकायचास, मी 'श्रावण गारा' ऐकायचो. 'गारा' आणि 'रिमझिम' ची भट्टी काही जमायची नाही, तरी नेटाने गायचो! आशू, अविकुमार आणि Mpa , त्या abcd गाण्यात एक पाॅज़ घेऊन शेवटची दोन yz अक्षरं उच्चारल्या जातात. ते yz एका प्रख्यात मराठी शिवीचं acronym नाही वाटत? पसायदानातली एक ओळ- 'जे खळांची लंगोटी सांडो' अशी गायली जायची!
|