Bee
| |
| Monday, March 17, 2008 - 4:27 am: |
| 
|
माधुरी दिक्षितनी एक मराठी अंगाई गीत म्हंटले आहे मराठीत त्याची फ़ित youtube वर आहे. जर 'मराठी माधुरी दिक्षित' असे काहीबाही शोधून पाहिले तर दिसेलही. छान येते तिला मराठी. मी असे ऐकले आहे की नाना पाटेकर मुळचा अकोल्याचा आहे. शक्यच नाही.. अकोल्याची लोकं इतकी सणकी.. नो वे!
|
शरद केळकर मराठी असला तरी हिन्दी भागात(युपी का एमपी मधे)(लहानचा)मोठा झाल्याने हिन्दी चा प्रभाव जास्त आहे.
|
Giriraj
| |
| Monday, March 17, 2008 - 7:29 am: |
| 
|
अकोल्याची लोकं इतकी सणकी.. नो वे! >>> इतकीच कशी सणकी असतिल?? नो वे!
|
नाना मुरुडचा (रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिर्या वाला) आहे.
|
बी माधुरीची अन्गाई http://www.youtube.com/watch?v=mu_RrcRTvqk
|
Ashbaby
| |
| Monday, March 17, 2008 - 8:25 am: |
| 
|
आशा भोसले चे १ २ चाचाचा हे गाणे आहे का कुठे युट्युबवर? मी खुप शोधले पण सापडले नाही. साधना
|
Bee
| |
| Monday, March 17, 2008 - 2:50 pm: |
| 
|
>>> इतकीच कशी सणकी असतिल?? नो वे!>> अकोल्याबाहेर पडली की आपोआप सणकी होतात :-)
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:17 am: |
| 
|
अकोल्याबाहेर पडली की आपोआप सणकी होतात :-)>> >>>> म्हणजे गिरि आणि बी तुम्ही दोघेही अकोल्यातुन बाहेर पडलेला आहात तर दिवे, पाण्याच्या बादल्या, अग्निशमनाचा बंब सगळेच घ्या मित्रहो
|
इथं काहीतरी वेगळे पण अचाट आणि अतर्क्यच चालू दिसतेय. दिवे घ्या म्हणूनही पुढचे गोंधळ का होतात ते आत्ता लक्षात आलं माझ्या. भाराभर दिवे वाटले की एखादा तरी हातातून पडून आग लागणारच. त्यामुळं दिवे दिले की पुढं आग लागलीच समजा. आता तर आगीच्या आधीच अग्निशमनाचे बंब आणि पा. च्या बा. पण येणार दिसतेय. आणि हो हे वाचल्यावर दिवे घ्याच (काळजीपूर्वक).
|
ती माधुरीची अंगाई एकली. ती अशी का एकदम घाटी स्वरात गात होती. डोळ्य्या म्हणते ना त्यावेळेला,म्हणजे टोन तसा वाटला काय राव स्टाईल मध्ये. ...
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:22 pm: |
| 
|
सं.मित्रा... lol lol lol!!!
|
Tiu
| |
| Tuesday, March 18, 2008 - 9:39 pm: |
| 
|
घाटी स्वरात म्हणजे काय?
|
Malavika
| |
| Wednesday, March 19, 2008 - 1:50 pm: |
| 
|
माधुरीने आपल्या मराठीपणाची लाज न वाटू देता छान अंगाई म्हणून दाखवली हे खूपच स्तुत्य आहे. ती दुसरी बया मात्र बघवत नव्हती.
|
Lalitas
| |
| Wednesday, March 19, 2008 - 2:19 pm: |
| 
|
"मराठीपणाची लाज"? वाईट वाटलं वाचून....
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 19, 2008 - 4:42 pm: |
| 
|
>>डोळ्य्या म्हणते ना त्यावेळेला,म्हणजे टोन तसा वाटला<< तुला घाटी म्हणजे काय म्हणायचंय ते कळलं नाही पण तो जो काही डोळिया वाला टोन आहे ना तो खास कोकणातला चित्पावनी टोन आहे. कोकणातलाच, सपे नाही. जातिवाचक होतंय माफ करा पण पुण्यातले, सांगलीवाले नातेवाइक आणि कोकणातले नातेवाइक (चित्पा असल्याने!) यांच्या उच्चारातला फरक फारच जाणवण्यासारखा आहे म्हणून पटकन लक्षात आला. कुणाला त्रास वाटला तर तोतुबुदोस!
|
Malavika
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:55 pm: |
| 
|
ललिता, मराठीपणाची लाज एव्हढ्यासाठी म्हणले, कारण बर्याच सेलिब्रीटीज आपला मराठीपणा लपवायला बघतात. आजकाल तसे केल्या शिवाय तुम्ही "पुढरलेले" वगैरे समजत नाहीत. उपरोधाने मी तसे म्हणले.
|
नाना पाटेकर मला तरी बिल्कुल सणकी वाटत नाही. कोकणातला असल्यामुळे तो एकदम रोखठोक आहे. मुंबई फ़ेस्टिव्हलमधे तीजनबाईचे महाभारत आख्यान चालू होतं. (हा काय प्रकार आहे ते एकदा ऐकून बघा... अंगावर सर्रकन काटा उभा राहिला अभिमन्युवध ऐकताना) या कार्यक्रमाला नाना उशीरा आला. सभागृह खच्चून भरल्यामुळे काही ठराविक मंडळी उठून त्याला इथे बसा... इत्यादि सुरू केले. त्याने त्या सर्वाना डोळे वटारून कार्यक्रम सुरू झालाय गप्प बसा अशा अर्थाची खूण केली.. आणि चक्क तो प्रेक्षकामधे खाली पायरीवर बसला. आता ज्याना त्याने गप्प बसवले त्याना तो सणकी वाटला असेल... मला नाही वाटला.
|
Farend
| |
| Wednesday, April 02, 2008 - 2:49 pm: |
| 
|
आता इथे येऊद्या कोणते अ. आणि अ. आहेत व नाहीत वगैरे.
|
Ashbaby
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:38 am: |
| 
|
फ़रेंड, चांगले काम केलेत. दिवाना मस्ताना हा पण अ. आणि अ. आहे पण त्याने हसवले मात्र अगदी पोट धरून.... मम्मी मम्मी गाण्यात गोविंदा उलटा छतावर पण चाललाय.. साधना
|
Farend
| |
| Tuesday, April 15, 2008 - 11:01 pm: |
| 
|
हा घ्या आजचा हास्यडोस. सनी ची ही कौशल्ये माहीत असती तर शोलेत धरम कशाला त्या आगीत तो 'सुरंग बनाने का औजार' गरम करत बसला असता, फक्त दोन मिनीट सनीच्या हातात दिले की काम झाले
|