Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2008

Hitguj » My Experience » मी केलेला 'स्ट्रगल' » Archive through February 18, 2008 « Previous Next »

Ambar
Wednesday, February 13, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं तर 'मी' हा कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाचा आवडता शब्द!
त्या 'मी' करता प्रत्येकाला काहितरी स्ट्रगल' करावाच लागतो. ह्यातुन अगदी अंबानी ही वाचलेले नाहीयेत.
इकडे आपल्यापैकि खुप जणांच्या अशा असतील ह्याचि खात्री आहे. मी स्वत: फार काही स्ट्रगल केलाय असा माझा समज नाहीये.पण इकडे येणार्‍या काहि 'इन्स्पायरिन्ग' पोस्टिंग्स वाचायला आवडतील.


Ambar
Thursday, February 14, 2008 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाच सुरुवात करायला लागेलका?

Lalu
Thursday, February 14, 2008 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, तेवढा स्ट्रगल करावा लागेल. ~D

Swaatee_ambole
Thursday, February 14, 2008 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


       

Savyasachi
Thursday, February 14, 2008 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>इकडे आपल्यापैकि खुप जणांच्या अशा असतील ह्याचि खात्री आहे.

:-) नक्की काय म्हणायचे आहे?
लालू, जबरी :-)


Manuswini
Thursday, February 14, 2008 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, तुझ्या ह्या जोकवर एवढे जोरात हसायला आले ऑफ़ीसमध्ये की मागच्या दोन कुबीकल वाल्यांनी उठून बघितले माझ्याकडे.

सही....


Rutu_hirwaa
Friday, February 15, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु
मी पण एकटीच हसत बसले तुझा जोक वाचून ग्रेट


Shonoo
Friday, February 15, 2008 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू वेल्कम ब्याक गं

Ashusachin
Friday, February 15, 2008 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझा हे पुस्तक वाचा :-)

Sas
Friday, February 15, 2008 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, तेवढा स्ट्रगल करावा लागेल >>>> :-)

Lalu
Friday, February 15, 2008 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol अंबर स्ट्रगल करायला गेला की काय? :-) ~D

बीबीचा उद्देश चांगला आहे, 'इन्स्पायरिन्ग स्टोरीज':-). पण लोकांना स्वतःबद्दल असेच वाटत असेल की 'त्यात एवढे काय केले?' ही गोष्ट काही अंशी खरीही आहे. आपल्या आजूबाजूच्या पाचपन्नास लोकांचीही तीच कहाणी असते, मग त्यात सांगण्यासारखे काय्- असे वाटू शकते. 'कष्ट' म्हणजे 'स्ट्रगल' नव्हे, कष्ट हा त्याचा एक भाग झाला. काही मिळवायचे म्हणजे कष्ट हे सगळ्यांनाच करावे लागतात, पण सगळ्यांनाच झुंजावे लागते असे नाही. बिकट परिस्थिती, विरोध आला की तिथे झुंज आली. बिकट परिस्थितीतून शैक्षणिक किंवा आर्थिक, व्यावसायिक कमाई याबरोबरच दुर्धर रोगाशी सामना करणे, सामाजिक अन्यायाला, भ्रष्टाचाराला तोंड देणे हे पण 'स्ट्रगल' मध्ये येऊ शकते.

मला असे वाटते की इथे फक्त स्वतःच्या गोष्टी लिहीण्यापेक्षा (स्वतःच्याही लिहायला हरकत नाही) आपल्या आजूबाजूच्या, माहित असलेल्या लोकांच्या, तुम्हाला ज्यामुळे inspiration मिळाले अश्या गोष्टीही लिहीता येतील. वर आशुसचिन ने लिहिले आहे त्याप्रमाणे अश्या काही लोकांवरची पुस्तकं असतील त्याचीही थोडक्यात माहिती देता येईल. पटले तर बीबीचे नाव बदलावे लागेल


Gajanandesai
Sunday, February 17, 2008 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा 'मी केलेला स्ट्रगल' नाही पण जवळून बघीतलेला आहे. लालूची वरची पोस्ट वाचून तो इथे लिहित आहे.
--------------------------------------------------------------------------------------

