|
Dakshina
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:35 am: |
| 
|
ओझोनच्या थराला पडलेल छिद्र हे आधी जे रेफ़्रिजरेटर आणि A/C वापरायचे त्याच्यामुळे आहे. >>>> आणि आजकाल प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणार्या बॉडी स्प्रेज मूळे त्यात वाढ होते आहे.
|
Bee
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:45 am: |
| 
|
झक्कासराव, पण त्यावेळी असे काही होईल हे कुणाच वैज्ञानिकांना माहिती नव्हतं. आता ही लोक जागरुक होत आहेत. झपाट्यानी तोडगा काढण्याचा प्रयास करत आहेत. ह्याच विषयाच्या संदर्भात, मध्यंतरी ह्या वैज्ञानिकांची बाली मधे मीटिन्ग होती. मला कळेना की बाली सारख्या राज्यात इतक्या गहन प्रश्नाची चर्चा कशाला. मग कळले की ह्यातली राजकारण आहे. कारण बालीला आणखी आणखी पर्यटक स्थळ बनवायचे आहे म्हणून. ACN वरती सारख्या बालीच्याच बातम्या बघावयास मिळत. उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद.
|
Ladtushar
| |
| Thursday, February 21, 2008 - 6:19 am: |
| 
|
>> आणि आजकाल प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणार्या बॉडी स्प्रेज मूळे त्यात वाढ होते आहे काही तरीच काय हो.....हे म्हणजे कावळ्या च्या शापाने गाईचे मरणे
|
Ashwini_k
| |
| Thursday, February 21, 2008 - 6:33 am: |
| 
|
Ozone layer ला भोक पडणे हे CFC व तत्सम वायूंचा परीणाम आहे व हा परीणाम वैज्ञानिकांना फ़ार पुर्वी कळला होता पण हे गॅसेस emit झाल्यानंतर atmosphere च्या सगळ्यात वरच्या भागात (जिथे ozone असतो) जायला ५० वर्षे लागतात, तेव्हा खूप अवकाश आहे या वृत्तीने त्यावर तोडगा काढणे लांबले. अजूनही Kyoto Protocol सर्व विकसित देशांनी कुठे sign केला आहे? (लाईफ़स्टाईलच तशी, त्यांचा चंगळवाद सगळ्या जगाला भोवणार!)ऑस्ट्रेलिया आता कुठे तयार होत आहे. Carbon Credits चे गाजर पुढे करावे लागले, आता बघू!
|
Zakasrao
| |
| Thursday, February 21, 2008 - 9:35 am: |
| 
|
बी अरे माहित असुन देखिल टाळण हा तर एक मोठाच खेळ आहे रे. आताच मध्ये एक परिषद झाली. अश्विनी यानी जे उदाहरण दिलय तीच. त्यात ऑस्ट्रेलिआ आताशी तयार झाली आहे तो प्रोटोकॉल पाळण्यासाठी. अजुन अमेरिकेची सही झालेली नाही. त्यात फ़क्त एवढच आहे की ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी कार्बनची जे प्रदुषण होतय ते कमी करायचे आहे. तर त्यावर बुश यांच उत्तर होत की त्यापेक्षा नवीन टेक्नोलॉजी वापरुन त्याव्र तोडगा काढला पाहिजे. कार्बन कमी प्रमाणार सोडणे हा तोडगा नाही. आता मला सांग प्रिथ्वीचा काही हजार किलोमीटर भाग पाण्याखाली गेल्याअवर नवीन टंत्रज्ञान मिळणार असेल तर आताच स्वत्:वर बंधन नकोत का?? जेणेकरुन आहे हे संवर्धन होइल नवीन तंत्रज्ञान सापडेपर्यंत. पण नाही. गळ्यापर्यंत आल्याशिवाय अस कस बरं लग्गेच मान्यता देता येइल अशा गोष्टीना.
|
उधळपट्टी ही व्वाईट हे खरे पण ग्लोबल वॉर्मिंग हे माणसामुळेच झाले आहे हे निर्विवाद सिद्ध झालेले नाही. इतिहासात अनेकदा ग्लोबल वॉर्मिंग होऊन गेले असे दिसते. ४००-५०० वर्षापूर्वी अशी एक लाट आली होती. त्यापूर्वीही आल्या असतील. तेव्हा मानव प्रगत नव्हता त्यामुळे माणसाने खूप कार्बन डायोक्साईड सोडला हे कारण नव्हते. त्यामुळे सध्याच्या वॉर्मिंगमधे माणसाचा सिंहाचा वाटा आहे हे कशावरून अमेरिकेतील कठोर काययांमुळे कित्येक शहरातील हवा दहा वर्षापूर्वी होती त्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. झाडे जास्त आहेत. अप्रगत देशात प्रदूषण उत्तरोत्तर वाढत आहे. त्यावर काही निर्बंध नाहीत.
