|
Ankyno1
| |
| Wednesday, April 02, 2008 - 3:55 pm: |
| 
|
सलग वेळ उपल्ब्ध होत नसल्यामुळे तुकड्या तुकड्यात विच्छेदन करतोय... डेव्हिड धवन च्या सिनेमाचं विच्छेदन असल्यामुळे तुम्ही कोणी मनावर घेणार नाही याची खात्री आहे...
|
Ankyno1
| |
| Wednesday, April 02, 2008 - 3:56 pm: |
| 
|
वन... प्लस वन... वन... प्लस वन... अशा पार्श्वसंगीतात दोन 'एक' डाव्या खालच्या कोपर्यातून उजव्या वरच्या कोपर्यात धावतात... अशी त्यांची धावपळ चालू असताना आपल्याला कोण कोण लोक कर्तब दाखवणार अहेत त्यांची नावं दिसतात... गोविंदा... संजय दत्त... अमृता अरोरा... नंदिनी सिंग (बहुतांश लोकांच्या चेहेर्यावर... "कोण ही" असं प्रश्णचिन्ह..)... अशी बरीच नावं सरकतात... पण जी नावं दिसणारच याची खात्री होती तीच दिसत नाहीत.... 'कादर खान आणि शक्ती कपूर' (डेव्हिड धवन चा सिनेमा या दोघांच्या शिवाय बनू शकतो?... अहो... सतीश कौशिक सुद्धा दिसला नाही... म्हणजे... काय बघायचं या सिनेमात? उरलंच काय... पण असो... तरीही तुम्ही जर माझ्यासारखे गोविंदा चे पंखे असाल तर तुम्हीही पुढे आख्खा सिनेमा बघाल याचि मला आणि डेव्हिड धवनलाही खात्री आहे... अहो आपल्यासाठीच तर काढलाय सिनेमा... आपणच नाही पाहिला तर मग कोण बघणार?...) तर अशा या धावपळीनंतर डेव्हिड चं नाव दिस्तं आणि कानावर आवाज येतो... "थर्टीफाइव पॉइंट वन टेक वन....." (हे मला असंच ऐकू येतं... तुम्हाला इतर काही येत असेल तर ते समजा... याचा अर्थ एव्हडाच.... सुरू.....) एक... एक... एक एक एक... एक और एक... एका टेंपो मधून काही लोक एक कपाट एका बंगल्यात आणतात... वॉचमन विचारतो... 'काय खजिना घेऊन आलात का'... 'दिसत नाही... कपाट आहे... तुझ्या मालकानी सांगितलं होतं...' कपाट आत ठेवतात आणि बरोब्बर... ठेका पकडून 'ग्यारा' असं गात कपाटातून 'तारा सितारा' बाहेर पडतात... (त्या कपाटाचा आणि दोघांचा साईझ बघता कपाट उचलणार्यांच्या हालतीची कल्पना येते...) चोरी करायला आलेले हे दोघे वीर... नाही.. पाजी... जोर जोरात गाणं म्हणतात... ते ही स्वतःचं वर्णन करणारं... मग टेप रेकॉर्डर, मूर्त्या वगरे फुटकळ वस्तू सक मधे भरतात... एक पिआनो ही उचलायचा प्लॅन असतो... पण पेलवत नाही आणि सॅक मधे मावत नाही म्हणून तसाच सोडून देतात आणि जाता जाता कॅमेर्यात बघत आपल्याला अंगठा दाखवतात.... (कि ऑल द बेस्ट... पुढच्या २-३ तासांसाठी....) मग ओम पुरी च्या आवाजात हे दोघं कोण याची माहिती आपल्याला पुरवली जाते.... थेट एका मिलिटरी बेस वर जॅकी आणि आशीष विद्यार्थी, अजीत वाच्छानी ला भेटतात... गेट वरच्या शिपायाला जॅकी विद्यार्थी ची ओळख एक सायंटिस्ट म्हणून करून देतो... (अरे चेहेर्यावरनंच जो तिसरी फेल वाटतो... तो सायंटिस्ट?)