माझा एक जवळचा वर्गमित्र शाळेत पहिल्यापासून पहिला नंबर काढायचा. वडील सरकारी नोकरीत. सरकारी क्वार्टर्स मध्ये राहायचे. त्यांच्या गावाकडे त्यांची काही शेतीवाडीही होती, त्यामुळे त्याची आई गावाकडे राहून ती बघायची. याला आणि याच्यापेक्षा मोठ्या एका बहिणीला इकडे (मुंबईत) शिकायला आणलेले. सरकारी नोकरी म्हणजे आर्थिक परिस्थिती पण बेताचीच. शाळेत अभ्यासात आणि सगळ्याच उपक्रमांमध्ये हा चमकायचा यामुळे शाळेतील शिक्षकांचे याच्याकडे विशेष लक्ष असायचे. दहावीत आल्यावर तर याच्याकडून सगळ्या शाळेला अपेक्षा होत्या.

याच दरम्यान त्याच्या वडिलांची तब्बेत बिघडायला सुरुवात झाली. त्यात त्यांना फार त्रास व्हायचा आणि त्यातच त्यांचे नोकरीतील निवृत्तीचे वर्ष जवळ आलेले होते. तुटपुंज्या वेतनामुळे मुंबईत इतरत्र कुठे स्वतःचे घर घ्यायचे जमले नव्हते. त्यामुळे निवृत्तीनंतर राहण्यापासून ते शिक्षणापर्यंत मोठे प्रश्न त्यांच्या समोर होते. यावर वडिलांच्या निवृत्तीनंतर ते सगळे गावाला जाणार असे तो म्हणायचा. प्रत्यक्षात याला पुढे खूप शिकायची जबरदस्त इच्छा होती. मेडिकलला, अभियांत्रिकीला किंवा सी. ए. ला प्रवेश घेऊन ते सहज पूर्ण करण्याइतकी बुद्धिमत्ता त्याच्याकडे होती. पण वडिलांची तब्बेत अलीकडे वारंवार बिघडायची. आई जवळ असली म्हणजे नीट औषधोपचार, काळजी घेतली जाईल हे एक होतेच आणि निवृत्ती तोंडावर आल्यावर आईला इकडे आणून, मुंबईतील महागडे औषधोपचार करणे, आई इकडे आल्यावर गावाकडचा पसारा सगळा जैसे थे पडणार, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर याने काहीतरी शॉर्टकट करून नोकरीचे कुठेतरी बघायचे हे ओघाने आलेच. त्याचा स्वभाव एकदम समजूतदार, शांत आणि तडजोड करून घेणारा, पण या सगळ्यामुळे दहावीच्या वर्षात त्याच्या मनात बरीच खळबळ चाललेली असायची, पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे अवघड जायचे.

सुरुवातीपासून हुशार आणि गुणी म्हणून सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या याच्या मनात तेव्हा त्याची पण काही स्वप्ने असणारच की - पुढच्या शिक्षणाविषयी, करिअर विषयी, आयुष्याविषयी. त्याला त्याच्या इच्छा-आकांक्षांना केवढी मोठी मुरड घालायला लागतेय हे बघून मला खूप वाईट वाटायचे. यात दहावीची परीक्षा झाली. बोर्डात नाहीतरी तो शाळेत पहिला आला (यात विशेष काय नव्हते म्हणा). आता वडिलांच्या नोकरीचे एकच वर्ष राहिलेले त्यामुळे याने आयटीआयचा कोर्स करावा, तो पूर्ण होईपर्यंत कशीही तडजोड करायची मग नोकरीचे इथे जमतेय का बघून, नाहीतर गावाकडे जायचे असा वडिलांचा प्लॅन होता. याची विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावी नंतर अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायची खूप इच्छा होती. गुणवत्ता आणि इच्छा असूनही मेडिकलला जायचा विचार करणेही शक्य नव्हते. पण आता काय करायचे? अजूनपर्यंत जे आधी ठरलेले होते ते निर्णय म्हणजे - आपल्याला इच्छेप्रमाणे शिकता येणार नाही, शॉर्टकटचा अवलंब करावा लागणार - वगैरे ते आता प्रत्यक्षात आणायची वेळ आली होती. उत्तम गुण मिळवलेला दहावीचा रिझल्ट हातात होता, इतरांकडून येणारे अभिनंदनाचे वर्षाव होते, आणि दुसरीकडे मनात फुटू पाहणार्‍या नव्या इच्छांना थोपवणे चालू होते. अशा वेळी आयटीआयला प्रवेश घेणे मनातून अजिबात पटत नव्हते. वडिलांपुढे बोलायची हिम्मत व्हायची नाही कारण अलीकडे त्यांची तब्बेत फार नाजूक झाली होती, आणि स्वभाव तापट झाल्यामुळे ते स्वतःला फार त्रास करून घ्यायचे.