|
Ashwini_k
| |
| Friday, February 22, 2008 - 5:47 am: |
| 
|
शेंडे न., ग्लोबल वॉर्मिंग मानवनिर्मित आहे किंवा नाही, असल्यास किती, यावर अजूनही अभ्यास चालू आहे. पण आत्तापर्यंतचा available statistical data हेच सांगतो. तसेच little ice age मधे मधे येऊन जात असेल पण retreating and advancing glaciers ची तुलना केली तर retreat जास्त आहे. brown clouds, acid rains, de-forestation हे प्रॉब्लेम्स मानवनिर्मित नाहीत का? अशा अनेक गोष्टी ग्लोबल वॉर्मिंगचे either causes or consequences आहेत. आपण नक्किच आपल्यापरीने प्रयत्न करू शकतो. उदा. कागदाचे, प्लॅस्टिकचे recycling. Recycling of 4 ft high stack of newspapers can save one good size tree ., रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरापेक्षा vermicompost वापरावे ( greenhouse gases कमी उत्सर्जित होतील). मग नेहमिच virgin plastic वापरायची चंगळ का? कागद, biodegradable wastes नुसत्या कचर्यात टाकण्यापेक्षा त्याचे असे उपयोग नक्की करता येतील. अप्रगत देशातील समस्या वेगळ्याप्रकारच्या आहेत. त्यांच्याकडे या disaster ला तोंड द्यायला ना पैसा, ना awareness . त्यामुळे ते जास्त affect होणार. आणि हे मानवनिर्मित असो वा नसो, "वसुधैव कुटुम्बकम" या नात्याने या वसुधेचे व पर्यायाने आपले रक्षण करणे त्यासाठी आपल्या चंगळीला मुरड घालणे याचा विचार करायला नको का? अमेरिकेसारख्या big brothers नी तर हवाच हवा.
|
म्हनुन आत्तर वापरावे.. ईस्प्रे वाप्रु नये.
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 9:25 am: |
| 
|
ग्लोबल वार्मींगची झळ अजून कित्येकांना लागली नाही. खूप जणांना हे नक्की काय आहे तेही माहिती नाही. पण पर्यावरणाचा तोल तसाही ढासळत आहे हे आपण बघतोच आहे ना आणि ह्याला आपण किती जबाबदार आहोत ह्याचीही अनेक उदाहरणं माहिती आहेतच ना सर्वांना. मुख्य म्हणजे वृक्षतोड आणि दाट काळकुट्ट धुर सोडणारे कारखाणे. आपल्या देशात आधीच घाण आहे त्यात आपण सुशिक्षित लोकही कुठेही केर फ़ेक करतच असतो ना? किंवा असे होत असताना बघत असतोच ना? सुटसुटीत कायदे आणि लोकशाहीचा गैरवापर ही देखील एक चंगळच म्हणावी लागवी.
|
Dakshina
| |
| Monday, February 25, 2008 - 9:01 am: |
| 
|
>> आणि आजकाल प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणार्या बॉडी स्प्रेज मूळे त्यात वाढ होते आहे काही तरीच काय हो.....हे म्हणजे कावळ्या च्या शापाने गाईचे मरणे >>>> I was just referring to body sprayes and it's contents, because it is one of the associate which is one of the cause for damage to ozone layer, and not the strong reason.
|
Dakshina
| |
| Monday, February 25, 2008 - 9:03 am: |
| 
|
>> आणि आजकाल प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणार्या बॉडी स्प्रेज मूळे त्यात वाढ होते आहे काही तरीच काय हो.....हे म्हणजे कावळ्या च्या शापाने गाईचे मरणे >>>> I was just referring to body sprayes and it's contents, because it is one of the associate which is one of the cause for damage to ozone layer, and not the strong reason.
|
Ladtushar
| |
| Monday, February 25, 2008 - 9:32 am: |
| 
|
भा. पो. दक्षिणा !!! माझे सागंण्याचे तात्पर्य एवढेच आहे की या ग्लोबल वार्मींग वर परिणामकारक वस्तुंचा किमान वापर जरी आपण टाळू नाही शकलो तरी कमालीचा अतिरेक टाळू शकतो.... पण या किमान गरजेच्या वापराला चंगळवाद म्हणू नये.