... असो... वाच्छानी नी एक अफलातून बंदूक बनवलेली असते... ज्याला पासवर्ड पण असतं.... (वा... वा... वाच्छानी) अशी बंदूक बनवणारा इसम हुशार असणारंच... तो बरोब्ब्र ओळखतो... की विद्यार्थी गोलमाल माणूस... आणि त्याला खोलीबाहेर काढतो... विद्यार्थी ला बहुतेक शाळेत पण वर्गाबाहेर उभं रहायची सवय असावी... तो ही विनातक्रार बहेर जातो... जॅकी बंदुकीचा पासवर्ड घेतो... पण मिशन चा कोड सांगू शकत नाही... एव्हड्याय जॅकी परत दरवाज्यात येतो... तिथला शिपाई बावचळतो... तो पर्यंत आतला जॅकी वाच्छानी ला मारून बंदूक पळवतो... तो आणि विद्यार्थी व्हॅन मधून पळतात.. नंतर आलेला जॅकी त्याचा पाठलाग करतो... व्हॅन मधल्या जॅकी ला बहेर खेचून काढतो.. त्याचा मास्क काढल्यावर तो गुलशन ग्रोवर असल्याचं उघड होतं.... (मास्क लावल्यावर त्याची उंची रुंदी सगळं वाढतं... द मास्क नंतर हाच मास्क... पण या मास्क चं काम इथेच संपतं...) आणि आपल्याला कळतं की जॅकी हा सैन्यात मेजर आहे... त्यानी पँथर ला पकडलय... पण कोब्रा पळून गेलाय... त्याच्या जवळ बंदूक आहे... पण पासवर्ड पँथर लाच माहिति असल्यानी कोब्राला त्याचा कही फायदा नाही... इंस्पेक्टर मुश्ताक खान दिनेश हिंगू ला सांगतो की २ चोरांपासून सावध रहा... पण हिंगू साहेबांना त्यंच्या टिपिकल स्टाईल नी हसणं सोडून काहीही कळत नसल्यामुळे त्ते दुर्लक्ष करतात... ते दोन चोर म्हणजेच आपले तारा सितारा... त्याच्याकडे नोकर बनून असतात... हे कळूनही तो पोलीस घराबाहेर छुपी गस्त-पहारा वगरे लावत नाही... दोघं पाजी आपण सुधारलो अहोत पण जेंव्हा चोर होतो तेंव्हा लोकांना कसं उल्लू बनवायचो याचं वर्णन करता करता हिंगू ला लस्से मधून गुंगीचं औषध पाजतात आणि तो गुंगल्यावर घर चकाचक करतात.... हे बाहेर गेले न गेले तोच इंस्पेक्टर परत येतो आणि कपाळाला हात लावतो... (अरे येड्या... जर माहिती होतं तर आधीच का नाही दबा धरून बसला... रंगे हाथ सापडले अस्ते ना दोघं.... पण जाउदे... या सिनेमात कोणालाही विचार करणं अलाऊड नाहिये... अगदी 'शंकर-एहसान-लॉय' नी ही डोकं बाजूला ठेऊन संगीत दिलंय.... क्रमशः
|
Shraddhak
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:27 am: |
| 
|
चांगलं चाललंय ऍंकी. पण प्लीज लिखाणाचा रंग लाल नको रे. डोळ्यांना त्रास होतो अगदी.
|
Zakki
| |
| Thursday, April 03, 2008 - 12:55 pm: |
| 
|
काहो या चित्रपटांचे पटकथा लेखन कुठे मिळते का? नि त्याचे गाईड पण? कारण ते दोन्ही जवळ ठेवून, थांबवत थांबवत चित्रपट पाहिल्याखेरीज, काय चालले आहे ते कसे कळणार? आणि तुम्ही क्रमश: लिहीले आहे म्हणजे अजून काही काही होणार आहे की काय? एव्हढे नुसते वाचूनच माझे डोके तीनचारदा गरा गरा फिरले.!
|
Ankyno1
| |
| Thursday, April 03, 2008 - 3:49 pm: |
| 
|
झक्की... डीव्हीडी घ्या.... सबटायटल्स सकट मिळेल.... एकदा पहाच.... डोकं नाही डीव्हीडी च्या स्पीड नी फिरलं तर मग तुम्हाला डेव्हिड धवन आणि सुभाष घई जातीनी पारितोषिक देतील.... श्र... आज खुप कमी वेळ आहे... पुढचा भाग उद्या टाकीन... आणि पुढचा भाग लाल नसेल.... घाबरू नको... इतर रंगात ही नसेल... काळ्या फाँट मधेच लिहीन...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|