मी त्याचा जवळचा मित्र. मला पण त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे शिकायला मिळावे असे मनापासून वाटायचे. आम्ही दोघे कितीतरी वेळ या सगळ्यांवर बोलत राहायचो. यातून त्याने विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचे असे आम्ही परस्पर ठरवून टाकले! जी काही पुस्तके, नोट्स वगैरे लागतील ते माझ्याकडून घ्यायचे आणि बारावी करायची असे आमचे ठरले. आम्ही त्याच्या वडलांना माहीत पडू नये म्हणून काळजी घ्यायचो. हेतू एवढाच की त्यांना अजून त्रास होऊ नये. (तेव्हा माझी पण अक्कल किती असणार पुढचा सारासार विचार करायला? आपल्या विचारांच्या कक्षेबाहेरही अडथळे असू शकतात याची शक्यता त्यावेळी वाटली नाही.) घरी सांगितलेच नाही अकरावीला प्रवेश घेतलेला. मी माझ्या घरी थोडीफार कल्पना दिली होती, आणि मला एवढी खात्री होती की वेळ पडली तर माझ्या घरून आम्हाला पूर्ण पाठिंबा आणि काहीतरी खटपट करून का होईना, होईल ती आर्थिक मदत मिळेल. [या सगळ्यात त्याच्या वडिलांना त्या वेळी आणि आताही मी दोष देणार नाही. सगळे लिहिणे इथे शक्य नसले, तरी परिस्थीतीपुढे माणूस फार आगतिक होतो याच्याशी तुम्ही सहमत व्हाल.] पण आम्हाला तेव्हा जास्त कशाची धास्ती वाटत होती, तर ती म्हणजे त्याच्या वडलांना कळेल आणि त्यांना त्रास होईल. त्यांना त्रास व्हायला लागला म्हणजे ते बघणे केवळ अशक्य व्हायचे. पण शेवटी हे घरी कळलेच. मग त्याचे वडील खूप रागावले, त्रागा करून घेतला आणि त्याचा त्यांना फार त्रासही झाला.

दरम्यान याने BEST मध्ये अप्रेन्टीसचा अर्ज केला होता, तिथून कॉल आला. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर याने मागचा पुढचा विचार न करता कॉलेज सोडून तो कॉल स्वीकारला. अकरावीचे वर्ष सुद्धा पूर्ण होऊ शकले नव्हते. आपण उगीच त्याला सायन्सला प्रवेश घ्यायला दुजोरा देऊन तोंडघशी पाडले अशी अपराधी बोच मलापण लागून राहिली. झाले.. आता काय? विचारच खुंटले.

पण तो खरंच धीराचा. ते अर्धे वर्ष तो BEST मध्ये गेला आणि मग BEST वर्कशॉपच्या कामाच्या वेळा वगैरेचा सगळा विचार करून त्याने पुढच्या शैक्षणिक वर्षात रात्र-महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला! दिवसभर BEST चे वर्कशॉप आणि रात्री कॉलेज असे करत त्याने बारावी केली आणि बारावीला रात्रमहाविद्यालयांमधून गुणवत्ता यादीत राज्यातून पहिला आला! तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. त्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये याचे नाव फोटोसहित झळकले होते, आणि आम्ही वेड्यासारखे सगळ्या वर्तमानपत्रांच्या प्रती विकत घेत सुटलो होतो! उर्दू वर्तमानपत्राच्या देखील!!! आता हे लिहिताना पण मला तो दिवस आठवून अंगावर रोमांच आले.