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 5:35 pm: |
| 
|
तर त्यावर बुश यांच उत्तर होत की त्यापेक्षा नवीन टेक्नोलॉजी वापरुन त्याव्र तोडगा काढला पाहिजे. हा त्यानी भारत चीन इ. देशातील लोकांना केलेला उपदेश आहे. अमेरिकेत आजकाल आहे कुणाकडे एव्हढी अक्कल! मी तर नेहेमी म्हणतो, बरं तर बरं, भारत, चीन यांची लोकसंख्या जास्त आहे. ते लोक इथे येऊन त्यांनी काही केले तरच जमेल. अमेरिकनांच्या कडून काही होईल अशी अपेक्षा नाही.
|
Manuswini
| |
| Monday, February 25, 2008 - 6:42 pm: |
| 
|
हा बीबी आताच वाचला, चंगळवाद म्हटले तर एक गोष्ट अजीबात पटत नाही उधळपट्टी. आणि ती कुठेही असो. लग्नामध्ये दिखाऊपणासाठी केलेली उधळपट्टी मला अजीबात खपत नाही. दुसरे म्हणजे त्यामागची वृत्ती. बघा आम्ही आमच्या मुलासाठी इतका खर्च करून लग्न केले. आमाच्याकडे आहे म्हणून आम्ही उधळतो. कोणाला आणि कशाला तो मोठेपणा दाखवतात लोक लग्नात? असो.. हे माझे मत आहे चंगळवादावर. आणि एकच उदाहरण... आणि बरेच आहेत..........
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 8:08 pm: |
| 
|
अहो मनुस्वीनि, तुम्ही विचारले किती खर्च येतो लग्नाला म्हणून सांगितले हो, भोळेपणाने, प्रांजळपणे. त्यात कुणाला काही प्रौढी दाखवण्याचा हेतू नव्हता. अरे देवा. यापुढे या मायबोलिवर खरे बोलायची, मोकळेपणे बोलायचीच चोरी झाली आहे. हटकेश्वर, हटकेश्वर!
|
Manuswini
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:19 am: |
| 
|
Oh my God! हे काय, झक्की तुम्हाला का असे वाटले की तुम्ही तिथे लिहिले त्यावर मी टीका करतेय? अरे बापरे! मी कुठल्या विचाराने लिहिले नी तुम्ही अगदी बादरायण संबध लावलात. कृपया मी तुमच्या कुठल्याही लिखाणावर टीका म्हणून वरील पोस्ट केली नाही ह्याची नोंद घ्यावी. आजकाल लग्नसराईचा मौसम चालु आहे नी तिथे हे प्रकार अजूनही दिसतात, तीच metality म्हणून लिहिले. तुमचा काही संबध नाही वरील पोस्ट मध्ये. मीच हटकेश्वर म्हटले पाहीजे. काही लिहायची सोय नाही. लोक आपापल्य्य समजुतीने विचार करतील. हटकेश्वर! हटकेश्वर!
|
Zakki
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:52 pm: |
| 
|
जाउ द्या हो मनुस्वीनि. माझे लिहीलेले काय मनावर घेता? मी कधीच रागावत नाही. तसा मी आजकाल खरे बोलायला घाबरत नाही. फक्त आज एक तर उद्या एक असे होते, नि लोकांना वाटते मी खोटे बोललो, वगैरे. मला अशी सवयच आहे, इकडचे तिकडे करायची. म्हणूनच गोष्टी सापडत नाहीत. म्हणून तीन तीन चष्मे, घड्याळे वगैरे घ्यावे लागते. मग लोक 'चंगळवाद' म्हणाले तरी हरकत नाही! आता तुम्ही रागावला नसाल अशी आशा आहे.
|
Sandu
| |
| Tuesday, February 26, 2008 - 9:19 pm: |
| 
|
आता मी रागवलो आहे. तुमचे भांडण येथेच संपणार म्हणून.
|
Tonaga
| |
| Wednesday, February 27, 2008 - 3:14 pm: |
| 
|
तुम्ही अगदी बादरायण संबध लावलात>>>> मनुस्विनी असे म्हणू नका, झक्की साहेब लगेच अस्माकं बदरी, तस्माकं बदरी असला श्लोक सुरू करतील....
|
Ladtushar
| |
| Wednesday, March 12, 2008 - 8:22 am: |
| 
|
चंगळवादा वर मुंबईकरां साठी तोडगा! http://www.carpoolmumbai.com/
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|