या त्याच्या स्वबळावर त्याने मिळवलेल्या यशाने आणि सगळीकडून होणार्‍या कौतुकाच्या वर्षावाने त्याचे वडील सुखावले. पुढे त्याच्या इच्छेप्रमाणे शिकायला त्यांनी परवानगी दिली. पण आता काही दिवसांतच ते निवृत्त होणार होते. त्यामुळे राहण्याचा आणि अभियांत्रिकीच्या अवाढव्य खर्चाचा मोठा प्रश्न समोर होता. पुस्तके आणि अभ्यासाचे जे काही मटेरिअल लागेल ते मी माझ्याकडून देण्यात मला धन्यच वाटत होते. वर्तमानपत्रातील त्याच्या यशाची ती बातमी वाचून मुंबईतील अनेक उद्योजकांनी आणि संस्थांनी त्याला शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. (यात BEST ने मात्र कसल्याही प्रकारच्या मदतीसाठी कमालीची उदासीनता दाखवली.) दरम्यान त्याचे वडीलही निवृत्त झाले. याची राहायची व्यवस्था चुलतभावाने त्याच्याकडे स्वतःच्या घरी केली. वडील, बहिण गावी गेले. (नंतर वडलांच्या निवृत्तीसोबत मिळालेली रक्कम हाती आल्यावर त्यांनी कल्याणला एक घर घेतलं.)

आता एवढ्या ठेचा खाऊन का होईना पण तो अभियांत्रिकीच्या वर्गात बसू शकणार होता! लगेचच अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे अर्ज सुटले आणि आम्ही विनाविलंब तो भरून दिला. फीची व्यवस्था झाली आणि अभियांत्रिकीच्या मनाजोगत्या शाखेत मुंबई विद्यापिठाच्या एका महाविद्यालयामध्ये त्याला गुणवत्तेच्या बळावर विनासायास प्रवेश मिळाला. बस्स! आता त्याच्यापुढे एकच ध्येय होते.. अभ्यास!

चुलत भावाकडे राहून याचे अभियांत्रिकीचे वर्ष सुरू झाले खरे, पण तीन-चार महिने जातायत तोच नियतीने पुन्हा एकदा आपल्या एका हुलकावणीत निर्दयपणे त्याला अनिश्चिततेच्या खायीत ढकलून दिले. गावाकडे वडिलांची तब्बेत एकदम सिरिअस असल्याची बातमी मिळाली आणि तो कॉलेजमधून परस्पर गाडीत बसला.

तिकडे एव्हाना वडलांना सरकारी इस्पितळात हलवण्यात आले होते, आणि तिथेच दीर्घकाळासाठी ऍडमीट करून घेतले होते. घरी आई एकटीच. हा हॉस्पिटलमध्येच वडिलांसोबत (तालुक्याच्या गावी) राहू लागला.. याकाळात आम्ही एकमेकांना पत्रे लिहायचो. अशा परिस्थितीत त्याच्याशी काय बोलावे, त्याला धीर कसा द्यावा हे मला कळेनासे व्हायचे. इस्पितळातील तीन-चार महिन्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्याच्या वडलांचे दुर्दैवी निधन झाले... या घटनेचा आघात त्याची आई सहन करू शकली नाही. तिला नैराश्याचा झटका आला. स्वयंपाक करायचे लक्षात नाही, किंवा केल्यावर खायचे लक्षात नाही. तास-न्-तास शून्यात नजर लावून बसायची. तिचेही औषधोपचार चालू झाले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. लवकरच तिला माणसे ओळखू येईनाशी झाली. अशा अवस्थेत आता पुढे काय करायचे हा प्रश्न पुन्हा त्याच्यासमोर उभा ठाकला. त्याने लग्न करावे असा जोराचा आग्रह नातेवाईकांकडून झाला. लवकरच बहिणीचे लग्न होणार होते. मग आईचे काय? पण त्याच्या सासरी गेलेल्या मोठ्या बहिणी आईची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आल्या आणि तू मुंबईला परत जा आणि शिक्षण पुरे कर असे याला सांगितले. यासाठी त्याच्या बहिणींच्या सासरच्यांचेही कौतुकच वाटते.

तो परत मुंबईला आला. (दहावी-बारावीत शिकण्याच्या वयात वडील गेले आणि आईची अशी अवस्था म्हणजे कसे वाटले असेल.) तोपर्यंत पहिल्या सत्राची परीक्षा संपलीही होती. पहिल्या सत्राच्या एकाही पेपरासाठी याची उपस्थिती नसल्याने थेट दुसर्‍या सत्राची परीक्षा देता येत नव्हती. थोडक्यात ते वर्ष वाया गेले होते. हे कमी की काय, म्हणून पुढच्या वर्षाच्या शैक्षणिक वर्षात तुम्हाला परीक्षा द्यायच्या असतील तर एका शैक्षणिक वर्षाची फी पुन्हा भरावी लागेल असे कॉलेजने सांगितले. (परीक्षा फी नव्हे, ती वेगळीच). थोडक्यात "अभियांत्रिकी" ही खर्चिक चैन आपल्याला परवडणारी नाही असा विचार करून, मनावर मोठा दगड ठेवून त्याने अभियांत्रिकीचा निरोप घेतला...

यावेळी एक त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे त्याच्या वडलांच्या निवृत्त होतानाचे जे पैसे हाती आले होते, त्यात त्यांनी कल्याणमध्ये एक घर घेतले त्याचा ताबा मिळाला आणि राहण्याची स्वतःची अशी सोय झाली. बारावीचा निकाल आला तेव्हा काही उद्योजकांनी व्यक्तीशः पत्रे पाठवून मदत करण्याची इच्छा दाखवली होती. त्यातल्या एका सद्गृहस्थांशी याने संपर्क साधला आणि सगळी परिस्थिती त्यांना ऐकवली. त्यांनी याला अकाऊंटींग विभागात नोकरी देण्याची तयारी दर्शवली, शिवाय पुढे तुला शिकायचे असेल तर आर्थिक मदत करण्याचीही तयारी दाखवली. याने ती नोकरी धरली. आणि याची गाडी बारावी सायन्सनंतर व्हाया अभियांत्रिकी, प्रथम वर्ष वाणिज्य पदवीच्या रुळांवर आरूढ झाली! तो correspondence ने बी. कॉम्. करू लागला. कामावरून सुटल्यावर एका खाजगी शिकवणीत विज्ञान शाखेच्या अकरा-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाऊ लागला. अशा रितीने त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण संपवत आणले. या दरम्यान आता लग्न करून आईलाही इकडे आणावे आणि बहिणींवरची जबाबदारी आपण घ्यावी असा विचार त्याने केला. पण हेही त्याच्या मनाप्रमाणे व्हायचे नव्हते. कारण याचवेळी त्याच्या आईचेही निधन झाले...

ग्रॅज्युएशन नंतर त्याने केंद्रशासनातर्फे घेण्यात येणारी आयकर विभागाची परीक्षा दिली आणि त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. आयकर विभागाने चांगल्या पदासाठी त्याची निवड केली. आणि आत्तापर्यंत मदतीचा, धीराचा हात देणार्‍या बॉसनेही त्याला आनंदाने पुढच्या वाटचालीकरता निरोप दिला.


Uday123
Sunday, February 17, 2008 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद गनानन, असे परिस्थीतिशी झगडणारी लोकं आणी त्यांच्या कहाण्या वाचुन एक जगण्यासाठीचा एक नविन हुरुप येतो.



Divya
Sunday, February 17, 2008 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानान, तुमच्या मित्राचा struggle थक्क करणारा आहे, तरीपण त्याला engneering चे शिक्षण पुर्ण करता यायला हवे होते असे वाटत रहाते.

मी तरी यावर फ़ार belive करते कि तुम्ही फ़क्त कठपुतली असता आणि नियती तुम्हाला नाचवते. जरी तुम्ही कितीही म्हणाला कि हे मी struggle करुन मिळवल तरी ते नशीबात होत म्हणुनच मिळाल नाहीतर कितीही प्रयत्न केले तरी नसेल नशीबात तर मिळतच नाही.

असा struggle करुन वर आलेली माणस खुप स्वताची मुल्य जपणारी असतात.


Suyog
Sunday, February 17, 2008 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gajanan, really inspiring, nice one

Dineshvs
Monday, February 18, 2008 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, त्या मित्राचे अभिनंदन. खरे तर त्याला भेटण्याची खुप इच्छा आहे.

Limbutimbu
Monday, February 18, 2008 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी मी माझ्या फेव्हरीट मधे टाकून ठेवला हे! :-) अपेक्षा हे की बर्‍याच कहाण्या वाचून स्फुर्ती मिळेल! :-)

Aaftaab
Monday, February 18, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीच माझ्या एका मित्राची कहाणी.
तो माझा पहिलीपासूनचा मित्र.
तो, त्याच्या तीन मोठ्या बहिणी, त्यातली एक लग्नानंतर सोडलेली, त्याची विधवा आई आणि त्याचा छोटा भाऊ असे सगळे एका सहा x दहाच्या खोलीमध्ये रहायचे. घरात वीज नव्हती, रॉकेलचे दिवे वापरायचे. अशा परिस्थितीत दिवंगत वडिलांचा आधीचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय तो नि त्याची बहीण (त्याचे आणि त्याच्या भावाचे शिक्षण सांभाळत) करायचे. म्हणजे ते रस्त्याच्या कडेला बसून टॉवेल, बनियन वगैरे विकतात ना, तसा प्रकार. पाठीवर कपड्यांचे गठ्ठे वाहून त्याला कमी वयातच छातीत दुखणे वगैरे सुरू झालेले. तरी त्याने अभ्यासात मन लावून वर्गात पहिल्या दहा मध्ये असायचाच.
कुणाकुणाची थोडीथोडी मदत घेतघेत त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. PCM group ला छान मार्क मिळाले आणि पुन्हा scholarship आणि काही शिक्षकांनी केलेल्या मदतीवर त्याने अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला.
अधून मधून येणारे छातीतले दुखणे, मित्रांकडून कधी मदत, कधी हेटाळणी असा व्यवहार वगैरे सहन करत त्याने mechanical इंजिनीयरिंग पूर्ण केले आणि एका छोट्याश्या कंपनीत नोकरी धरली. तशाच घरात अजूनही ते कुटुंब राहात होते. तशाच परिस्थितीत त्याने लग्नही केले. त्या काळात माझा एवढा संपर्क नव्हता पण शहरात एक छोटेसे घर भाड्याने घेतले होते असे कळाले.
लग्नानंतर एका वर्षात बायकोला दिवस गेले. तिचे वय जास्त नव्हते आणि जुळ्याचे बाळंतपण होते. त्यातच त्याची कंपनी बंद पडली आणि तो एका दूरच्या गावी नोकरीसाठी गेला. जोडीला वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तू विकण्याचा उद्योगही संध्याकाळी करू लागला. भावालाही engineering ला घातले होते त्याचाही खर्च असायचा. बाळंतपणामध्ये रक्तस्त्राव जास्त होऊन त्याच्या पत्नीचे दु:खद निधन झाले. दोन जुळ्या मुली सुखरूप जन्मल्या होत्या.
आता बिन आईच्या दोन छोट्या बाळांची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यातच मोठी बहीण, जिचे लग्न होऊ शकले नव्हते, तिने आत्महत्या केली.
पुण्यात एका कंपनीमध्ये त्याने नोकरी धरली आणि खूप काम करून वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. त्याच्या सुदैवाने दुसरे लग्नही झाले आणि नवीन बायकोने दोन बाळांना आपल्या मुलींपमाणे वाढवले.
आज तो त्या कंपनीत marketing and technical support चा India region चा in-charge आहे. DGM ची पोस्ट आहे.
एखाद्याच्या नधीबात किती struggle असू शकते याचे हे एक उदाहरण आहे. त्याच्या बारावीच्या यशानंतर एक सर भाषणात म्हणाले होते.. "चार भिंतीच्या आत कुणीही दिवा लाऊ शकतो. पण वादळात दिवा लाऊन तो टिकवणाराच खरा..."


Dakshina
Monday, February 18, 2008 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतरांबरोबरच आपण स्वतः केलेला स्ट्रगल पण लिहूयात का?
नाहीतर बी. बी. चं नाव बदलून 'इतरांनी केलेला स्ट्रगल' असं ठेवावं लागेल....


Ambar
Monday, February 18, 2008 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन आणि आफताब आपल्या पोस्ट वाचुन खरच बर वाटतय!!हा बि बि चालु करायचा उद्देश हा अशाच काही 'इन्स्पायरिंग 'गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं असा आहे,त्याच्या मुळे आधिच्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष केलं आहे.त्याच्या वरच्या माझ्या कॉमेंट्स मुळे ह्या बिबि चा मुळ उद्देश बाजुला राहिल.
टॉपिक च नाव बदलायलाही माझी काहीच हरकत नाहीये:-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators